जागतिक पर्यावरण : समस्या, आव्हाने व उपाय
Global Environment Issues, Challenges and Solutions
Authors:
ISBN:
₹375.00
- DESCRIPTION
- INDEX
पर्यावरण म्हणजे आपल्या सभोवतालची परिस्थिती असे सामान्यपणे म्हटले जाते. आपल्या सभोवतालचे वृक्ष, पक्षी, प्राणी, मानव, पाणी, हवा, डोंगर इत्यादी घटक या सर्वाचे एकत्रीत स्वरुप म्हणजे पर्यावरण होय. पर्यावरणाच्या असमतोलमुुळे त्याचा मानवी आरोग्यावर मोठ्या प्रमाणात परिणाम होत आहे. त्याचबरोबर सजिव सृष्टीलाही धोका निर्माण झाला आहे. पर्यावरणाचा हव्यासापोटी केलेला वापर मानवाच्याच जीवावर उठलेला आहे. शिकारी ते शेतकरी अशा क्रमाने मानवाचा विकास होत गेला. जीवन अधिकाधिक सुखी व समृध्द करण्यासाठी आधुनिक कौशल्यांचा वापर करायला सुरुवात केली. त्यातूनचं मानवी उत्क्रांती व विकास याचा इतिहास घडत गेला. वाढत्या लोकसंख्येच्या वाढत्या गरजा भागवण्यासाठी मानवाने औद्योगिक क्रांतीचा आधार घेतला आणि निसर्गाचे मूळ रुपच बदलायला लागले. नैसर्गिक साधनसंपत्तीचा बेसुमार वापरामुळे मानवी हव्यासापोटी पर्यावरणाचा मोठ्या प्रमाणात र्हास होऊ लागला. याचाच परिणाम सजीवसृष्टीवर होण्यास सुरुवात झाली. या सर्व समस्यांचा शोध घेण्यासाठी या राष्ट्रीय परिषदेचे आयोजन केले आहे.
जागतिक समस्यांच्या गुंतागुंतीचे स्वरुप समाजापुढे यावे तसेच निसर्गाविषयीची संवेदनशीलता आणि वैज्ञानिक दृष्टीकोन यांच्या समन्वय साधणारे लेख या पुस्तकात आहेत. पर्यावरणाची आजवरची वाटचाल, विविध प्रश्न आणि सर्वसामान्य माणसाची भूमिका याचा वेध घेणारे हे पुस्तक उत्तम संदर्भग्रंथ ठरु शकेल.