Your cart is empty now.
मानवी स्वभाव व जीवनाचा सखोल अर्थ भगवान पाटलांनी त्यांच्या
शक्तीनुसार आकलन केला. पण कथेच्या चौकटीत तो अभिव्यक्त करतांना
तंत्राचे सामर्थ्य काही ठिकाणी कमी पडले. माणसांचे माणूसपण शब्दात सिद्ध
करताना त्यांचे अंतरंग व स्वभावदर्शन कलात्मक झाले तरच कथेचे कथापण
अधिक प्रभावी ठरते. पाटलांच्या चिंतन सूत्रांनी कथेचा नायक महत्वपूर्ण
मानून पण त्यावर मात करून प्रभाव सिद्ध केला. म्हणून ही कथा ग्रामीण
कथा असली तरी ती मूलतः चिंतन कथा आहे. अर्थात ग्रामीण कथेला
भगवान पाटलांच्या कथेच्या रूपाने चिंतन कथेचे नवे परिमाण प्राप्त झालेय.