• दिल्ली सुलतानशाहीचा इतिहास (1206 ते 1526)

    भारताचा सर्वप्रथम अरब आक्रमणांनी आक्रमणे केली. मुहम्मद बिन कासिम यांनी भारतावर पहिले आक्रमण केले. यानंतर तुर्कानी भारतावर आक्रमणे केली आणि भारतात आपली सत्ता स्थापन केली. कुतुबुद्दीन ऐबक हे महंमद घोरी यांच्या भारतातील राज्याचे प्रतिनिधी होते. महमंद घोरी यांच्या मृत्युनंतर इ.स. 1206 मध्ये कुतुबुद्दीन ऐबक यांनी स्वतःला राज्याभिषेक करुन सुलतान ही पदवी धारण केली. त्यांच्या राज्याची राजधानी दिल्ली होती. ऐबक यांनी स्थापन केलेले हे राज्य भारतातील पहिले मुस्लिम राज्य होते. हे राज्य इ.स. 1526 पर्यंत अस्तित्वात होते. इ.स. 1206 ते इ.स. 1526 हा काल खंड दिल्ली सुलतानशाहीचा कालखंड म्हणून ओळखला जातो. याचकाळात गुलाम, खिलजी, तुघलक, सय्यद व लोदी राजवंशाने राज्य केले. याचकाळात दक्षिण भारतात विजयनगर व बहमनी राज्य होऊन गेले. प्रस्तुत ग्रंथात दिल्ली सुलतानशाहीच्या काळातील भारताचा राजकीय, सामाजिक, धार्मिक, आर्थिक व प्रशासन, कला आणि वास्तुकलेचा इतिहास दिला आहे.

    Delhi Sultanshahicha Ithihas (1206 te 1526)

    350.00
    Add to cart
  • भारतवर्ष खंड 1, 2, 3 (अश्मयुग ते इसवी 2000)

    भारतवर्ष खंड 1 – अश्मयुग ते इसवी 1206

    * प्राचीन भारतीय इतिहास *

                    ‘भारतवर्ष’, ‘आर्यवर्त’, ‘इंडिया’, ‘हिंद’, ‘हिंदुस्तान’, ‘जम्बुद्विप’ इ. विविध नावांनी आपला देश ओळखला जातो. ओरिसा-कलिंगच्या चेदी वंशातील खारवेलच्या प्रशस्तीपत्रात भूवनेश्वर जवळ असणार्‍या हाथीगुंफा शिलालेखात भारतवर्षाचा उल्लेख सर्वप्रथम लिखित स्वरूपात मिळतो. प्रस्तुत ग्रंथाची सुरुवात करताना आपण कोण? मानवाचा विकास आणि त्या विकासाच्या अवस्था, भारतातील मानवाच्या सहा वांशिक प्रजाती आणि चार भाषीक समुह यांची नोंद लेखकाने घेतली आहे. त्याचप्रमाणे प्राचीन भारताच्या अभ्यासाची साहित्यीक आणि पुरातत्वीय आणि विदेशी यात्रेकरूंचे वृत्तांत साधन म्हणून नोंदविले आहेत. भारतातील प्रागैतिहासिक काळ, आद्य इतिहासकाळ आणि ऐतिहासिक काळ यांचा वृत्तांत समर्पक शब्दात मांडला आहे. जगातील सर्वात मोठी संस्कृती सिंधु संस्कृतीची नोंद विविध अंगाने शब्दबद्ध केली आहे. पूर्व वैदिक आणि उत्तर वैदिक संस्कृतिची वैशिष्ट्ये, इ.पू. 6 व्या शतकातील जैन आणि बौद्ध धर्म पंथांचा उदय आणि घडलेली प्रबोधनाची चळवळ वाचनीय आहे. संगम साहित्यात लेखक-कवि-रचनाकारांचे योगदान, प्राचीन भारतातील पहिले केंद्रीय साम्राज्य मौर्य सत्ताचा उदय-विस्तार आणि अस्त यांची माहिती एकत्रित वाचकाला मिळते. मौर्योत्तर काळात झालेले बदल गुप्त काळात निर्माण स्थैर्य आणि विकास, कला-साहित्य-स्थापत्य-निर्मिती वैभवशाली राहिली. गुप्तोत्तरकाळात प्रांतीय सत्तांचा झालेला उदय, दक्षिण भारतात आणि उत्तर भारतात झालेले त्रिपक्षीय संघर्ष तसेच पूर्व व आग्नेय आशियाच्या भागात भारतीय संस्कृतीचा झालेला प्रसार आणि प्रचार याची नोंदही जाणीवपूर्वक लेखकाने सिद्धहस्तपणे घेतली आहे. परिशिष्ठात लेखकाने प्राचीन भारतीय सामंतशाही, चित्र आणि मूर्तीकला, विद्याकेंद्रे, संस्कारांची यादी, लिपी, महत्त्वपूर्ण विधाने, राज्य आणि राजधानी, राजवंश, शहरे, शब्दार्थ, घटनाक्रम इ. ची नोंद केली आहे.

    भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात प्रकाशित होणारा त्रिखंडात्मक ‘भारतवर्ष’चा इतिहास हा इतिहासाचा विद्यार्थी, स्पर्धा परीक्षातून करिअरचा मार्ग चोखळणार्‍या अभ्यासकाला निश्चितच दिशा देणारा ग्रंथ आहे.


    भारतवर्ष खंड 2 – इसवी 1206 ते 1818

    * मध्ययुगीन भारतीय इतिहास *

                    रवींद्रनाथ टागोर ‘भारतवर्ष’ ही एक संपूर्ण भौगोलिक मूर्ती आहे असे मानतात. ओरिसा-कलिंगच्या चेदी वंशातील खारवेलच्या प्रशस्तीपत्रात भूवनेश्वर जवळ असणार्‍या हाथीगुंफा शिलालेखात भारतवर्षाचा उल्लेख सर्वप्रथम लिखित स्वरूपात मिळतो. प्रस्तुत ग्रंथाची सुरुवात करताना इ.स. 1206-1818 या 612 वर्षाच्या कालखंडाची मांडणी लेखकाने इस्लाम धर्माचा उदय आणि तुर्क आक्रमणे नोंदवून केली आहे. सुलतानशाही आणि मोगल सत्ता यांनी मध्ययुगीन कालखंडात भाषा, साहित्य, कला, स्थापत्य, संस्कृति, प्रशासन, आहारविहार यांना नवीन आयाम दिले. मध्यकाळात सुफी आणि भक्तिचळवळीच्या झालेल्या उदयाने संस्कृति समन्वयच नव्हे तर भारतवर्षाच्या सर्व धर्म, पंथ, जात, व्यवहार यांना एकसंघत्वाच्या विचाराने पूढे जाण्याचा मार्ग दाखविला. मध्ययुगीन कालखंडात दिल्ली-मध्य भारत हे सत्तेचे केंद्र राहिले. अल्लाउद्दीन खिलजीचे दक्षिणेतील आक्रमण आणि मुहम्मद तुघलकाद्वारा देवगिरी हे बनलेले राजधानी केंद्र या दोन घटकांतूनच दक्षिणेच्या मध्ययुगीन कालखंडाची सुरुवात झाली. बहामनी आणि विजयनगर साम्राज्याचा झालेला उदय याचीच परिनीति आहे. आदिलशाही, कुतुबशाही, निजामशाही, बरिदशाही आणि ईमादशाही यांच्या परस्परांच्या संघर्षात मराठा सरदारांचा-घराण्यांचा सर्वात मोठा सहभाग होता. नव्हे तर या सत्ता म्हणजेच मराठा सरदार आणि घराण्यांचे कार्य आणि कर्तृत्व होय. मुघलांच्या सत्तांचा काळ हा छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती राजाराम महाराज आणि ताराराणी यांचा समकालीन काळ होता. याच काळात पाश्चिमात्यांचे भारतात आगमन झाले. मराठा सत्तेचा शेवट केल्यानंतर ब्रिटिशांनी भारत ताब्यात घेतला. मध्ययुगीन काळातील शब्दांचे अर्थ परिशिष्ठात दिले आहेत. सचित्र मांडणी, बल्बन, अल्लाउद्दीन खिलजी, फिरोज तुघलक, शेरशाह सुरी आणि सम्राट अकबराच्या काळातील लेखकाने नोंदविलेल्या सुधारणा आणि योग्य ठिकाणी केलेली तुलनात्मक मांडणी हे ग्रंथाचे प्रमुख वैशिष्ट्य आहे.

    भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात नवोदित लेखकाकडून प्रकाशित होणारा त्रिखंडात्मक ‘भारतवर्ष’चा इतिहास इतिहासाचा विद्यार्थी, स्पर्धा परीक्षातून करिअरचा मार्ग चोखळणार्‍या अभ्यासकाला निश्चितच दिशा देणारा ग्रंथ आहे.


    भारतवर्ष खंड 3 – इसवी 1818 ते 2000

    * आधुनिक भारतीय इतिहास *

                    रॉबर्ट क्लाईव्हच्या प्रशासकीय व्यवस्था ते मराठा साम्राज्याचा अस्त हा कालखंड कंपनीच्या वर्चस्वासाठी सर्वात महत्त्वाचा होता. ब्रिटिशांच्या धोरणाचा हस्त, लघु आणि कृषीउद्योग यावर विपरीत परिणाम झाला. भारतीय जनता आणि संस्थानिक शासक यांची कंपनीच्या विरोधातील सार्वत्रिक प्रतिक्रिया म्हणजे 1857 चा स्वातंत्र्यलढा. 1857 च्या तदपूर्वी बहुभागात आदिवासी, कृषक इ. चे लढे अत्यंत महत्त्वूपर्ण राहिले. भारतात लागू नियमित कायदा, पीट्स अ‍ॅक्टचा प्रयत्न, 1793 ते 1853 पर्यंतचे 4 चार्टर अ‍ॅक्ट्स, 1858 ते 1935 पर्यंतच्या संघराज्य कायद्याची समर्पक संवैधानिक शब्दात मांडणी लिखाणात आहे. समाज प्रबोधन आणि प्रबोधनकार यांचे प्रयत्न, स्थानिक सत्ताधिशांनी कंपनी सरकार आणि ब्रिटिश सरकारचे झालेले संघर्ष, शेजारी राष्ट्रांशी असणारी ब्रिटिशांची धोरणे यांचे एकच सुत्र होते ते म्हणजे व्यापारवादातून साम्राज्यवाद. भारतातील वृत्तपत्रे, शिक्षण, प्रशासन, कायदे, गव्हर्नर जनरल आणि व्हाईसराय यांची नोंददेखील या ग्रंथात आहे. स्वातंत्र्य चळवळीतील संघटना, संस्था, व्यक्ति, पक्ष-मवाळ-जहाल, म. गांधीवादी आणि क्रांतीकारक विचारधाराद्वारा घडलेला घटनाक्रम हा संघर्षशील होता. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर संस्थानिकांचे प्रश्न, जातीय दंगली-हिंसा, राज्यघटनेची निर्मिती, भाषावार प्रांतरचना, गोवा मुक्तिलढा, सार्वत्रिक निवडणूका या घटनांतून भारतीय लोकशाहीचा विकास घडत गेला. राष्ट्रीय आणि प्रादेशिक पक्षांनी बहुसांस्कृतिक भारतीय लोकशाहीला समृद्ध केले. उदयमुख भारताने केलेली शिक्षण, व्यवसाय, क्रीडा, मनोरंजन, इतिहास, साहित्य इ. क्षेत्रातील प्रगतीचाही उल्लेख प्रस्तुत ग्र्रंथात सविस्तररित्या नोंदविला आहे.

    भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात नवोदित लेखकाकडून प्रकाशित होणारा त्रिखंडात्मक ‘भारतवर्ष’चा इतिहास हा इतिहासाचा विद्यार्थी, स्पर्धा परीक्षातून करिअरचा मार्ग चोखळणार्‍या अभ्यासकाला निश्चितच दिशा देणारा ग्रंथ आहे.

    1,515.00
    Add to cart
  • भारताचा इतिहास (इ.स. 1206 ते 1756)

