Prashant Publications

My Account

थोडाही गुण मिळवा घ्यावे…..!

रंगराव पाटील  असं म्हणतात की, जिंकण्याची इच्छा असणं आणि जिंकण्याच्या इच्छेसाठी पूर्वतयारी करणं यात खूप फरक आहे. समजा एखाद्या व्यावसायिकाला आपला व्यवसाय वाढवायचा आहे, त्याचा विकास करायचाय तर त्याला त्यासाठी खास प्रयत्न, तेही नियोजनबध्द करावे लागतात. अर्थात त्याप्रसंगी त्याच्यासमोर अनेक पर्याय उपलब्ध असतात. पण त्या व्यावसायिकाला \’ते\’ पर्याय एकाच वेळी वापरता येत नाहीत. तो असा पर्याय निवडतो जो त्याला सहजी मानवेल व त्याचा व्यवसायही वाढवून देण्यास मदत करील. थोडक्यात, तो \’धोका\’ नसलेला पण \’फायदा\’ देणारा पर्याय निवडतो. \’रुक जाना नही, तू कही हार के\’ म्हणत व्यवसायाला पुढे नेतो. जळगावच्या \’प्रशांत बुक हाऊस\’ व \’प्रशांत पब्लिकेशन्स्\’ चे मालक रंगराव पाटलांना जेव्हा भेटायला निघालो तेव्हा वरील विचार डोक्यात होते. पण प्रत्यक्षात काय – काय घडले व रंगराव कसे घडले, हे जाणण्याची देखील उत्सुकता होती. म्हणून मुलाखतीच्या सुरुवातीला \’नमस्कार\’ वगैरे करत मी सरळ सुरुवात केली ती खालील प्रश्नाने… प्रश्न : कोल्हापूर ते जळगाव आणि सेल्समन ते \’प्रशांत\’ चे मालक. हा प्रवास कसा होता वा या प्रवासातील \’घडवणारे\’ टप्पे कसे होते! रंगराव : कीर्ती आणि विश्रांती या गोष्टी कधीच एकत्र नांदत नाही. माझ्या बाबतीत सागायचं तर \’थोडाही गुण मिळता घ्यावा / साठा त्याचा नित्य करावा / कोणालाही तो शिकवावा / ठेवा हे चित्ती\’ या न्यायानुसार या पुस्तक व्यवसायात मी गेल्या 25-26 वर्षांपासून आहे. सुरुवातीला 4/5 वर्षं मी आग्रा येथील \’रतन प्रकाशन\’ मध्ये प्रतिनिधी म्हणून काम करत होतो. त्यानिमित्ताने उत्तर प्रदेशात फिरत होतो. अगदी डाकूंच्या टोळ्या अनुभवत गावं फिरत होतो. प्रसंगी त्याच डाकूंच्या गाडीत वगैरे बसत एखादं गाव संध्याकाळच्या वेळी पार करत होती. म्हणूनच ही फिरस्ती तशी खडतर. त्यात मी मराठी भाषिक, महाराष्ट्रातला. साहजिकच इतर भाषिक मला थोडे वेगळं ठरवायचे. पण मी जिद्दीने काम करत होतो. अशाच फिरस्तीत पुढे नागपूरच्या \’हिमालय\’ संस्थेशी माझा परिचय झाला. मी उत्तर प्रदेशाला रामराम करत महाराष्ट्रात आलो. पुढे \’हिमालय पब्लिकेशन्स\’ चा प्रतिनिधी म्हणून मी जवळपास दहा-अकरा वर्ष काम केलं. विदर्भासह, खान्देश, मराठवाडा हा भाग हिंडलो, फिरलो. तिथली सर्व कॉलेजं पालथी घातली. त्याबरोबरच त्या भागाचा मी डोळसपणे अभ्यास करतं स्वत:चं दुकान शोधू लागलो आणि 1995 ला ते जळगावी मला सापडलं. प्रश्न – \’धैर्याला काहीच पर्याय असत नाही\’ या वाक्याचा आधार घेत पुढचा प्रश्न असाय की, 1995 ला तुम्ही जळगावी आला आणि \’प्रशांत बुक हाऊस\’ ची पाटी लावत खर्‍या अर्थाने मालक झाला. पण हा \’प्रवास\’ तसा सोपा होता वा लगेच यशाचा मार्ग दाखवणारा होता? रंगराव : धैर्याला काही पर्याय असत नाही… ह्याच ओळीचा आधार घेत सांगायचं तर \’जोखीम पत्करणं व निभावणं या दोन गोष्टी मी तशा अगोदरच शिकलो होतो. 