Your cart is empty now.
मध्ययुगीन कालखंडातील मराठी वाङ्मयाला जवळपास साडेसहाशे वर्षांची परंपरा आहे. या काळात संतकवी, पंडितीकवी, शाहीर, बखरकार आदींनी गद्य – पद्य स्वरूपाची मौलिक निर्मिती केलेली आहे. या वाङ्मयाच्या प्रेरणा व स्वरूपाचे अंशत: दर्शन निवडलेल्या वेच्यांमधून होणार आहे.हे वाङ्मय भक्ती, अध्यात्म, पारलौकिक – लौकिक श्रद्धा प्रकट करणारे आहे. तत्कालीन लोकजीवन, लोकसंस्कृती, धर्मविचार, तत्त्वज्ञान आदींचा आविष्कार या वाङ्मयातून झालेला पाहावयास मिळतो. येथे मध्ययुगीन कालभान प्रकट होतेच, पण मराठी भाषेची बदलती रूपेही अनुभवता येतात.