आज आपण 21 व्या शतकात वावरत आहोत. 20 व्या शतकाच्या मध्यात जगातील सर्व देशांमध्ये बँकींगचा विकास व विस्तार करण्यासाठी त्या-त्या देशाच्या सरकारने सर्वतोपरी प्रयत्न केलेत. बँकिंगच्या सर्वांगीण विकासामुळे बँकिंग क्षेत्राला कार्पोरेट क्षेत्राचा दर्जा मिळाला. दररोजच्या आर्थिक व्यवहारांपैकी जवळपास 60% व्यवहार हे बँकांच्या माध्यमातून होतात असा संशोधकांनी निष्कर्ष काढला आहे. इतके आज आपण बँकिंग क्षेत्राशी निगडीत झालेले आहोत. बँकिंग क्षेत्रात अवलंबिण्यात येत असलेले नवीन प्रवाह, बँकिंग क्षेत्रातील अलीकडील सुधारणा ह्यामुळे तर बँकिंग क्षेत्र बँकेच्या ग्राहकांचा एक अविभाज्य असा घटक बनलेला आहे. आज व्यापार- व्यवसाय, औद्योगिक क्षेत्र, कृषीक्षेत्र, सार्वजनिक क्षेत्र अशी विविध क्षेत्र बँकांनी व्यापली असून ह्या क्षेत्रात बँका महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. विषय अधिक आकलन होण्याच्या दृष्टीने पुस्तकात आवश्यक त्या ठिकाणी नवीन संज्ञा, नवीन संकल्पना, विविध आकृत्या, विविध नमुने (खारसशी) तसेच मराठी शब्दांना पर्यायी इंग्रजी शब्द देण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे. त्यामुळे हा विषय समजण्यास सुलभ होईल अशी खात्री आहे.
या पुस्तकात ए.टी.एम., टेली बँकिंग, ई.एफ.टी., ई.सी.एस., डेबीट कार्ड, इंटरनेट बँकिंग, मोबाईल बँकिंग, ई-पर्चेस, ई-मनी, कोअर बँकिंग, सी टी एस ई एफ टी ओ एस अशा बँकिंग क्षेत्रातील अलीकडील सुधारणा व तंत्रज्ञान या सारख्या बँकिंगमधील आधुनिक प्रवृत्ती अभ्यासण्यात आल्यामुळे हे पुस्तक बँकिंग संबंधात अत्याधुनिक झाले आहे.
Banking Tattv Ani Vyavhar