1995 ला जेव्हा जळगावी मी \’प्रशान्त बुक हाऊस\’ चा पसारा मांडला तेव्हा माझ्या असं लक्षात आलं की, खान्देश परिसरातील सर्व छोट्या मोठ्या गावांना वा त्या परिसरातील सर्व महाविद्यालयांना जर आपण अभ्यासासंबंधी, संदर्भासह पुस्तकं दिली, पोहचवली तर ती त्यांना हवीये. झालं, मी तिच नस पकडत \’प्रशांत\’ ची दिशा ठरवली. ऑर्डरी मिळू लागल्या आणि थोडाथोडा जम बसू लागला. अर्थात जळगाव, धुळे, नंदूरबार जिल्ह्यातील सर्व महाविद्यालयांना भेटणं व त्यांना हवी ती पुस्तकं (प्रतिनिधीद्वारा) देणं तसं सोपं नव्हतं. पण ती जोखीम मी पत्करली, पुढे जात राहिलो. प्रश्न : 1995 नंतर वर्ष आलं 2002. त्याच 2002 साली \’प्रशांत\’ ने आपली ‘पब्लिकेशन्स्’ ही ब्रॅन्च सुरु केली. नेमकी काय भावना होती या पब्लिकेशन्स सुरु करण्यामागे! रंगराव : महाविद्यालयांना पुस्तकं पुरवता पुरवता माझ्या असं लक्षात आलं की, विद्यापीठाच्या विविध अभ्यासक्रमांवर आधारित पुस्तकं छापायला जर आपण हाती घेतली तर ते गणित सुटतेय वा जमतेय. म्हणून 2002 ला मी \’प्रशांत पब्लिकेशन्स\’ ची सुरुवात केली. पण प्रश्न होता अभ्यासक्रमानुसार पुस्तकं लिहून देणार्‍या लेखकांचा? मी बर्‍याच प्राध्यापक मित्रांना लिहिण्याविषयी विचारलं. रॉयल्टीनुसार पैसे देऊन केले. हळूहळू टीम तयार होत गेली. त्यात पुण्याच्या \’अमोल प्रकाशन\’ चे संजय काकडे यांच्यासह खूपशा माणसांचं उत्तम सहकार्य लाभलं. एफ.वाय. ते एम.ए. पर्यंतची (वा तिन्ही शाखांची) पुस्तकं प्रकाशित होऊ लागली. वाचकांनी, विद्यार्थ्यांनी \’प्रशांत\’ टीमची पुस्तकं स्वीकारली आणि आज प्रकाशित पुस्तकांची संख्या शंभरी ओलांडत पुढे गेली आहे. त्यानंतर कथा – कादंबर्‍यांऐवजी मी काही संदर्भ वा ललित पुस्तकं प्रकाशित केली. प्रश्न : \’प्रशांत\’ चा दोन्ही अंगानं पसारा वाढला. आता तर तो सारा पसारा नव्या वास्तूत स्थिरावतोय. यापुढे काही नव्या योजना हाती घेणार आहात? रंगराव : पुस्तकांच्या रुपाने वाचकांशी संवाद साधण्याचं व विद्यार्थ्यांसह प्राध्यापकांना विविध विषयांवरची पुस्तकं देण्याचा सिलसिला यापुढेही सुरु राहणार आहेच. काळानुसार ऑनलाईन सर्व्हिस देणं जसं गरजेचं आहे तसंच व्यक्तिमत्त्व विकास व विविध स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त अशी पुस्तकं, संदर्भग्रंथ कमी किंमतीत उपलब्ध करुन द्यायचीय. संदर्भ ग्रंथांचं दालनही वाढवायचं आहे. महाविद्यालयांमध्ये जे स्पर्धा परीक्षा विभाग आहेत त्यांना उत्तमोत्तम व लेटेस्ट पुस्तकं देण्याची तयारी सुरु आहे. तसेच विद्यापीठाची क्रमिक पुस्तकं, त्याच्या कॉपीज् जास्त छापल्या जात असल्याने, कमी किमतीत आम्ही देणार आहोत. नव्या दमाच्या लेखकांमार्फत नव्या विषयांची ओळख विद्यार्थ्यांपर्यंत नेण्याचा आम्ही 100% प्रयन्त करणार आहोत आणि मला वाटतं आम्ही ह्याच ग्रंथ प्रसारासाठी जे न्यूज बुक वा न्यूज बुकलेट तयार करत महाविद्यालयांपर्यंत पोहचवतोय, त्याचाही चांगला फायदा आम्हाला होतोय. असो. तर, \’अकॅडेमिक बुक हाऊस\’ ही नवी वितरण व्यवस्था हाती घेत आज \’प्रशांत\’ चे रंगराव पाटील व त्यांची टीम ज्यारितीने सजग, सुजाण वाचकांसाठी व अभ्यासूंसाठी नव्या योजना आखत आपलं कार्य समाजाभिमुख वा ज्ञानाभिमुख करताय ती खरोखरच कौतुकास्पद गोष्ट आहे. \’प्रशांत\’ ला आपल्या सर्वांचं उत्तम सहकार्य आहेत, ते वाढावे ही आग्रहाची विनंती! शब्दांकन : चंद्रकांत भंडारी, जळगाव

