• Stress and Burnout in Sports

    Cricket is the game which requires a very high level of co-ordination of individual as well as group for physical and psychological preparation. The Cricket is one of the competitive sports which lay more burnout as well as stress on the individual as compared to sports activity done in the general sense. This book is an attempt to the study of the burnout and stressful situations occurred in the cricket. This book is divided into five chapters. Every chapter has its own importance and rational.

    100.00
    Add to cart
  • Textbook of YOGA

    275.00
    Add to cart
  • आत्मविश्वास

    जीवनानंदाचे सुख-समाधान प्राप्त करणे हे व्यक्ती-व्यक्तीचे कर्तव्य आहे. भीतीग्रस्त आयुष्य, सुख-समाधान, आनंद उपभोगू शकत नाही. जीवनात भीतीचा प्रवेश निरनिराळ्या मार्गांनी, घटनांनी होत असतो. त्यातही संशयाचे भूत फक्त भीतीच निर्माण करीत नाही तर पदोपदी आपल्या शक्तीस, मनोधैर्यास, आत्मबलास नष्ट करीत असते. त्याच संशयाच्या भीतीमधून पापकृत्य, क्रोध-राग किंवा अनैसर्गिक, अवांछित कार्य होत असते. मनाचा संकुचितपणा, मनातील भीती, मनातील साशंकता, मनावरील ताण, मनातील चिंता-काळजी, मनाची निराशा तुमच्या आत्मविश्वासाला धक्का पोहचवितात. आत्मविश्वास वाढवायचा असेल तर मनावर नियंत्रण असणे अत्यावश्यक आहे, मनात भीतीचा लवलेशही निर्माण होवू देता कामा नये, मनावर कोणत्याही प्रकारे ताण-तणाव ठेवता कामा नये. जीवनातील यशस्वी वाटचालीसाठी सकारात्मक दृष्टीकोनाबरोबर आत्मविश्वास महत्त्वाचा असतो. मनोधैर्य किंवा आत्मबल व्यक्तीला सर्वोच्च शिखरापर्यंत पोहचविते. उच्च मनोधैर्याच्या मानसिकतेतूनच भारतमातेची सुरक्षा अबाधित आहे. कुटुंबाच्या, समाजाच्या, गावाच्या, देशाच्या कल्याणासाठी आपणही आपला आत्मविश्वास वाढवावा त्यासाठीच्या प्रक्रियेसाठीच हा लेखनप्रपंच!

    Aatmavishwas

    110.00
    Add to cart
  • गर्भसंस्कार

    मातृत्व या विश्वातील महान सृजनता आणि संस्कार आहे. ‌‘आई-अपत्याचे’ प्रेम प्रत्यक्ष परमेश्वरालाही गवसलेले नाही. गर्भसंस्काराचा आणि भारतीयांचा अनन्यसंबंध आहे. प्राचीन भारतीयांची जगाला मिळालेली ती एक देणगी आहे. गर्भसंस्काराची आवश्यकता जशी जननी आणि जन्मभूमीसाठी आहे तशीच ती कुटुंब सौख्यासाठी आणि कल्याणासाठी आहे. पती-पत्नी या उभयतांनी भावी जीवनाची फक्त काळजी चिंता करण्यात वेळ दवडू नये तर त्यांनी गर्भावस्थेचा परिपूर्ण आनंद उपभोगावा; निरोगी स्वस्थ बालक जन्माला यावेत, तसेच त्यांच्या पोषणाच्या योग्य ती काळजी घेण्यात यावी यासाठी हे संस्कार अत्यावश्यक आहेत. प्रसुतीपूर्वीची निगराणी जेवढी आवश्यक आहे तेवढी प्रसुतीनंतरही व्यवस्थापन अत्यावश्यक आहे. प्राचीन भारतीयांनी शुद्ध बीजासाठी अन बुद्धीमान व आरोग्यसंपन्न प्रसुतीसाठी संस्काराचा मार्ग अवलंबला. संस्कारक्षम उत्तम, कुशाग्र बुद्धीमत्तेची, सशक्त, सर्वगुणसंपन्न पिढी निर्माण करायची असेल तर संस्कार जपलेच पाहिजे. संस्काराची सुरुवात गर्भसंस्कारापासूनच होते. तांत्रिक-वैज्ञानिक, स्पर्धात्मक या बुद्धीमान युगात सक्षम आणि संस्कार संपन्न होण्याचा मूलभूत पाया मुलांच्या जन्माच्या आधीपासून घालणे महत्त्वाचे आहे. त्याचसाठी उत्तम स्वास्थ्य, स्वभाव आणि कुशाग्र बुद्धीमत्तेच्या संततीसाठी गर्भाधान व गर्भसंस्काराची आवश्यकता आहे.