    इ.स.1206 मध्ये कुतुबुद्दीन ऐबक यांनी भारतात सर्वप्रथम मुस्लिम सत्तेची स्थापना केली. त्यांनी स्थापना केलेले राज्य सुलतानशाही या नावाने ओळखले जाते. जहिरूद्दीन बाबर यांनी दिल्लीच्या सुलतानशाहीचे राज्य इ.स.1526 मध्ये जिंकून घेतले व त्याठिकाणी मुघल वंशाची स्थापना केली. दिल्लीचे सुलतान आणि मुघल सम्राटांनी संपूर्ण भारतावर राज्य केले. त्यांच्या काळात जी प्रादेशिक राज्ये होती ती सुलतानशाही व मुघलांची मांडलीक राज्ये होती. मुघल साम्राज्य इ.स.1857 पर्यंत अस्तित्वात असले तरी ते इ.स.1707 पर्यंतच प्रबळ व शक्तीशाली होते. यानंतर मात्र या साम्राज्याचा र्‍हास झाला. मध्ययुगात जी अनेक राज्ये स्वतंत्रपणे राज्य करीत होती. त्यापैकीच एक दक्षिण भारतातील मराठा राज्य होते. हे राज्यही शक्तिशाली राज्य होते. मुघल बादशाहाने सुद्धा स्वत:च्या संरक्षणाची जबाबदारी मराठा राज्यावर टाकली होती. तसा त्यांच्यात इ.स.1752 मध्ये एक करारही झाला होता. मुघल बादशाहाच्या संरक्षणासाठीच मराठ्यांनी अहमदशहा अब्दाली विरूद्ध युद्ध केले व ते त्यांच्याकडून पराभुत झाले. या पराभवामुळे व युद्धातील जीवित हानीमुळे मराठा राज्याचे कधीही भरून न निघणारे नुकसान झाले. एवढेच नव्हे तर येथून पुढे मराठा राज्यही र्‍हासाकडे वाटचाल करू लागले. इ.स.1818 मध्ये ब्रिटीश ईस्ट इंडिया कंपनीने मराठा राज्य जिंकून घेतले. मध्ययुगात दिल्लीचे मुघल व महाराष्ट्रातील मराठा राज्य महत्वाचे होते. या दोन्ही राज्याच्या कालखंडातील भारतातील राजकीय, सामाजिक, धार्मिक व आर्थिक इतिहासाची सविस्तर माहिती या ग्रंथात दिली आहे.

    Bharatacha Itihas (1206-1756)

    495.00
    Add to cart
  • भारताचा इतिहास (इ.स. 1757 ते 1947)

    ब्रिटिश इस्ट इंडिया कंपनीने इ.स.1757 मध्ये प्रथम बंगाल प्रांतात सत्तेचा पाया घातला. पुढे हळूहळू संपूर्ण भारत देशावर आपली सत्ता स्थापन केली. इ.स.1857 मध्ये भारतीयांनी कंपनी सरकारच्या विरोधात उठाव केला. त्यामुळे भारतात कंपनीची सत्ता संपुष्टात आली व त्याठिकाणी ब्रिटिश सम्राटाची सत्ता आली. ब्रिटिश सरकारने इ.स. 1947 पर्यंत भारतावर राज्य केले. या कालखंडात भारताची भौतिक प्रगती झाली असली तरी मोठ्या प्रमाणात आर्थिक शोषणही झाले. परिणामी क्रांतिकारकांनी क्रांतिकारी चळवळ करून आणि जनतेने भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या नेतृत्वाखाली लढा देऊन भारत देशाला ब्रिटनच्या राजकीय वर्चस्वातून मुक्त केले. याच काळात भारतात सामाजिक व धार्मिक चळवळीही झाल्या. या सर्व घटकांचा इतिहास या ग्रंथात दिला असून हा ग्रंथ विद्यापीठ स्तरावरील परिक्षा, नेट, सेट व तत्सम स्पर्धा परिक्षेसाठी उपयुक्त ठरणार आहे.

    Bharatacha Itihas (1757-1947)

    375.00
    Add to cart
  • मध्ययुगीन भारत (1206-1707)

    मध्ययुगीन भारताचे स्थूल मानाने दोन कालखंड गृहीत धरले जातात. एक म्हणजे सुलतान कालखंड व दुसरा मोगल कालखंड. सुलतानशाहीच्या कालखंडात दक्षिण भारतात विजयनगरची व बहामनीची सत्ता होती. दिल्ली सुलतानशाहीच्या 320 वर्षाच्या इतिहासातील संघर्षाला राजकीय आणि धार्मिक असे दुहेरी स्वरुप आलेले दिसते. पानीपतच्या पहिल्या लढाईत बाबरने इब्राहीम लोदीस ठार केले त्याच बरोबर दिल्लीची सुलतानशाही नष्ट झाली. प्रस्तुत ग्रंथात सुलतानशाहीकालीन व मोगलकालीन भारतातील इतिहासाची साधन,े राजकीय, सामाजिक, आर्थक, कला-स्थापत्य आणि प्रशासन यांचा आढावा घेतला आहे. प्रस्तुत ग्रंथ सर्व स्पर्धा परीक्षा व शैक्षणिक अभ्यासक्रमासाठी विद्यार्थी, प्राध्यापक व वाचकांसाठी निश्चित उपयोग होईल.

