Welcome to Prashant Publications

Rs. 175.00 10% OFF
Availability: 10 left in stock

‘निंबोळ’ या कथासंग्रहाची ही दुसरी आवृत्ती आहे. या कथासंग्रहाची पहिली आवृत्ती चेतश्री प्रकाशनाचे दिवंगत वा. रा. सोनार यांनी 1984 साली पहिल्यांदा प्रसिद्ध केली होती. या कथासंग्रहाच्या वेगळेपणामुळे स्वतः पुढाकार घेवून...

Guaranteed safe checkout:

apple paygoogle paymasterpaypalshopify payvisa

Orders ship within 5 to 10 business days.

Hoorey ! This item ships free to the US

निंबोळ
- +

‘निंबोळ’ या कथासंग्रहाची ही दुसरी आवृत्ती आहे. या कथासंग्रहाची पहिली आवृत्ती चेतश्री प्रकाशनाचे दिवंगत वा. रा. सोनार यांनी 1984 साली पहिल्यांदा प्रसिद्ध केली होती. या कथासंग्रहाच्या वेगळेपणामुळे स्वतः पुढाकार घेवून त्यांनी पहिली आवृत्ती प्रसिद्ध केली. उणेपुरे 40 वर्षांनंतर या कथासंग्रहाची दुसरी आवृत्ती प्रकाशित होत आहे. 
या संग्रहातील सर्व कथा अनुभवसिद्ध असून सहचर्य जाणिवांमधून प्रकट होत जाणारे त्यांचे सामाजिक भान आणि सजग, सम्यक निरीक्षण प्रगट करणाऱ्या आहेत. या कथासंग्रहाच्या ‘निंबोळ’ ह्या शीर्षकाचे केवळ त्यांच्या निंबा कृष्ण या नावाशी साधर्म्य नसून ते त्यांच्या कडू स्वभावाचे पण प्रशासनाच्या माध्यमातून सामाजिक वैगुण्यावर औषधांसारखे उपाय करणाऱ्या मधाळ अर्काचेही द्योतक आहे. तसेच या कथांमध्ये चित्रित केलेल्या कटू, गोड आणि सर्वस्पर्शी सामाजिक वास्तवाचेही द्योतक आहे. गुणवत्तेशिवाय इतर कशालाही थारा न दिल्यामुळेच केवळ सहा वर्षात उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या निर्मितीचे, हजार जन्माचे सार्थक होईल एवढे कार्य विद्यापीठाचे कुलगुरू म्हणून ते करू शकले. यामुळे काही हितसंबंधीत दुखावले जाऊन त्यांना ठाकरे सर निम्बार्कापेक्षाही कडू वाटणे स्वाभाविक आहे. पण त्यामुळेच विद्यापीठाची गुणात्मक वाटचाल झाली आणि भावी पिढ्यांना दर्जेदार उच्च शिक्षणाची कवाडं खुली झालीत हे मान्य करावे लागेल.

1. साप..............................................15

2. सोनू आजी.......................................26

3. अवलिया.........................................39

4. अविश्वास........................................55

5. उंचावलेली.......................................73

6. चुराडा............................................97

💬

Chat with us