रौप्य महोत्सवी प्रगतिपथावरील वाटचाल!

वाचन संस्कृतीचे आधारस्तंभ म्हणजे वाचक, लेखक, प्रकाशक, ग्रंथ वितरक आणि ग्रंथालये असतात. वाचक-लेखक, प्रकाशक आणि ग्रंथालयांना नित्यनूतन ग्रंथांची उपलब्धता ‘ग्रंथवितरक’ सातत्याने करीत असतात. त्यामुळेच वाचकांच्या गरजा पूर्ण होऊन ‘वाचन संस्कृती’ समृध्द होत असते. आज प्रकाशन संस्थेलाच वितरणाची जोड घेऊन वाचकांपर्यंत पोहचावे लागते अशी स्थिती आहे. त्यामुळे “प्रशांत पब्लिकेशन्स आणि बुक हाऊस” या संस्थेमार्फत जळगावमध्ये गेल्या 15 वर्षात जी अविरत आणि उत्कृष्ट सेवा देण्याची परंपरा निर्माण केली आहे; ती खानदेशात सध्यातरी अग्रस्थानी आहे असे जाणवते. त्याचे सेवावृत्तीचे आणि व्यावसायिक सूचितेचे कार्य श्री.रंगराव पाटील यांनी परिश्रमपूर्वक सुरु ठेवले आहे. ‘प्रशांत पब्लिकेशन्स’ आणि ‘बुक हाऊस’ हा आता या ग्रंथ संस्कृतीचा आणि वाचन अभिरुचीचा फार मोठा परिवार म्हणून शैक्षणिक आणि सामाजिक सांस्कृतिक क्षेत्रात सर्वश्रृत झाला आहे. श्री. रंगराव पाटील यांच्या आयुष्याच्या प्रगती पथाचा आलेख हा खडतर मार्गाचा असून कोल्हापूर ते आग्रा आणि व्हाया नागपूर ते जळगाव – खानदेश असा सुमारे 25 वर्षांचा दीर्घ प्रवास आहे. आग्राचे रतन प्रकाशन आणि नागपूरचे हिमालया पब्लिकेशन्स या दोन्ही ठिकाणी सुमारे दहा-अकरा वर्षे खूप मेहनत त्यांनी घेतली. एक प्रकारचे व्यावसायिक प्रशिक्षणच म्हणता येईल अशी त्यांची स्थिती होती. विदर्भ-मराठवाडा आणि खानदेशातील सर्व शिक्षण संस्था, प्राचार्य, वाचनालये, प्राध्यापक आणि वाचक-विद्यार्थी यांचे अनुभवनिष्ठ सर्वेक्षण या नोकरीच्या (प्रतिनिधी) काळात त्यांनी केले. ही अनुभवांची ‘शिदोरी’ घेऊन त्यांनी प्रशांत पब्लिकेशन्स आणि प्रशांत बुक हाऊस या व्यवसायात पदार्पण केले. मराठी तरुण सहसा नोकरी आणि मर्यादीत उत्पन्नावर खूष असतो. रंगराव पाटील यांनी उत्तर प्रदेश, मध्यप्रदेश आणि नागपूर-विदर्भात जे वितरण प्रशिक्षण आणि व्यावसायिक अनुभव घेतले ते त्यांना धाडसाने पुढे जाण्यास उपयुक्त ठरले. नोकरी ही केवळ नियुक्त कार्य करण्यासाठी नसून व्यवसायात खूप आंतमध्ये शिरण्याचे माध्यम म्हणून त्यांनी केली. म्हणूनच ते ‘स्वयंभू’ असे आपले स्वत:चे स्थान या व्यवसायात निर्माण करु शकले. कष्ट उपासण्याचे जिद्द, बुध्दीनिष्ठ व्यवहाराची पध्दती, संवादातून समन्वयाची भूमिका, अर्थव्यवहारातील पारदर्शकता, नियोजन, मराठी वाचकांची नाळ ओळखण्याची चतुरता, अथक परिश्रम घेण्याची वृत्ती ही त्यांच्या आजच्या प्रगतीची प्रमुख कारणे आहेत. त्यांनी खानदेशात आधी वितरणाचे कार्य सुरु केले. त्यामाध्यमातून खानदेशातील गावोगावी विविध महाविद्यालये, ग्रंथालये आणि वाचकांशी सतत संपर्क वाढला. प्रत्यक्ष भेटीत ॠजुता, संयमशीलता, शांत चित्तवृत्ती आणि व्यावहारिकता यामुळे संवादातून-संपर्कातून माणसं जुळवणं ही त्यांची भूमिका यशस्वी ठरली. उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या