Prashant Publications

My Account

प्राकृतिक भूगोलाची ओळख आणि प्रात्यक्षिके

Introduction to Physical Geography and Practicals

Authors: 

ISBN:

SKU: 9789393727978
Marathi Title: Prakritik Bhugol Olkha Aani Pratyakishike
Book Language: Marathi
Published Years: 2024
Pages: 96
Edition: First
Category:

130.00

  • DESCRIPTION
  • INDEX

भूगोल हा अतिशय प्राचीन व गतिशील असा विषय आहे. त्यामुळे या विषयाचा अभ्यास निरीक्षण अवलोकन व कृतीशील सर्वेक्षणावर अवलंबून आहे. हा विषय चार भिंतीच्या आत मध्ये शिकण्यापेक्षा चार भिंतीच्या बाहेर जास्त शिकता येतो. भूगोलाचा अभ्यास करताना प्राकृतिक भूगोलाचा अभ्यास महत्त्वाचा आहे. किंबहुना प्राकृतिक भूगोल ही भूगोलाची महत्त्वाची शाखा आहे. प्राकृतिक भूगोलाची ओळख व प्रात्यक्षिके या ग्रंथाच्या पहिल्या भागात भूगोल म्हणजे काय?, भूगोलाच्या महत्त्वाच्या शाखा, प्राकृतिक भूगोलाची ओळख, शिलावरण, वातावरण, जलावरण या घटकांवर प्रकाश टाकला आहे. तर दुसऱ्या भागात उठाव दर्शवण्याच्या संख्यात्मक व गुणात्मक पद्धती व समोच्च रेषांच्या साहाय्याने उतार व भूरूपे दर्शवणे या घटकांचा अभ्यास केला आहे. प्राध्यापक विद्यार्थी व स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना सदरील पुस्तक निश्चित उपयुक्त ठरेल अशी आशा आहे.

विभाग-अ
प्राकृतिक भूगोलाची ओळख

1. प्राकृतिक भूगोलाची ओळख 
(Introduction to Physical Geography)
1.1 भूगोलाची ओळख, व्याख्या आणि शाखा
(Introduction, definition and Branches of Geography)
1.2 प्राकृतिक भूगोलाची व्याख्या आणि शाखा
(Definition and Branches of Physical Geography)
1.3 प्राकृतिक भूगोलाचे स्वरूप व व्याप्ती आणि महत्त्व
(Nature, Scope and Importance of Physical Geography)

2. शिलावरण 
(Lithosphere)
2.1 पृथ्वीचे अंतरंग
(Interior of the Earth)
2.2 वेगनर यांचा भूखंड वहन सिध्दांत
(Wegener’s Continental Drift Theory)

3. वातावरण 
(Atmosphere)
3.1 हवा व हवामान संकल्पना
(Concept of weather and climate.)
3.2 वातावरणाचे घटक व वातावरणाची रचना
(Composition and structure of the atmosphere)
3.3 तापमानाच्या क्षितीज समांतर वितरणावर परिणाम करणारे घटक
(Factors affecting horizontal distribution of the temperature)

4. जलावरण 
(Hydrosphere)
4.1 सागरतळ रचना
(General Structure of Ocean Floor)
4.2 सागर जलाची हालचाल
(Movements of Ocean Water)
4.3 भरती ओहोटी – अर्थ, कारणे आणि प्रकार
(Tides – Meaning, Causes and types)

विभाग-ब
प्राकृतिक भूगोलातील प्रात्यक्षिके

1. उठाव दर्शविण्याच्या गुणात्मक पद्धती 
(Qualitative Methods of Relief Representation)
1.1 उठाव रेषा
(Hachures)
1.2 छाया पद्धती
(Hill Shading)
1.3 रंग पद्धती
(Color shading or Tinting)

2. उठाव दर्शविण्याच्या संख्यात्मक पद्धती 
(Quantitative Methods of Relief Representation)
2.1 स्थल उच्चांक
(Spot Height)
2.2 बेंच मार्क
(Bench Mark)
2.3 त्रिकोणमिती पद्धत
(Triangulation Method)
2.4 समोच्च रेषा
(Contour Lines)
2.5 आकार रेषा पद्धत
(Form Line)

3. समोच्चरेषांच्या साह्याने उतार आणि भू-रुपे दर्शविणे 
(Representation of slope and landforms by contours)
3.1 समोच्चरेषांच्या साह्याने उतार दर्शविणे
(Representation of slope by contours)
अ. सौम्य व तीव्र उतार
(Gentle and steep slope)
ब. समउतार व विषम उतार
(Even and uneven slope)
क. अंतर्वक्र उतार व बहिर्वक्र उतार
(Concave and convex slope)
3.2 समोच्चरेषांच्या साह्याने भू-रुपे दर्शविणे
(Representation of landforms by contours)
अ. शंकू टेकडी
(Conical hill)
ब. कडा
(Cliff)
क. व्ही आकाराची दरी
(V shaped valley)
ड. कटक
(Ridge)
इ. पठार
(Plateau)
फ. खिंड
(Pass)

RELATED PRODUCTS
You're viewing: प्राकृतिक भूगोलाची ओळख आणि प्रात्यक्षिके 130.00
Add to cart
Prashant Publications
Shopping cart close