Order Online Or Call Us: 0257-2232800, 2235520

साहित्य समीक्षा

साहित्य समीक्षा विचार

,

Rs.225.00

‘अनुभूतीचा आविष्कार’ म्हणजेच साहित्य होय. लेखकाला झालेली ही ‘कलात्मक अनुभूती’ सार्वत्रिकतेचा स्पर्श झाल्यामुळे आनंददायी असते. रसिक वाचक तिचा आस्वाद घेतो. त्यातील ‘जीवनानुभव’ समजून घेऊन आपली जाण समृद्ध करतो. म्हणूनच मानवी जीवनात ‘साहित्य’ क्षेत्र महत्त्वाचे ठरते. ‘साहित्य विचारा’इतकेच महत्त्व ‘साहित्य समीक्षे’ला आहे. समीक्षा व्यापार हा ‘साहित्यकृती’शी संबंधित आहे. लेखक-रसिक वाचक-समीक्षक त्या साहित्यकृतीतील आशय समजून घेऊन आपले अनुभवविश्व समृद्ध करतात. समीक्षक विशिष्ट साहित्यकृतीचे संदर्भात सर्वसमावेशक अशा मूल्यमापनातून आपला ‘मूल्यनिर्णय’ देतो तेव्हा समीक्षा साकारते. साहित्य व समीक्षा हे अभ्यासक्षेत्र परस्पराश्रयी आहे. या दोन्ही क्षेत्रातील मूलभूत संकल्पना समजून घेतल्या म्हणजे त्याच्या निर्मितीची क्षमता आत्मसात करता येते.
प्रस्तुत पुस्तकातून साहित्य व्यापाराशी संबंधित भारतीय व पाश्चात्य साहित्यशास्त्राची संकल्पना, व्याख्या, साहित्याची प्रयोजने, साहित्य निर्मितीची प्रक्रिया, साहित्यांची भाषा, शैलीविचार इ. घटकांचा परिचय करुन देत असतानाच ‘साहित्य आणि समीक्षा’ यांचे परस्पर संबंध, समीक्षा संकल्पना, समीक्षेची भाषा, समीक्षापद्धती यांचाही यथायोग्य परिचय करुन देण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे.

Sahitya Vichar V Samiksha

  1. साहित्याचे स्वरुप आणि प्रयोजन : 1.1 साहित्य संकल्पना व व्याख्या, 1.1.1 भारतीय साहित्यविचारातील व्याख्या, 1.1.2 पाश्चात्य साहित्यविचारातील व्याख्या, 1.1.3 साहित्य अनुभवांचे विशेष, 1.2 साहित्याची प्रयोजने, 1.2.1 मम्मटाची प्रयोजने, 1.2.2 पाश्चात्यांची प्रयोजने, 1.2.3 मराठी साहित्यिकांची प्रयोजने
  2. साहित्याची निर्मितीप्रकिया : 2.1. साहित्यनिर्मिती : एक अलौकिक घटना, 2.2 साहित्यनिर्मितीचे प्रधान कारण :  प्रतिभाशक्ती, 2.1.1 प्रतिभाशक्ती : व्याख्या व स्वरुप, 2.2.2 प्रतिभाशक्तीचे कार्य, 2.2.3 साहित्यनिर्मितीची इतर गौण कारणे, 2.3 स्फुर्ती व कल्पनाशक्ती : स्वरुप व कार्य, 2.4 साहित्यत्यिकाचे व्यक्तिमत्वाचा विशेष
  3. साहित्याची सामाजिकता व भाषा : 3.1. साहित्य आणि समाज, 3.2 वाङ्मयीन मूल्ये व जीवनमूल्ये, 3.3 साहित्याची भाषा, 3.3.1 शब्दार्थांचा वक्रव्यापार – शब्दशक्ती, 3.3.2 अलंकार विचार, 3.3.3 वक्रोक्ती विचार, 3.3.4 रूपक, प्रतिमा, प्रतीक, प्राक्कथा, 3.4 शैलीविचार : संकल्पना व प्रकार
  4. समीक्षा : संकल्पना व स्वरुप : 4.1. समीक्षा : व्याख्या व स्वरुप, 4.2 समीक्षा : प्रकार व प्रयोजन, 4.3 साहित्यविचार व समीक्षा यातील अनुबंध, 4.4 समीक्षेचे कार्य
  5. साहित्य आणि समीक्षा यांचे परस्पर संबंध : 5.1. साहित्यकृती आणि रसिक वाचक, 5.2 साहित्यकृती :  लेखक – वाचक – समीक्षक, 5.3 समीक्षा व्यापाराचे घटक, 5.3.1 आकलन व आस्वाद, 5.3.2 विश्लेषण व मूल्यमापन
  6. समीक्षा व्यापार आणि समीक्षकाचे गुण व पथ्ये : 6.1. समीक्षा व्यापार, 6.2 समीक्षकाचे गुण, 6.3 समीक्षकाने पाळावयाची पथ्ये, 6.4 समीक्षेचे उपयोजन, 6.4.1 ग्रंथ परिचय, 6.4.2 ग्रंथ परीक्षण, 6.4.3 ग्रंथ समीक्षा, 6.5 समीक्षेचा भाषिक मूल्यव्यवहार

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “साहित्य समीक्षा विचार”
Shopping cart