Welcome to Prashant Publications

Rs. 250.00 10% OFF
Availability: 10 left in stock


इतिहास हा केवळ भूतकाळातील घटना, राजे-महाराजे, युद्धे आणि साम्राज्यांची माहिती देणारा विषय नाही; तर मानवी समाजाच्या विकासाचा, परिवर्तनाचा आणि प्रगतीचा प्रदीर्घ प्रवास आहे. मानवाच्या आद्य जीवनापासून सुरू झालेला हा प्रवास...

  • Name : प्राचीन भारत (Ancient India)
  • Vendor : Prashant Publication
  • Type : TYBA
  • Manufacturing : September 2026
  • Total Pages : 159 Pages

Guaranteed safe checkout:

apple paygoogle paymasterpaypalshopify payvisa

Orders ship within 5 to 10 business days.

Hoorey ! This item ships free to the US

प्राचीन भारत (Ancient India)
- +


इतिहास हा केवळ भूतकाळातील घटना, राजे-महाराजे, युद्धे आणि साम्राज्यांची माहिती देणारा विषय नाही; तर मानवी समाजाच्या विकासाचा, परिवर्तनाचा आणि प्रगतीचा प्रदीर्घ प्रवास आहे. मानवाच्या आद्य जीवनापासून सुरू झालेला हा प्रवास सामाजिक, आर्थिक, धार्मिक, सांस्कृतिक आणि राजकीय परिवर्तनातून पुढे विकसित होत गेला. या परिवर्तनाची प्रक्रिया समजून घेतल्याशिवाय भारतीय संस्कृती आणि समाजाच्या जडणघडणीचे स्वरूप समजणे शक्य नाही.
‘प्रागैतिहासिक ते मौर्यकाल’ या पुस्तकाच्या माध्यमातून भारतीय इतिहासाच्या या महत्त्वपूर्ण कालखंडाचा क्रमबद्ध, सुटसुटीत आणि विद्यार्थ्यांना समजेल अशा भाषेत आढावा घेण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. प्रागैतिहासिक मानवाचे जीवन, दगडी संस्कृती, शेतीचा उदय, स्थिर वसाहतींची निर्मिती, सिंधू संस्कृतीचा विकास, वैदिक संस्कृती, महाजनपदांची निर्मिती, बौद्ध व जैन धर्माचा उदय आणि मौर्य साम्राज्याची स्थापना या विविध ऐतिहासिक टप्प्यांचा यात समावेश करण्यात आला आहे.
विद्यार्थ्यांना इतिहासातील घटना केवळ पाठ करण्याऐवजी त्या घटनांमागील कारणे, त्यांचे परिणाम आणि त्यांचा परस्परसंबंध समजून घेता यावा, हा या पुस्तकाचा प्रमुख उद्देश आहे. इतिहास विषय विद्यार्थ्यांना अधिक जवळचा आणि रंजक वाटावा, यासाठी विषयांची मांडणी सोप्या, स्पष्ट आणि अभ्यासपूर्ण पद्धतीने करण्याचा प्रयत्न केला आहे. विद्यार्थ्यांच्या मनात ‘काय घडले?’ याबरोबरच ‘का घडले?’ आणि ‘त्याचा समाजावर काय परिणाम झाला?’ असे प्रश्न निर्माण व्हावेत, यालाही महत्त्व दिले आहे.
या पुस्तकाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये इतिहासाविषयी जिज्ञासा, चिकित्सक दृष्टिकोन आणि भारतीय सांस्कृतिक वारशाबद्दल अभिमानाची भावना निर्माण व्हावी, ही अपेक्षा आहे. इतिहासाचा अभ्यास हा केवळ परीक्षेपुरता मर्यादित न राहता वर्तमान समजून घेण्यासाठी आणि भविष्यासाठी सजग दृष्टिकोन निर्माण करण्यासाठी उपयुक्त ठरावा, हीच या पुस्तकामागील मुख्य भावना आहे.

प्रकरण 1........................................................................7
साधने
(Sources)
अ) पुरातत्त्वीय स्रोत - पुरातत्त्वीय स्रोतांचे साधन: उत्खनन, शिलालेखीय आणि नाणकीय स्रोत, कला-स्थापत्य आणि प्रतिमाशास्त्रीय स्रोत
ब) साहित्यिक स्रोत -
वैदिक - वेद, आरण्यके-उपनिषदे, पुराणे, रामायण-महाभारत
बौद्ध - पिटक-निकाय-जातके, बुद्धचरित्र
जैन - आगम, पौमचरिउ, वासुदेवहिंडी
क) परकीय स्रोत -
ग्रीक-रोमन - इंडिका, पेरिप्लस ऑफ द एरिथ्रियन सी
चिनी - फा-हियान, ह्वेन-त्सांग

प्रकरण 2.......................................................................35
प्रागैतिहासिक ते उत्तर-हडप्पा संस्कृती
(Pre-history to Post Harappan Civilization)
अ) प्रागैतिहासिक - पॅलिओलिथिक (पुरापाषाण), मेसोलिथिक (मध्यपाषाण) आणि निओलिथिक (नवपाषाण) संस्कृती
ब) हडप्पा संस्कृती -
उगम, नियोजन (नगररचना), कला-स्थापत्य, शिक्के आणि लिपी
अर्थव्यवस्था, समाज आणि धर्म पतन
क) चाल्कोलिथिक (ताम्रपाषाणिक) आणि मेगालिथिक (महापाषाणिक) संस्कृती -
चाल्कोलिथिक संस्कृती - जोर्वे संस्कृती
मेगालिथिक संस्कृती - पुरातन थडग्यांचे प्रकार आणि लोह तंत्रज्ञान

प्रकरण 3......................................................................81
वैदिक संस्कृती आणि नवीन धार्मिक पंथांचा उदय (Vedic Culture and Rise of New Religious Sects) अ) वैदिक संस्कृती (प्रारंभिक आणि उत्तर)-मूळ स्थान, विधी आणि समाज ब) जैन धर्म - तत्त्वज्ञान, पंथ - दिगंबर आणि श्वेतांबर क) बौद्ध धर्म - तत्त्वज्ञान, पंथ - हीनयान आणि महायान ड) आजीविक आणि लोकायत - तत्त्वज्ञान

प्रकरण 4....................................................................121
महाजनपदांपासून मौर्यांकाळापर्यंत (Mahajanapadas to Mauryas) अ) महाजनपदे ब) मगध साम्राज्याचा उदय, नंद शासक क) मौर्य साम्राज्य - चंद्रगुप्त आणि अशोक, अशोकाचा धम्म, प्रशासन, समाज, अर्थव्यवस्था आणि संस्कृती, मौर्य साम्राज्याचा पतन

💬

Chat with us