Your cart is empty now.
छत्रपती शिवाजी महाराज हे हिंदुस्तानचे आराध्य दैवत आहेच, पण त्याचबरोबर ते एक असीम चैतन्य आहेत. त्या चैतन्याला जेवढी प्रामाणिकपणे साद घातली जाते, तितक्याच उत्कटतेने प्रतिसाद मिळतो, अशी माझी ठाम धारणा आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास हा वेगवेगळया साहित्य कृतीतून पोहचत राहणं हे पुढच्या पिढीसाठी दिशादर्शक आणि मार्गदर्शक आहे. याच श्रुंखलेतला ‘शिवकाव्य’ हा जो महाकाव्याचा प्रयत्न आहे, त्या महाकाव्याच्या प्रयत्नासाठी माझ्याकडून मनःपूर्वक आभार आणि खूप साऱ्या शुभेच्छा!
– डॉ. अमोल रामसिंग कोल्हे