Order Online Or Call Us: 0257-2232800, 2235520

अर्थशास्त्र

समग्रलक्षी अर्थशास्त्र (S.Y.B.Com.)

Macro Economics

Rs.395.00

अर्थशास्त्र हे एक मानवी जीवनाशी निगडीत असे मानवी वर्तणूकीचे अध्ययन करणारे सामाजिक शास्त्र आहे. आज जगातील प्रमुख अर्थव्यवस्था आर्थिक सुधारणांच्या माध्यमातून आपला विकास साध्य करीत आहेत. खासगीकरण, उदारीकरण जागतिकीकरण माध्यमातून जगाच्या अर्थव्यवस्था एकमेकांमध्ये मिसळत आहेत, जगाचे जागतिक खेड्यात रूपांतरण होत आहे. अर्थशास्त्र या अभ्यास विषयाचा विकास हा व्यापारवादी विचारसरणी, निसर्गवादी विचारसरणी, सनातनपंथीय विचारसरणी, नवसनातनपंथीय विचारसरणी, आधुनिक विचारसरणी, नव-नव सनातनपंथीय विचारसरणी अशा अनेक परस्पर पुरक आणि परस्परविरोधी विचारसरणीतून झालेला आहे. ‘समग्रलक्षी अर्थशास्त्रा’मध्ये समग्र मागणी, समग्र पुरवठा, एकूण उत्पादन, एकूण राष्ट्रीय उत्पन्न, एकूण बचत, एकूण गुंतवणूक, एकूण रोजगार/बेरोजगारी, सामान्य किंमत पातळी या समग्रलक्षी चलांच्या वर्तणूकी व त्यांचे परस्पर संबंध या महत्त्वपूर्ण घटकांचा समावेश होतो. समग्रलक्षी अर्थशास्त्र व्यक्तीगत वा विशिष्ट घटकाचा अभ्यास न करता समुच्चय आणि समुच्चयाच्या वर्तणुकीचा अभ्यास करते त्याचप्रमाणे समग्रलक्षी अर्थशास्त्र अर्थव्यवस्थेला विकासाची दिशा दर्शनाचे कार्य करते.
प्रस्तुत पुस्तकात राष्ट्रीय उत्पादन व राष्ट्रीय उत्पन्न, समग्र मागणी, समग्र पुरवठा, एकूण रोजगार, एकूण उत्पन्न, एकूण उपभोग खर्च, एकूण बचत, एकूण गुंतवणूक, आर्थिक विकास, आर्थिक वृद्धी, व्यापार चक्रे, भाववाढ व भावघट, विदेश व्यापार, विदेश चलन विनिमय दर, समग्रलक्षी चल, त्यांचे परस्पर संबंध, एकमेकांवरील प्रभाव, बेरोजगारी, दारिद्य्र, विषमता ह्या समग्रलक्षी समस्या, त्यांचा उत्पादन, रोजगार, प्रभावी मागणी, पुरवठा बाजूवर पडणारा प्रभाव, समस्या सोडविण्यासाठी वित्तीय धोरण, चलन विषयक धोरण, विदेश व्यापार धोरण या महत्त्वपूर्ण घटकांचा सर्वांगीण समावेश केला आहे.

