• 14 ऑक्टोबर 1956

    डॉ. विशाखा कांबळे यांनी दोन दशकांपासून मराठी साहित्य आणि प्राचीन पुरातत्त्व विषयात स्वतंत्रपणे लौकिकता प्राप्त केली. त्यांनी मराठी वाङ्मयातील सर्वच प्रकारांना लेखणीच्या माध्यमातून अतिशय सक्षम व समर्थपणे स्पर्श केलेला आहे. विशेष म्हणजे भारतातील सर्वाधिक उंचीचा वीरस्तंभाचा शोध लावून त्यावर संशोधन केले आहे. प्राचीन पुरातत्त्व व इतिहास विषयातही त्यांनी फार मोठे योगदान दिलेले आहे. संशोधन क्षेत्रात त्यांनी केलेले कार्य अतुलनीय आहे.
    आजवर त्यांचे विविध प्रकारातील एकूण 21 ग्रंथ प्रकाशित झालेले आहेत. या सर्वच ग्रंथात मानवीमूल्य आणि जीवनमूल्यांवर त्यांनी अभ्यासपूर्ण विवेचन व चिंतन मांडलेले आहे. त्यांची संशोधनपर लेखन मिमांसा अभ्यासकांना विचारप्रवृत्त करण्यास भाग पाडते. मानववंश शास्त्राचे सर्व प्रमेय नव्या पद्धतीने मांडणार्‍या प्रतिभावंत संशोधक-लेखिका म्हणून साहित्य व पुरातत्त्व क्षेत्रात त्यांनी स्वतःची नाममुद्रा उमटविली आहे. त्यांना आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय व राज्यस्तरीय स्वरूपाचे एकूण 14 पुरस्कार प्राप्त झाले आहेत. वैशिष्ट्य म्हणजे त्यांचे आंतरराष्ट्रीय स्तरावरील 47 शोधनिबंध प्रकाशित झालेले आहेत.
    त्यांनी चित्रपट, मालिका, नाटक, महानाट्यातून विविध भूमिकाही साकारल्या आहेत. डॉ. कांबळे अष्टपैलू व्यक्तिमत्त्वाच्या धनी आहेत.

    14 October 1956

    250.00
    Add to cart
  • 19 व्या शतकातील महाराष्ट्र

    1818 मध्ये बाजीराव पेशवा हा इंग्रजांना शरण गेला व छत्रपती शिवाजी महाराजांनी महत्प्रयासाने उभारलेले स्वराज्य संपुष्टात आले. त्याकाळी सामाजिक जीवनामध्ये जातीव्यवस्थेचे वर्चस्व वाढले होते. जातीव्यवस्था ही दृढ झाली होती. पेशवे काळामध्ये स्त्रीजीवन फारसे चांगले नव्हते. राजा राममोहन रॉय, म. फुले इ. सुधारकांनी केलेल्या प्रयत्नांमुळे समाजात सर्वांगीण सुधारणेस प्रारंभ झाला. समाजातील अनिष्ट प्रथांना मूठमाती दिली गेली. विविध वृत्तपत्रे, नियतकालिकांनी ज्ञान प्रसार आणि समकालीन घटनांना प्रसिद्धी देणे या दोन हेतूंनी समाजसुधारणेस हातभार लावला. ज्ञान आणि विज्ञानाचा परिचय सर्वसामान्यांना झाला. शिक्षणामुळे राजकीय, सामाजिक आणि आर्थिक विकास होतो, याची समाजाला जाणीव झाली. इंग्रजांनी विविध मार्गांनी भारतीयांचे शोषण केले. याबाबत दादाभाई नौरोजी यांनी आर्थिक निःसारणाचा सिद्धांत मांडला. त्यामुळे भारताच्या दारिद्य्राचे खरे कारण कळाले. न्यायमूर्ती रानडे, लोकमान्य टिळक, सुभाषचंद्र बोस, बाबासाहेब आंबेडकर, म. गांधीजींसारख्या नेत्यांनी याविरुद्ध आवाज उठविला व भारतीयांना स्वातंत्र्यप्राप्तीसाठी प्रेरणा दिली.

    19 vya Shatakatil Maharashtracha Itihas

    225.00
    Add to cart
  • 20 व्या शतकातील महाराष्ट्राचा इतिहास

    विसावे शतक हे रौद्र शतक मानले जाते. या शतकात दोन महायुद्धे होवून मानव किती क्रूर होवू शकतो हे जगाला दिसले. जगात मोठ्या प्रमाणात मानवी आणि भौतिक संपत्तीची हानी झाली. हिंदुस्थानात गर्व्हनर जनरल लॉर्ड कर्झनने बंगालची फाळणी करून येथे राष्ट्रवाद निर्माण केला. लाल, बाल आणि पाल यांची त्यांतून निर्मिती होवून स्वराज्याची मागणी होवू लागली. त्यानंतर गांधीयुग उदयाला आले. स्वातंत्र्याची पहाट घेवून आले. पण त्यावर फाळणीचे धुके पसरले. भाषावार प्रांताची भारतात मागणी झाली. त्यातून नवीन प्रांतांची निर्मिती झाली. महाराष्ट्राचा दुर्दैवाने द्वैभाषिक राज्य गुजरातच्या जोडीने निर्माण झाले. गुजरात आणि महाराष्ट्र या दोन्ही राज्यांना हे द्वैभाषिक मान्य नव्हते. त्यातून मुंबई कोणाची ही समस्या निर्माण झाली आणि संयुक्त महाराष्ट्राची चळवळ सुरु झाली. 1960 मध्ये स्वतंत्र महाराष्ट्र राज्याची निर्मिती होवून या राज्याने मोठ्या प्रमाणात औद्योगिकरण साधले. त्यातून नागरीकरणाचा प्रश्न निर्माण झाला. सहकाराच्या मार्गाने या राज्याची प्रगति झाली. साखर, कापूस या उत्पादनांनी यश गाठले. याचा प्रारंभीचा पाया महाराष्ट्रातील अनेक विचारवंतांनी घातला. औद्योगिक प्रगतीमुळे कामगारांचे प्रश्न निर्माण झाले. ब्राह्मणेत्तर चळवळीबरोबर शेतकऱ्यांची चळवळ आणि दलित चळवळ ह्या चळवळी महाराष्ट्रात झाल्या. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर हैद्राबादचा निजाम संघराज्यात सामील होत नव्हता. रझाकार चळवळीने त्याच्या राज्यात धुमाकूळ घातला. त्याला जमिनीवर आणण्याचे कार्य पोलिस कारवाईने केले. अशा अनेक घटनांचा आढावा या ग्रंथात घेण्याचा प्रयत्न केला आहे.

    20 vya Shatakatil Maharashtracha Itihas

    200.00
    Add to cart
  • अमेरिकन संघराज्याचा इतिहास (इ.स. 1776 ते इ.स. 1945)

    ‘अमेरिकन संघराज्याचा इतिहास’ या ग्रंथात वसाहतीपूर्व काळापासून ते दुसर्‍या महायुद्धापर्यंतचे सखोल विवेचन करण्यात आले आहे. वसाहतकालीन अमेरिकन समाज संस्कृतीमध्ये काही आधारभूत तत्वे युरोपियन असली तरी संस्कृतीची स्वतंत्र अशी ओळख होती. लोकशाहीवरील अढळ निष्ठा किंवा लोकशाही ही जीवनाची प्रणाली म्हणून स्वीकारणे, लोकशाहीचा स्वीकार केल्यावर समान संधीच्या कायद्याच्या, समतेच्या पायावर नवीन समाजरचना निर्माण करणे, व्यक्तीस्वातंत्र्य व व्यक्तींचा संपूर्ण विकास करण्यास सर्व प्रकारची आवश्यक ती परिस्थिती निर्माण करणे वगैरेंचा त्यात समावेश होता. प्रस्तुत ग्रंथात अमेरिकेची सुरुवातीची पार्श्वभूमी, वसाहती, वसाहतकालीन समाज आणि संस्कृती, अमेरिकन स्वातंत्र्य युद्ध, स्वातंत्र्याचा जाहीरनामा, अमेरिकन राज्यघटना, जॉर्ज वॉशिंग्टन, जॉन अ‍ॅडॅम्स, थॉमस जेफरसन, जेम्स मन्रो, अब्राहम लिंकन या राष्ट्राध्यक्षांची महत्त्वपूर्ण भूमिका, अमेरिकन यादवी युद्ध, औद्योगिकरण, अमेरिका आणि जागतिक युद्धाचा काळ, राष्ट्राध्यक्ष वुड्रो विल्सनची कारकीर्द तसेच पहिल्या व दुसर्‍या महायुद्धातील अमेरिकेतील भूमिका इ. घटनांचे विश्लेषण साध्या सोप्या भाषेत केले आहे.

