Welcome to Prashant Publications

Rs. 175.00 10% OFF
Availability: 10 left in stock

विद्यापिठ अनुदान आयोगाच्या मार्गदर्शक तत्वानुसार संत गाडगेबाबा
अमरावती विद्यापिठाने 2024-25 या शैक्षणिक सत्रापासून पदवी स्तराला नवीन
शैक्षणिक धोरण 2020 (NEP 2020) नुसार अभ्यासक्रम लागू केला आहे.
त्याअंतर्गत बी.कॉम. प्रथम वर्ष दुसरे...

Categories:

Guaranteed safe checkout:

apple paygoogle paymasterpaypalshopify payvisa

Orders ship within 5 to 10 business days.

Hoorey ! This item ships free to the US

Bharatiya Prasanvida Adhiniyam – II
- +

विद्यापिठ अनुदान आयोगाच्या मार्गदर्शक तत्वानुसार संत गाडगेबाबा
अमरावती विद्यापिठाने 2024-25 या शैक्षणिक सत्रापासून पदवी स्तराला नवीन
शैक्षणिक धोरण 2020 (NEP 2020) नुसार अभ्यासक्रम लागू केला आहे.
त्याअंतर्गत बी.कॉम. प्रथम वर्ष दुसरे सत्रकरिता प्रमुख विषय म्हणून भारतीय
प्रसंविदा अधिनियम-2 या अभ्यासक्रमाची निवड केली आहे. विद्यापिठाने निश्चित
केलेल्या अभ्यासक्रमानुसार या पुस्तकाची मांडणी केली आहे.
कायद्यासारखा किचकट विषय विद्यार्थ्यांना सहजपणे समजावा, या हेतूने
विषयाची सोपी व सुटसुटीत मांडणी करुन प्रस्तृत पुस्तकाचे लिखाण केले आहे.
कायद्याची भाषा बोजड, क्लिष्ट वाटू नये म्हणून विविध संकल्पना, नियम तरतुदीचे
मुद्देसूद विश्लेषण सोप्या भाषेत स्पष्ट करण्यात आले आहे. आवश्यक तिथे व्याख्या
व स्पष्टीकरणेसुद्धा दिलेली आहेत. तसेच सहज समजतील अशी उदाहरणे देऊन
संकल्पना स्पष्ट करण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे. प्रस्तुत पुस्तकाची
रचना भाषा आणि विवेचन पद्धती सरळ व सुलभ अशी आहे. प्रत्येक घटकाच्या
शेवटी प्रश्नसंग्रह दिलेला आहे. मला खात्री आहे की, विद्यार्थ्यांना या पुस्तकाच्या
माध्यमातून वाणिज्य कायद्याशी संबंधित विषय सोपा वाटेल. हे पुस्तक विद्यार्थी व
प्राध्यापक वर्गाच्या स्वाधीन करतांना आनंद होत आहे.

1. क्षतिपूर्ती आणि प्रत्याभुतीचा कायदा ..................................... 7
1.1 क्षतिपूर्तीचा प्रसंविदा : व्याख्या, अर्थ
1.2 क्षतिपूर्ती प्रसंविद्याची आवश्यक लक्षणे
1.3 क्षतिपूर्ती गृहित्याचे अधिकार
1.4 क्षतिपूर्तीदात्याचे अधिकार

2. प्रत्याभूतीचा प्रसंविदा ...................................................16
2.1 प्रत्याभूतीचा प्रसंविदा - व्याख्या, अर्थ
2.2 बँक हमी संदर्भातील कायदा
2.3 प्रत्याभूतीचे प्रकार
2.4 प्रत्याभूतीदात्याचे उत्तरदायित्व
2.5 सह-प्रत्याभूतीदाते आणि त्यांची जबाबदारी
2.6 प्रत्याभूतीदात्याचे अधिकार

3. निक्षेपाचे प्रसंविदे आणि तारणासाठी निक्षेप.............................41
3.1 निक्षेपाचा प्रसंविदा - व्याख्या, अर्थ
3.2 निक्षेपदात्याचे अधिकार, कर्तव्य आणि उत्तरदायित्व
3.3 निक्षेपगृहित्याचे अधिकार, कर्तव्य आणि उत्तरदायित्व
3.4 ग्रहणाधिकार म्हणजे काय?
3.5 बंधक/तारण - व्याख्या, अर्थ
3.6 तारणगृहित्याचे अधिकार, कर्तव्य आणि उत्तरदायित्व
3.7 तारणदात्याचे अधिकार, कर्तव्य आणि उत्तरदायित्व

4. अभिकर्तृत्वाचा कायदा .................................................82
4.1 अभिकर्तृत्व म्हणजे काय ?
4.2 अभिकर्तृत्वाची निर्मिती
4.3 पुष्टीकरण व पुष्टीकरणासंबंधी नियम
4.4 अभिकर्त्याचे प्रकार
4.5 अभिकर्त्याचे अधिकार क्षेत्र
4.6 अभिकर्त्याचे अधिकार, कर्तव्ये आणि
तिसऱ्या पक्षाबद्दल उत्तरदायित्व
4.7 प्रमुखाचे अधिकार, कर्तव्ये आणि
तिसऱ्या पक्षाबद्दल उत्तरदायित्व
4.8 अभिकर्तृत्वाची समाप्ती

💬

Chat with us