विविध विषयांच्या-वैविध्यपूर्ण अभ्यासक्रमांच्या आणि कोर्सेसच्यासाठी लागणारी सोप्या भाषेतील व कमी किंमतीत उपलब्ध होणारी‘ पाठ्य पुस्तके’ तयार करण्याचे कार्य त्यांनी आरंभिले. त्यामुळे जास्त प्रतींची निर्मिती केली तर निर्मिती मूल्य घटते या विचारातून प्रगतीचा मार्ग सापडला. स्थानिक प्राध्यापकांची – लेखकांची अभ्यासास उपयुक्त पाठ्यपुस्तके निर्माण करण्याचा त्यांचा निर्णय खूप महत्वाचा ठरला. ‘प्रशांत बुक हाऊस’ च्या जोडीला सन 2002 मध्ये ‘प्रशांत पब्लिकेशन्स’चा नवा शाखा विस्तार अशा खडतर प्रवासातून झाला आहे. लेखकांची, कार्यालयीन वितरकांची, विविध बुक विक्रेत्यांची अशी एक ‘टीम’ त्यांनी तयार केली. त्यामुळे माणसे जोडली गेलीत. रोजी रोटीचा प्रश्नही काही तरुणांना सोडवता आला. त्यांच्या आयुष्यात श्री. रंगराव पाटील यांना कर्मसंस्कृतीची फुंकर घातली. त्यामुळेच “प्रशांत परिवार” ही कौटुंबिक जिव्हाळ्याची एक सामाजिक जाण असलेली संस्थाच निर्माण झाली असे म्हणता येईल. कला, वाणिज्य, विज्ञान, तंत्रज्ञान, संगणक, शिक्षणशास्त्र, कायदा आणि आय.टी. इत्यादी सर्वच शाखांची सर्व विषयांची पाठ्यपुस्तके, संदर्भ पुस्तके, वाङ्मयीन ग्रंथ आणि शब्दकोश इत्यादी पुस्तकांचे भांडार उभारुन त्यांनी खूप मोठी लोकशक्ती आणि लोकसेवा साध्य केली आहे. प्रथम वर्षापासून तर पदवी व पदव्युत्तर वर्गांच्या सर्वच पाठ्यपुस्तकांची निर्मिती आणि वितरण अशा द्विस्तरीय सेवेची सुमारे 25 वर्षे पूर्ण करणारे व्यक्तिमत्व म्हणजेच श्री. रंगराव पाटील हे आहे यात शंकाच नसावी. या त्यांच्या एकंदरीत प्रगतीचा नवा अध्याय आता दोन पातळीवर प्रगतीकडे वाटचाल करीत आहे. त्यातील पहिला अध्याय म्हणजे “प्रशांत पब्लिकेशन्सचा नवीन वास्तूत प्रवेश” होत आहे आणि दुसरा अध्याय म्हणजे “अकॅडेमिक बुक हाऊस” या नव्या वितरण व्यवस्थेची मुहूर्तमेढ होत आहे. त्यांच्या या दोनही नव्या संकल्पांचे मन:पूर्वक स्वागत करतो. तरुणपिढीला घडवण्यासाठी, त्यांची ज्ञानलालसा जोपासण्यासाठी, वाचनसंस्कृतीच्या वृध्दीसाठी आणि पर्यायाने समाज आणि राष्ट्र निर्मितीच्या कार्यात आपला व्यावसायिक‘ खारीचा वाटा’ उचलण्यासाठी कटीबध्द झालेल्या मराठी माणसाला प्रगतीच्या दाही दिशांना मुक्तपणे संचार करण्यासाठी हार्दिक शुभेच्छा देतो. ज्ञानयुक्त भक्ती, भक्तीमय कर्म आणि कर्मनिष्ठ ज्ञानाची परंपरा सांगणार्‍या भारतीय संस्कृतीत ज्ञानात्मक आणि कर्मात्मक पातळीवर सचोटीने पुढे नेण्यासाठी; त्यांना ऊर्जा प्राप्त व्हावी यासाठी ही शब्दरुपी भावनांची गुलाब पुष्पे देऊन स्वागत! हा त्यांचा ज्ञानदीप चेतवण्यांचा विचार, संत ज्ञानेश्वरांच्या शब्दातसांगायचा तर ज्योतसे ज्योत जलतो चलो।, प्रेमकी गंगा बहाते चलो॥ अशा स्वरुपाचा आहे. त्या ज्ञानज्योतीला सलाम! अज्ञानाच्या अंध:काराला नष्ट करण्याच्या प्रक्रियेतील एका कार्यकर्त्याला शुभेच्छा! प्राचार्य डॉ. किसन पाटील, अ.ज्ञा.प्र.मंडळाचे महिला महाविद्यालय, जळगाव.