    Amerikan Sangharajyacha Itihas (C.E. 1776 to C.E. 1945)

    275.00
    Add to cart
  • आधुनिक चीनचा इतिहास

    Adhunik Chinacha Itihas

    250.00
    Add to cart
  • आधुनिक जगाचा इतिहास (1453 – 2000)

    अमेरिकन, फ्रेंच, औद्योगिक व रशियन क्रांतीला जगाच्या इतिहास महत्त्वपूर्ण स्थान आहे. अमेरिका व फ्रेंच क्रांतीने सर्वप्रथम लोकशाहीचा पुरस्कार केला. औद्योगिक क्रांतीने मानवी जीवनात आमूलाग्र बदल घडवून आणला, तर रशियन क्रांतीने साम्यवादाचा पुरस्कार केला. अमेरिकेला यादवी युद्धाच्या संकटातुन अब्राहम लिंकनने सुखरुप बाहेर काढले; पण त्यामुळे त्यांना आपला प्राण गमवावा लागला. एकोणिसाच्या शतकात युरोपात राष्ट्रवादी चळवळींना जोम आला. मॅझिनी, काव्हूर, गॅरिबाल्डी व व्हिक्टर इमॅन्युअल दुसरा यांच्या देशभक्तीमधून इटालीचे आणि बिस्मार्कच्या महत्त्वांकाक्षेतून जर्मनीचे एकीकरण पूर्ण झाले.

    बिस्मार्कने युरोपात गुप्त राजकारण व गटबाजीचे धोरण स्वीकारल्यामुळे युरोपियन देशांची दोन गटांत विभागणी झाली. त्याचे पर्यवसान पहिल्या महायुद्धात झाले. या महायुद्धाचे मानवी जीवनावर अत्यंत वाईट परिणाम झाले. आंतरराष्ट्रीय प्रश्न विचारविनिमय करुन सामोपचाराने सोडवावेत आणि जगात शांतात राखावी म्हणून राष्ट्रसंघ स्थापन करण्यात आला; परंतु बड्या देशांनी राष्ट्रसंघाचा फायदा केवळ स्वार्थासाठीच करुन घेतला. याशिवाय मुसोलिनी व हिटलर या हुकूमशहांनी राष्ट्रसंघावर आघात केला. त्यांच्या आक्रमक धोरणामुळे दुसरे महायुद्ध घडून आले. यानंतर जागतिक शांततेसाठी पुन्हा संयुक्त राष्ट्रसंघटना अस्तित्वात आली. दुसर्‍या महायुद्धानंतर स्वातंत्र्य चळवळींना जोर आला. इजिप्त व इंडोनेशिया हे दोन्ही देश अनुक्रमे बिटिश आणि डचांच्या राजकीय गुलामगिरीतून मुक्त झाले. या सर्व घटनांचा सविस्तर इतिहास प्रस्तुत पुस्तकात देण्यात आला आहे.

    Adhunik Jagacha Itihas (1453 – 2000)

    895.00
    Add to cart
  • आधुनिक जगाचा इतिहास (1780 ते 1919)

    मानवी समाजाच्या इतिहासात 15 वे शतक हे नवविचार, नवसमाजरचना, विज्ञानवादी दृष्टिकोन देणारे ठरले. येथूनच आधुनिक युगास प्रारंभ झाला. याच कालखंडात मानवतावाद निर्माण होऊन ‘मानव’ हा विचाराचा केंद्रबिंदू बनला. या कालखंडात अनेक विचारवंत उदयास आले. त्यांच्या नवविचारांनी वैचारीक क्रांती होण्यास सुरुवात झाली. ज्ञानाचा प्रसार सर्वत्र होवू लागला. राजसत्ता व धर्मसत्तेला हादरे बसू लागले. 18 व्या शतकात अमेरिकेमध्ये औद्योगिक क्रांती आणि फ्रान्समध्ये फे्रंच राज्यक्रांती झाल्याने त्यांचा परिणाम सर्वत्र होवून तत्कालिन काळात त्याचे प्रतिबिंब उमटले. राजकीय, सामाजिक, आर्थिक, धार्मिक इत्यादी सर्वच क्षेत्रात संपूर्ण जगावर परिणाम करणार्‍या या घटना होय. सर्वच देशात नवे विचार, नवी राजकीय, सामाजिक व्यवस्था अशा नवयुगाचा प्रारंभ झाला.

    प्रस्तुत पुस्तकात फ्रेंच राज्यक्रांती ते राष्ट्रसंघाची निर्मिती व कार्यापर्यंतचा जगाचा इतिहास देण्यात आला आहे. तसेच नेपोलियन बोनापार्ट, व्हिएन्ना काँग्रेस, बिस्मार्क, कैसर विल्यम दुसरा, रशिया-जपान युद्ध, त्रिराष्ट्र मैत्री करार, पहिले महायुद्ध, अमेरिकेचा महासत्ता म्हणून उदय, समाजवाद, भांडवलशाही, साम्यवाद संकल्पना, रशियन राज्यक्रांती, पॅरिस शांतता परिषद, विविध तह व करारनामे, राष्ट्रसंघ व दुसर्‍या महायुद्धाकडे वाटचाल या प्रमुख विषयांचा समावेश असून विषयाची मांडणी साधी सोपी व सर्वांना समजेल अशी आहे.

    Aadhunik Jagacha Itihas (1780 te 1919)

    250.00
    Add to cart
  • आधुनिक जगाचा इतिहास (1789 ते 1945)

    Adhunik Jagacha Itihas (1789 to 1945)

    350.00
    Add to cart
  • आधुनिक जगातील घडामोडी

    अमेरिका व फ्रेंच क्रांतीने सर्वप्रथम लोकशाहीचा पुरस्कार केला. औद्योगिक क्रांतीने मानवी जीवनात आमूलाग्र बदल घडवून आणला, तर रशियन क्रांतीने साम्यवादाचा पुरस्कार केला. एकोणिसाव्या शतकात युरोपात राष्ट्रवादी चळवळींना जोम आला. मॅझिनी, काव्हूर, गॅरिबाल्डी व व्हिक्टर इमॅन्युअल दुसरा यांच्या देशभक्तीमधून इटालीचे आणि बिस्मार्कच्या महत्त्वांकाक्षेतून जर्मनीचे एकीकरण पूर्ण झाले. बिस्मार्कने युरोपात गुप्त राजकारण व गटबाजीचे धोरण स्वीकारल्यामुळे युरोपियन देशांची दोन गटांत विभागणी झाली. त्याचे पर्यवसान पहिल्या महायुद्धात होऊन मानवी जीवनावर अत्यंत वाईट परिणाम झाले. आंतरराष्ट्रीय प्रश्न विचारविनिमय करून सामोपचाराने सोडवावेत आणि जगात शांतता राखावी म्हणून राष्ट्रसंघ स्थापन करण्यात आला; परंतु बड्या देशांनी राष्ट्रसंघाचा फायदा केवळ स्वार्थासाठीच करून घेतला. याशिवाय मुसोलिनी व हिटलर या हुकूमशहांनी राष्ट्रसंघावर आघात केला. त्यांच्या आक्रमक धोरणामुळे दुसरे महायुद्ध घडून आले. यानंतर जागतिक शांंततेसाठी पुन्हा संयुक्त राष्ट्रसंघटना अस्तित्वात आली. दुसर्‍या महायुद्धानंतर स्वातंत्र्य चळवळींना जोर आला.
    प्रस्तुत पुस्तकात प्रबोधनाचे युग, धार्मिक सुधारणा चळवळी, अमेरिकन व फ्रेंच राज्यक्रांती, औद्योगिक क्रांती, इटाली व जर्मनीचे एकीकरण, मेईजी क्रांती, पहिले महायुद्ध व साम्यवादाचा उदय, विविध शांतता परिषदा, राष्ट्रसंघ, रशियन राज्यक्रांती, शीत युद्ध आणि सोव्हिएत रशियाचे विघटन इ. विविध मुद्द्यांचा सखोल विचारविमर्श केलेला आहे.

