Order Online Or Call Us: 0257-2232800, 2235520

स्मृती किरणे

प्राचार्य डॉ. ग. म. तल्हार यांचा जीवन प्रवास : काही संस्मरणे

,

Rs.150.00

प्रस्तुत ग्रंथ म्हणजे प्राचार्य डॉ. गजानन महादेव तल्हार यांच्या जीवनातील आठवणींचा जागर आहे. या आठवणी म्हणजे त्यांचे आत्मचरित्र किंवा चरित्र ही नाही. हे खरे असले तरी ऐंशी नव्वदच्या दशकातील खान्देशातील शैक्षणिक चळवळीच्या दिशा आणि दशा यांचा इतिहास अधोरेखित करण्याचा एक प्रयास आहे. डॉ. ग. म. तल्हार यांच्या आठवणी स्व’चा इतिहास सांगत असल्या तरी सभोवतालचे शैक्षणिक पर्यावरण विलक्षण आत्मीयतेने रेखाटतात, हे या ग्रंथाचे बलस्थान आहे .
प्राचार्य डॉ. ग. म. तल्हार हे एक अष्टपैलू व्यक्तिमत्व आहे. विटे जि. सांगली, रत्नागिरी, फैजपूर आणि मु. जे. कॉलेज, जळगाव अशा विविध ठिकाणी वाणिज्य विषयाचे अध्यापन करतांना एक विद्यार्थी प्रिय प्राध्यापक म्हणून त्यांनी लौकिक प्राप्त केला. धरणगाव आणि बाहेती महाविद्यालय जळगाव येथे एकूण 18 वर्षे प्राचार्यपद भूषविले. प्राचार्यांचे प्राचार्य म्हणून ते ओळखले जातात.
प्राचार्य तल्हार यांनी जीवनप्रवासात अनेक चढउतार पाहिले. संघर्षाचे क्षण अनुभवले. संकटांवर मात केली. अत्यंत जीवघेण्या हृदय विकारातूनही सहीसलामत सुखरुप वाचले. हा जीवनप्रवास त्यांना जसा आठवला तसा स्मरणरंजनासारखा शब्दबद्ध केला आहे. त्यांच्या सोबत काम केलेल्या सहकार्‍यांचेही लेख तल्हार सरांचे व्यक्तिमत्व साकार करतात.
कोणताही आडपडदा न ठेवता, आत्मस्तुतीचा दोष न पत्करता अत्यंत प्रांजळपणे केलेलं हे आत्मनिवेदन आहे. परिश्रम आणि पुरुषार्थाच्या बळावर माणूस यशाचे शिखर गाठू शकतो याचे उत्तम उदाहरण म्हणजे प्राचार्य तल्हारांचा हा जीवन प्रवास ‘सत्य असत्याशी मन केले ग्वाही। मानियेले नाही बहुमता॥’ या संत वचनानुसार सत्याच्या वाटेवर चालण्याची प्रेरणा वाचकांना यातून मिळेल याचा मला विश्वास आहे.

– ह.भ.प. प्रा. सी. एस्. पाटील

Smruti Kirane

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “स्मृती किरणे”
WordPress › Error

There has been a critical error on this website.

Learn more about troubleshooting WordPress.