Welcome to Prashant Publications

Rs. 170.00 10% OFF
Availability: 10 left in stock

कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव (नॅक ‘अ’ श्रेणी प्राप्त) यांनी शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 च्या मार्गदर्शक सूचनानुसार तृतीय वर्ष कला स्तर-5.0 या वर्गातील अर्थशास्त्र...

  • Name : आर्थिक विकास आणि वृद्धी-1 (Economic Development and Growth-I)
  • Vendor : Prashant Publication
  • Type : TYBA | V | Eco
  • Manufacturing : August 2026
  • Total Pages : 120 Pages
  • Barcode : 9789377761202

Guaranteed safe checkout:

apple paygoogle paymasterpaypalshopify payvisa

Orders ship within 5 to 10 business days.

Hoorey ! This item ships free to the US

आर्थिक विकास आणि वृद्धी-1 (Economic Development and Growth-I)
- +

कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव (नॅक ‘अ’ श्रेणी प्राप्त) यांनी शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 च्या मार्गदर्शक सूचनानुसार तृतीय वर्ष कला स्तर-5.0 या वर्गातील अर्थशास्त्र हा विषय विशेष प्राविण्यासह व विशेष प्राविण्यासह संशोधन (With Honours and Honours with Research) या आधारावर अभ्यासक्रमाची पुनर्रचना मा. कुलगुरू प्रो. (डॉ.) व्ही. एल. माहेेशरी, प्र. कुलगुरू प्रो. (डॉ.) एस.टी.इंगळे, अधिष्ठाता प्रो. (डॉ.) जगदिश पाटील (मानव्यविद्याशाखा) प्रो. (डॉ.) अनिलजी डोंगरे (वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखा) यांच्या मार्गदर्शनानुसार अर्थशास्त्र अभ्यासमंडळाने केली आहे. तृतीय वर्ष कला (T.Y.B.A.) वर्गासाठी 2026-2027 या शैक्षणिक वर्षांपासून विशेष स्तरावरील हा विषय DSE-1 ECO-314A ‘आर्थिक विकास आणि वृद्धी-1’ (Economic Development and Growth-1) या विषयाची निवड करण्यात आली आहे. प्रत्येक सत्रासाठी 4 श्रेयांक (Credit) निर्धारीत केलेले असून एकूण मुल्यांकन 100 गुणांचे होणार आहे. त्यात अंतर्गत मूल्यांकन 40 गुणांचे व बहिस्थ मुल्यांकन 60 गुणांचे करण्यात येणार आहे.
आर्थिक विकास आणि आर्थिक वृद्धी हा विषय आधुनिक अर्थशास्त्रातील महत्त्वाची शाखा आहे. कोणत्याही देशाचा विकास केवळ राष्ट्रीय उत्पन्नावर अवलंबून नसतो तर त्या देशाचे नागरिकांचे जीवनमान, शिक्षण, आरोग्य, रोजगार, सामाजिक न्याय, पर्यावरणीय शाश्वता आणि सर्वसमावेशक विकास अशा अनेक महत्त्वपूर्ण घटकाचा त्यात सहभाग असतो. म्हणून विकास आणि वृद्धी या दोन परिमाणांतून देशाच्या विकासाचे मोजमाप केले जाते. कारण वृद्धी ही उत्पादन आणि उत्पन्नातील परिणामात्मक वाढ दर्शविते तर विकास हा आर्थिक, सामाजिक, मानवी आणि संस्थात्मक परिवर्तनाची व्यापक प्रक्रिया आहे. या पुस्तकातून विद्यार्थ्यांना केवळ सैद्धांतिक ज्ञान न देता प्रत्यक्ष जीवनातील आर्थिक समस्यांचे विश्लेषण करण्याची क्षमता विकसित करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
या सत्रात आपण चार प्रकरणाचे अध्ययन करणार आहोत, त्या आर्थिक विकासाची संकल्पना, आर्थिक विकासाचे सिद्धांत, आर्थिक विकास प्रक्रियेतील संचनात्मक समस्या, शिक्षण आणि आरोग्य, दारिद्य्र आणि आर्थिक विषमता, प्रादेशिक असमतोल, नियोजन, तंत्रज्ञान यांची आर्थिक विकासातील भूमिका, 
निती आयोग अशा वेगवेगळ्या महत्त्वाच्या भागाचे अध्ययन करुन विद्यार्थ्याच्या ज्ञान कक्षा वृद्धींगत होतील, ज्ञानधिष्ठित, सर्वसमावेशक, शाश्वत आणि आत्मनिर्भर भारताच्या निर्मितीसाठी आर्थिक विकासाबाबतचे सखोल आकलन आवश्यक आहे. हे पुस्तक विद्याथी, प्राध्यापक संशोधकांना उपयुक्त ठरेल.

1. आर्थिक विकासाचा परिचय .............................................9
(Introduction to Economic Development)
1.1 आर्थिक विकासाचा अर्थ (Meaning of Economic Development):
1.2 आर्थिक विकासाचे निर्देशक
(Indicators of Economic Development)
1.2.1 संख्यात्मक निर्देशक (Quantitative Indicators)
1.2.2 गुणात्मक निर्देशक (Qualitative Indicators)
1.3 आर्थिक विकासावर परिणाम करणारे घटक
(Factors Influencing Economic Development)
1.3.1 नैसर्गिक संसाधने (Natural Resources)
1.3.2 भांडवल निर्मिती (Capital Formation)
1.3.3 मानवी भांडवल (Human Capital)
1.3.4 तंत्रज्ञान आणि नवोन्मेष (Technology and Innovation)
1.4 विकसनशील आणि विकसित देशांमधील फरक
(Difference between Developing and Developed Countries)

2. आर्थिक विकासाचे सिद्धांत .............................................32
(Theories of Economic Development)
2.1 ॲडम स्मिथचा आर्थिक विकासाचा सिद्धांत
(Adam Smith Theory of Economic Development)
2.2 डेव्हिड रिकार्डोचा आर्थिक विकासाचा सिद्धांत
(David Ricardo Theory of Economic Development)
2.3 मार्कचा आर्थिक विकासाचा सिद्धांत
(Mark's Theory of Economic Development)
2.4 प्रबळ चालनाचा सिद्धांत (The Big Push Theory)

3. विकास प्रक्रियेतील संरचनात्मक समस्या ...............................65
(Structural Issues in Development Process)
3.1 भारतातील मानवी भांडवलामध्ये शिक्षण, आरोग्य आणि पोषण यांची भूमिका (Role of Education, Health and Nutrition in Human Capital in India)
3.2 दारिद्य्र आणि विषमतेचा अर्थ आणि मापन
(Meaning and Measurement of Poverty and Inequality)
3.3 दारिद्य्र आणि विषमता दूर करण्याचे उपाय
(Measures to Eradicate Poverty and Inequality)
3.4 प्रादेशिक असंतुलनाचा अर्थ (Meaning of Regional Imbalances)

4. नियोजन, तंत्रज्ञान आणि आर्थिक विकास ..............................93
(Planning, Technology and Economic Development)
4.1 आर्थिक विकासातील पायाभूत सुविधांची संकल्पना
(Concept of Infrastructure in Economic Development)
4.2 आर्थिक विकासात तंत्रज्ञानाची भूमिका
(Role of Technology in Economic Development)
4.3 आर्थिक विकासात नियोजनाची भूमिका
(Role of Planning in Economic Development)
4.4 नियोजन आयोग आणि नीती आयोग
(Planning Commission & NITI Aayog)

संदर्भ ग्रंथसूची...............................................................116

💬

Chat with us