    Adhunik Jagatil Ghadamodi

    450.00
    Add to cart
  • आधुनिक जपानचा इतिहास

    Adhunik Japancha Itihas

    175.00
    Add to cart
  • आधुनिक भारताचा इतिहास

    Adhunik Bharatacha Itihas

    395.00
    Add to cart
  • आधुनिक भारताचा इतिहास (1757 ते 1857)

    पूर्वेकडील राष्ट्रांशी व्यापार करण्यासाठी इ.स. 1600 मध्ये ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना झाली. त्यामुळे त्याचवर्षी व्यापाराच्या निमित्ताने ईस्ट इंडिया कंपनीने भारतात प्रवेश केला आणि व्यापाराच्या क्षेत्रात आपले वर्चस्व निर्माण केले. या काळात भारतात अनेक लहान-लहान राजवटी होत्या. त्यांच्यात परस्परात नेहमी संघर्ष होत असत. यामधूनच राजकीय अस्थिरता निर्माण झाली. याच अस्थिरतेचा फायदा घेऊन कंपनीने भारतात इ.स. 1757 मध्ये सत्ता स्थापन केली. इ.स. 1858 पर्यंत कंपनीने भारतावर राज्य केले. याच वर्षी कंपनीची भारतातील सत्ता संपुष्टात येऊन ती ब्रिटिश राजसत्तेच्या ताब्यात गेली. प्रस्तुत ग्रंथात कंपनीच्या राजवटीच्या काळातील भारताचा राजकीय, सामाजिक, धार्मिक व प्रशासकीय इतिहास देण्यात आला आहे. त्यामुळे हा ग्रंथ विद्यापीठ पातळीवरील परीक्षा, सेट, नेट, MPSC, UPSC व सर्व स्पर्धा परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त आहे.

    Adhunik Bharatacha Itihas (1757 to 1857)

    425.00
    Add to cart
  • आधुनिक भारताचा इतिहास (1857 ते 1950)

    भारताच्या घटनात्मक विकासाला ब्रिटिश काळातच सुरूवात झाली होती. ब्रिटिशांनी क्रमाक्रमाने भारतीयांना राजकीय हक्क बहाल केले. त्याची सुरूवात 1990 च्या मोर्ले-मिंटो सुधारणा कायद्याने आधीच झाली होती. या कायद्यांना राजकीय सुधारणांचे हप्ते असेही म्हटले जाते. मोर्लेे-मिंटो कायद्यानंतरचा टप्पा म्हणजे 1919 चा माँटेग्यू-चेम्सफोर्ड सुधारणा कायदा होय. भारतातील ब्रिटिश राजवटीच्या प्रस्थापनेबरोबर भारतीयांच्या आर्थिक शोषणाला प्रारंभ झाला. भारतीय समाजसुधारकांनी भारतीयांमध्ये विवेकवाद, वैज्ञानिकता, उदारमतवाद, व्यक्तिस्वातंत्र्य, लोकशाही या आधुनिक कल्पना रुजविण्यास प्रारंभ केला. 1942 च्या चले जाव चळवळीने भारतीयांमध्ये मोठे चैतन्य निर्माण केले. सुभाष चंद्र बोस यांच्या आझाद हिंद सेनेच्या अचाट कार्याने ब्रिटिशांच्या भारतातील सत्तेला सुरुंग लागला. पिंरणामी संपूर्ण स्वातंत्र्याकडे भारताची वेगाने वाटचाल सुरु झाली. स्वातंत्र्यानंतर भारताची फाळणी आणि पाकिस्तानचा जन्म ही भारतीय राजकारणातील क्लेशदायी आणि विवादास्पद घटना ठरली.

    Adhunik Bharatacha Itihas (1857 te 1950)

    350.00
    Add to cart
  • आधुनिक भारताचा इतिहास (1858 – 1947)

    ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने भारतात व्यापाराच्या निमित्ताने प्रवेश केला असला तरी येथील अराजकतेचा फायदा घेऊन कंपनीने आपले राज्य स्थापन केले. कंपनीने भारत देशाचे आर्थिक शोषण सुरु केले. परंतु पुढे भारतीय लोकांमध्ये सामाजिक, राजकीय व आर्थिक जागृती झाली. यामधुनच भारतीय राष्ट्रीय काँग्रेस स्थापन झाली. यापूर्वीच इ.स. 1858 मध्ये भारतावरील कंपनीची सत्ता संपुष्टात येऊन व येथे ब्रिटनची सत्ता स्थापन झाली होती. लोकमान्य बाळ गंगाधर टिळक व महात्मा मोहनदास करमचंद गांधी यांनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या नेतृत्वाखाली ब्रिटिश सरकारच्या विरोधात आंदोलन केले. याच आंदोनालात क्रांतिकारक व स्त्रियानीही महत्त्वाचे योगदान दिले. शेतकरी व आदिवासी लोकांनी केलेले उठाव व केलेल्या चळवळी सुद्धा महत्त्वाच्या ठरतात. संस्थानातील जनतेनेही प्रतिगामी राजवटींच्या विरोधात चळवळी केलया होत्या. राष्ट्रीय चळवळीपासून मुस्लिम लीग दूर राहीली. यामधूनच पुढे पाकिस्तान या स्वतंत्र देशाची निर्मिती झाली. इ.स. 1858 पासून इ.स. 1947 पर्यंतचा भारताचा इतिहास प्रस्तुत ग्रंथात दिला असून हा ग्रंथ विविध स्पर्धा परिक्षा, एम.पी.एस.सी., यु.पी.एस.सी. व विविध विद्यापीठाच्या अभ्यासक्रमासाठी उपयुक्त संदर्भ ग्रंथ ठरणार आहे.

    Adhunik Bharatacha Itihas

    475.00
    Add to cart
  • आधुनिक भारताचा इतिहास (सन 1757 ते 1857)

    आधुनिक भारताचा हा कालखंड अनेक स्थित्यंतरे व प्रचंड उलथापालथीचा होता. या कालखंडात राजकीय, सामाजिक, आर्थिक, प्रशासकीय, सांस्कृतिक, वैचारिक बदल घडून आलेत या बदलाचे भारताच्या राजकीय पटलावर जे परिणाम झालेत ते दूरगामी स्वरुपाचे दिसून येतात.

    अठराव्या शतकाच्या मध्यापासून ते 1857 पर्यंत भारतात इंग्रजी सत्तेची पायाभरणी झाली. ही परकीय राजसत्ता कशी प्रस्थापित झाली व कशी दृढमूल झाली याची माहिती घेण्याच्या दृष्टीने आवश्यक ते इंग्रजी शासनाचा तपशील दिला आहे. या कालावधीत एकीकडे इंग्रज साम्राज्यवादी सत्तेची मुठ हिंदुस्थान भोवती आवळत गेले, तर दुसरीकडे भारतात आधुनिक मूल्ये रुजू लागली.

