Your cart is empty now.
भूगोल हा अतिशय प्राचीन व गतिशील असा विषय आहे. त्यामुळे या विषयाचा अभ्यास निरीक्षण अवलोकन व कृतीशील सर्वेक्षणावर अवलंबून आहे. हा विषय चार भिंतीच्या आत मध्ये शिकण्यापेक्षा चार भिंतीच्या बाहेर जास्त शिकता येतो. भूगोलाचा अभ्यास करताना प्राकृतिक भूगोलाचा अभ्यास महत्त्वाचा आहे. किंबहुना प्राकृतिक भूगोल ही भूगोलाची महत्त्वाची शाखा आहे. प्राकृतिक भूगोलाची ओळख व प्रात्यक्षिके या ग्रंथाच्या पहिल्या भागात भूगोल म्हणजे काय?, भूगोलाच्या महत्त्वाच्या शाखा, प्राकृतिक भूगोलाची ओळख, शिलावरण, वातावरण, जलावरण या घटकांवर प्रकाश टाकला आहे. तर दुसऱ्या भागात उठाव दर्शवण्याच्या संख्यात्मक व गुणात्मक पद्धती व समोच्च रेषांच्या साहाय्याने उतार व भूरूपे दर्शवणे या घटकांचा अभ्यास केला आहे. प्राध्यापक विद्यार्थी व स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना सदरील पुस्तक निश्चित उपयुक्त ठरेल अशी आशा आहे.