Your cart is empty now.
मानवी जीवनाशी जाहिरातीचा नेहमी संबंध येतो. मानवाचा जाहिरातीशी संबंध केवळ वस्तू व सेवा यांना प्रसिद्धी देणे तसेच त्यांच्या निवडीला मदत करणे इतका मर्यादित नाही. तर सामाजिक, राजकीय, शासकीय, शैक्षणिक, कृषी अशी विविध क्षेत्रांशी जाहिरातीचा संबंध येतो. आज जाहिरात, आधुनिक तंत्रज्ञानामुळे आकर्षक होत आहे. वस्तू व सेवांची माहिती विविध जाहिरातीच्या माध्यमाद्वारे ग्राहकांच्या मान्सशास्त्राचा वापर करुन त्याला वस्तू खरेदी करण्यासाठी डावपेच आखले जातात. आजच्या जागतिकीकरण, उदारीकरण व खाजगीकरण यामुळे बाजारपेठ क्षेत्र आंतरराष्ट्रीय झाले आहे. अशा परिस्थितीत केवळ वस्तू दर्जेदार असणे आवश्यक नाही तर त्याविषयी माहिती परिणामकारकपणे पटवून देणे महत्त्वाचे कार्य जाहिरातीद्वारे केले जाते. या पुस्तकात जाहिरातीची ओळख, जाहिरात माध्यमे, जाहिरातीतील सर्जनशिलता, जाहिरात अंदाजपत्रक, जाहिरात संस्था, जाहिरातीचे नियमन आणि नियंत्रण या घटकांचा समावेश आहे.
Jahirat Tantra aani Vyuharchna