Your cart is empty now.
आजचे युग हे माहितचे युग, कृत्रिमबुद्धिमत्तेचे युग म्हणून ओळखले जाते. माहितीचा विस्फोट आणि तंत्रज्ञानातील झपाट्याने होणारे बदल, कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर यामुळे ग्रंथालय आणि माहितीशास्त्र या विषयाचे स्वरूपही काळानुरूप बदलत आहे. केवळ ग्रंथालयात पारंपरिक ग्रंथसंग्रह करणे, ग्रंथ देवाण घेवाण करणे इथपर्यंत मर्यादित न राहता, माहितीचे अचूक संकलन, व्यवस्थापन आणि ती वाचकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचवणे ही कार्य ग्रंथालय करीत आहेत आणि ती आजच्या काळाची गरज बनली आहे.
सदर पुस्तक कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव, ‘ग्रंथालय आणि माहितीशास्त्र कौशल्ये (भाग 2) हे विशेषतः राष्ट्रीय शैक्षणिक धोरण मधील नवीन अभ्यासक्रमानुसार चौथ्या सत्रासाठी तयार करण्यात आले आहे. कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठांमधील पदवी स्तरावरील विद्यार्थ्यांसाठी हे पुस्तक मार्गदर्शक ठरेल यात शंका नाही.
सदरील पुस्तकातील विषयाची मांडणी अत्यंत सोप्या आणि सुटसुटीत भाषेत करण्यात आली आहे. सदर पुस्तक केवळ शैक्षणिक अभ्यासक्रमच नव्हे, तर NET, SET, PET आणि इतर स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या गरजा लक्षात घेऊन महत्त्वाच्या मुद्द्यांचा समावेश केला आहे.
हे पुस्तक लिहिण्यामागे आमचा मुख्य उद्देश विद्यार्थ्यांना ग्रंथालय शास्त्रातील क्लिष्ट संकल्पना सोप्या पद्धतीने समजावून सांगणे हा आहे. कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव, ग्रंथालय आणि माहितीशास्त्र चेअरमन डॉ.अनिल चौधरी तसेच सर्व सदस्य यांचे आभार त्यांनी सदर विषयाकरिता एक चांगला अभ्यासक्रम तयार केला.