    Garbhasanskar

    195.00
    Add to cart
  • निरामय चैतन्य

    निरामय आनंदी जीवनाचे रहस्य जाणून घेऊन समाधानी, सुखी जीवन जगण्यातच बुद्धीकौशल्य आहे. आयुष्याच्या सर्वच वाटा सरळ नाहीत. त्या मार्गावर अनेक वळणेही आहेत. वळणावर योग्यरित्या वळणे, प्रसंगावधान राखण्यातच शहाणपणा आहे. मानवी शरीरशास्त्रातील सर्वच ज्ञान मानवाला गवसले आहे, हे म्हणणे अतिशयोक्तीच होईल. परमेश्वराने सुप्त सामर्थ्याने पुनरुत्पादनाची प्रक्रिया सुरु ठेवलेली आहे. मानवी जीवनात जन्मास आलेले बाळ, त्याचे शारिरीक अवयव आणि सुरक्षा परंपरेने विकसीत होत आलेले आहेत. पूर्वी बाळाच्या जन्माच्यावेळी कापलेली नाळ निरुपयोगी समजून फेकून दिली जात असे. पण त्या नाळेत बाळाचे आणि त्यांच्या कुटूंबियांचे सुरक्षाकवच दडलेले आहे, याची जाण अलीकडेच झालेली आहे. बाळाच्या नाळेत सुमारे 300 विकाररोग दूर करण्याची क्षमता आहे; म्हणूनच तिची साठवण महत्वाची आहे. शरीरातील सर्व नियंत्रक नाड्या नाभीरत केंद्रीत आहेत आणि त्या नाभीचे महत्व जाणून त्याप्रमाणे आचरण करणे म्हणजेच निरामय आनंदी जीवनाचे फलीत आहे.

    Niramay Chaitanya

    150.00
    Add to cart
  • निरोगी स्वास्थ्य

    निर्मळ आनंदी-समाधानी जीवनासाठी स्वत:चे आरोग्य शारीरिक, मानसिक दृष्ट्या उत्तम, सक्षम असणे अत्यावश्यक आहे. शारीरिक संतुलनासाठी, प्रत्येक आनंदी क्षणासाठी अन्नाचे व्यवस्थापन अत्यावश्यक आहे. आहार, विहार-निद्रा यांचा योग्य समन्वय साधला गेला तर विकाराचा आकारच नष्ट होतो. ‌‘अन्न हे पूर्ण ब्रम्ह’ आहे. शरीराचे पोट आणि मेंदू ही दोन्ही ‌‘ऊर्जा निर्मिती केंद्रे’ आहेत. त्यांचे सुस्थितीतील कार्य व गती आपल्या सात्त्विक आहाराशीच संबंधित आहे. शरीराला ‌‘चैतन्य ऊर्जा’ अन्नातूनच प्राप्त होते. त्याच ऊर्जेतून वासना निर्मिती आणि मेंदू कार्य सुरू होते. शरीर ही एक नैसर्गिक रसायनशाळाच आहे. मानसिक ताण-तणावामुळे रसायनीच संतुलन बिघडते. आहाराचाच सौंदर्याशी घनिष्ठ संबंध आहे. ‌‘तूप खाल्ल्यानेच रूप येतं’ हा अनुभव जोपासा. चेहराच आपल्या मनाचा आरसा असल्याने बाह्य सौंदर्याबरोबर मनाचे सौंदर्य कायम करणे गरजेचे आहे.
    रोग, त्याची लक्षणे आणि त्यावरील औषधे ही माहिती देताना चौधरी दांपत्याचे व डॉ. हर्षल यांनी खूप मेहनत घेतलेली दिसते. त्यांचा या विकारासंबंधीचा अभ्यास सखोल असून तो समाजोपयोगी ठरणार आहे. आयुर्वेद आणि ॲलोपॅथी या दोहोंचा सुंदर समन्वय ‌‘निरोगी स्वास्थ्यात’ झालेला आहे.

