Welcome to Prashant Publications

Rs. 150.00 10% OFF
Availability: 10 left in stock


कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र, विद्यापीठाच्या तृतीय वर्ष कला शाखेसाठी असलेल्या वाङ्मय प्रकार ललित साहित्य अंतर्गत ‘जंगलाचं देणं’ अभ्यासक्रमावर आधारित पुस्तकाचे संपादन करताना आनंद होत आहे. 
निसर्ग आणि मानवी जीवन यांचा...

Guaranteed safe checkout:

apple paygoogle paymasterpaypalshopify payvisa

Orders ship within 5 to 10 business days.

Hoorey ! This item ships free to the US

जंगलाचं देणं एक आकलन
- +


कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र, विद्यापीठाच्या तृतीय वर्ष कला शाखेसाठी असलेल्या वाङ्मय प्रकार ललित साहित्य अंतर्गत ‘जंगलाचं देणं’ अभ्यासक्रमावर आधारित पुस्तकाचे संपादन करताना आनंद होत आहे. 
निसर्ग आणि मानवी जीवन यांचा अनुबंध तसा युगानुयुगांचा, पण आधुनिकतेच्या प्रवाहात आपण निसर्गापासून दुरावत गेलो. अशा वेळी निसर्गाशी तुटलेला हा धागा पुन्हा जोडण्याचे आणि अरण्यातील गूढ, समृद्ध जग उलगडून दाखवण्याचे अद्भूत कार्य मारुती चित्तमपल्ली यांच्या लेखनाने केले आहे. ‘जंगलाचे देणं’ हे केवळ एक पुस्तक नसून, निसर्गाने मानवी संस्कृतीला दिलेली एक अमूल्य भेट आहे.
या साहित्यावर समीक्षात्मक लेखन करताना निसर्गभ्रमणाचा अनुभव घेता येतो. जंगलातील पशू-पक्षी, झाडे-झुडपे, कीटक आणि वन्यजीवांच्या विश्वाशी एकरूप होऊन त्यांनी मांडलेले निरीक्षण केवळ वैज्ञानिक दृष्टिकोन दाखवत नाही, तर त्यात एक हळवा, संवेदनक्षम साहित्यिकही जाणवतो. त्यांच्या या पुस्तकातून जंगलाची भाषा, तिथली शांतता आणि त्या शांततेतील गूढ नाद समजून घेता आला.
या माध्यमातून चित्तमपल्ली यांच्या निसर्गप्रेमी दृष्टीचा, त्यांच्या समृद्ध शब्दकळांचा आणि जंगलाकडे बघण्याच्या दृष्टिकोनाचा शोध घेण्याचा प्रयत्न केला आहे. वन्यजीवांचे जीवन त्यांनी ज्या तन्मयतेने टिपली त्याची जाणीव करून होते . परंतु या अभ्यासाने वाचकांचा निसर्गाकडे पाहण्याच्या दृष्टिकोनात आमूलाग्र बदल घडवून आणला. चित्तमपल्लींचे हे लेखन वाचकांमध्ये निसर्गाबद्दल केवळ कुतूहल निर्माण करत नाही, तर एक नैतिक जबाबदारी आणि पर्यावरणाविषयीची जाणीवही निर्माण करते. ‘जंगलाचे देणं’ या साहित्यकृतीचा वेध घेताना निसर्गाप्रती कृतज्ञतेची ही भावना अधिक होते. 

प्रकरण 1. ललित साहित्य: संकल्पना व स्वरूप.......................7
1.1 ललित गद्य संकल्पना स्वरूप व वैशिष्ट्ये
1.2 ललित गद्य म्हणजे काय?
1.3 इंग्रजी साहित्यातील ललित गद्याची वाटचाल
1.4 मराठी साहित्यातील ललित गद्याची वाटचाल
ललित गद्याच्या व्याख्या
ललित गद्याच्या मराठीतील व्याख्या
1.5 ललित गद्याचे प्रकार
1. आठवणी अनुभव
2. लघुनिबंध
3. प्रवासवर्णनने
4. व्यक्तिचित्रे
5. ललितलेख
6. विनोदी लेखन

प्रकरण 2. मराठी ललित साहित्य लेखनाचा परामर्श..................28
2.1 सन 1950 पूर्वीचे मराठी ललित गद्य (लघु निबंध)
2.2 सन 1950 नंतरचे मराठी ललित गद्य (ललित निबंध)
2.3 सन 1975 नंतरचे मराठी ललित लेखन

प्रकरण 3. ‌‘जंगलाचं देणं‌’ या साहित्यकृतीचे वेगळेपण...............36
3.1 मारुती चित्तमपल्ली यांचा जीवन परिचय
3.2 ‌‘जंगलाचं देणं‌’ मधील आशय
3.3. ‌‘जंगलाचं देणं‌’ निसर्ग ज्ञान व विज्ञान
3.4 ‌‘जंगलाचं देणं‌’ या ललित गद्याचे वेगळेपण

प्रकरण 4. ‌‘जंगलाचं देणं‌’ साहित्यकृतीचा अभ्यास...................76
4.1 ‌‘जंगलाचं देणं‌’ मधील चिंतनशीलता
4.2 ‌‘जंगलाचं देणं‌’ मध्ये आलेल्या कथा
4.3 ‌‘जंगलाचं देणं‌’ मधील झाडांचे वर्णन
4.4 ‌‘जंगलाचं देणं‌’मधील प्राणीसृष्टी
4.5 ‌‘जंगलाचं देणं‌’ मधील भाषाशैली

संदर्भ ग्रंथसूची.......................................................94

💬

Chat with us