    सन 1757 ते 1857 हा काळ आधुनिक भारताच्या इतिहासात महत्त्वपूर्ण आहे. भारतीयांचा परकीयांशी आलेला संबंध त्यांनी केलेले आर्थिक शोषण, त्याच बरोबर भारतात प्रबोधनाच्या दृष्टीने आधुनिक पर्वास झालेला प्रारंभ याचा या ग्रंथात साकल्याने विचार केला आहे.

    Adhunik Bharatacha Itihas (1757 te 1857)

    250.00
    Read more
  • आधुनिक महाराष्ट्राचा इतिहास

    भारताच्या राजकीय सामाजिक सांस्कृतिक जडणघडणीत महाराष्ट्राचे योगदान अनन्य साधारण आहे. भारतातील सामाजिक सुधारणा चळवळीचा पाया महाराष्ट्रामध्ये घातला गेला. देशांच्या बदलाचे नेतृत्व महाराष्ट्राने केलेले दिसून येते. इ.स. 1818 मध्ये पेशवाईचा शेवट झाला व महाराष्ट्रावर ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची सत्ता स्थापन झाली. इ.स. 1818 नंतरची महाराष्ट्रातील राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक पार्श्वभूमीचा आढावा प्रस्तुत संदर्भ ग्रंथात घेण्यात आलेला आहे. ब्रिटिश सत्तेच्या स्थापनेच्या सुरुवातीच्या कालखंडातील वृत्तपत्रे, शिक्षण, प्रशासन, ख्रिस्ती मिशनऱ्यांचे कार्य याबद्दलचे विवेचन करण्यात आलेले आहे. देशाच्या सामाजिक सुधारणेत महत्त्वपूर्ण योगदान देणारे महाराष्ट्रातील समाजसुधारकांच्या कार्याची सविस्तर माहिती देण्यात आलेली आहे. टिळक युग, क्रांतिकारी चळवळ गांधीयुग व महाराष्ट्रातील स्वातंत्र्य चळवळ यांचा ऊहापोह केलेला आहे. तसेच स्त्रीमुक्ती चळवळ, कामगार चळवळ, दलित चळवळ, आदिवासी चळवळ, शेतकरी चळवळ व संस्थानातील स्वातंत्र्य चळवळीचा विचार केलेला आहे.
    प्रस्तुत ग्रंथ महाराष्ट्राच्या इतिहासाचा अभ्यास करणारे संशोधक, एमपीएससी व युपीएससी परीक्षेची तयारी करणारे विद्यार्थी व पदवी तसेच पदव्युत्तर स्तरावरील विद्यार्थ्यांसाठी निश्चितच उपयुक्त ठरेल.

    Aadhunik Maharashtracha Itihas

    450.00
    Add to cart
  • आधुनिक युरोपचा इतिहास

    Adhunik Europcha Ithihas

    175.00
    Add to cart
  • आधुनिक युरोपचा इतिहास (इ.स. 1780 ते 1945)

    मध्ययुगात युरोप हा धर्मगुरू व राजा यांच्या गुलामगिरीत वाढलेला. इंग्लंडने गुलामगिरीचे सर्वप्रथम उच्चाटन केले. फे्रंच राज्यक्रांतीने स्वातंत्र्य, समता, बंधुता, राष्ट्रवाद व राज्यघटनेचे महत्त्व विशद केले. वैज्ञानिक शोधांमुळे ‘औद्योगिक क्रांती’ युरोपमध्ये उदयास आली. वसाहतीच्या शोधामुळे युरोपमध्ये विनाशकारी साम्राज्यवादाचा उदय झाला. संपूर्ण जगाला विनाशाच्या गर्तेत फेकणार्‍या दोन्ही महायुद्धांना युरोप कारणीभूत ठरले. दोन्ही महायुद्धात प्रचंड प्रमाणात मनुष्यहानी, आर्थिकहानी झाली. मानवजातीचा समूळ विनाश करणार्‍या विध्वंसकारी अणुबॉम्बचा शोध याच काळात लागला. महायुद्धांतील संहारक अस्त्रांमुळे मानव जात स्तब्ध झाली. जगात पुन्हा महायुद्ध होऊ नये, विध्वंसकारी अणुबॉम्बच्या वापरास निर्बंध घालावा तसेच शांततापूर्ण सहकार्य यासाठी यूनो या जागतिक दर्जाच्या संघटनेची निर्मिती झाली.
    प्रस्तुत पुस्तकात इंग्लंडमधील लोकशाही, फे्रंच राज्यक्रांती, औद्योगिक क्रांती, साम्राज्यवाद, राष्ट्रवाद, राष्ट्रसंघ व संयुक्त राष्ट्र संघटना यांची निर्मिती, रशियन राज्यक्रांती, फॅसिझम, नाझीझम, तुर्कस्थानचे आधुनिकीकरण इ. महत्त्वपूर्ण मुद्द्यांचे सविस्तर विवेचन केलेले आहे.

    Aadhunik Yuropcha Itihas (A.D. 1780 – 1945)

    225.00
    Add to cart
  • इतिहासलेखनशास्त्राची ओळख

    विल ड्युरंटच्या मते, इतिहासाला बिलगुण संस्कृतिनामक गोष्ट सहज अबोलपणे कार्यरत असते. मानवी संस्कृति हा एक जिवंत, चैतन्यमय झुळझुळता प्रवाह असतो. त्याला किनारे आहेत. माणसे आपआपसात लढतात. लुटमार करतात. एकमेकांचे प्राण घेतात. माणसांच्या रक्ताने संस्कृतिचा वाहता प्रवाह भरुन जातो आणि इतिहास या साऱ्यांची इमानेइतबारे नोंद करतो पण त्याचवेळी याच प्रवाहाचा दोन्ही तिरांवर शांतपणे कोणाच्या ध्यानातही येणार नाही अशा रितीने माणसे परस्परांवर प्रेम करतात, स्त्री-पुरुष विवाहबद्ध होतात, अपत्यांना जन्म देवून त्यांचे संगोपण करतात, गाणी गातात, सुंदर चित्रे काढतात, शिल्पे खोदतात आणि कविता लिहितात, मानवी इतिहास म्हणजे खरोखर संस्कृतिच्या दोन्ही तिरांवर जे घडत असते त्याला ‌‘इतिहास’ म्हणतात.

    Itihaslekhanshasstrachi Olkha

    195.00
    Add to cart
  • इतिहासातील संशोधन पद्धती

    इतिहासकार कसा असावा याबाबत महान इतिहासकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात,
    इतिहासकार हा काटेकोर, तळमळीचा आणि पंक्तिप्रपंच न करणारा असा असला पाहिजे. भावनाविरहित, आपुलकिची भावना, भीती, तिरस्कार किंवा प्रेमाची ओढ यांच्यापासून मुक्त असा असला पाहिजे. इतिहासाची जननी जी सत्यनिष्ठा ती त्याच्या रोमारोमात भिनलेली असली पाहिजे. महत्कृत्यांना सुरक्षित ठेवणारा, अंधाराचा संहार करणारा, पूर्वकाळाचा साक्षी आणि भावी काळाचा नेता असा असला पाहिजे. थोडक्यात सांगावयाचे म्हणजे अगदी रिकामे नसणारे नव्हे पण उघडे असणारे त्यांचे मन पाहिजे. खोटे-नाटे पुरावे जरी त्याच्या हाती लागले तरी त्या सर्व पुराव्यांची छाननी करण्याची त्याची तयारी पाहिजे म्हणजे सत्यानिष्ठा हा इतिहासाचा आत्मा असतो. डॉ. आंबेडकरांनी भारतीय इतिहासावर जे लिखाण केले ते वस्तुनिष्ठता व सत्यनिष्ठेने केले.