    Madhyayugin Bharat (1206-1707)

    350.00
    Add to cart
  • मध्ययुगीन भारत (इ.स. 1206 – 1707)

    सुलतानशाहीच्या कालखंडात दक्षिण भारतात विजयनगरची व बहामनीची सत्ता होती. सुलतान तुर्क आणि अफगाण वंशातील होते. त्यांना भारतीय धर्म, संस्कृती व तेथील जीवनपध्दती याबद्दल काडीचीही आस्था नव्हती. त्यांनी येथील राजे व त्यांचे सैन्य यांचा पराभव करुन या देशाचा लष्करी ताबा मिळविला होता. दिल्ली सुलतानशाहीच्या 320 वर्षाच्या इतिहासातील संघर्षाला राजकीय आणि धार्मिक असे दुहेरी स्वरुप आलेले दिसते. उत्तर भारतात महंमद तुघलकाचे आसन डळमळू लागले होते. या संधीचा फायदा घेऊन हरिहरने इ.स. 1336 मध्ये स्वतंत्र हिंदू राज्यांची स्थापना केली. विजयनगर येथे संगम वंश, शाल्व वंश, तुल्ववंश व अरविंद वंश असे चार घराण्यांनी सुमारे पाऊणेतीनशे वर्ष राज्य केले. तालिकोटच्या लढाईमध्ये विजयनगर साम्राज्याचा विनाश झाला. पानीपतच्या पहिल्या लढाईत बाबरने इब्राहीम लोदीस ठार केले त्याच बरोबर दिल्लीची सुलतानशाही नष्ट करून मोगल साम्राज्याची उभारणी केली. मोगल घराण्यात बाबर, हुमायून, अकबर, जहांगिर, शहाजहान व औरंगजेब हे कर्तबगार सम्राट होऊन गेले.
    प्रस्तुत ग्रंथात सुलतानशाहीकालीन व मोगलकालीन भारतातील इतिहासाची साधने, राजकीय, सामाजिक, आर्थिक, कला-स्थापत्य आणि प्रशासन यांचा आढावा घेतला आहे. प्रस्तुत ग्रंथ सर्व स्पर्धा परीक्षा व शैक्षणिक अभ्यासक्रमासाठी विद्यार्थी, प्राध्यापक व वाचकांसाठी निश्चितच उपयोगी सिद्ध होईल.

    Madhyayagin Bharat (1206-1707)

    350.00
    Add to cart
  • मध्ययुगीन भारताचा इतिहास (इ.स. 1000 ते 1857)

    इ.स. 1206 पासून इ.स. 1757 पर्यंतचा भारताचा कालखंड हा मध्ययुग समजला जातो. अरब मुसलमानांच्या भारतावरील आक्रमणाच्यावेळी भारतात विभिन्न राज्ये होती. त्यांच्यात राजकीय एकतेचा अभाव होता. या काळात मुसलमान आक्रमक इस्लाम धर्माचा झेंडा हातात घेऊन आपल्या सैन्यानिशी भारताच्या सरहद्दीवर येऊन धडकले. मुहम्मद बिन कासिम, महंमद गझनी, कुतुबुद्दीन ऐबक, अल्लाउद्दीन खिलजी, मुहम्मद तुघलक या आक्रमकांनी अनेक आक्रमणे करून संपत्तीची लूट केली. तुघलक साम्राज्याच्या विघटनातून दक्षिणेत बहमनी व विजयनगर साम्राज्याचा उदय झाला. इ.स. 1526 साली बाबर यांनी भारतावर आक्रमण करून दिल्ली सल्तनतचा शेवट केल्याने मुघल सत्तेचा ध्वज फडकू लागला. भारतात इस्लामी सत्ता स्थापन होण्यापूर्वी भारतीय कलेचा विकास झालेला होता. मध्ययुगात होऊन गेलेल्या अनेक साधुसंतांनी आपल्या काव्याद्वारे जनतेला उपदेश केला. छत्रपती शिवाजी महाराजांनी मुघल सत्तेविरुद्ध संघर्ष करुन मराठा सत्तेची स्थापना केली. तद्नंतर छत्रपती संभाजी, छत्रपती राजाराम, महाराणी येसूबाई, महाराणी ताराबाई, सेनापती संताजी घोरपडे व धनाजी जाधव यांनी अमूल्य योगदान देवून मुघल सत्ता खिळखिळी केली. त्याचप्रमाणे पंजाबमध्ये महाराजा रणजितसिंह यांनी मुघलांना प्रखर विरोध करून स्वतंत्र शीख सत्तेची पायाभरणी केली. तद्नंतर ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने कटकारस्थाने करून भारतात सत्ता स्थापन केली. प्रस्तुत ग्रंथात दिल्ली सल्तनत आणि मुघल काळातील राजकीय इतिहास, सामाजिक, धार्मिक, आर्थिक स्थिती, प्रशासन, कला, वास्तुकला व स्थापत्य कलेची सविस्तर माहिती दिली आहे. प्रस्तुत ग्रंथ सर्व स्पर्धा परीक्षा व शैक्षणिक अभ्यासक्रमासाठी उपयुक्त ठरणार आहे.

