Your cart is empty now.
प्रस्तुत पुस्तकाची मांडणी चार प्रकरणांमध्ये मुद्देसूद व साध्या आणि सोप्या भाषेमध्ये करण्याचा प्रयत्न केलेला आहे. वर्गातील विद्यार्थ्यांची भाषिक पार्श्वभूमी वेगवेगळी असते. कुटुंब, मित्र, शेजारी इ.सर्वांचा अध्ययनार्थ्यांवर परिणा होत असतो. शिक्षकाकडे बहुभाषिकता असायला हवी, त्यामुळे शिक्षणात भाषा विषयासाठी प्रमाण भाषेचा विचार होत असतो. विषयानुसार भाषेचे स्वरूप बदलते त्याच्या कार्यनीती, सिद्धांत, संक्रण या सर्वांचे ज्ञान असायला पाहिजे. त्या संदर्भातील माहिती या विषयातून आपणास प्राप्त होऊ शकते. त्यामुळे शालेय विद्यार्थ्यांची भाषिक पार्श्वभूमी, भाषेची संकल्पना, विद्यार्थ्यांचे वर्गातील बहुभाषिकतेविषयीचे आकलन व संवेदनशीलता, बहुभाषिक वर्ग खोलीतील आव्हाने, बहुभाषिक वर्ग खोलीच्या प्रयुक्त्या, प्रमाण भाषेचा प्रभाव, भाषेचे स्वरूप आणि अध्ययनार्थीच्या सामाजिक परिस्थितीत तील विभिन्नतेसाठीचा अभ्यासक्र. इत्यादीची माहिती देण्यात आली आहे. वर्गातील भाषिक, मौखिक अभिव्यक्तीचे स्वरूप, भूमिका, महत्व या बाबी स्पष्ट केल्या आहेत तसेच माहितीचे अवांतर वाचन आणि लेखन यामधून मूक आणि प्रकट वाचन, चांगल्या हस्ताक्षराची वैशिष्ट्ये, वाचनाच्या कार्यनीती, टिप्पणी लेखन, सारांश लेखन, संदर्भ ग्रंथ वाचन व विमर्षण इत्यादी आशयाची सविस्तर मांडणी केली आहे.