Best Selling Author – March

Phosfluorescently engage worldwide methodologies with web-enabled technology. Interactively coordinate proactive e-commerce via process-centric “outside the box” thinking. Completely pursue scalable customer service through sustainable potentialities. Collaboratively administrate turnkey channels whereas virtual e-tailers. Objectively seize scalable metrics whereas proactive e-services. Seamlessly empower fully researched growth strategies and interoperable internal or “organic” sources. Credibly innovate granular internal or “organic” sources whereas high standards in web-readiness. Energistically scale future-proof core competencies vis-a-vis impactful experiences. Dramatically synthesize integrated schemas with optimal networks.

Offer Of The Month

Interactively procrastinate high-payoff content without backward-compatible data. Quickly cultivate optimal processes and tactical architectures. Completely iterate covalent strategic theme areas via accurate e-markets. Globally incubate standards compliant channels before scalable benefits. Quickly disseminate superior deliverables whereas web-enabled applications. Quickly drive clicks-and-mortar catalysts for change before vertical architectures. Credibly reintermediate backend ideas for cross-platform models. Continually reintermediate integrated processes through technically sound intellectual capital. Holistically foster superior methodologies without market-driven best practices.

Review Most Recommended Books

Credibly reintermediate backend ideas for cross-platform models. Continually reintermediate integrated processes through technically sound intellectual capital. Holistically foster superior methodologies without market-driven best practices. Distinctively exploit optimal alignments for intuitive bandwidth. Quickly coordinate e-business applications through revolutionary catalysts for change. Seamlessly underwhelm optimal testing procedures whereas bricks-and-clicks processes. Synergistically evolve 2.0 technologies rather than just in time initiatives. Quickly deploy strategic networks with compelling e-business. Credibly pontificate highly efficient manufactured products and enabled data. Dynamically target high-payoff intellectual capital for customized technologies. Objectively integrate emerging core competencies before process-centric communities. Dramatically evisculate holistic innovation rather than client-centric data. Progressively maintain extensive infomediaries via extensible niches. Dramatically disseminate standardized metrics after resource-leveling processes. Objectively pursue diverse catalysts for change for interoperable meta-service

Prashant Publications
Shopping cart close