-
उपयोजित इतिहास
इतिहासाचे स्वरूप काळाप्रमाणे उदंड आहे. साधारणत: पृथ्वीच्या उत्पत्तीपासून मानवी इतिहासाचा प्रारंभ होतो. मानवी जीवनाची झालेली उत्क्रांती, त्यातील टप्पे, मानवी संस्कृतीचा उदय-अस्त, त्यांच्या जीवनात घडलेल्या विविध घटनांचा परामर्श इतिहासाच्या अभ्यासात केला जातो. मानवी जीवनाचा भूतकाळ म्हणजे इतिहास. मानवी जीवनाच्या सर्वांगाला स्पर्श करण्याचा प्रयत्न साधारणत: इतिहासाच्या अभ्यासाद्वारे केला जावू शकतो. प्राचीन, अतिप्राचीन काळात इतिहासाला मर्यादा होत्या. आधुनिक काळात मात्र त्या नाहीत. प्राचीन काळापासूनच मानवाला सुंदर, कलात्मक, मौल्यवान, दुर्मिळ अशा कोणत्याही वस्तू अथवा अवशेषांबद्दल आकर्षण व कुतूहल असते. वस्तुसंग्रहालयातून मानव संस्कृतीच्या पाऊलखुणा जपून ठेवलेल्या दिसतात. वस्तुसंग्रहालयाची कल्पना सर्वप्रथम युरोपमध्ये जन्माला आली. वस्तुसंग्रहालयाचा उदय प्रथम ग्रीस व रोममध्ये घडून आला. प्राचीन भारतात अनेक विद्यापीठे होती. या विद्यापीठात मोठी संग्रहालये होती. पण ती आजच्या वस्तुसंग्रहालयासारखी सुसज्ज नव्हती. देशभरातील अनेक संस्थानिकांनी आपआपल्या संस्थानात त्यांच्याकडे उपलब्ध असलेल्या वस्तूंची वस्तुसंग्रहालये स्थापन केलीत. मानवी जीवनात नाविन्यपूर्ण गोष्टी, वास्तू पहाण्याचे आकर्षण अनादी काळापासून आहे. ऐतिहासिक स्थळे, स्मारके, प्राचीन वस्तू व वास्तू, मंदिरे, मंदिरातील देवदेवतांच्या मूर्ती, राजवाडे, नवी आकर्षक व जुनी घरे, किल्ले, गुहा, लेणी इ. पहाण्याची मानवी मनास अत्यंत उत्सुकता व कुतूहल असते.
Upyojit Itihas
-
प्राचीन भारत (प्रारंभ ते १२००)
भारतीय संस्कृती ही अतिप्राचीन असून तिचा प्रारंभ सिंधू संस्कृतीपासून होते. सिंधू संस्कृतीच्या पूर्वीसुद्धा भारतात मानवी संस्कृती अस्त्त्विात होती. सिंधू संस्कृतीनंतर वैदिक संस्कृतीचा उदय व विकास झाला.