    375.00
    Add to cart
  • निसर्गोपचार : निरामय, निरोगी जीवनाचा लाभ करून देणारी जीवनपध्दती

    निसर्गोपचार ही एक उपचार पध्दती आहे. आपल्याला नेहमी माहिती असलेल्या औषधोपचार पध्दती म्हणजे आयुर्वेद, अ‍ॅलोपॅथी/इलेक्ट्रोपॅथी, होमिओपॅथी ह्या होत. याशिवाय अ‍ॅक्युप्रेशर चिकित्सा व अ‍ॅक्युपंक्चर, चुंबक चिकित्सा, योगोपचार आणि निसर्गोपचार या नवीन उपचार पध्दती आहेत. सध्या अलिकडच्या प्रदुषित वातावरणात, रोगट परिस्थितीत निसर्गोपचार चिकित्सा सर्वांना माहिती होणे ही काळाची गरज आहे.
    मानवी शरीर आणि मानवी मन यावर ताबा मिळविता येतो, नियंत्रण ठेवता येते. नैसर्गिक आणि सात्विक आहारामुळे शरीरामध्ये बदल घडवून आणता येतात; तर प्राणायाम, ध्यानसाधना, योगासने, दिर्घश्वसन याद्वारे मन बदलविता येते. म्हणजेच निसर्गोपचारामध्ये शरीरावर व मनावर नियंत्रण घालून रोग विकारापासून स्वत:चे संरक्षण करता येते. सध्याच्या युगात निसर्गोपचार पध्दतीमध्ये आहार चिकित्सा, उपवास चिकित्सा, अ‍ॅक्युप्रेशर/अ‍ॅक्युपंक्चर, योगोपचार, वनौषधी, पुष्पौषधी इत्यादी चिकित्सांचा समावेश केला जातो. याचाच अर्थ असा की, पर्यावरणात, निसर्गसृष्टीत जे काही चांगले आहे त्या सर्वांचा समन्वय यामध्ये करण्यात आलेला आहे. त्यामुळेच निसर्गोपचार पध्दती ही अत्यंत गुणकारी, चमत्कारी, क्रांतीकारी उपचार पध्दती तयार झालेली आहे. ही पध्दती मानवी जीवनाच्या कल्याणासाठी एक दैवी शक्ती आहे.

    Nisargapachar : Niramay, Nirogi Jeevanacha Labha Karun Denari Jeevanpaddhati

    225.00
    Add to cart
  • भारतीय लैंगिक शिक्षण

    21व्या शतकात लैंगिक शिक्षण मानवी जीवनासाठी अत्यावश्यक स्वरुपाचे शिक्षण आहे. समाजात असलेल्या अनेक गंभीर प्रश्नांपैकी एक असा हा प्रश्न असून समाजातील सामाजिक नियंत्रणे संयमपूर्वक, स्वास्थपूर्वक सर्वांकडून पाळली जावी यासाठीही लैंगिक शिक्षणाची देणे ही काळाची गरज आहे. सद्य:स्थितीत गतिमान आणि बदलती जीवनपद्धती यामुळे आईवडील आणि मुलांमधील संवाद कमी झाला आहे. शारीरिक बदलांची इत्थंभूत माहिती मुलामुलींना मिळाली नाही, तर त्यांच्यात न्यूनगंड निर्माण होतो. सामाजिक जीवनापासून दूर जाऊन त्यांच्यात एकलकोंडेपणा वाढतो. वाढत्या वयानुसार मुलामुलींमध्ये होणार्‍या शारीरीक बदलांची माहिती त्यांना आवश्यक तेव्हा आणि वेळेत मिळाल्यास त्यांच्यात गैरसमज निर्माण होणार नाहीत. त्यांच्यात आरोग्याची काळजी घेण्याची सवय निर्माण होऊन शारीरिक स्वास्थ्याबरोबर त्यांचे मानसिक व भावनिक स्वास्थ टिकून राहील. परिणामी सुदृढ समाजाची निर्मिती होईल.
    मुलामुलींना लैंगिक शिक्षणाची जबाबदारी ही सर्वांची असून त्यात आई-वडील किंवा पालक, शिक्षक तसेच समाजसेवी संस्था व सरकार यांचा देखील समावेश होतो. वैज्ञानिक आणि तांत्रिक युगामध्ये परंपरावादी, जुन्या बुरसटलेल्या विचारांना थारा देणे योग्य नाही. अल्पायुषी असलेल्या मानवी जीवनात आरोग्य स्वास्थासाठी योग्य वेळेस योग्य शिक्षण देणे आवश्यक आहे.

