Welcome to Prashant Publications

Rs. 185.00 10% OFF
Availability: 10 left in stock

इतिहास आणि भारतीय संस्कृती हे स्पर्धा परीक्षांचे महत्त्वाचे घटक असल्याने हे पुस्तक UPSC, MPSC, UGC-NET, MH -SET तसेच अन्य विविध स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठीही उपयुक्त संदर्भग्रंथ ठरेल. नाण्यांच्या आधारे...

Guaranteed safe checkout:

apple paygoogle paymasterpaypalshopify payvisa

Orders ship within 5 to 10 business days.

Hoorey ! This item ships free to the US

मध्ययुगीन भारतीय नाणकशास्त्र (Medieval Indian Numismatics)
- +

इतिहास आणि भारतीय संस्कृती हे स्पर्धा परीक्षांचे महत्त्वाचे घटक असल्याने हे पुस्तक UPSC, MPSC, UGC-NET, MH -SET तसेच अन्य विविध स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठीही उपयुक्त संदर्भग्रंथ ठरेल. नाण्यांच्या आधारे सामाजिक-आर्थिक इतिहास, व्यापार-वाणिज्य, परकीय प्रभाव, धार्मिक सहिष्णुता, राजकीय सार्वभौमत्व आणि कालमापन पद्धती यांचा सखोल अभ्यास करता येतो, जो स्पर्धा परीक्षांच्या अभ्यासासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. या ग्रंथात नाणी केवळ चलन म्हणून नव्हे, तर इतिहासाचा विश्वासार्ह स्रोत म्हणून मांडण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. नाण्यांचे संवर्धन, त्यांचे संशोधनमूल्य आणि इतिहास लेखनातील स्थान यांचाही विचार करण्यात आला आहे. शास्त्रीय दृष्टिकोन जपत, तरीही विषय रंजक व समजण्यास सोपा राहील, याची विशेष काळजी घेण्यात आली आहे. या पुस्तकाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये आणि अभ्यासकांमध्ये मध्ययुगीन भारतीय नाणकशास्त्राविषयी शास्त्रीय दृष्टी विकसित व्हावी, भारतीय ज्ञानपरंपरेतील या महत्त्वपूर्ण घटकाचे महत्त्व अधोरेखित व्हावे आणि इतिहासाकडे पाहण्याची दृष्टी अधिक सखोल व व्यापक व्हावी-हीच या ग्रंथामागील लेखनाची प्रामाणिक भूमिका आहे.                

प्रकरण 1........................................................................9
मध्ययुगीन काळातील नाणी
Coins Under Medieval Period
1.1 मुघलपूर्व काळातील नाणेप्रणाली
Coinage before Mughal Period
1.2 शेरशाह सूरीच्या कालखंडातील नाणकशास्त्र
Coinage under Sher Shah Suri's Period
1.3 मुघल काळातील नाणकशास्त्र
Coinage under Mughal Per
1.4 मराठा कालखंडातील नाणकशास्त्र
Coinage under Maratha Period

प्रकरण 2......................................................................78
सामाजिक-आर्थिक इतिहासाचे स्रोत म्हणून नाणकशास्त्र व त्याच्या जतनाच्या पद्धती
Coinage as a Source of Socio-Economic History and its
Preservation Methods
2.1 भारतीय नाणकशास्त्रावर परकीय प्रभावांचा परिणाम
Impact of Foreign Influences on Indian Coinage
2.2 व्यापार, वाणिज्य आणि अर्थव्यवस्थेचे पुरावे म्हणून नाणी
Coinage as Evidence of Trade, Commerce and Economy
2.3 नाण्यांमधील धार्मिक व राजकीय प्रतीकात्मकता
Religious and Political Symbolism in Coinage
2.4 नाण्यांचे संवर्धन (जतन) करण्याच्या पद्धती.
Methods of Coin Preservation

संदर्भ ग्रंथसूची..............................................................126

💬

Chat with us