Order Online Or Call Us: 0257-2232800, 2235520

सेट / नेट / जेआरएफ - मार्गदर्शन

संशोधन पद्धती (प्री पीएच.डी. कोर्स वर्क व संशोधकांना उपयुक्त)

Research Methods (Pre-Ph.D.)

Rs.150.00

संशोधन पद्धती हे संशोधन करण्याच्या तंत्राविषयी माहिती देणारे शास्त्र आहे. सामाजिक शास्त्रातील संशोधन हे विज्ञान शाखेतील संशोधनाइतकेच शास्त्रशुद्ध व अर्थपूर्ण व्हावे यासाठी संशोधनाच्या तंज्ञाची माहिती असणे आवश्यक आहे. मानसशास्त्र, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, इतिहास, राज्यशास्त्र इ. विषयांमध्ये अलिकडे संशोधनाचे महत्त्व वाढतच आहे. आधुनिक युगात आणि जगात संशोधनाला अनन्य साधारण महत्त्व प्राप्त झालेले आहे. तेव्हा संशोधन करतांना संशोधकाला संशोधन कार्याबद्दल माहिती व्हावी. संशोधन करताना संशोधकाला विषयाची पद्धतशीर माहिती असणे आवश्यक असल्यामुळे प्री पीएच.डी. अभ्यासक्रमाला भारतातील सर्व विद्यापीठामध्ये प्री. पीएच.डी. कोर्ससाठी सामाजिक संशोधन पद्धतीचा पेपर अनिवार्य केला आहे. तेव्हा मराठी माध्यमाच्या संशोधकांसाठी वस्तुनिष्ठ प्रश्नांसाठीच्या पुस्तकाची होणारी परवड लक्षात घेऊन हे पुस्तक निर्माण करण्याचा लेखकांचा प्रयत्न आहे.
सामाजिक संशोधनात वस्तुनिष्ठता व तटस्थता राखणे तसे कठीण आहे, परंतु वैज्ञानिक पद्धतीचा अवलंब करून सामाजिक घटनांचे शासत्रीय पद्धतीने अध्ययन करून नवीन ज्ञान प्राप्त करणे शक्य होते. प्री पीएच.डी. च्या संशोधकांना संशोधनाचा मार्ग सुकर व्हावा यासाठी सामाजिक संशोधनासंबंधीचे ज्ञान सरळ व सोप्या पद्धतीने उपलब्ध व्हावे हाच उद्देश यामागे आहे. त्याचबरोबर संशोधन विषयक दृष्टीकोन या घटकांतर्गत येणार्‍या नेट सेट परीक्षेतील मागील प्रश्नपत्रिकेंमध्ये प्रश्नांचाही यात समावेश करण्यात आला आहे.

Sanshodhan Padhati

  1. अभ्यासक्रम (उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव)
  2. विद्यावाचस्पती (सुधारीत नियमावली)
  3. वस्तुनिष्ठ प्रश्न (संशोधन पद्धतीशास्त्र)
  4. निवडक प्रश्नांची स्पष्टीकरणे
  5. संशोधन पद्धतीशास्त्र-पुरक माहिती (ललितकला, भाषा, मानस निती सामाजिक शास्त्रे शाखा)
  6. संशोधन पद्धतीशास्त्र-पुरक माहिती (शिक्षणशास्त्र शाखा)

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “संशोधन पद्धती (प्री पीएच.डी. कोर्स वर्क व संशोधकांना उपयुक्त)”
Shopping cart