Samagralakshi Arthashastra – SYBCOM

 1. समग्रलक्षी अर्थशास्त्राचा परिचय : 1.1 समग्रलक्षी अर्थशास्त्र म्हणजे काय?, 1.2 समग्रलक्षी अर्थशास्त्राचे स्वरूप, 1.3 समग्रलक्षी अर्थशास्त्राची व्याप्ती, 1.4 समग्रलक्षी अर्थशास्त्राचे महत्त्व, 1.5 समग्रलक्षी अर्थशास्त्राच्या मर्यादा, 1.6 समग्रलक्षी आर्थिक विरोधाभास
 2. राष्ट्रीय उत्पन्न आणि सामाजिक लेखांकन : 2.1 राष्ट्रीय उत्पन्न : अर्थ आणि व्याख्या, 2.2 राष्ट्रीय उत्पन्नाच्या संकल्पना व त्यांचे मापन, 2.3 राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याच्या पद्धती, 2.4 राष्ट्रीय उत्पन्न मोजण्यातील अडचणी
 3. समग्रलक्षी अर्थशास्त्राचा सनातन दृष्टीकोन आणि रोजगार व उत्पादनाचे सिद्धांत : 3.1 सनातन दृष्टीकोन, 3.1.1 जे.बी.से यांचा बाजार नियम, 3.1.2 सनातन दृष्टिकोनाचा सारांश, 3.2 से व सनातन दृष्टीकोनावरील केन्सची टिका
 4. सामान्य रोजगार सिद्धांताबाबतचा केन्सचा आधुनिक दृष्टिकोन : 4.1 केन्सच्या सिद्धांताची पार्श्वभूमी आणि प्रमुख वैशिष्ट्ये, 4.2 प्रभावी मागणीचे तत्त्व, 4.3 पूर्ण रोजगार आणि अपूर्ण रोजगार संतुलन, 4.4 प्रभावी मागणीचे महत्त्व, 4.5 भाववाढकारक अंतर, 4.6 द्विक्षेत्रिय अर्थव्यवस्थेतील बचत-गुंतवणूक दृष्टीकोन, 4.7 बचतीचा विरोधाभास
 5. उपभोग आणि बचत फलन : 5.1 उपभोग फलनाचा अर्थ, 5.2 उपभोग व बचत फलनातील तांत्रिक संकल्पना आणि त्यांची वैशिष्ट्ये, 5.3 उपभोग प्रवृत्ती आणि बचत प्रवृत्ती यांच्यातील संबंध, 5.4 केन्सचा उपभोगविषयक मानसशास्त्रीय नियम, 5.5 उपभोग फलनाचे महत्त्व/केन्सच्या नियमाचा सूचितार्थ, 5.6 उपभोग फलनाचे निर्धारक, 5.7 बचतीचे निर्धारक, 5.8 बचतीचा/मितव्ययतेचा विरोधाभास
 6. गुंतवणूक फलन : 6.1 गुंतवणूक फलन, 6.2 गुंतवणूकीचा अर्थ, 6.3 गुंतवणूकीचे प्रकार, 6.4 प्रेरित गुंतवणूकीचे निर्धारक, 6.4.1 भांडवलाच्या सीमांत कार्यक्षमतेचा घटता दर, 6.5 भांडवलाच्या सीमांत कार्यक्षमतेवर प्रभाव टाकणारे घटक, 6.6 गुंतवणूक प्रोत्साहित करण्याचे उपाय, 6.7 व्याजदर आणि भांडवली साधन संचय/साठा, 6.8 बचत-गुंतवणूक समानता दृष्टिकोन
 7. गुंतवणूक गुणक आणि प्रवेग तत्व : 7.1 गुंतवणूक गुणक, 7.1.1 गुणकाचा अर्थ, 7.1.2 गुणक आणि सीमांत उपभोग प्रवृत्ती यांच्यातील संबंध, 7.1.3 गुणक प्रक्रिया/उत्पन्न प्रसार, 7.1.4 गुणक सिद्धांताची गृहिते, 7.1.5 उत्पन्न प्रसार प्रक्रियेतील गळती, 7.1.6 गुणकाचे महत्व, 7.1.7 गुणकाच्या मर्यादा, 7.2 प्रवेग तत्व, 7.2.1 प्रवेग/त्वरकाचा अर्थ, 7.2.2 प्रवेगाची गृहिते, 7.2.3 प्रवेगाची क्रियाशीलता, 7.2.4 प्रवेग तत्वाच्या मर्यादा, 7.2.5 गुणक-प्रवेग परस्पर क्रिया
 8. पैशांचा पुरवठा : 8.1 पैसा : व्याख्या आणि अर्थ, 8.2 पैशाची कार्ये, 8.3 पैशाचा पुरवठा आणि पैशाच्या पुरवठ्याचे मापन, 8.3.1 पैशाचा पुरवठा : अर्थ, 8.3.2 पैशाच्या पुरवठ्याचे दृष्टिकोण, 8.3.3 भारतीय रिझर्व्ह बँक दृष्टिकोण, 8.3.4 रिझर्व्ह बँकेच्या पैशाच्या पुरवठ्याचे इतर मापन आणि त्यांचे घटक, 8.3.5 रोखतेच्या आधारावर पैशाच्या पुरवठ्याचे नवीन मापक, 8.4 पैशाचा पुरवठा आणि व्यापारी बँकांची भूमिका, 8.4.1 बँक : अर्थ अणि व्याख्या, 8.4.2 बँकाची कार्ये, 8.4.3 पतनिर्मिती प्रक्रिया आणि ठेव गुणक, 8.4.4 पतनिर्मिती प्रक्रियेच्या मर्यादा, 8.5 पैशाचा पुरवठा आणि मध्यवर्ती बँक, 8.5.1 मध्यवर्ती बँकेची कार्ये, 8.6 भारतीय रिझर्व्ह बँक आणि पत नियंत्रण, 8.6.1 पतनियंत्रणाची उद्दिष्ट्ये, 8.6.2 पतनियंत्रणाची चलन विषयक साधने, 8.7 भारतीय रिझर्व्ह बँकेकडून अल्पकालीन रोखतेचे व्यवस्थापन