    Bharatiya Langik Shikshan

    195.00
    Add to cart
  • महाराष्ट्रातील औषधी वनस्पती संग्रह

    एकविसावे शतक हे जैवविविधतेचे शतक म्हणून संयुक्त राष्ट्रसंघाने जाहीर केले आहे. महाराष्ट्र राज्य वैविध्यपूर्ण वनसंपदेसाठी प्रसिध्द आहे. परंतु सर्वच वनस्पतींना औषधी मान्यता अभ्यासाशिवाय नसते. त्यात काही विशिष्ट वनस्पतींना अधिकची मान्यता प्राप्त असते. औषधी वनस्पतींची माहिती मराठी भाषेत देताना आजही वैज्ञानिक भाषा वापराच्या मर्यादा अनुभवास येतात.
    प्रस्तुत ग्रंथात जवळपास 384 औषधी वनस्पतींची माहिती देण्यात आलेली असून वनस्पतींचे शास्त्रीय किंवा लॅटिन नाव, कूळ, शास्त्रीय वर्णन, उपयुक्त भाग, उपयोगिता, रसायने, भौगोलिक प्रसार इ. बाबींवर अभ्यासपूर्ण लेखन केले आहे.संस्कृत, हिंदी, इंग्रजी भाषेतील त्यांची नावे इतर भाषिकांना उमज होण्याच्या दृष्टीने दिली आहेत. औषधीय रसायनांचा उल्लेख इंग्रजीत शास्त्रीय भाषेतच संभ्रम टाळण्याच्या हेतूने दिला आहे. सरतेशेवटी परिशिष्ट-1 मध्ये विविध रोग आणि त्यावरील औषधे, तसेच परिशिष्ट-2 मध्ये औषधी गुणांनुसार औषधी वनस्पतींची सूची दिली आहे. शास्त्रीय व इतर भाषेतील नावे वर्गमालेनुसार दिली आहेत.
    सामान्य जनास सदरील ग्रंथ उपयुक्त ठरावा हा जरी या ग्रंथाचा प्रमुख हेतू असला तरी विद्यार्थी, शिक्षक व संशोधक यांनाही त्याचा उपयोग होईलच. पारंपारिक शिक्षणाबरोबर आयुर्वेद, शिक्षण, कृषी, उद्योग व वनविभाग यांनाही हा ग्रंथ संग्रही ठेवता येईल.

    Maharashtratil Aushadhi Vanspati Sangrah

    595.00
    Add to cart
  • योग शिक्षण

    योग हा विषय कल्पवृक्षाप्रमाणे आहे. इच्छित फळ हा कल्पवृक्ष देतो. आज सामाजिक व आर्थिक परिस्थितीत गोंधळलेल्या माणसांना नैतिक ध्यैर्य, कष्ट सोसण्याची ताकद व स्वास्थ, शांती, संतुलनासाठी योगाभ्यासाशिवाय पर्याय नाही.

    त्यासाठी योगविद्येचा प्रचार व प्रसार शाळा व महाविद्यालयातून होणे आवश्यक आहे. विद्यार्थी वर्ग प्रेरित होण्यासाठी योगविद्येकडे आकर्षित होण्यासाठी योगशिक्षण प्रथम शिक्षकांनी घेऊन योगशिक्षक बनले पाहिजे. तरच विद्यार्थी मनःपूर्वक ते शिकतील कारण ‘As is the teacher, so is the student’ म्हणून ‘अष्टांगयोगाच्या’ माध्यमातून, नियमित अभ्यासातून, प्रशिक्षणार्थ्यांचे व्यक्तिमत्त्व सुसंघटीत व्हावे हा एकमेव उद्देश डोळ्यासमोर ठेवून प्रस्तुत पुस्तक लेखन करण्यात आले आहे.

    प्रस्तुत पुस्तकात एकूण चार प्रकरणे असून त्यात योगाभ्यासाचे सविस्तर वर्णन, योगाविषयी सैध्दांतिक व प्रात्यक्षिक स्वरूपाचे विवेचन आहे.

