Your cart is empty now.
लोकसाहित्याचे विविध आयामांतून संशोधन होणे गरजेचे आहे. लोकसाहित्य ही आमच्या आदिम जीवनप्रवासाची संस्कार प्रणाली आहे. लोकसाहित्यातून निर्माण झालेला संस्कृती स्रोत व शोध मानवसमूहाची ओळख करुन देणारा महत्त्वाचा घटक आहे; त्यामुळे लोकसाहित्याला नकार म्हणजे मानव समूहाच्या निर्मितीक्षम पूर्वपरंपरांना नकार ठरेल, त्यामुळे लोकसाहित्याचे बहुआयामी संशोधन ही काळाची गरज आहे.