-
-
-
-
-
आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्र
आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्र अभ्यासाची स्वतंत्र शाखा म्हणून आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्र उगम पावलाचे दिसून येते. सन 1929 मध्ये अमेरिकेला मंदीचा फटका बसला त्यामुळे सर्व जगाला व्यापून टाकले. संकटावर मात करण्यासाठी, प्रत्येक देशाने स्वत:ची जपणूक करण्याच्या दृष्टिकोनातून एक व्यापक व्यापार योजना अवलंबली, ज्यामुळे आंतरराष्ट्रीय व्यापार आणि परस्पर हितसंबंधांचे अतूट, साहजिकच, शिवाय आंतरराष्ट्रीय आर्थिक संबंधातील काही उत्तम व्यवस्था अवलंबण्याचा प्रयत्न झाला आहे. विसाव्या शतकात आणि त्यानंतरपासून जागतिक एकीकरण वेगाने वाढले आहे, ज्यामुळे अर्थव्यवस्थेच्या स्वरूपात मोठे बदल झाले आहेत. जागतिक व्यापार संघटना (WTO) च्या ऑपरेशनमुळे व्यापार निर्बंध आणि नियम कमी केले जात आहेत, म्हणूनच जागतिकीकरणाला वेग आला आहे.
सदरील ग्रंथात व्यापार, आंतरराष्ट्रीय व्यापाराची तत्त्वे, व्यापाराचे फायदे, व्यापार धोरणे, विनिमय दर, भारताचा परराष्ट्र व्यापार व धोरणे, जागतिक व्यापार संघटना, प्रादेशिक, आंतरराष्ट्रीय सहकार्य व निर्यातीत विशेष आर्थिक क्षेत्रांच्या धोरणाचे मूल्यांकन इत्यादीचे सखोल लिखाण केले गेले आहे. विद्यार्थ्यांना समजू शकेल अशी सोपी भाषा, परिभाषा कसे वापरता येईल याची दक्षता घेण्यात आली आहे. तसेच स्पर्धा परीक्षा, सेट, नेट परीक्षा तसेच व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या परीक्षांसाठी हे पुस्तक नक्कीच उपयुक्त ठरेल.Antarrashtriya Arthashastra
-
-
आंतरराष्ट्रीय व्यापार : सिद्धांत आणि व्यवहार
आर्थिक विकासाचे इंजिन म्हणून आंतरराष्ट्रीय व्यापाराकडे पाहिले जाते. व्यापार माध्यमातून जगातील सर्वच देशांचा कमी-जास्त वेगाने आर्थिक विकास होऊ लागतो. आंतरराष्ट्रीय व्यापार माध्यमातून प्रत्येक देश आपला विकास साध्य करण्याचा प्रयत्न करतो. एकमेकांवरील अवलंबित्वातूनच जगातील विविध देशांमध्ये आंतरराष्ट्रीय व्यापार सुरू होतो. व्यापार मुळात लाभ मिळविण्याच्या हेतुने केला जातो. एखादा देश आर्थिकदृष्ट्या कितीही संपन्न असला तरी संपुर्णत: स्वयंपूर्ण असू शकत नाही. कारण देशात सर्वच वस्तू व सेवांचे पुरेशा प्रमाणात उत्पादन होतेच असे नाही. वस्तू व सेवांची देशांतर्गत टंचाई दूर करण्यासाठी आणि आर्थिक विकासासाठी इतर देशांवर अवलंबून राहावे लागते, तसेच देशातील वस्तू व सेवांचे अतिरिक्त उत्पादन खपविण्यासाठी इतर देशांवर अवलंबून राहावे लागते. व्यापारातून देशा-देशांमध्ये आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक आणि राजकीय संबंध निर्माण होतात, सहकार्याची आणि एकात्मकतेची भावना निर्माण होते, विकसित देश विकसनशील देशांना विकासासाठी मदत करतात.
प्रस्तुत पुस्तकात आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्र, आंतरराष्ट्रीय व्यापार, आर्थिक विकास, आंतरराष्ट्रीय व्यापारापासून लाभ-हानी, विविध सिद्धांत व धोरणे, व्यापारतोल, विदेशी विनिमय दर, विदेशी गुंतवणूक, बहुराष्ट्रीय कंपन्या, विदेश चलन गंगाजळी, विविध आंतरराष्ट्रीय संस्था व परिषदा, जागतिक वित्तीय संकट 2008, रुपयाचे अवमूल्यन आणि परिवर्तनियता इ. मुद्द्यांचा सविस्तर परामर्श घेतलेला आहे.– प्रा. डॉ. एन. एल. चव्हाण
Antarrashtriy Vyapar And Vyavahar
-