 9. पैशाची मागणी : 9.1 पैशाच्या मागणीचे निर्धारक, 9.2 पैशाच्या मागणीचे सिद्धांत, 9.2.1 सनातन दृष्टिकोण, 9.2.2 केन्सचा दृष्टिकोण/केन्सचा रोखता प्राधान्य दृष्टिकोन
 10. पैशाच्या मूल्याचे सिद्धांत : 10.1 पैशाचे मूल्य, 10.2 पैशाचे मूल्य निश्चिती, 10.3 पैशाचा परिमाण/चलन संख्यामान सिद्धांत : फिशर दृष्टिकोण, 10.4 केंब्रिज रोख शिल्लक समीकरण, 10.5 मिल्टन फ्रिडमनचा पैशाचा परिमाण सिद्धांत
 11. व्यापार चक्र : 11.1 व्यापार चक्र : अर्थ, 11.2 व्यापार चक्रांची वैशिष्ट्ये, 11.3 व्यापार चक्रांचे प्रकार, 11.4 व्यापार चक्राच्या अवस्था, 11.5 व्यापारचक्राची कारणे
 12. समग्रलक्षी आर्थिक समस्या : 12.1 अती चलन वृद्धी/चलन विस्तार/भाववाढ, 12.2 भाववाढीचे प्रकार, 12.3 भाववाढकारक अंतर, 12.4 भाववाढीचे सिद्धांत, 12.4.1 मागणी ओढ/ताणजन्य भाववाढ सिद्धांत, 12.4.2 खर्चदाबजन्य भाववाढ, 12.5 भाववाढीची कारणे, 12.6 भाववाढीचे परिणाम, 12.7 भावघट/चलनसंकोच, 12.7.1 भावघटकारक अंतर, 12.8 भावघटीची कारणे आणि परिणाम, 12.8.1 भावघटीची कारणे, 12.8.2 भावघटीचा परिणाम, 12.9 भाववाढ आणि भावघट रोखण्यासाठी उपाययोजना, 12.10 फिलीप्स वक्र : भाववाढ आणि बेरोजगारी यांच्यातील सम-मूल्यन, 12.11 जडत्व जन्य भाववाढ, 12.12 विवेकशिल अपेक्षा आणि फिलीप्स वक्र
 13. समग्रलक्षी आर्थिक धोरणे : 13.1 समग्रलक्षी धोरणाचे इष्टांक/लक्ष्य, 13.2 समग्रलक्षी आर्थिक धोरणाचा अर्थ आणि उद्दिष्ट्ये, 13.3 समग्रलक्षी आर्थिक धोरणे, 13.3.1 चलनविषयक/मौद्रीक धोरण, 13.3.2 वित्तीय धोरण
 14. मंदीयुक्त भाववाढ आणि पुरवठा बाजूचे अर्थशास्त्र : 14.1 मंदीयुक्त भाववाढ, 14.2 पुरवठा बाजूचे अर्थशास्त्र, 14.2.1 पुरवठा बाजू अर्थशास्त्राचा दृष्टिकोण, 14.2.2 पुरवठा बाजूच्या अर्थशास्त्राची मध्यवर्ती कल्पना, 14.3 कर कपात आणि समग्र पुरवठा, 14.4 कर कपात आणि सरकारचा महसूल : ऑर्थर लाफेर वक्र, 14.5 पुरवठा बाजू अर्थशास्त्राचे टिकात्मक मूल्यमापन
 15. आंतरराष्ट्रीय व्यापार : 15.1 आंतरराष्ट्रीय व्यापार, 15.1.1 व्यापार : अर्थ, 15.1.2 अंतर्गत व आंतरराष्ट्रीय व्यापारातील साम्य आणि भेद, 15.2 आंतरराष्ट्रीय व्यापाराचे फायदे आणि तोटे, 15.3 व्यापारतोल आणि व्यवहारतोल, 15.3.1 व्यापारतोल, 15.3.2 व्यवहारतोल, 15.3.3 व्यापारतोल आणि व्यवहारतोल यांच्यातील फरक, 15.3.4 व्यवहारतोलाच्या जमा आणि देणे बाजू, 15.3.5 व्यवहारतोलाची रचना, 15.3.6 आधिक्य आणि तुटीचा व्यवहारतोल संकल्पना, 15.4 व्यवहारतोलातील असमतोल : अर्थ, 15.5 व्यवहारतोलात असमतोलाची कारणे, 15.6 व्यवहारतोलातील असमतोल दूर करण्याचे उपाय, 15.7 मुक्त व्यापार धोरण, 15.8 संरक्षणाचे धोरण
 16. विदेश चलन विनिमय दर : 16.1 विनिमय दर, 16.2 विदेश चलन विनिमय दर निश्चिती, 16.3 स्थिर विनिमय दर आणि बदलते व तरंगते विनिमय दर, 16.3.1 स्थिर विनिमय दर, 16.3.2 बदलते किंवा लवचिक विनिमय दर, 16.4 विदेश विनिमय दरावर प्रभाव टाकणारे घटक, 16.5 विनिमय नियंत्रणाचा अर्थ, 16.6 विनिमय नियंत्रणाची उद्दिष्टे

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “समग्रलक्षी अर्थशास्त्र (S.Y.B.Com.)”
Shopping cart