Order Online Or Call Us: 0257-2232800, 2235520

संरक्षणशास्त्र

संरक्षण व सामरिकशास्त्र : मुलभूत संकल्पना आणि भारत

Defence and Strategic Studies : Basic Concepts and India

Rs.695.00

संरक्षण या विषयाचा विचार करताना, मानवाला संरक्षण ही संकल्पना कधी व का सुचली असावी, असा प्रश्न पडतो. त्याच्या आदिम किंवा प्राथमिक अवस्थेत स्वसंरक्षणासाठी त्यास निसर्गाशी व जंगली श्वापदांशी सतत झगडावे लागत असे. कालांतराने तो प्रगत झाला. मानव प्राणी मनुष्य या संज्ञेला जेव्हापासून पात्र झाला व मानव संस्कृतीचाही विकास झाला तेव्हापासून तो संरक्षणाचा अधिक विचार करू लागला. त्यामधून संरक्षण या संकल्पनेचा विकास झाला. आज तर मानव व मानवी संस्कृतीचा खूपच विकास झालेला आहे. त्याच्या वैज्ञानिक संशोधनातून त्याने प्रत्येक क्षेत्रात नेत्रदीपक प्रगती केली आहे. परंतु संरक्षणाचे विचार त्याच्या मनाने आजही हद्दपार तर केले नाहीतच, उलट तो संरक्षणाच्या तरतुदींमध्ये अधिकाधिक गुंतत चालला आहे. स्वसंरक्षणासाठी त्यास पर्यावरण संरक्षण व पर्यावरण संतुलन देखील तितकेच महत्त्वाचे आहे. पर्यावरण संरक्षण हे मानवी संसरक्षणासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. याच दृष्टिकोनातून संरक्षण संकल्पनेचा परीघ विस्तृत झाला आहे.

‘संरक्षण व सामरिकशास्त्र : मूलभूत संकल्पना आणि भारत’ हा नाविण्यपुर्ण माहितीने नटलेला ग्रंथ आपल्याकडे सोपवताना अतिशय आनंद होत आहे. महाराष्ट्रातील सर्व विद्यापीठातील पदवी व पदव्युत्तर वर्गातील संरक्षण व सामरिकशास्त्र, राज्यशास्त्र, तसेच नेट व सेट राज्यशास्त्र, संरक्षण व सामरिकशास्त्र यांचा अभ्यास करण्यासाठी हा ग्रंथ उपयुक्त पडेल.

Sanrkshan V Samarikshastra

 1. संरक्षण आणि सामरिकशास्त्र : प्रस्तावना; संरक्षण : अर्थ, व्याख्या, व्याप्ती; राष्ट्रीय संरक्षण : अर्थ व व्याख्या, व्याप्ती, संरक्षण धोरणाचा अर्थ, संरक्षण धोरणाचे घटक, संरक्षण धोरणाचे पवित्रे
 2. सुरक्षा आणि त्यासंदर्भातील संकल्पना : प्रस्तावना; सुरक्षा किंवा सुरक्षितता : अर्थ आणि व्याख्या; राष्ट्रीय सुरक्षा: अर्थ आणि संकल्पना, महत्त्व, स्वरूप, व्याप्ती, उद्दिष्टे, तत्त्वे आणि घटक
 3. संघर्ष व शांतता : प्रस्तावना; संघर्ष : अर्थ, संघर्षाचा अभ्यास, इतिहास, स्वरूप, व्याप्ती, वैशिष्ट्ये, प्रकार, संघर्ष नियंत्रण, संघर्षाचे व्यवस्थापन किंवा संघर्षाला प्रतिबंध घालण्याचे किंवा निवारण करण्याचे तंत्र
 4. युध्द आणि युध्दतत्त्वे : युद्ध : अर्थ, व्याख्या, व्याप्ती, स्वरूप, कार्ये, कारणे, परिणाम, युद्ध टाळण्याचे उपाय; युद्धतत्त्वे : उद्दिष्टांची निवड व त्यांचे सातत्य, आक्रामक कार्यवाही, केंद्रीकरण
 5. युद्धनिती किंवा सामरिकता किंवा डावपेच : प्रस्तावना; विशाल युध्दनीती : व्याख्या, अर्थ आणि संकल्पना, उद्देश; युद्धनीती: व्याख्या, अर्थ आणि संकल्पना, उद्देश, प्रकार, महायुद्धनीती व युद्धनीतीतील फरक
 6. समकालीन युद्धपद्धती : पारंपारिक युद्ध : पारंपरिक युद्ध, अणुयुद्धातील पारंपारिक युद्धपद्धती; मर्यादित युद्ध : मर्यादित युद्धाची वैशिष्टे, मर्यादित युद्धाचे स्वरूप; आधुनिक किंवा सर्वंकष युद्ध : स्वरूप
 7. क्रांतीकारी युद्धपद्धती किंवा मंदगतीची युद्धकार्यवाही : क्रांतीकारी युद्धपद्धती : प्रस्तावना, क्रांतिकारक युद्धाचे घटक; गनिमी युद्ध: अर्थ, संकल्पना, युद्धनीती, गनिमी युद्धनीतीचे डावपेच, वैशिष्ट्ये, तत्त्वे
 8. आधुनिक युद्धपद्धती : रासायनिक किंवा गॅस युद्धपद्धती : अर्थ आणि संकल्पना, उद्देश किंवा उद्दिष्टये, स्वरूप, परिणाम करणारे घटक, युद्ध खेळण्याच्या पद्धती, प्रकार व त्यापासून मानवावर होणारे परिणाम
 9. युद्धाचे अर्थशास्त्र : प्रस्तावना; भारतीय अर्थव्यवस्थेची वैशिष्टे; आर्थिक युद्धपद्धती : अर्थ किंवा संकल्पना, उद्दिष्टे, स्वरूप, व्याप्ती, युद्ध खेळण्याचे प्रकार/आर्थिक युद्धाच्या पद्धती
 10. विविध प्रदेशातील युद्धधारणा : मैदानी प्रदेशातील युद्धपद्धती : वैशिष्टे, सेना व शस्त्रास्त्रे, पुरवठाव्यवस्था; वाळवंटी प्रदेशातील युद्धपद्धती : वैशिष्टे, सेना व शस्त्रास्त्रे, पुरवठाव्यवस्था
 11. भारताचे लष्करी सज्जता किंवा सिद्धता किंवा तयारी : प्रस्तावना; भारतीय स्वातंत्र्य आणि सेनेची विभागणी; भूसेना व लष्करी सज्जता किंवा सिद्धता किंवा तयारी : पहाडी प्रहारी दल, ऑर्डनन्स फॅक्टरी-(ओएफ)
 12. आण्विक तंत्रज्ञान व त्या संदर्भातील करार : प्रस्तावना; अणुशक्तीचे शांततेसाठीचे प्रयत्न; इंटरनॅशनल अ‍ॅटोमिक एनर्जी एजन्सी (आयएईए); अणुशक्तीचे शांततेसाठीचे उपयोग; अणुतंत्रज्ञान हस्तांतरण

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “संरक्षण व सामरिकशास्त्र : मुलभूत संकल्पना आणि भारत”
Shopping cart