Order Online Or Call Us: 0257-2232800, 2235520

साहित्य समीक्षा

साहित्यातील मानवतावाद

Rs.395.00

माणसाच्या सर्वकष कल्याणाचा विचार मानवतावादात येतो. माणसाच्या सर्व समस्यांचे निराकरण मानवतावादात अपेक्षित आहे. माणूस हा मानवतावादाचा केंद्रबिंदू आहे. माणसाला कोणत्याही गटा-तटात किंवा भेदोभेदात अडकवणे चुकीचे आहे. धर्म, पंथ, जात, लिंग, वंश, देश, प्रदेश, अशा कोणत्याही भेदांत विघटिकत करुन माणसाचा विचार होऊ नये, कोणत्याही नैसर्गिक सुविधेपासून, लाभापासून माणसाला वंचित ठेवणे, ही मानवतावादविरोधी क्रिया आहे.
साहित्य म्हणजे उच्चभ्रूंची मक्तेदारी का? साहित्य म्हणजे उच्चवर्गीयांच्या ऐय्याशी भावना का? साहित्य म्हणजे गोर्‍या वर्णाच्या लोकांचा उत्सव का? साहित्य म्हणजे श्रीमंताचा बडेजाव का? साहित्य म्हणजे फक्त साक्षर लोकांची अनुभूती का? साहित्य म्हणजे आयुष्यात स्थैर्य प्राप्त झालेल्या लोकांची संकुचित सामाजिक जाणीव का? साहित्य म्हणजे गोरगरिबांची लाचारी तर नव्हे, साहित्य म्हणजे दुःखितांचा अनावर हुंकार तर नव्हे. साहित्य म्हणजे नाडलेपण, गाडलेपण तर नव्हे. साहित्य म्हणजे दीनदलितांची पिळवणूक तर नव्हे, साहित्य म्हणजे सामान्य माणसाची, किंबहुना असाक्षर माणसाची उपेक्षा तर नव्हे, साहित्य म्हणजे हजारो वर्षांपासूनच्या गुलामीत डांबलेल्या प्रत्येक घरातील स्त्रियांचे मुकेपण तर नव्हे, साहित्य म्हणजे खेडूतांना गावंढळ संबोधून संस्कृती प्रवाहाच्या बाहेर ढकलणे तर नव्हे?
साहित्य लिहिणारा माणूस असतो, साहित्य वाचणारा माणूस असतो. साहित्यातून अभिव्यक्त होणाराही माणूसच असतो ; साहित्य वाचणारा माणूस असतो. साहित्यातून अभिव्यक्त होणाराही माणूसच असतो:; त्यामुळे साहित्य माणसाचे आहे; ते संस्कारित असणे गरजेचेच आहे. माणसासाठी साहित्य मानवतावादी पद्धतीने अभिव्यक्त झाले, तर मानवतावादी संस्कृती प्रवाहाला सक्षमता प्राप्त होऊ शकते!

Sahityatil Manavatavad

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “साहित्यातील मानवतावाद”
WordPress › Error

There has been a critical error on this website.

Learn more about troubleshooting WordPress.