    डॉ. भीमराव रामजी आंबेडकर
    (शुद्र मूळचे कोण होते)

    Itihaas Sanshodhan Paddhati

    150.00
    Add to cart
  • उपयोजित इतिहास

    इतिहासाचे स्वरूप काळाप्रमाणे उदंड आहे. साधारणत: पृथ्वीच्या उत्पत्तीपासून मानवी इतिहासाचा प्रारंभ होतो. मानवी जीवनाची झालेली उत्क्रांती, त्यातील टप्पे, मानवी संस्कृतीचा उदय-अस्त, त्यांच्या जीवनात घडलेल्या विविध घटनांचा परामर्श इतिहासाच्या अभ्यासात केला जातो. मानवी जीवनाचा भूतकाळ म्हणजे इतिहास. मानवी जीवनाच्या सर्वांगाला स्पर्श करण्याचा प्रयत्न साधारणत: इतिहासाच्या अभ्यासाद्वारे केला जावू शकतो. प्राचीन, अतिप्राचीन काळात इतिहासाला मर्यादा होत्या. आधुनिक काळात मात्र त्या नाहीत. प्राचीन काळापासूनच मानवाला सुंदर, कलात्मक, मौल्यवान, दुर्मिळ अशा कोणत्याही वस्तू अथवा अवशेषांबद्दल आकर्षण व कुतूहल असते. वस्तुसंग्रहालयातून मानव संस्कृतीच्या पाऊलखुणा जपून ठेवलेल्या दिसतात. वस्तुसंग्रहालयाची कल्पना सर्वप्रथम युरोपमध्ये जन्माला आली. वस्तुसंग्रहालयाचा उदय प्रथम ग्रीस व रोममध्ये घडून आला. प्राचीन भारतात अनेक विद्यापीठे होती. या विद्यापीठात मोठी संग्रहालये होती. पण ती आजच्या वस्तुसंग्रहालयासारखी सुसज्ज नव्हती. देशभरातील अनेक संस्थानिकांनी आपआपल्या संस्थानात त्यांच्याकडे उपलब्ध असलेल्या वस्तूंची वस्तुसंग्रहालये स्थापन केलीत. मानवी जीवनात नाविन्यपूर्ण गोष्टी, वास्तू पहाण्याचे आकर्षण अनादी काळापासून आहे. ऐतिहासिक स्थळे, स्मारके, प्राचीन वस्तू व वास्तू, मंदिरे, मंदिरातील देवदेवतांच्या मूर्ती, राजवाडे, नवी आकर्षक व जुनी घरे, किल्ले, गुहा, लेणी इ. पहाण्याची मानवी मनास अत्यंत उत्सुकता व कुतूहल असते.

    Upyojit Itihas

    120.00
    Add to cart
  • उपयोजित इतिहास

    An ordinary Guide reads.
    An average Guide explains
    A good guide demonstrates,
    But a great Guide inspires, to Scholar, म्हणूनच
    डॉ. कोठारी म्हणतात की, Destiny of India shaped in the Class room with research. संशोधन करीत असताना संशोधकाच्या अंगी विषयाची आवड असावी, कष्ट सहन करण्याची क्षमता असावी, संदर्भ संकलन आणि प्राप्तीसाठी भ्रमंती, वेळ आणि पैसा, नम्रता, तटस्थता, उत्तम संवाद आणि संपर्क, कौशल्य सद्सदविवेकता, व्यवहारज्ञान, चौकसपणा व वस्तुनिष्ठता असावी लागते. संदर्भ संकलन आणि साधने प्राप्त करीत असताना नमूदीकरण ही आवश्यकता असते. पायाभूत संशोधन (Basic Research) आणि व्यवहार उपयोगी संशोधन (Applied Research) हे संशोधनाचे मुख्य दोन प्रकार आहेत. Discover, Investigation आणि Research हे तीन वेगवेगळे घटक आहेत.

    350.00
    Add to cart
  • खानदेश वैभव : काल, आज आणि उद्या

    साने गुरुजींनी खानदेशाच्या गौरवार्थ ‌‘वैभवेश’ हे विशेषण वापरलेले आहे. बी.एन. हा या वैभवेशाचा पुत्र खरा, पण एका गरीब अल्पभूधारक शेतकरी कुटुंबात जन्मलेला आणि बालपणीच मातृवियोगाचा आघात पचवलेला पुत्र! खडतर आयुष्यात त्याने जे काही सोसलं, ते एखाद्या शोकात्म कादंबरीसारखं आहे. पण आयुष्यात हे असलं हलाहल पचवणाऱ्या या माणसाच्या हृदयात मात्र खानदेशी गोडव्याचं अमृत आहे! अगदी बहिणाबाईंच्या कवितेतला गोडवाच म्हणा ना! मातेविना पोरका असा हा मुलगा एक मातृहृदयी पुरूष म्हणून जगला. साधेपणा, ऋजुता, पारदर्शीपणा याच्या अंगात मुरलेला. याचं विद्यार्थीप्रेम हे हृदयाच्या अंतर्हृदयातून पाझरलेलं. याच्यातला सामाजिक सेवाभाव म्हणजे जणू कानबाईने दिलेला कानमंत्रच! एका व्यक्तीचा काही व्यक्तींनी केलेला गौरव, एवढेच या गौरवग्रंथाचे महत्त्व नाही. माझ्या मते त्याला एक प्रतिकात्मक मूल्य आहे. बीएन ही निव्वळ एक व्यक्ती नाही, तर ती एक चालतीबोलती संस्था आहे. ते केवळ एक अभ्यासू शिक्षक नाहीत, तर एका वैचारिक परंपरेचे डोळस प्रतिनिधी आहेत. कोणत्याही राजकीय पक्षाचे वा वैचारिक पंथाचे ‌‘लेबल’ त्यांनी लावलेले नाही. पण त्यांच्यामध्ये समाजवादी आणि सर्वोदयी विचारांचा सुंदर समन्वय झालेला आहे. महाराष्ट्रात साने गुरूजींमध्ये आणि देव-जावडेकर-भागवत वगैरे आचार्य-परंपरेमध्ये गांधीवाद, लोकशाही, समाजवाद यांचा जो सुरेख मेळ साधला गेलेला आढळतो, तसा तो बीएन यांच्या जगण्यावागण्यातून प्रत्ययास येतो. शिक्षकी पेशाचं अवमूल्यन झालेल्या काळात असे शिक्षक आचार्य कुलाचं एखादं ओॲसिस उभारतात. शिक्षण क्षेत्राचं बाजारीकरण आणि मूल्यांचा ऱ्हास चालू असताना असे काही ‌‘अव्यवहारी’ लोक स्वार्थाच्या बाजारातसुद्धा परमार्थाची गुढी उभारतात. वर्किंग अवर्स, वेतन आयोग, बाळसेदार बायो-डेटा हे सगळं गरजेचं. वाटत असेल अध्यापकांना; पण त्यापलीकडे जी व्यक्ती पोहोचली, अध्यापन हा जिने ‌‘धर्म’ मानला आणि शिक्षकी पेशातले सामाजिक उत्तरदायित्व जिने जाणले, तीच व्यक्ती शिक्षकी-पेशाला खऱ्या अर्थाने जागली, तिलाच खरा यतिधर्म समजला! बीएन हे या जातकुळीतले शिक्षक आहेत. म्हणून निवृत्तीसमयीचा त्यांचा गौरव हा निव्वळ उपचार नव्हे, ती नुसती सत्काराची शाल नाही, तर प्रेरणेची मशाल आहे.

