Order Online Or Call Us: 0257-2232800, 2235520

समाजशास्त्र

सातपुड्यातील आदिवासी भिल्ल

Rs.175.00

ठाणे, नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, बुलढाणा, अमरावती, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यातील आदिवासी जमातींचे वास्तव्य आहे. धुळे, नंदुरबार व जळगावमध्ये भिल्ल, पावरा, मावची कोकणी अशा जमाती प्रामुख्याने आहेत. जळगाव जिल्ह्यातील यावल, रावेर, चोपडा तालुक्यातील सातपुड्याच्या पायथ्याशी असलेले आदिवासी बांधव भारताचे मुळनिवासी यांचे पारंपारिक जीवन विविध माध्यमातील कला विष्कारांनी संपन्न समृद्ध झाले आहे. संगीत, नृत्य, नाट्य, मौखिक, वाङ्मय यामुळे जीवनातील दुःख, दारिद्य्र सोसूनही आनंदी राहण्याची कला त्यांनी शतकानुशतके जोपासली आहे.

आदिवासींच्या जीवनाचे विविध पैलू समजून घेऊन आदिवासींची भाषा, कुळे, गोत्रे, कुटुंब, समाज, प्रथा-पंरपरा, त्यातून आदिवासींची बनलेली विशिष्ट जीवनशैली आणि संस्कृती याविषयीच्या नोंदी सदरील पुस्तकात आहेत. सदरील माहिती एखाद्या अभ्यासकाप्रमाणे सूत्रबद्धरीतीने मांडलेली आहे. त्यामुळे हा ग्रंथ लहानसा का होईना, पण अभ्यासक, जिज्ञासू, विद्यार्थी तसेच सर्वांसाठी संदर्भसाधन म्हणून उपयोगी ठरेल, अशी अपेक्षा करायला काही हरकत नाही.

Satpudyatil Adivasi Bhill

  1. आदिवासी संकल्पना व स्वरूप : आदिवासीसंबंधीचे दृष्टिकोन, आदिवासी संकल्पना, आदिवासींची ठळक वैशिष्ट्ये
  2. जगातील आदिवासी : आदिवासींचे कौटुंबिक व सामाजिक जीवन, आदिवासी नातेसंबंध, आदिवासी स्त्री, न्यायनिवाडा पद्धत, धार्मिक समारंभ, जादूटोणा व धार्मिक समजुती, आदिवासी वैद्यक, आदिवासी कला, पाषाणांची व शिंपल्यांची आभुषणे, संगीत व साहित्य, आदिवासींची अर्थव्यवस्था, शिकार, मासेमारी, अन्न गोळा करणे, पशुपालन, वस्त्र व निवारा
  3. भारतातील आदिवासी : भारतातील आदिम जमाती, आदिवासी जमातीचे पाच भागात वर्गीकरण, भाषिक व वंशिकरण वर्गीकरण, आर्थिक संघटना, सामाजिक संघटना, विवाहसंस्था, धर्म, कला, आदिवासी क्रांतीकारक बिरसा मुंडा
  4. महाराष्ट्रातील आदिवासी : महाराष्ट्रातील आदिवासी समाज, महाराष्ट्रातील आदिवासींच्या प्रमुख जमाती, आदिवासी विषयक मध्यमवर्गीय दृष्टीकोन, आदिवासी जीवनातील सुधारणा, आदिवासी जमातीतील शूरवीर आणि सुधारक, समाजसुधारक तंट्या भिल, तडवी भिलांचे प्रचारक वजीरभाई चाँदखाँ तडवी, आदिवासी समाजाची वैशिष्ट्ये, आदिवासी समाजाची सध्याची स्थिती
  5. सातपुड्यातील आदिवासी भिल्ल : खान्देशातील आदिवासी, आदिवासी भिल्ल, भिल्ल आदिवासींचे कुळे व पोटजात, आदिवासी पावरा भिल्ल, सामाजिक स्थिती, प्रथा आणि परंपरा, पावरा भिल्लांची शारीरिक ठेवण, पावरा लोकांचा पेहराव, आहार आरोग्य, जमात पंचायत, पावरा भिल्लांची कुळे आणि कुळाचार, आदिवासी दिनचर्या, शरीर गोंधणे, गोंधण्याची पद्धत, आदिवासींची पेहराव, पावरा भिल्लांचे घरे
  6. सातपुड्यातील तडवी भिल्ल : तडवी भिलांची उत्पत्ती, जळगाव जिल्हा तालुकानिहाय तडवी भिलांची स्थिती, उपप्रकार, संविधानात्मक स्थान, सातपुड्यातील आदिवासी व तडवी भिल्ल, स्त्रियांचा पोशाख, जळगाव जिल्ह्यातील तडवी भिल्लांची कुळे, लग्नविधी, तडवी भिलांची परंपरा, तडवी भिल्लांची बोलीभाषा, तडवी भिलांचे राहणीभान, तडवी भिलांच्या परंपरा, जत्रा, संदलचा दिवस, जत्रेचा दिवस, बाशी जत्रा, फुटाणे, निवते, बाजार, लग्नाची तयारी, लग्नविधी, मांडव, जन्मविधी, मृत्यु विधी, आत्मा संकल्पना
  7. सातपुड्यातील आदिवासींच्या समस्या व उपाय : आदिवासी भिल्लांच्या आर्थिक समस्या, सातपुड्यातील आदिवासींच्या नागरीकरण विषयक समस्या, आदिवासींच्या शिक्षणविषयक समस्या, शासकीय विकास योजनांविषयक समस्या

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “सातपुड्यातील आदिवासी भिल्ल”
Shopping cart