Order Online Or Call Us: 0257-2232800, 2235520

संशोधन

राज्यशास्त्रातील संशोधन पद्धती

Research Methodology in Political Science

,

Rs.110.00

संशोधन ही सतत चालणारी बौद्धिक प्रक्रिया आहे. या प्रक्रियेत जुन्या त्रुटी दूर करून नवीन वस्तुस्थिती कोणताही पुर्वग्रह मनाशी न बाळगता मांडली जाते. जे साध्य व सिद्ध करायचे असते यासाठी विशिष्ट साधनांचा अथवा रचनांचा भौतिकशास्त्रात ज्या पद्धतीने अवलंब केला जातो तोच फरक हा संशोधनाचे तंत्र व संशोधन पद्धतीमध्ये दिसून येतो. राजकीय अथवा सामाजिक संशोधनात संशोधनाचा अभ्यास, विषयाकडे पाहण्याचा दृष्टिकोन हा सर्वांचा सारखाच असत नाही. संशोधनात आपल्या उद्दिष्टाशी, दृष्टीकोनाशी नेहमीच कटिबद्ध रहावे लागते. हा दृष्टीकोन ऐतिहासिक, तुलनात्मक, विश्लेषणात्मक, रचनात्मक, कार्यात्मक यापैकी कोणताही असू शकतो. संशोधनात बुद्धीनिष्ठता, वस्तुनिष्ठता, तर्कशुद्धतेचा विशेष अवलंब केला जातो.

सामाजिक शास्त्रातील संशोधनामध्ये संशोधकाचा संबंध हा वास्तविक घटनांशी तसेच सजीव व्यक्तीशी येत असतो. राज्यशास्त्रातील संशोधनामध्ये प्रतीकांची व तथ्यांची हाताळणी व पडताळणी सहेतुक पद्धतीने करावी लागते. विशिष्ट वस्तू किंवा व्यवस्थेविषयी, समस्येविषयी डोक्यात येणारी कल्पना म्हणजे ढोबळ मानाने संकल्पना होय. या संकल्पनेचे अवलोकन करून संशोधक निष्कर्ष काढत असतो. हे निष्कर्ष संशोधनाचे स्वरूप ठरविण्यासाठी महत्वाचे असते. संशोधनात कोणतीही घटना किंवा प्रसंग भावनेच्या चष्म्यातून पाहिला जात नाही. तर वारंवार त्याची पडताळणी केली जाते आणि मगच तथ्यापर्यंत पोहचता येते.

सामाजिक परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घटनांची वास्तवता कशी शोधावी, राजकीय घटना अथवा घडामोडींचा अन्वयार्थ कसा लावावा, राजकीय सिद्धांताची मांडणी कशी करावी, राजकीय तसेच त्या अनुषंगाने सामाजिक स्वरूपाची गृहीतके कशी मांडावीत तसेच त्यांची पडताळणी करून निष्कर्षाची मांडणी कशा पद्धतीने करावी यासाठी प्रस्तुत ग्रंथ उपयोगी आहेच त्याचबरोबर संशोधनाची ओळख, त्यांचे स्वरूप, संशोधनाची वैशिष्ट्ये, आव्हाने, समस्या व संशोधनाच्या पद्धती, त्याची गृहीतके तसेच ध्येय आणि उद्दिष्टांच्या माहितीचे स्पष्टीकरण यांचेही मुद्देसूद विवेचन शास्त्रीय पद्धतीने केले आहे.

Rajyashastratil Sanshodhan Paddhati

  1. संशोधनाची ओळख : 1.1 संशोधनाचा अर्थ व व्याख्या, 1.2 संशोधनाचे स्वरूप व महत्त्व, 1.3 संशोधनाची वैशिष्ट्ये, 1.4 संशोधनातील आव्हाने व समस्या
  2. संशोधन पद्धती : 2.1 संशोधन पद्धतीचा अर्थ, 2.2 गृहितके, 2.3 संशोधनाचे ध्येय व उद्दिष्ट्ये
  3. संशोधनातील अहवाल लेखन : 3.1 माहितीचे संकलन, 3.2 नमुना निवड, 3.3 अहवाल लेखन, 3.4 निष्कर्ष व संदर्भ ग्रंथ सूची

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “राज्यशास्त्रातील संशोधन पद्धती”
Shopping cart