Welcome to Prashant Publications

Rs. 150.00 10% OFF
Availability: 10 left in stock

विद्यापीठ अनुदान आयोगाच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने सन 2026-27 या शैक्षणिक वर्षापासून तृतीय वर्ष कला (T.Y.B.A.) वर्गासाठी लागू केलेल्या NEP 2020 अंतर्गत सुधारित अभ्यासक्रमानुसार ‘पर्यावरण भूगोल’ (Environmental Geography)...

Guaranteed safe checkout:

apple paygoogle paymasterpaypalshopify payvisa

Orders ship within 5 to 10 business days.

Hoorey ! This item ships free to the US

पर्यावरण भूगोल (Environmental Geography)
- +

विद्यापीठ अनुदान आयोगाच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने सन 2026-27 या शैक्षणिक वर्षापासून तृतीय वर्ष कला (T.Y.B.A.) वर्गासाठी लागू केलेल्या NEP 2020 अंतर्गत सुधारित अभ्यासक्रमानुसार ‘पर्यावरण भूगोल’ (Environmental Geography) हे संदर्भ पुस्तक लिहिण्यात आले असून सदर पुस्तक विद्यार्थी आणि प्राध्यापक बंधू-भगिनींच्या हाती सुपूर्द करताना आम्हास अतिशय आनंद होत आहे. अलीकडील काळात पर्यावरण हा सर्वांच्या जिव्हाळ्याचा विषय बनला आहे. कारण पर्यावरणात होणाऱ्या बदलामुळे गंभीर परिणामांना सामोरे जावे लागत आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या भूगोल अभ्यास मंडळाने अतिशय जाणीवपूर्वक निर्णय घेऊन पर्यावरण भूगोल विषयाचा अभ्यासक्रमात समावेश केला आहे. विद्यार्थ्यांना पर्यावरणीय घटक व पर्यावरणीय घडामोडी याविषयीची सखोल माहिती मिळण्यासाठी तसेच पर्यावरणाचे महत्त्व पटवून देण्याच्या दृष्टीने पर्यावरण क्षेत्रातील जाणकार, अभ्यासक, व्यावसायिक, संशोधक यांच्याशी सखोल चर्चा करून तसेच पर्यावरणाशी निगडीत संदर्भ ग्रंथ, नियतकालिके, इंटरनेटवर उपलब्ध असलेली माहिती, वर्तमानपत्रातील लेख, अहवाल, चर्चासत्रे, परिषदा, शोध निबंध यांचा आधार घेऊन सदर पुस्तकाचे लिखाण करण्यात आले आहे. 
या पुस्तकात पहिल्या प्रकरणात पर्यावरणाशी संबंधित पर्यावरण भूगोलाचा अर्थ, व्याख्या, स्वरूप आणि व्याप्ती, पर्यावरणाचे घटक, मानव पर्यावरण संबंध याविषयी लिखाण केले आहे. दुसऱ्या प्रकरणात हवामान बदल, ग्लोबल वार्मिंग, पर्यावरण प्रदूषण, पर्यावरण हानी यांची व्याख्या, कारणे व परिणाम याविषयी लिखाण केले आहे. तर तिसऱ्या प्रकरणात पर्यावरण व्यवस्थापन, शाश्वत विकास व पर्यावरणीय कायदे यांचा या पुस्तकांच्या लेखनात समावेश केला आहे. 

प्रकरण 1........................................................................9
पर्यावरण भूगोलाची ओळख
(Introduction to Environmental Geography)
1.1 पर्यावरण भूगोल अर्थ, व्याख्या, स्वरूप आणि व्याप्ती
(Environment Meaning, Definition, Nature and Scope)
1.2 पर्यावरणाचे घटक
(Types of Components)
1.3 मानव पर्यावरण संबंध
(Human - Environment Relationship)

प्रकरण 2.......................................................................32
पर्यावरणीय समस्या आणि आव्हाने
(Environmental Problems and Challenges)
2.1 हवामान बदल: व्याख्या, कारणे आणि परिणाम
(Climate Change: Definition, Causes and Effects)
2.2 जागतिक तापमान वाढ
(Global Warming: Definition, Causes and Effects)
2.3 पर्यावरणीय प्रदूषण
(Environmental Pollution: Definition, Causes and Effects)
2.4 जैवविविधतेची हानी
(Loss of Biodiversity: Definition, Causes and Effects)

प्रकरण 3.......................................................................84
पर्यावरणीय व्यवस्थापन
(Environmental Management)
3.1 पर्यावरण व्यवस्थापन
(Environment Management)
3.2 शाश्वत विकासाची संकल्पना
(Concept of Sustainable Development)
3.3 पर्यावरण संरक्षण कायदा 1986
(Environmental Protection Act 1986)
3.4 जैवविविधता कायदा 2002
(Biological Diversity Act 2002)

संदर्भ ग्रंथसूची...............................................................103

💬

Chat with us