Your cart is empty now.
या पुस्तकाचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे त्याची समकालीन प्रासंगिकता हे होय! आज आपण जेंव्हा प्रशासन पारदर्शकतेचा, नैतिकतेचा आणि स्थानिक सहभागाचा आग्रह धरतो. तेव्हा भारताने या मूल्यांचा स्वीकार आपल्या पुरातन प्रशासनातच केलेला आहे, हे लक्षात येते. यामुळेच हे पुस्तक राष्ट्रीय शैक्षणिक धोरण - NEP 2020 अंतर्गत भारतीय ज्ञान परंपरा (IKS) नुसार असलेल्या नवीन अभ्यासक्रमासाठी अत्यंत उपयुक्त असेच आहे. पाश्चात्त्य सिद्धांतांनी व्यापलेल्या अभ्यासपद्धतीत भारतीय दृष्टिकोनाची भर घालण्याचे कार्य त्याने यशस्वीरित्या केले आहे.
अशा बहुपैलू संदर्भांमुळे या पुस्तकाचे वाचन विविध वाचकवर्गांसाठी उपयुक्त ठरेल. ते इतिहासाचा अभ्यास करणाऱ्यांसाठी सिंधूपासून - मुघलांपर्यंतच्या प्रशासनाचा तुलनात्मक विकास दाखवते. भारतीय प्रशासनाच्या आद्य तत्त्वांची समज या पुस्तकाद्वारे लोकप्रशासनाचे विद्यार्थी मिळवू शकतात. धोरण निर्धारक, प्रशासनातील अधिकारी आणि प्रशिक्षण घेणारे उमेदवार प्राचीन व्यवस्थेतील नैतिक आदर्श, न्यायधर्म, विकेंद्रीकरण आणि लोकहिताचे तत्त्व भावी काळात त्यांच्या कार्यात समाविष्ट करू शकतात. याशिवाय, भारतीय संस्कृतीचा अभ्यास करणाऱ्यांसाठी हे पुस्तक प्रशासन आणि धर्म, अर्थ, काम, मोक्ष या जीवनमूल्यांमधील परस्परसंबंध स्पष्ट करते.