    – राजा दीक्षित
    सुप्रतिष्ठित प्राध्यापक,
    इतिहास विभाग, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे

    Khandesh Vaibhav : Kal, Aaj Aani Udya

    1,250.00
    Add to cart
  • खानदेशमधील राष्ट्रवादाचा उदय आणि विकास (खानदेशचा इतिहास)

    इतिहासाचे पुनर्लेखन ही जशी काळाची गरज आहे तसेच प्रादेशिक इतिहास लेखन हे सुद्धा आवश्यक आहे. आजपर्यंत भारतीयांनी प्रादेशिक इतिहासाकडे दुर्लक्ष केले. वास्तविक पाहता स्वातंत्र्याच्या चळवळीत हिंदुस्थानातील सर्व प्रदेशांचे योगदान आहे. पण त्यांच्या कार्याची फारशी नोंद झाली नाही. ती व्हावी या हेतूने हा ग्रंथ लिहिला आहे. यांत राजकीय चळवळीबबरोबर सत्यशोधक चळवळ, गुला महाराजांचे भिल्लांतील प्रबोधन, मंदिर प्रवेशाची चळवळ, अस्पृश्यता नष्ट करण्यासाठी झालेले प्रयत्न, हिंदुस्थानातील ग्रामीण भागात काँग्रेसचे प्रथमच भरलेले फैजपूरचे अधिवेशन व त्यात शेतकर्‍यांसंबंधी झालेले ठराव आदि अनेक गोष्टींचा आढावा घेतला आहे. खानदेशमध्ये मोठ्या प्रमाणात भिल्ल व आदिवासी लोक आहेत. त्यांनीच पहिल्या प्रथम ब्रिटीश सत्तेला खानदेशच्या भूमीवर विरोध केला. म्हणून खर्‍या अर्थाने ते महाराष्ट्रातील आद्य क्रांतीकारक होत. काझीसिंग व भागोजी नाईक आदि भिल्ल क्रांतीकारकांनी 1857 च्या उठावात भाग घेवून खानदेशमध्ये स्वातंत्र्याची ज्योत पेटविण्याचा प्रयत्न केला. अशा वंचित नि उपेक्षित जनता व प्रदेशाचा इतिहास उजेडात आणण्याचा प्रयत्न म्हणजे हा ग्रंथ होय.

    Khandeshmadhil Rashtravadacha Uday Ani Vikas (Khandeshcha Itihas)

    595.00
    Add to cart
  • खानदेस रतन

    स्तंभलेखन : गावकरी, पुण्यनगरी, आपला महाराष्ट्र या वृत्तपत्रात अहिराणी व मराठीत स्तंभलेखन. “गावकरी” मध्ये सन 1995 पासून सतत 5/6 वर्षे “आप्पान्या गप्पा” हे अहिराणी सदर चालविले. ते लोकप्रिय झाल्यामुळे आप्पान्या गप्पाकार ही ओळख मिळाली. आपला महाराष्ट्र मध्ये देखील मधुर वैंजी, गयामाय ही कथारुप व्यक्तिचित्रे व ज्ञानेश्वरी, तुकारामाची गाथा यातील काही भागांचे अहिराणीत अनुवाद प्रसिद्ध. पुण्यनगरीत “मायन्यान भो” हे सदर एक दिड वर्षे चालविले. त्यातून शेतकऱ्यांच्या ज्वलंत प्रश्नांना वाचा फोडली. चोखंदळ वाचकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला. सोशल मिडीयातून देखील अहिराणी प्रचाराचे काम सुरु आहे.
    अहिराणी साहित्य : आप्पान्या गप्पा भाग1 व 2 अहिराणी ललित लेखांची पुस्तके व पुरणपोळी कविता संग्रह प्रसिद्ध. “खानदेस रतन” हे पुस्तक आता प्रकाशित करत आहे. त्यात स्वातंत्र्य चळवळीतील महान विभूती, लेखक, कवी, समाजसेवक, राजकारणी यांची व्यक्तिचित्रे रेखाटली आहेत. खानदेस रतन भाग 2 देखील लवकरच प्रकाशित होईल. अहिराणीत आत्मवृत्त लिहीण्याचे काम चालू आहे.
    अहिराणी प्रचार प्रसार : कासारे, चाळीसगाव येथील साहित्य संमेलनात परिसंवादात अहिराणीतून भाषण करुन इतरांनाही अहिराणीतूनच बोलण्याचा आग्रह केला. आजपर्यंत झालेल्या सर्व अ.भा.अहिराणी साहित्य संमेलनांचा वृत्तांत लिहून व्रुत्तपत्रात प्रसिद्ध केला. तसेच चाळीसगांव अ.भा.अहिराणी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. रमेश सूर्यवंशी यांची मुलाखत घेऊन प्रसिद्ध केली.
    अहिराणी त्रैमासिक : मायबोली अहिराणीच्या प्रचार प्रसारासाठी तसेच अहिराणीत लिहू इच्छीणाऱ्या नवोदित हातांना हक्काचे व्यासपीठ मिळवून देण्यासाठी प्रा.डॉ. सदाशिव सूर्यवंशी यांच्या सहकार्याने “खान्देशनी वानगी” हे त्रैमासिक जाने. 2016 पासून सुरु केले आहे. मायमावलींचे अलिखीत साहित्यही त्यात प्रसिद्ध केले जाते.
    मराठी साहित्य : गंधाळलेली कविता हा काव्यसंग्रह व एक चारोळी संग्रह प्रसिद्ध
    सामाजिक कार्य : व्यसनमुक्ती, भ्रष्टाचार व अंधश्रद्धा निर्मूलन, व्रुक्ष लागवड व संवर्धन आदि चळवळीत सक्रिय सहभाग.

    Khandes Ratan

    150.00
    Add to cart
  • गोवा मुक्ति आंदोलनात साप्ताहिक प्रबोधचंद्रिकेची भूमिका

    प्रस्तुत ग्रंथात प्रस्तावना, संपादकीय, साप्ताहिक प्रबोधचंद्रिकेचा इतिहास, भूमिका व गोवा मुक्ती संग्रामात जागृत ठेवण्याचे कार्य ज्या अग्रलेखाच्या माध्यमातून केले ते निवडक अग्रलेख परिशिष्ठासह देण्याचा प्रयत्न केलेला आहे. एकूण 15 अग्रलेख, वृत्त, बातमी, घटनेचे फोटो, संपादकीय व अग्रलेखाच्या माध्यमातून प्रबोधचंद्रिकेने गोव्यातील सूक्ष्म सूक्ष्म घटनेची नोंद घेतली आहे. एवढेच नव्हे तर खान्देशातील गोवा मुक्तीसाठी जाणारे सत्याग्रही, नेते, नवतरुण यांच्या कार्याची दखल, सभा, भाषणे, जागतिक घडामोडी, परदेशी वार्ताहर यांच्या प्रत्येक हालचालींची नोंद साप्ताहिक प्रबोधचंद्रिकेत विशेष स्वरूपात दिसून येते. स्थानिक इतिहासाच्या (Local History) अभ्यासातून राष्ट्रीय तथा आंतरराष्ट्रीय इतिहासाची सुरुवात असते. साप्ताहिक प्रबोधचंद्रिकेने हीच भूमिका अतिशय उत्तम पद्धतीने टिकवून ठेवल्याची दिसते.

