Your cart is empty now.
या पुस्तकाचा उद्देश विद्यार्थ्यांना मराठी व्याकरणाचे मूलभूत ते प्रगत ज्ञान सोप्या, स्पष्ट आणि सुबोध पद्धतीने उपलब्ध करून देणे हा आहे. अनेकदा व्याकरण हा विषय विद्यार्थ्यांना कठीण आणि कंटाळवाणा वाटतो. परंतु योग्य उदाहरणे, सराव आणि सुसंगत स्पष्टीकरण यांच्या साहाय्याने तो विषय सोपा आणिसुटसुटीत करण्याचा प्रयत्न केला आहे. शेवटी, मराठी भाषेची गोडी वाढविणे, तिचा शुद्ध आणि प्रभावी वापर करण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करणे आणि विद्यार्थ्यांमध्ये भाषिककौशल्य विकसित करणे हा या पुस्तकाचा मुख्य हेतू आहे.
मराठी भाषा ही प्राचीन परंपरा, समृद्ध साहित्य आणि विविध सांस्कृतिक पैलूंनी परिपूर्ण अशी भाषा आहे. संत साहित्यापासून आधुनिक साहित्यापर्यंत मराठीने एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. अशा या भाषेचा अचूक, शुद्ध आणि प्रभावी वापर करण्यासाठी व्याकरणाची भक्कम पायाभरणी असणे गरजेचे आहे. व्याकरण हे केवळ नियमांचे बंधन नसून, ते भाषेला योग्य दिशा देणारे आणि तिच्या सौंदर्यात भर घालणारे साधन आहे.
या पुस्तकाची निर्मिती करताना महाविद्यालयीन स्तरावरील विद्यार्थ्यांच्या बौद्धिक क्षमतेला आणि जिज्ञासेला केंद्रस्थानी ठेवून करण्यात आली आहे. उच्च शिक्षणाच्या पायरीवर वावरत असताना विद्यार्थ्यांची भाषिक सुसज्जता प्रगल्भ असणे आजच्या काळाची अत्यंत महत्त्वाची गरजबनली आहे. केवळ परीक्षाभिमुख 4 | प्रशांत पब्लिकेशन्स
दृष्टिकोनातून नव्हे, तर मराठी भाषेच्या उपजत सौंदर्याचा, तिच्या उपपत्तीचा आणि व्युत्पत्तीचा सूक्ष्म मागोवा घेण्याच्या उद्देशाने या पुस्तकाची मांडणी करण्यात आली आहे. ते करत असताना विद्यार्थ्यांच्या गरजा, त्यांची समज आणि अभ्यासक्रम यांचा सखोल विचार करण्यात आला आहे. व्याकरण विषय अनेकदा कठीण, कोरडा आणि क्लिष्ट वाटतो परंतु तो सोप्या आणि आकर्षक पद्धतीने मांडल्यास विद्यार्थ्यांना तो अधिक रुचकर वाटू शकतो. या उद्देशाने या पुस्तकात प्रत्येक संकल्पना स्पष्ट, सोप्या आणि उदाहरणांसह दिली आहे.
या पुस्तकात मराठी व्याकरणातील विविध घटकांचा समावेश करण्यात आला आहे. शब्दांचे प्रकार, शब्दरचना, वाक्यरचना, लिंग, वचन, विभक्ती, काळ, अलंकार, वाक्प्रचार, म्हणी, तसेच लेखनकौशल्याशी संबंधित घटक यांचे सविस्तर विवेचन करण्यात आले आहे. प्रत्येक घटक विद्यार्थ्यांच्या स्तरानुसार आणि अभ्यासक्रमाशी सुसंगत ठेवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.