भारतभूमीत प्राचीन काळात सम्राट चंद्रगुप्ताने आचार्य चाणक्यांच्या सहकार्याने संबंध भारत भूमीवर एक विशाल मौर्य साम्राज्य उभारले. सम्राट अशोकाने पराक्रम करुनही जगाला शांतीचा संदेश दिला. सारनाथ येथील अशोकाच्या स्तंभावरील चार सिंहाचे प्रतीक, अशोक चक्र स्वतंत्र भारताच्या शासनाने राजचिन्ह मानले. मौर्यानंतर गुप्त, वाकाटक, सातवाहन, चालुक्य, राष्ट्रकूट, राजपूत, चोल, चेर, पांड्य, पल्लव इत्यादी राजकीय सत्ताधिशांच्या काळात सोपरा, भडोच ह्या प्रसिद्ध बंदरातून भारतीय उत्पादीत माल निर्यात होऊ लागला. अनेक प्रकारचे उद्योग कृषी व्यवसायातून पुढे आल्याने भारत सुवर्णभूमी बनली होती. भारतीय राजकीय सत्ता काळातील अजिंठा व वेरुळ लेणी तर शिल्पशास्त्रातील एक आश्चर्य मानण्यात यतेते. या ग्रंथात राजकीय इतिहासाबरोबरच षङ्दर्शने, उषनिषदे, जैन व बौद्ध धर्म, स्त्रियांची परिस्थिती, कायदा व न्यायव्यवस्था, शिक्षण पद्धती, कला व स्थापत्य, शेती, व्यापार व वाणिज्य, सरंजामशाही, धार्मिक व सामाजिक परिस्थिती आणि साहित्य या विषयांवरही सविस्तर प्रकाश टाकला आहे. प्रस्तुत ग्रंथ पदवी, पदव्युत्तर, नेट/सेट आणि स्पर्धात्मक परीक्षांसाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे.Prachin Bharat (Praranbh te 1200)
-
-
प्राचीन भारताचा इतिहास (इ.पू. 3000 ते इ.स. 1200)
प्राचीन काळी भारत सुवर्णभूमी म्हणून ओळखला जात असे. त्याचा व्यापार दूरदूरच्या देशांबरोबर चालत असे. त्याच्या संस्कृतीची किर्ती संपूर्ण जगात पसरली होती. कलाकौशल्य, साहित्य, विज्ञान, तत्त्वज्ञान आणि व्यापार यांच्या बाबतीत हा देश जगाला मार्गदर्शक होता. असे असतानाही आपणास मोठ्या दु:खाने सांगावे लागते, की आज या देशाचा प्राचीन गौरवशाली इतिहास उपलब्ध नाही. जो उपलब्ध आहे तो फारच अल्प आहे, म्हणून प्राचीन भारताचा अभ्यास करताना इतिहासकाराला मोठा त्रास पडतो. आज भारताचा जो इतिहास उपलब्ध आहे त्याच्या कैकपटीने प्राचीन भारताचा इतिहास स्मृतीच्या गर्तेत नष्ट झाला. त्यामुळे बरेच इतिहासकार भारताचा इतिहास किंवा भारतीय संस्कृती ही आधुनिक संस्कृती आहे, असा समज करून घेतात. भारतीयांनी तत्त्वज्ञान, नीतिशास्त्र, अर्थशास्त्र, राज्यशास्त्र इत्यादी अनेक विभागांत कार्य केले. परंतु इतिहासाबाबत संपूर्ण दुर्लक्ष केले. त्यामुळे फारच अशी थोडी प्राचीन इतिहासविषयक साधने उपलब्ध आहेत, की त्यांच्यावर विसंबूनच आपणास प्राचीन भारताचा इतिहास जाणून घ्यावा लागतो.
प्रस्तुत पुस्तकात प्राचीन भारतीय इतिहासाची साधने, हडप्पा किंवा सिंधू संस्कृती, पूर्व वैदिक काळ, धर्मक्रांतीचे युग, मौर्य साम्राज्य व मौर्योत्तर काळ, गुप्त साम्राज्य, वर्धन घराणे, दक्षिण भारत या घटकांची अचूक माहिती देण्यात आली आहे.
Prachin Bhartacha Itihas (BC 3000 to CE 1200)
-
प्राचीन भारताचा इतिहास (प्रारंभ ते इ.स.1318)
मानवाच्या उत्क्रांतीचा इतिहास लाखो वषार्र्ंचा आहे. मानवाला प्रगती करण्यासाठी अनेक घडामोडींतून वाटचाल करावी लागली. इ.स.पू. सहावे शतक हे भारताच्या इतिहासात धार्मिक क्रांतीचे युग म्हणून ओळखले जाते. या पार्श्वभूमीवर अनेक नवीन पंथांचा उदय झाला. या अनेक संप्रदायांपैकी (पंथ) जैन व बौद्ध धर्म हे प्रमुख आहेत. भारतीय संस्कृतीचा विदेशात प्रसार करण्याचे श्रेय बौद्ध धर्माला जाते. बौद्ध धर्माचे अनुकरण करून कालांतराने जैन, हिंदू, शैव व वैष्णव पंथांनी कलेच्या क्षेत्रात भरीव प्रगती केली.
