Your cart is empty now.
उपग्रहवेधी क्षेपणास्त्राची चाचणी, आक्रमक व शत्रुला विस्मयाचा धक्का देणार्या सर्जिकल स्ट्राईक्स, बालाकोट एअरस्ट्राईक आणि डोकलाम विवादात घेतलेल्या ठाम व कणखर भूमिकेमुळे चीनी सैन्याला घ्यावी लागलेली माघार या प्रासंगिकतेतून भारताने आज आक्रमक व वास्तववादी सुरक्षा धोरणाचा अंगिकार केल्याचे स्पष्ट होते. परिणामी ‘सॉफ्ट स्टेट’ ही भारताची आजवरची प्रतिमा पुसून टाकण्यात आपण बर्यापैकी यशस्वी झालो आहोत.
राष्ट्रीय सुरक्षा ही देशासाठी प्राधान्यक्रमाची बाब असून कोणतीही आर्थिक, औद्योगिक प्रगती किंवा विकास हा पुरेशा सुरक्षेशिवाय निरर्थक आहे. प्रादेशिक समस्यांमध्ये भाषा, सामाजिक, राजकीय, भौगोलिक, धार्मिक व आर्थिक समस्या तसेच सांप्रदायिकता, स्थलांतर, निरक्षरता, लिंगभेद, नव्याने प्रस्थापित झालेली समाज माध्यमे व त्यापासून होणारे दुष्परिणाम, आरोग्य, पर्यावरण, माओवादी चळवळी, शेजारील राष्ट्रांचा अमानुष दहशतवाद, सायबर गुन्हेगारी आणि भारताच्या सीमा समस्या व सुरक्षा या सर्व समस्या आणि नव्याने उभ्या ठाकलेल्या आव्हानांचा यथायोग्य परामर्श ‘भारताची राष्ट्रीय सुरक्षा’ या ग्रंथात घेण्यात आलेला आहे. त्याचबरोबर राष्ट्रशक्तीवर विविध समस्यांचा परिणाम होऊन देश दुबळा कसा बनतो व त्याचबरोबर करावयाच्या उपाययोजनाही सूचविण्यात आलेल्या आहेत.