    Yog Shikshan

    150.00
    Add to cart
  • वास्तु विज्ञान

    पंचमहाभूतावर आधारित असलेल्या वास्तुशास्त्रात ब्रम्हकन्या ‘सरस्वती’ आणि सुपूत्र ‘विश्वकर्माचा’ सहभाग आहे. वास्तुशास्त्र सर्व समावेशक शास्त्र असून त्याच्या निर्मितीसाठी भौतिक नियमाबरोबरच आपल्या सभोवतालचा सूक्ष्म अध्यात्मिक शक्तीची जाण असणे आवश्यक असते.
    भारतीय धर्मग्रंथामध्ये, वेद-उपनिषादमध्ये आणि पौराणिक सूक्तामध्ये वास्तूबद्दल उल्लेख आहे. कौटुंबिक जीवन जगताना नैसर्गिक सुख तसेच अधिकाधिक विश्रांतीच्या छायेसाठी संतुलीत घराची आवश्यकता असते.
    बांधकाम साहित्याच्या भौतिक गुणाबरोबरच त्यांच्याशी संबंधित सर्व ऊर्जास्रोतांचाही विचार वास्तुशास्त्रात केला जातो. जीवनात सर्वोत्कृष्ट मार्गाचा अवलंब केला तर आपल्याला इच्छित स्थळी लवकरात लवकर सहज व सुरक्षित रित्या पोहचता येते. वास्तुशास्त्रात प्रतिकात्मकरित्या सूत्रांच्या रूपात विना अडथळ्यांचा मार्ग सूचविलेला असतो. सदरील ग्रंथात वास्तुशास्त्र, वास्तुकला इतिहास, वास्तुआकार, वास्तुनियोजन/नकाशा, वास्तु घटक, वास्तुनिर्मिती, प्रवेशद्वार, गृहप्रवेश, वास्तुदोष निवारण, वास्तु या सर्व घटकांचा परामर्श घेण्यात आलेला आहे.

    Vastu Science

    150.00
    Add to cart
  • वृद्धांसाठी पुष्पौषधी

    खेमराज हरी खडके यांचा योगसाधनेचा प्रदीर्घ अभ्यास आहे. योगविद्या धाम नाशिक या संस्थेतुन योगशिक्षक ही पदवी घेतल्यानंतर योग प्रबोध, योगप्रविण व योगपंडित अशा एक एक वरचढ पदव्या संपादन केल्या. त्याचवेळी त्यांनी निसर्गोपचाराचाही अभ्यासक्रम पूर्ण केला व ते तेव्हापासून योगोपचार व निसर्गोपचाराचे उपचार रूग्णांवर करीत आहेत. ते पूर्णवेळ निसर्गोपचाराचे डॉक्टर व योगशिक्षक आहेत.
    अध्यात्मातही त्यांची विशेष रूचि असून श्री पंतमहाराज बाळेकुंद्री यांचे ते निष्ठावान भक्त आहेत. श्रीपंतांच्या वाङ्मयावरही त्यांनी बरेच लिखाण केलेले आहे. श्री पंत गुरुचरित्र पोथीचा मराठी अनुवादही त्यांनी केलेला आहे.

    Vruddhansathi Pushpaushadhi

    50.00
    Read more
  • वैकासिक मानसशास्त्र

    Vaikasik Manasshastra

    165.00
    Add to cart
  • व्यक्तिमत्व विकास आणि सॉफ्ट स्किल्स

    व्यक्तिमत्त्व रचना व व्यक्तिमत्त्व विकास यांचा विचार पाश्चात्य आणि पौर्वात्य तत्ववेत्ते आणि संशोधकांनी प्राचीन काळापासून केला आहे. व्यक्तीला व्यक्तित्व असते तसेच व्यक्तिमत्त्वदेखील असते. निसर्गातील सर्वच प्राणीमात्रांना व्यक्तीत्व असते. निसर्गाकडून प्राप्त झालेली ही देणगी स्वकर्तृत्वाने दैदिप्यमान होवू शकते. जीवनामध्ये यशस्वी होण्यासाठी अनेक कौशल्यांची आवश्यकता असते. आजच्या गतिमान, स्पर्धात्मक अशा एकविसाव्या शतकात व्यवस्थापन कसे करावे हे माहित असणे अत्यंत आवश्यक आहे. यशस्वी लोक उपलब्ध वेळेचे व्यवस्थापन कौशल्य वापरून करतात. मानवी जीवनात बालपण, तरुणपण आणि उतारपण या अवस्थांमध्ये त्या त्या परिस्थितीनुसार ध्येय बदलत असतात. तात्पुरत्या यशाने हुरळून जावू नये आणि अपयश आले म्हणून मागेही हटू नये. आपण स्वतःविषयी काय विचार करतो यावर आपल्या आयुष्याची गुणवत्ता काय असेल हे बहुतांशी निर्धारित होत असते. सर्वात म्हणजे पैसे देऊन आपण स्वतःचा वेळ विकत घेऊ शकत नाही आणि एकदा निघून गेलेली वेळ कधीच परत येत नाही.

