Your cart is empty now.
निर्णयनासाठी वित्तीय व्यवस्थापन या पुस्तकाची अत्यंत साध्या व सोप्या भाषेत मांडणी केलेली आहे. ‘वित्तीय व्यवस्थापन’ हा शब्द दोन शब्द ‘वित्तीय’ आणि ‘व्यवस्थापन’ ह्या शब्दांनी बनला आहे. ‘वित्तीय’ शब्दाचा अर्थ हा धन प्राप्तीच्या साधनांना एकत्रित करणे तथा व्यवसायाच्या मौद्रिक आवश्यकतांचे पूर्वानुमान करणे. त्याचे आधारावर ह्या साधनांचे वितरण करणे असा आहे. तर ‘व्यवस्थापन’ शब्दाचा अभिप्राय हा एखाद्या संस्थेचे उद्देश प्राप्त करण्यासाठी मानवीय क्रिया आणि भौतिक संसाधनांचे नियोजन, संगठन, समन्वय आणि निर्णय ह्यांच्याशी संबंधित आहे. अशा प्रकारे ‘वित्तीय व्यवस्थापन’ ही व्यावसायिक व्यवस्थापनाची ती शाखा आहे जी संस्थेच्या वित्तीय संसाधनांचे नियोजन आणि नियंत्रणाच्या संबंधित आहे अर्थात वित्त कार्याचे व्यवस्थापन.
आधुनिक विचारधारेनुसार वित्तीय व्यवस्थापनाला सामान्य व्यवस्थापनाचेच एक अभिन्न असे मानले जाते. वस्तूत: ते सामान्य व्यवस्थापनाच्या कार्यात्मक क्षेत्राचे स्वरूप आहे. उत्पादन व्यवस्थापन, विपणन व्यवस्थापन, सेवावर्गीय व्यवस्थापनाप्रमाणेच वित्तीय व्यवस्थापन हे कार्यात्मक व्यवस्थापनाच्या श्रेणीत येते. सामान्यत: वित्तीय व्यवस्थापनाचा आशय हा वित्तीय नियोजन, वित्त प्राप्ती, संपत्ती व्यवस्थापन तसेच विविध वित्तीय क्षेत्रात संतुलन स्थापित करणे असा आहे. ह्यात पुंजी, रोख प्रवाह, प्रत्याय, मूल्य आणि लाभ निती, निष्पत्ती नियोजन आणि मूल्यांकन तथा आयव्ययक नियंत्रण निती आणि प्रणाली यांचा समावेश होतो. प्रस्तुत पुस्तक वाणिज्य आणि व्यवस्थापन विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांना, प्राध्यापकांना निश्चितच उपयुक्त ठरेल.