Your cart is empty now.
एकूणच, समाज माध्यमांसाठी आशय लेखन ही बदलत्या डिजिटल विश्वातील एक महत्त्वपूर्ण अभिव्यक्तिकला आहे. तंत्रज्ञान संवादासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देते; परंतु त्या व्यासपीठाला अर्थपूर्ण बनविण्याचे कार्य आशय करतो. शब्दांमधून विचार व्यक्त करणे, माहितीच्या माध्यमातून ज्ञान निर्माण करणे आणि सर्जनशील लेखनातून समाजाशी नाते जोडणे ही आशय लेखनाची खरी शक्ती आहे. भविष्यात डिजिटल तंत्रज्ञानाचे स्वरूप अधिक विकसित होईल, नवीन समाज माध्यमे उदयास येतील आणि संवादाच्या पद्धतींमध्येही परिवर्तन घडत राहील. तरीही अचूक माहिती, सुस्पष्ट भाषा, सर्जनशील विचार, सामाजिक बांधिलकी आणि मानवी संवेदनशीलता यांचे महत्त्व कायम राहील. या जाणिवेतून समाज माध्यमांसाठी आशय लेखनाचा अभ्यास करणे म्हणजे केवळ डिजिटल लेखनाचे तंत्र शिकणे नव्हे, तर बदलत्या समाजाशी अर्थपूर्ण संवाद साधण्याची क्षमता विकसित करणे होय.या पुस्तकाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना, शिक्षकांना, संशोधकांना आणि नवोदित आशय लेखकांना समाज माध्यमांच्या व्यापक विश्वाची ओळख होईल, आशय लेखनाच्या विविध पद्धतींचे आकलन होईल आणि प्रभावी, सर्जनशील व जबाबदार डिजिटल लेखनासाठी आवश्यक असलेली दृष्टी प्राप्त होईल, अशी अपेक्षा आहे. ज्ञान, भाषा, तंत्रज्ञान आणि सर्जनशीलता यांचा समन्वय साधत मराठी आशय लेखनाला अधिक समृद्ध आणि अर्थपूर्ण बनविण्याच्या दिशेने हे पुस्तक एक उपयुक्त पाऊल ठरेल, असा विश्वास वाटतो.