Your cart is empty now.
मानवाच्या आर्थिक क्रिया आणि मानवाच्या सभोवतालची परिस्थिती यांचा सविस्तर अभ्यास आर्थिक भूगोल या शाखेमध्ये केला जातो. मानव हा घटक पर्यावरणाची निर्मिती तर संसाधने ही पर्यावरणाची वैशिष्ठ्ये आहेत. अर्थशास्त्रातील उत्पादन, उपभोग, विनिमय आणि वितरण या घटकांवर प्राकृतिक पर्यावरणाचा सतत परिणाम होत असतो. वस्तू उत्पादन, वस्तूंचा उपभोग आणि त्या निर्मित वस्तूंचा विनिमय याबरोबरच आर्थिक-सामाजिक आणि बौद्धिक गरजांच्या पुर्ततेसाठी आवश्यक असलेल्या वेगवेगळ्या प्रकारच्या सेवा सुविधा अशा सर्वांचा समावेश मानवी आर्थिक क्रियांमध्ये केला जातो. प्रस्तुत पुस्तकात आर्थिक भूगोलाचा परिचय, अभ्यास पद्धती, विविध शास्त्रांशी असलेले संबंध, विविध आर्थिक क्रिया, जगातील संसाधने, भारतीय अर्थव्यवस्था, शेती, वाहतूक, व्यापार, उद्योगधंदे, कारखानदारी, प्रादेशिक विकास, ग्रामीण विकास या विविध मुद्द्यांचे सर्वांगिण विवेचन केले आहे.