     

    Goa Mukti Aandolanat Saptahik Prabodhchandrikechi Bhumika

    150.00
    Add to cart
  • चीन व जपानचा इतिहास

    China V Japancha Itihas

    225.00
    Add to cart
  • दिल्ली सुलतानशाहीचा इतिहास (1206 ते 1526)

    भारताचा सर्वप्रथम अरब आक्रमणांनी आक्रमणे केली. मुहम्मद बिन कासिम यांनी भारतावर पहिले आक्रमण केले. यानंतर तुर्कानी भारतावर आक्रमणे केली आणि भारतात आपली सत्ता स्थापन केली. कुतुबुद्दीन ऐबक हे महंमद घोरी यांच्या भारतातील राज्याचे प्रतिनिधी होते. महमंद घोरी यांच्या मृत्युनंतर इ.स. 1206 मध्ये कुतुबुद्दीन ऐबक यांनी स्वतःला राज्याभिषेक करुन सुलतान ही पदवी धारण केली. त्यांच्या राज्याची राजधानी दिल्ली होती. ऐबक यांनी स्थापन केलेले हे राज्य भारतातील पहिले मुस्लिम राज्य होते. हे राज्य इ.स. 1526 पर्यंत अस्तित्वात होते. इ.स. 1206 ते इ.स. 1526 हा काल खंड दिल्ली सुलतानशाहीचा कालखंड म्हणून ओळखला जातो. याचकाळात गुलाम, खिलजी, तुघलक, सय्यद व लोदी राजवंशाने राज्य केले. याचकाळात दक्षिण भारतात विजयनगर व बहमनी राज्य होऊन गेले. प्रस्तुत ग्रंथात दिल्ली सुलतानशाहीच्या काळातील भारताचा राजकीय, सामाजिक, धार्मिक, आर्थिक व प्रशासन, कला आणि वास्तुकलेचा इतिहास दिला आहे.

    Delhi Sultanshahicha Ithihas (1206 te 1526)

    350.00
    Add to cart
  • नारो शंकर राजेबहाद्दर आणि मालेगांवचा इतिहास

    नारोशंकर राजेबहाद्दर आणि त्यांच्या घराण्यासंबंधी माहिती गोळा करण्याकरीता मराठ्यांच्या इतिहासाच्या सागरात उडी टाकून त्यातून हिरे जवाहिर शोधून आणणे अतिकष्टाचे कार्य होते. मालेगांवची ही वसाहत कशा पध्दतीने टप्प्याटप्प्याने उदयास आली आणि कशा पध्दतीने ती वाढली? भूतकाळातील एक लहानसं खेडं क्रमाक्रमाने इतक्या मोठ्या शहरामध्ये कसे रुपांतरीत झाले. विविध टप्प्यामध्ये लोकसंख्या वाढीची काय कारणे होती? हिंदू आणि मुसलमान कोठून आले? केव्हा आले? त्यांच्या स्थलांतराची काय कारणे होती? या सर्व प्रश्नांची उत्तरे देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.

    सदर ग्रंथात मालेगांवचा भूगोल आणि नामकरण, मालेगांव कोणत्या काळात कोणाचे राज्य होते, नारो शंकर राजे बहाद्दर घराण्याचा इतिहास, मालेगांवच्या भुईकोट किल्ल्याची रचना, मालेगांवच्या किल्ल्याचे युध्द, बस्ती बसना खेलना ही है, हिंदुस्तानच्या स्वातंत्र्य युध्दात मालेगांवचा सहभाग, नैसर्गिक आपत्ती आणि रोगांच्या साथी, पॉवरलूम उद्योगाचा इतिहास, मालेगांवातील इस्लामी शिक्षणाचा इतिहास या सर्व घटनांचा परामर्श डॉ. इलियास सिद्दीकी यांनी उत्कृष्ट पद्धतीने मांडलेला आहे.

    425.00
    Add to cart
  • पुराभिलेखागार

    21 व्या शतकाच्या पूर्वार्धात जगभरातील सर्व तर्‍हेची माहिती महाजालामुळे एका क्लिकवर उपलब्ध झालेली असली तरी जुनी कागदपत्रे जपणारे पुराभिलेखागार आजही महत्वाचे आहेत. पुराभिलेख म्हणजे मानवाच्या प्रगतीचा आलेख दर्शविणारी साधने.
    इ.स.पू. 327 च्या सुमारास अलेक्झांडरबरोबर भारतात आलेल्या निआर्कसने ‘हिंदू लोक रुई (कापूस) कुटून कागद तयार करतात’ असे लिहून ठेवले आहे. भारतात मध्यकाळापासूनच कागदपत्रे जतन करून ठेवण्याची पध्दत रूढ असल्याचे दिसून येते. पूर्वी संस्थानात कायम सांभाळून ठेवण्याजोगी कागदपत्रे लाल रुमालात बांधत तर पस्तीस, बारा व तीन वर्षे राखून ठेवण्याची कागदपत्रे पांढर्‍या रुमालात बांधत असत. इ.स. 1818 मध्ये महाराष्ट्रात ब्रिटिश सत्ता प्रस्थापित झाली. यावेळी करण्यात येत असलेला सरकारी पत्रव्यवहार, जनतेचे तक्रार अर्ज व इतर कागदपत्रे सरकार दरबारी जमा होऊ लागली.
    सदरील पुस्तकात अभिलेखागारविषयक सर्व उपयुक्त माहितीसोबतच मुंबई अभिलेखागार, मुंबई, पुण्याचे पेशवे दफ्तर (पुणे अभिलेखागार) आणि इ.वि.का. राजवाडे संशोधन मंडळ, धुळे येथील पुराभिलेखागारांचाही समावेश आहे. ‘डिजिटल अभिलेखागार’ या नव्या संकल्पनेबाबत दिलेली माहिती विद्यार्थी, शिक्षक व नवोदित इतिहास संशोधक अभ्यासकांनाही उपयोगी ठरेल असा विश्वास आहे.

    Purabhilekhagar

    160.00
    Add to cart
  • प्राचीन भारत (प्रारंभ ते १२००)

    भारतीय संस्कृती ही अतिप्राचीन असून तिचा प्रारंभ सिंधू संस्कृतीपासून होते. सिंधू संस्कृतीच्या पूर्वीसुद्धा भारतात मानवी संस्कृती अस्त्त्विात होती. सिंधू संस्कृतीनंतर वैदिक संस्कृतीचा उदय व विकास झाला.
    भारतभूमीत प्राचीन काळात सम्राट चंद्रगुप्ताने आचार्य चाणक्यांच्या सहकार्याने संबंध भारत भूमीवर एक विशाल मौर्य साम्राज्य उभारले. सम्राट अशोकाने पराक्रम करुनही जगाला शांतीचा संदेश दिला. सारनाथ येथील अशोकाच्या स्तंभावरील चार सिंहाचे प्रतीक, अशोक चक्र स्वतंत्र भारताच्या शासनाने राजचिन्ह मानले. मौर्यानंतर गुप्त, वाकाटक, सातवाहन, चालुक्य, राष्ट्रकूट, राजपूत, चोल, चेर, पांड्य, पल्लव इत्यादी राजकीय सत्ताधिशांच्या काळात सोपरा, भडोच ह्या प्रसिद्ध बंदरातून भारतीय उत्पादीत माल निर्यात होऊ लागला. अनेक प्रकारचे उद्योग कृषी व्यवसायातून पुढे आल्याने भारत सुवर्णभूमी बनली होती. भारतीय राजकीय सत्ता काळातील अजिंठा व वेरुळ लेणी तर शिल्पशास्त्रातील एक आश्चर्य मानण्यात यतेते. या ग्रंथात राजकीय इतिहासाबरोबरच षङ्दर्शने, उषनिषदे, जैन व बौद्ध धर्म, स्त्रियांची परिस्थिती, कायदा व न्यायव्यवस्था, शिक्षण पद्धती, कला व स्थापत्य, शेती, व्यापार व वाणिज्य, सरंजामशाही, धार्मिक व सामाजिक परिस्थिती आणि साहित्य या विषयांवरही सविस्तर प्रकाश टाकला आहे. प्रस्तुत ग्रंथ पदवी, पदव्युत्तर, नेट/सेट आणि स्पर्धात्मक परीक्षांसाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे.