इ.स.पू. सहाव्या शतकात भारताच्या सीमेवर परकीयांची आक्रमणे होण्यास सुरवात झाली. यानंतर ग्रीक, शक, कुशाण या सत्तांनी भारतावर आक्रमणे करून आपली स्वतंत्र राज्ये स्थापन केली. मौर्य, गुप्त, वाकाटक व सातवाहन सम्राटांनी परकीय आक्रमणांना यशस्वीरित्या थोपविण्याचा प्रयत्न केला. गुप्त काळाला प्राचीन भारताच्या इतिहासात ‘सुवर्णकाळ’ म्हणून ओळखले जाते. इ.स. 1318 साली यादवांचे राज्य सुलतानाच्या ताब्यात गेले. मराठी मुलखात नाथ, महानुभाव व वारकरी संप्रदायांचा प्रभावच महाराष्ट्रीय संस्कृतीच्या अभ्युदयाला व मराठी भाषेच्या उत्कर्षाला कारणीभूत ठरला.
हर्षवर्धनाच्या मृत्यूपासून मुस्लिम विजयापर्यंतचा भारतीय इतिहास राजपुतांच्या प्रभावामुळे ‘राजपूत युग’ या नावाने ओळखला जातो. प्राचीन भारतातील शिक्षणपद्धतीची माहिती संहिता, उपनिषदे, धर्मशास्त्र, बौद्ध व जैन साहित्य व धर्मसूत्रावरून होते. काळाचा दीर्घ विस्तार, भावनांची समृद्धता, भाषेचे सौंदर्य व परिष्कृत कल्पनेच्या दृष्टीने प्राचीन भारतीय साहित्य अप्रतिम आहे. धर्म हाच प्राचीन भारतात कायद्याचा मुख्य आधार मानला जात होता. भारतात विविध जनपदांची सत्ता असल्याने परंपरागत कायदा सर्वत्र एकसारखाच न राहता विभिन्न प्रकारचा राहिला. प्राचीन भारतात विविध उद्योगधंद्याचा विकास झालेला होता.
सदरील ग्रंथात राजकीय इतिहासाबरोबरच षङ्दर्शने, उषनिषदे, जैन व बौद्ध धर्म, स्त्रियांची परिस्थिती, कायदा व न्यायव्यवस्था, शिक्षण पद्धती, कला व स्थापत्य, शेती, व्यापार व वाणिज्य, सरंजामशाही, धार्मिक व सामाजिक परिस्थिती आणि साहित्य या विषयांचेही सविस्तर विवेचन केले आहे.
प्रस्तुत ग्रंथ पदवी, पदव्युत्तर, नेट/सेट आणि स्पर्धात्मक परीक्षांसाठी अत्यंत उपयुक्त आहे.