    Madhyayugin Bharatacha Itihas

    750.00
    Add to cart
  • मध्ययुगीन भारताचा इतिहास (इ.स. 1206 ते इ.स. 1707)

    प्राचीन काळापासून भारतावर इराणी, ग्रीक, शक, कुशाण व हूण इ. अनेक परकीय जमातींनी आक्रमण केले. भारतीय संस्कृतीने या सर्वांना आपल्यात समाविष्ट करुन घेतले. परंतु 12 व्या शतकात आलेल्या मुसलमान आक्रमकांना भारतीय धर्म, संस्कृती व तेथील जीवनपध्दती याबद्दल काडीचीही आस्था नव्हती. त्यांनी आपले वेगळेपण शेवटपर्यंत कायम राखले. इ.स. 1200 ते 1800 हा 600 वर्षांचा कालखंड मध्ययुगीन भारताचा कालखंड म्हणून ओळखला जातो. सुलतानशाही कालखंडात दक्षिण भारतात विजयनगरची व बहामनीची सत्ता स्थापन झाली होती. सुलतान तुर्क व अफगाण वंशातील होते. साधारणपणे याच कालखंडात दक्षिण भारतात विजयनगरची व बहामनीची सत्ता होती. बाबरने 1526 मध्ये दिल्लीचा सुलतान इब्राहिम लोदीचा पराभव करून भारतात मोगल राजघराण्याची स्थापना केली. हा सर्व कालखंड अत्यंत धामधुमीचा होता. सतत लढाया होत असे. सामान्य माणसाचे जीवन अत्यंत हलाखीचे होते.प्रस्तुत पुस्तकात मध्ययुगीन व्यापार, उद्योगधंदे आणि कृषी जीवन, सामाजिक-धार्मिक जीवन इ. मुद्द्यांचा अंतर्भाव केलेला आहे.

    Madhyayugin Bharatacha Itihas – Ad 1206 to 1707

    295.00
    Add to cart
  • मोगलकालीन भारताचा इतिहास (१५२६ ते १७०७)

    जहिरूद्दीन मोहम्मद बाबर यांनी २१ एप्रिल १५२६ रोजी दिल्लीचे सुलतान इब्राहिम लोदी यांचा पराभव करुन भारतात मोगल राजघराण्याची सत्ता स्थापन केली. हे राज्य इ.स. १७०७ पर्यंत प्रभावी होते. तर इ.स. १७०७ पासून १८५७ पर्यंत नामधारी होते. या काळात दिल्ली ही राज्याची राजधानी होती. मोगल घराण्यात जहिरूद्दीन बाबर, हुमायुन, अकबर, जहांगीर, शहाजहान व औरंगजेब हे कर्तबगार सम्राट होऊन गेले. प्रस्तुत ग्रंथात मोगलकालीन भारतातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, धार्मिक स्थिती आणि प्रशासन, कला व वास्तुकलेचा आढाव घेतला आहे. प्रस्तुत ग्रंथ सर्व स्पर्धा परीक्षा व शैक्षणिक अभ्यासक्रमासाठी उपयुक्त ठरणार आहे.

    Mogalkalin Bhartacha Ithihas (1526 te 1707)

    375.00
    Add to cart