    Prachin Bharat (Praranbh te 1200)

    395.00
    Add to cart
  • प्राचीन भारत (प्रारंभ ते इ.स. 1205 पर्यंत)

    Prachin Bharat Praranbh te C.E. 1205 Paryant

    395.00
    Add to cart
  • प्राचीन भारताचा इतिहास (इ.पू. 3000 ते इ.स. 1200)

    प्राचीन काळी भारत सुवर्णभूमी म्हणून ओळखला जात असे. त्याचा व्यापार दूरदूरच्या देशांबरोबर चालत असे. त्याच्या संस्कृतीची किर्ती संपूर्ण जगात पसरली होती. कलाकौशल्य, साहित्य, विज्ञान, तत्त्वज्ञान आणि व्यापार यांच्या बाबतीत हा देश जगाला मार्गदर्शक होता. असे असतानाही आपणास मोठ्या दु:खाने सांगावे लागते, की आज या देशाचा प्राचीन गौरवशाली इतिहास उपलब्ध नाही. जो उपलब्ध आहे तो फारच अल्प आहे, म्हणून प्राचीन भारताचा अभ्यास करताना इतिहासकाराला मोठा त्रास पडतो. आज भारताचा जो इतिहास उपलब्ध आहे त्याच्या कैकपटीने प्राचीन भारताचा इतिहास स्मृतीच्या गर्तेत नष्ट झाला. त्यामुळे बरेच इतिहासकार भारताचा इतिहास किंवा भारतीय संस्कृती ही आधुनिक संस्कृती आहे, असा समज करून घेतात. भारतीयांनी तत्त्वज्ञान, नीतिशास्त्र, अर्थशास्त्र, राज्यशास्त्र इत्यादी अनेक विभागांत कार्य केले. परंतु इतिहासाबाबत संपूर्ण दुर्लक्ष केले. त्यामुळे फारच अशी थोडी प्राचीन इतिहासविषयक साधने उपलब्ध आहेत, की त्यांच्यावर विसंबूनच आपणास प्राचीन भारताचा इतिहास जाणून घ्यावा लागतो.

    प्रस्तुत पुस्तकात प्राचीन भारतीय इतिहासाची साधने, हडप्पा किंवा सिंधू संस्कृती, पूर्व वैदिक काळ, धर्मक्रांतीचे युग, मौर्य साम्राज्य व मौर्योत्तर काळ, गुप्त साम्राज्य, वर्धन घराणे, दक्षिण भारत या घटकांची अचूक माहिती देण्यात आली आहे.

    Prachin Bhartacha Itihas (BC 3000 to CE 1200)

    325.00
    Add to cart
  • प्राचीन भारताचा इतिहास (प्रारंभ ते इ.स.1318)

    मानवाच्या उत्क्रांतीचा इतिहास लाखो वषार्र्ंचा आहे. मानवाला प्रगती करण्यासाठी अनेक घडामोडींतून वाटचाल करावी लागली. इ.स.पू. सहावे शतक हे भारताच्या इतिहासात धार्मिक क्रांतीचे युग म्हणून ओळखले जाते. या पार्श्वभूमीवर अनेक नवीन पंथांचा उदय झाला. या अनेक संप्रदायांपैकी (पंथ) जैन व बौद्ध धर्म हे प्रमुख आहेत. भारतीय संस्कृतीचा विदेशात प्रसार करण्याचे श्रेय बौद्ध धर्माला जाते. बौद्ध धर्माचे अनुकरण करून कालांतराने जैन, हिंदू, शैव व वैष्णव पंथांनी कलेच्या क्षेत्रात भरीव प्रगती केली.

    इ.स.पू. सहाव्या शतकात भारताच्या सीमेवर परकीयांची आक्रमणे होण्यास सुरवात झाली. यानंतर ग्रीक, शक, कुशाण या सत्तांनी भारतावर आक्रमणे करून आपली स्वतंत्र राज्ये स्थापन केली. मौर्य, गुप्त, वाकाटक व सातवाहन सम्राटांनी परकीय आक्रमणांना यशस्वीरित्या थोपविण्याचा प्रयत्न केला. गुप्त काळाला प्राचीन भारताच्या इतिहासात ‘सुवर्णकाळ’ म्हणून ओळखले जाते. इ.स. 1318 साली यादवांचे राज्य सुलतानाच्या ताब्यात गेले. मराठी मुलखात नाथ, महानुभाव व वारकरी संप्रदायांचा प्रभावच महाराष्ट्रीय संस्कृतीच्या अभ्युदयाला व मराठी भाषेच्या उत्कर्षाला कारणीभूत ठरला.

    हर्षवर्धनाच्या मृत्यूपासून मुस्लिम विजयापर्यंतचा भारतीय इतिहास राजपुतांच्या प्रभावामुळे ‘राजपूत युग’ या नावाने ओळखला जातो. प्राचीन भारतातील शिक्षणपद्धतीची माहिती संहिता, उपनिषदे, धर्मशास्त्र, बौद्ध व जैन साहित्य व धर्मसूत्रावरून होते. काळाचा दीर्घ विस्तार, भावनांची समृद्धता, भाषेचे सौंदर्य व परिष्कृत कल्पनेच्या दृष्टीने प्राचीन भारतीय साहित्य अप्रतिम आहे. धर्म हाच प्राचीन भारतात कायद्याचा मुख्य आधार मानला जात होता. भारतात विविध जनपदांची सत्ता असल्याने परंपरागत कायदा सर्वत्र एकसारखाच न राहता विभिन्न प्रकारचा राहिला. प्राचीन भारतात विविध उद्योगधंद्याचा विकास झालेला होता.

    सदरील ग्रंथात राजकीय इतिहासाबरोबरच षङ्दर्शने, उषनिषदे, जैन व बौद्ध धर्म, स्त्रियांची परिस्थिती, कायदा व न्यायव्यवस्था, शिक्षण पद्धती, कला व स्थापत्य, शेती, व्यापार व वाणिज्य, सरंजामशाही, धार्मिक व सामाजिक परिस्थिती आणि साहित्य या विषयांचेही सविस्तर विवेचन केले आहे.

    प्रस्तुत ग्रंथ पदवी, पदव्युत्तर, नेट/सेट आणि स्पर्धात्मक परीक्षांसाठी अत्यंत उपयुक्त आहे.

    Prachin Bharatacha (Praranbh Te CE 1318)

    850.00
    Add to cart
  • प्राचीन भारताचा इतिहास (प्रारंभापासून ते इ.स. 1206)

    प्राचीन भारताचा इतिहास या ग्रंथाच्या आधारे महाविद्यालयीन शिक्षण घेणाऱ्या तसेच MPSC, UPSC व NET, SET सारख्या महत्वपूर्ण स्पर्धा परीक्षांचा सखोल अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी खूपच महत्वपूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे. भारतीय संस्कृतीच्या प्रारंभीपासून सर्व परीक्षांच्या दृष्टीने असणारे महत्वपूर्ण घटक अगदी मुद्देसूद पद्धतीने स्पष्टीकरण केले असून सोप्या शब्दात वर्णन केले आहे.
    या ग्रंथात प्राचीन इतिहासाच्या उपलब्ध साधनांनुसार सिंधु संस्कृती, वैदिक संस्कृती, जैनधर्म, बौद्ध धर्म यासोबतच पूर्वीची राजकीय जीवनपद्धती, महाजनपदे आणि प्राचीन काळातील सर्वच महत्वपूर्ण राजघराण्यांविषयीची माहिती दिली आहे. प्राचीन भारतावर बौद्ध धर्माचा पडलेला प्रभाव स्वतंत्र प्रकरणाच्या अनुषंगाने दिला आहे. याशिवाय प्राचीन भारताचे सुवर्णयुग (गुप्तकाळ) सविस्तरपणे वर्णन केले आहे. तसेच भारतीय संस्कृतीची प्रारंभीची शैक्षणिक वाटचाल विविध विद्यापीठांची माहिती देऊन स्पष्ट केली आहे. प्राचीन स्त्रीजीवन, समाज, राज्य, अर्थ, संस्कृती व न्यायव्यवस्था याविषयीही योग्य ती माहिती सदर ग्रंथात दिली आहे.

    Prachin Bharatacha Itihas (Praranbhapasun Te CE 1206)

    225.00
    Add to cart