Prachin Bharatacha (Praranbh Te CE 1318)
-
प्राचीन भारताचा राजकीय आणि सांस्कृतिक इतिहास
Prachin Bhartacha Rajkiya Aani Sanskritik Itihas
-
प्रारंभिक भारत (प्रागैतिहासिक काळ ते राष्ट्रकुट काळ)
इतिहास हा विषय सर्वसामान्यांच्या दृष्टीने मनोरंजक, गोष्टीरूप व आनंददायी आहे. म्हणूनच तो लहानांपासून थोरांना आवडणारा विषय आहे. प्राचीन भारताच्या इतिहास अध्ययनातून आपल्याला भारतीय संस्कृतीची जडणघडण कशी झाली, याची माहिती प्राप्त होते. प्राचीन काळी या भूमीस ‘भारतवर्ष’ असे म्हटले गेले. प्राचीन भारताच्या इतिहासाची सुरुवात अश्मयुगापासून झाली. ताम्रपाषाण युगाच्या अखेरच्या काळात हडप्पा संस्कृतीचा उदय झाला. प्राचीन भारताची सांस्कृतिक दृष्टीने जडणघडण होण्यास प्रामुख्याने आर्यांच्या काळात सुरुवात झाली. राजकीय दृष्टीकोनातून टोळ्यांचा काळ संपून विभाजित लोकसमूह एकत्र येण्याला या काळात सुरुवात झाली. याच कालखंडात प्राचीन भारताच्या सांस्कृतिक जीवनास चालना प्राप्त झाली. भगवान गौतम बुद्ध व वर्धमान महावीर यांनी अनुक्रमे बौद्ध व जैन धर्माची स्थापना केली. याच काळात बलाढ्य अशा मगध साम्राज्याचा उदय, अलेक्झांडरची स्वारी या महत्वपूर्ण घटना घडल्या. मौर्य युगापासून प्राचीन भारताच्या राजकीय इतिहासास सुरुवात झाली. मौर्य, कुशाण, सातवाहन, गुप्त, वाकाटक, हर्षवर्धन तर दक्षिणेत चालुक्य, पल्लव, राष्ट्रकुट, चोल इत्यादी कर्तबगार अशी राजघराणी प्राचीन भारतात होऊन गेली. भारतात वेळोवेळी आलेल्या ग्रीक, शक, पहलव, हूण इ. परकीय सत्तांनी भारतीय समाजव्यवस्था, कला, वास्तुशास्त्र, साहित्य यांच्या विकासात मोठी भर घातली. वैदिक, बौध्द, जैन, द्रविड यांच्या सांस्कृतिक देवाणघेवाणीतून संयुक्त स्वरुपाची भारतीय संस्कृती उदयाला आली. म्हणून भारताच्या प्रारंभिक इतिहासाचे महत्व अनन्यसाधारण आहे.
Praranbhik Bharat (Progaitihasik Kal te Rashtrakut Kal)
-
भारतवर्ष खंड 1, 2, 3 (अश्मयुग ते इसवी 2000)
भारतवर्ष खंड 1 – अश्मयुग ते इसवी 1206
* प्राचीन भारतीय इतिहास *
‘भारतवर्ष’, ‘आर्यवर्त’, ‘इंडिया’, ‘हिंद’, ‘हिंदुस्तान’, ‘जम्बुद्विप’ इ. विविध नावांनी आपला देश ओळखला जातो. ओरिसा-कलिंगच्या चेदी वंशातील खारवेलच्या प्रशस्तीपत्रात भूवनेश्वर जवळ असणार्या हाथीगुंफा शिलालेखात भारतवर्षाचा उल्लेख सर्वप्रथम लिखित स्वरूपात मिळतो. प्रस्तुत ग्रंथाची सुरुवात करताना आपण कोण? मानवाचा विकास आणि त्या विकासाच्या अवस्था, भारतातील मानवाच्या सहा वांशिक प्रजाती आणि चार भाषीक समुह यांची नोंद लेखकाने घेतली आहे. त्याचप्रमाणे प्राचीन भारताच्या अभ्यासाची साहित्यीक आणि पुरातत्वीय आणि विदेशी यात्रेकरूंचे वृत्तांत साधन म्हणून नोंदविले आहेत. भारतातील प्रागैतिहासिक काळ, आद्य इतिहासकाळ आणि ऐतिहासिक काळ यांचा वृत्तांत समर्पक शब्दात मांडला आहे. जगातील सर्वात मोठी संस्कृती सिंधु संस्कृतीची नोंद विविध अंगाने शब्दबद्ध केली आहे. पूर्व वैदिक आणि उत्तर वैदिक संस्कृतिची वैशिष्ट्ये, इ.पू. 