कथारंग
Authors:
ISBN:
₹85.00
- DESCRIPTION
- INDEX
विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेतील विद्यार्थ्यांना विज्ञान कथा व विनोदी कथा अशा दोन कथाप्रकारांची ओळख करून देणारे सदर पुस्तक आहे. मानवी नातेसंबंध, मानवी मूल्ये यांपुढे विज्ञान-तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातील अफाट प्रगतीने उभी केलेली आव्हाने विद्यार्थ्यांनी जाणून घ्यावीत आणि त्याबाबतची त्यांची जाण प्रगल्भ व्हावी या भूमिकेतून विज्ञान कथांची निवड करण्यात आली आहे. आभासी विश्वाच्या तात्कालिक भुलभुलैयात गुरफटल्यामुळे जगण्यातील समाधानाचे क्षण हातातून निसटत चालले आहेत. शब्द, वाक्य, भाषा, स्वभाव, वर्तन, व्यवहार अशा विविध स्तरांवरील गमत-जमती आज सापडेनाशा झाल्या आहेत. याचे भान विद्यार्थ्यांना यावे म्हणून विनोदाच्या निरनिराळ्या परी व्यक्त करणार्या निवडक विनोदी कथांचा समावेश सदर पुस्तकात करण्यात आला आहे. यासोबतच विज्ञानकोशासाठी नोंद लेखन आणि विज्ञानपर लघुलेख लेखन या उपयोजित घटकांची जोड येथे देण्यात आली आहे.
Katharang
विज्ञान कथा
1) डिलिव्हरी – बाळ फोंडके
2) महात्मा – लक्ष्मण लोंढे
3) विठू विठू पोपट – सुबोध जावडेकर
4) मम्मी रोबो – रेखा बैजल
विनोदी कथा
1) गुंड्याभाऊचे दुखणे – चिं. वि. जोशी
2) नाटक – शंकर पाटील
3) म्हैस – पु. ल. देशपांडे
4) शोध : द सर्च – मंगला गोडबोले
ऋणनिर्देश
परिशिष्ट
अ) विज्ञानविषयक नोंद लेखन
आ) विज्ञानपर लेखन