Your cart is empty now.
‘ग्रंथरुपी ग्रंथपाल’ या आत्मचरित्रपर लेख संग्रहात शैक्षणिक आणि सार्वजनिक क्षेत्रातील ग्रंथालयात कार्यरत असणार्या ग्रंथपालांच्या लेखांचा समावेश आहे.
या मधील बहुसंख्य ग्रंथपालांचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांची गरिबीची परिस्थिति, परंतु गरिबीवर मात करत सतत पुढील शिक्षण घेण्याचा ध्यास घेऊन बहुतेकांनी बी.लिब, एम.लिब पदव्या प्राप्त केल्या आहेत. एवढेच नव्हे तर नेट/सेट परीक्षा देखील उत्तीर्ण करुन कायमस्वरुपी नोकर्या प्राप्त केल्या आहेत तर अनेकांनी याही पुढे जाऊन शिक्षण क्षेत्रातील सर्वोच्च समजली जाणारी पीएच.डी पदवी देखील प्राप्त केली आहे. या ग्रंथपालांनी त्यांच्या उच्च शिक्षणाचा उपयोग वाचकांना उत्तम संदर्भ सेवा देण्यासाठी केला आहे. तसेच नवीन तंत्रज्ञानावर आधारित ग्रंथालय सेवा देण्याचे पवित्र कार्य गेल्या दोन-तीन दशकांपासून करत आले आहेत. काही ग्रंथपालांना त्यांनी वाचकांना दिलेल्या उत्कृष्ठ सेवेबद्दल पुरस्कारही सुध्दा प्राप्त झाले आहेत. अशा ग्रंथपालांच्या या यशोगाथा नवीन पिढीला प्रेरणादायी जरुर ठरतील.