6 व्या शतकातील जैन आणि बौद्ध धर्म पंथांचा उदय आणि घडलेली प्रबोधनाची चळवळ वाचनीय आहे. संगम साहित्यात लेखक-कवि-रचनाकारांचे योगदान, प्राचीन भारतातील पहिले केंद्रीय साम्राज्य मौर्य सत्ताचा उदय-विस्तार आणि अस्त यांची माहिती एकत्रित वाचकाला मिळते. मौर्योत्तर काळात झालेले बदल गुप्त काळात निर्माण स्थैर्य आणि विकास, कला-साहित्य-स्थापत्य-निर्मिती वैभवशाली राहिली. गुप्तोत्तरकाळात प्रांतीय सत्तांचा झालेला उदय, दक्षिण भारतात आणि उत्तर भारतात झालेले त्रिपक्षीय संघर्ष तसेच पूर्व व आग्नेय आशियाच्या भागात भारतीय संस्कृतीचा झालेला प्रसार आणि प्रचार याची नोंदही जाणीवपूर्वक लेखकाने सिद्धहस्तपणे घेतली आहे. परिशिष्ठात लेखकाने प्राचीन भारतीय सामंतशाही, चित्र आणि मूर्तीकला, विद्याकेंद्रे, संस्कारांची यादी, लिपी, महत्त्वपूर्ण विधाने, राज्य आणि राजधानी, राजवंश, शहरे, शब्दार्थ, घटनाक्रम इ. ची नोंद केली आहे.
भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात प्रकाशित होणारा त्रिखंडात्मक ‘भारतवर्ष’चा इतिहास हा इतिहासाचा विद्यार्थी, स्पर्धा परीक्षातून करिअरचा मार्ग चोखळणार्या अभ्यासकाला निश्चितच दिशा देणारा ग्रंथ आहे.
भारतवर्ष खंड 2 – इसवी 1206 ते 1818
* मध्ययुगीन भारतीय इतिहास *
रवींद्रनाथ टागोर ‘भारतवर्ष’ ही एक संपूर्ण भौगोलिक मूर्ती आहे असे मानतात. ओरिसा-कलिंगच्या चेदी वंशातील खारवेलच्या प्रशस्तीपत्रात भूवनेश्वर जवळ असणार्या हाथीगुंफा शिलालेखात भारतवर्षाचा उल्लेख सर्वप्रथम लिखित स्वरूपात मिळतो. प्रस्तुत ग्रंथाची सुरुवात करताना इ.स. 1206-1818 या 612 वर्षाच्या कालखंडाची मांडणी लेखकाने इस्लाम धर्माचा उदय आणि तुर्क आक्रमणे नोंदवून केली आहे. सुलतानशाही आणि मोगल सत्ता यांनी मध्ययुगीन कालखंडात भाषा, साहित्य, कला, स्थापत्य, संस्कृति, प्रशासन, आहारविहार यांना नवीन आयाम दिले. मध्यकाळात सुफी आणि भक्तिचळवळीच्या झालेल्या उदयाने संस्कृति समन्वयच नव्हे तर भारतवर्षाच्या सर्व धर्म, पंथ, जात, व्यवहार यांना एकसंघत्वाच्या विचाराने पूढे जाण्याचा मार्ग दाखविला. मध्ययुगीन कालखंडात दिल्ली-मध्य भारत हे सत्तेचे केंद्र राहिले. अल्लाउद्दीन खिलजीचे दक्षिणेतील आक्रमण आणि मुहम्मद तुघलकाद्वारा देवगिरी हे बनलेले राजधानी केंद्र या दोन घटकांतूनच दक्षिणेच्या मध्ययुगीन कालखंडाची सुरुवात झाली. बहामनी आणि विजयनगर साम्राज्याचा झालेला उदय याचीच परिनीति आहे. आदिलशाही, कुतुबशाही, निजामशाही, बरिदशाही आणि ईमादशाही यांच्या परस्परांच्या संघर्षात मराठा सरदारांचा-घराण्यांचा सर्वात मोठा सहभाग होता. नव्हे तर या सत्ता म्हणजेच मराठा सरदार आणि घराण्यांचे कार्य आणि कर्तृत्व होय. मुघलांच्या सत्तांचा काळ हा छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती राजाराम महाराज आणि ताराराणी यांचा समकालीन काळ होता. याच काळात पाश्चिमात्यांचे भारतात आगमन झाले. मराठा सत्तेचा शेवट केल्यानंतर ब्रिटिशांनी भारत ताब्यात घेतला. मध्ययुगीन काळातील शब्दांचे अर्थ परिशिष्ठात दिले आहेत. सचित्र मांडणी, बल्बन, अल्लाउद्दीन खिलजी, फिरोज तुघलक, शेरशाह सुरी आणि सम्राट अकबराच्या काळातील लेखकाने नोंदविलेल्या सुधारणा आणि योग्य ठिकाणी केलेली तुलनात्मक मांडणी हे ग्रंथाचे प्रमुख वैशिष्ट्य आहे.
भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात नवोदित लेखकाकडून प्रकाशित होणारा त्रिखंडात्मक ‘भारतवर्ष’चा इतिहास इतिहासाचा विद्यार्थी, स्पर्धा परीक्षातून करिअरचा मार्ग चोखळणार्या अभ्यासकाला निश्चितच दिशा देणारा ग्रंथ आहे.
भारतवर्ष खंड 3 – इसवी 1818 ते 2000
* आधुनिक भारतीय इतिहास *
रॉबर्ट क्लाईव्हच्या प्रशासकीय व्यवस्था ते मराठा साम्राज्याचा अस्त हा कालखंड कंपनीच्या वर्चस्वासाठी सर्वात महत्त्वाचा होता. ब्रिटिशांच्या धोरणाचा हस्त, लघु आणि कृषीउद्योग यावर विपरीत परिणाम झाला. भारतीय जनता आणि संस्थानिक शासक यांची कंपनीच्या विरोधातील सार्वत्रिक प्रतिक्रिया म्हणजे 1857 चा स्वातंत्र्यलढा. 1857 च्या तदपूर्वी बहुभागात आदिवासी, कृषक इ. चे लढे अत्यंत महत्त्वूपर्ण राहिले. भारतात लागू नियमित कायदा, पीट्स अॅक्टचा प्रयत्न, 1793 ते 1853 पर्यंतचे 4 चार्टर अॅक्ट्स, 1858 ते 1935 पर्यंतच्या संघराज्य कायद्याची समर्पक संवैधानिक शब्दात मांडणी लिखाणात आहे. समाज प्रबोधन आणि प्रबोधनकार यांचे प्रयत्न, स्थानिक सत्ताधिशांनी कंपनी सरकार आणि ब्रिटिश सरकारचे झालेले संघर्ष, शेजारी राष्ट्रांशी असणारी ब्रिटिशांची धोरणे यांचे एकच सुत्र होते ते म्हणजे व्यापारवादातून साम्राज्यवाद. भारतातील वृत्तपत्रे, शिक्षण, प्रशासन, कायदे, गव्हर्नर जनरल आणि व्हाईसराय यांची नोंददेखील या ग्रंथात आहे. स्वातंत्र्य चळवळीतील संघटना, संस्था, व्यक्ति, पक्ष-मवाळ-जहाल, म. गांधीवादी आणि क्रांतीकारक विचारधाराद्वारा घडलेला घटनाक्रम हा संघर्षशील होता. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर संस्थानिकांचे प्रश्न, जातीय दंगली-हिंसा, राज्यघटनेची निर्मिती, भाषावार प्रांतरचना, गोवा मुक्तिलढा, सार्वत्रिक निवडणूका या घटनांतून भारतीय लोकशाहीचा विकास घडत गेला. राष्ट्रीय आणि प्रादेशिक पक्षांनी बहुसांस्कृतिक भारतीय लोकशाहीला समृद्ध केले. उदयमुख भारताने केलेली शिक्षण, व्यवसाय, क्रीडा, मनोरंजन, इतिहास, साहित्य इ. क्षेत्रातील प्रगतीचाही उल्लेख प्रस्तुत ग्र्रंथात सविस्तररित्या नोंदविला आहे.
भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात नवोदित लेखकाकडून प्रकाशित होणारा त्रिखंडात्मक ‘भारतवर्ष’चा इतिहास हा इतिहासाचा विद्यार्थी, स्पर्धा परीक्षातून करिअरचा मार्ग चोखळणार्या अभ्यासकाला निश्चितच दिशा देणारा ग्रंथ आहे.
-
भारताचा इतिहास (प्रारंभापासून ते इ.स. 1205 पर्यंत)
प्राचीन काळी भारत सुवर्णभूमी म्हणून ओळखला जात असे. त्याचा व्यापार दूरदूरच्या देशांबरोबर चालत असे. त्याच्या संस्कृतीची किर्ती संपूर्ण जगात पसरली होती. कलाकौशल्य, साहित्य, विज्ञान, तत्त्वज्ञान आणि व्यापार यांच्या बाबतीत हा देश जगाला मार्गदर्शक होता. इ.स.पू. सहावे शतक हे भारताच्या इतिहासात धार्मिक क्रांतीचे युग म्हणून ओळखले जाते. मौर्य काळात भारतात एकछत्री साम्राज्य निर्माण झाले. शक, हूण, कुषाण यांची आक्रमणे झालीत. पण ते भारतीय संस्कृतीतच विलीन झाले. इस्लामची आक्रमणे मात्र केवळ राजकीयच नव्हती तर ती भारतीय संस्कृतीवर आक्रमण करणारी होती. दक्षिणेत राष्ट्रकूट, चालुक्य, चोल व पांड्य यांची राज्ये निर्माण होवून शिल्पकलेला नवा आयाम मिळाला. शेकडो सुंदर देवालयांची निर्मिती झाली. सदरील पुस्तकात प्राचीन भारतीय इतिहास साधने, सिंधू संस्कृती, पूर्व वैदिक काळ व उत्तर वैदिक काळ, परकीयांची आक्रमणे, मौर्यकाल व मौर्योत्तर कालखंड, गुप्त साम्राज्य, वर्धन साम्राज्य, दक्षिणेकडील महत्त्वाची घराणी तसेच प्राचीन भारतातील शिक्षण पद्धती, स्त्रियांचे जीवन, न्यायपद्धती, सामाजिक, धार्मिक व राजकीय परिस्थितीचा समावेश आहे. सदरील ग्रंथ इतिहास वाचकांसाठी तसेच पदवी, पदव्युत्तर, नेट/सेट आणि स्पर्धात्मक परीक्षांसाठी उपयुक्त आहे.
Bharatacha Itihas (Prambhpasun Te CE 1205 Paryant)
-
भारतीय कला आणि वास्तुकला
प्राचीन भारताच्या इतिहासात कलेला महत्वाचे स्थान होते. प्रागैतिहासिक काळापासूनच मानवाला कलेची आवड आहे. कला विविध प्रकारची असते. गुप्त काळात कला आणि स्थापत्याच्या क्षेत्रात भरीव स्वरुपाची प्रगती झाली. प्राचीन काळात मूर्तिकला, वास्तुकला, संगीत कला, नृत्यकला आणि चित्रकलेत मानवाने चांगलीच प्रगती केली होती.
