समिक्षा आणि अभिप्रायांमधून प्राप्त झालेले सार :
एक सांभाळून ठेवण्याजोगे पुस्तक…
– मैरी जे. के. स्टालवर्ट
एका गंभीर असूनही रोचक अशा विषयावर असलेले पुस्तक खरोखरीच डॉ. सहर एक प्रतिभावान व्यक्ती आहेत. एक ‘संपूर्ण मनुष्य’ ज्यांच्यासाठी मानवी अध्यात्मिक विषयामधला कोणताही पैलू अनोळखी नाही.
– प्रो. जुजुकी ओकासा
हे पुस्तक वाचणाऱ्या कोणाही व्यक्तीला हे जाणवल्यावाचून राहणार नाही की तो एका भविष्यवेत्या प्रतिभावंताच्या सान्निध्यात आहे. जो एकाचवेळी विश्वात आणि प्रबुद्ध असा लेखकही आहे.
– अर्ल पी. के. रुधरफोर्स
सरतेशेवटी आपल्याजवळ आता एका अश्या लेखकाचं पुस्तक आहे की ज्याने ह्या पुस्तकांत लिहिलेल्या प्रत्येक अध्यात्मिक अवस्थेचा स्वतः अनुभव घेतलेला आहे.
– योगी राज कृष्णा, हिमालय वन विश्वविद्यालय
लेखकाने तिबेटीयन गुढ योगामधील सर्वात गहन अश्या रहस्यांची दिक्षा घेतलेली आहे. सहर हे आपल्या ह्या आजच्या युगातले ‘मिलारेपा’ (तिबेटातील सर्वात प्रसिद्ध असे योगी) आहेत.
– लामा टिलकू
सध्या हयात असणाऱ्या कोणत्याही विद्वानापेक्षा सदर योग आणि बौद्ध धर्माचे अधिक चांगले जाणकार आहेत.
– प्रो. डॉ. तारापोरे
हे पुस्तक (सहर ह्यांचे) बऱ्याच जणांमध्ये आत्मज्ञान जागवेल.
– स्वामी रामचंद्र
सहर जी विज्ञानातील सर्वात आधुनिक शोधांचा उपयोग प्राचीन ज्ञानाच्या पुष्ठ्यर्थ करतात. त्यांच्यासाठी दोन्ही प्रकारचे ज्ञान सहजसाध्य आहे.
– गुरु सत्यानंद
मानवी जीवनाच्या भविष्यकालीन प्रगतीसाठी सदर ह्यांनी केलेल्या ह्या कार्याची आलोचक सुद्धा प्रशंसा करतात.
– प्रिंसिपल जॅक्सन
वाचक जसजसा हे पुस्तक वाचत जातो, हे पुस्तक त्याच्यावर आपला प्रभाव टाकत जातं. हे महान पुस्तक कालातीत आहे आणि मुमुक्ष्ंना (जे सत्याचा शोध घेतात) ह्या पुस्तकाची नक्कीच शिफारस करता येईल.
– डीन इंगेरसोल
Ashtang-Yog