कला ही मानवाच्या आवडीचा विषय आहे. मानवी जीवनाच्या सर्वोत्कृष्ट साधनांचे रूप कलेच्या माध्यमाने प्रकट होते. कला ही मानवाच्या सृजन आणि प्रत्यक्ष अनुभवांच्या कल्पनेवर अवलंबून असते. मानवी जीवनात जे सुखद आणि आनंददायी अनुभव मिळालेले असतात, तेच कलेच्या माध्यमातून प्रकट होतात. कला ही कलाकाराच्या आंतरिक भावना, अनुभव, विचार व कल्पनेवर अवलंबून असते. स्थापत्य, वास्तू, काव्य, शिल्प, चित्र, नाट्य, संगीत इ. प्रकारांना ‘कला’ असे अभिधान आहे. मौर्य काळापासून वास्तुशिल्प कलेचा प्रारंभ झाला. मौर्य सम्राट अशोकाने बौद्ध धर्माला राजाश्रय देऊन त्याचा प्रचारही केला. मौर्य काळापासूनच डोंगरात चैत्य आणि विहार नावाच्या नवीन वास्तू निर्माण करण्यास प्रारंभ झाला. बौद्ध धर्माशी संंबंधित चैत्य व विहार, जैन धर्माशी संबंधित जैन मंदिरे आणि हिंदू धर्माशी संबंधित अनेक देवदेवतांची मंदिरे अस्तित्वात आली. मानवाने हिंदू, बौद्ध, जैन आणि लौकिक मूर्तिशिल्पांची निर्मिती केली. वास्तुकलेतही चांगलीच प्रगती झालेली होती. वास्तुकलेत मंदिरे, विहार, स्मारके, स्तूप आणि लेणी स्थापत्याचा समावेश होतो. कांची, महाबलीपूरम, ऐहोळी, गांधार, पट्टदकल, वेरुळ, कंधार, कार्ले, भाजे, अजिंठा, पितळखोरा, बाघ, सांची, सारनाथ, अमरावती, आग्रा, फतेहपूर सिकरी, भुवनेश्वर आणि कोणार्क ही भारतातील कलेची केंद्रे होती. याशिवाय अनेक ठिकाणी विभिन्न प्रकारच्या कलेचा विकास झाला. या कलेला अनेक राजघराण्यांनी आश्रय दिला. यामध्ये सातवाहन, गुप्त, वाकाटक, राष्ट्रकूट, बदामी व कल्याणीचे चालुक्य, यादव, गंग आणि चोल घराणे उल्लेखनीय ठरते. प्रस्तुत ग्रंथात प्राचीन आणि मध्ययुगातील निवडक कला व वास्तुकलेचा इतिहास दिलेला आहे.
Bharatiy Kala Aani Vastukla
-
भारतीय लष्करी इतिहास
आधुनिक संरक्षणशास्त्राचा विकास होण्यासाठी लष्करी इतिहासाचा संशोधनात्मक अभ्यास उपयुक्त ठरतो. युद्धकलेच्या अभ्यासाने, संशोधनाने ज्ञान समृद्ध होते. तसेच आत्मविश्वास वाढतो; त्याच कारणाने भारतीय युद्धकला अभ्यासक्रम अभ्यासासाठी निश्चित केलेला आहे. भारतीय युद्धकला अत्यंत समृद्ध असून ती अती प्राचीन आहे. प्राचीन भारतीय इतिहास हा भारतीय संस्कृतीच्या प्रगल्भतेच्या खुणा जपणारा आहे. मानवी उत्क्रांतीच्या बरोबर संस्कृतीचा जसजसा विकास होत गेला तसतशी मानवनिर्मित सर्वच तंत्राची, विज्ञानाची व कलांची प्रगती झालेली दिसते. वेद, पुराणशास्त्रे आणि उपनिषदे इत्यादी साहित्यातून आणि लोकपरंपरातून आजच्या विकसीत मानवी जीवनाच्या खाणाखुणा अभ्यासताना वैश्विक विकासाची दिशा स्पष्ट होते. प्राचीन लढायातून युद्धकला स्पष्ट होते. प्राचीन भारतातील युद्धनीती, डावपेच, युद्धयोजना सैनिक, शस्त्रास्त्रे इत्यादी संदर्भातील माहिती सर्वच प्रकारच्या लष्करासाठी उपयुक्त आहे. संबंधित अभ्यासक्रमातील निरनिराळे घटक विचारात घेवून विद्यार्थ्यांच्या दृष्टीने लेखन करण्याचा प्रयत्न केलेला आहे. अभ्यासकांना हा ग्रंथ उपयुक्त ठरेल अशीच आशा आहे.
Bharatiy Lashkari Itihas