    Vyaktimatva Vikas Ani Soft Skills

    175.00
    Add to cart
  • शारीरिक शिक्षणात मानसशास्त्राचे मार्गदर्शन व मूल्यमापन

    खगोल, भौतिक, रसायन या शास्त्रांप्रमाणेच मानसशास्त्र हे एक शास्त्र आहे. परंतु ते इतर शास्त्रांपेक्षा निराळे आहे. मानसशास्त्र हे मनुष्याशी निगडित आहे. इतर शास्त्रांच्या मानाने, हे शास्त्र नुकतेच म्हणजे 1000-2000 वर्षांपूर्वी अस्तित्वात आले. पण आज असे कोणतेही शास्त्र नाही की ज्याचा संबंध मानसशास्त्राशी नाही. सर्व क्षेत्रांत या शास्त्राची व्याप्ती झाल्याची आढळते. क्रीडा मानसशास्त्र ही क्रीडा तंत्रज्ञानास उपयुक्त ठरणारी मानसशास्त्राची एक उपयोजित शाखा आहे. क्रीडा मानसशास्त्राच्या दृष्टीने मुक्त खेळ व हालचालींमधून व्यक्ती आपल्या शक्तीबरोबर भावभावनांचा आविष्कार करते. शारीरिक शिक्षण व खेळ हे मानसशास्त्राच्या केवळ मानवी आचरणाशीच संबंधित नाही, तर मानसशास्त्रात बालक, प्रौढ, वृद्ध, स्त्रिया, पुरूष अशा समाजातील सर्व घटकांच्या वागणुकीशी संबंध येतो. शारीरिक शिक्षणाच्या स्थितीत फार मोठे परिवर्तन घडून आलेले आहे. अनेक प्रकारच्या स्पर्धांमुळे त्यांचे महत्त्व वाढतच आहे. महत्त्वाबरोबर त्यांच्या समस्याही वाढत आहेत. खेळाडूंचे प्रशिक्षणानंतर होणार्‍या जय-पराजयांनाही कसे पचवावे व यासाठी मनाची वृत्ती कशी असावी म्हणजेच यश आल्यामुळेच अगदीच हुरळून जाऊ नये व अगदी अपयश आले तरी नाराज होऊन खेळाविषयी नकारात्मक विचार निर्माण होऊ नये असा विश्वास क्रीडामानसशास्त्र देते. आधुनिक क्रीडा तंत्रज्ञानाच्या विकासासाठी क्रीडामानसशास्त्र ही अत्यंत उपयुक्त अशी मानसशास्त्राची शाखा आहे. त्यामुळे क्रीडामानसशास्त्र हे अलीकडे स्वतंत्र असे महत्त्वाचे शास्त्र बनू पहात आहे.

    Sharirik Shastrat Manasshastrache Margdarshan v Mulymapan

    195.00
    Add to cart
  • शिवांबु पिवळे रक्त

    रोग अनेक उपचार एक – शिवांबु

    प्राचीन काळापासून आपले ऋषिमुनी, हठयोगी, तपस्वी नित्य शिवांबु प्राशन करून निरोगी शरीराची जोपासना करीत आहे, पण त्यांनी हे गुप्तपणे केले. भारतीय ग्रंथावलीत शिवांबु विषयी माहिती दिलेली आहे. शास्त्रीय अभ्यासातून, विश्लेषणातून हे सिद्ध झाले आहे की, शिवांबु वृद्धावस्था आणि रोगांचा नाश करणारे दिव्य अमृत आहे.
    आपल्या देहात जर काही बिघाड झाला तर तो दुरूस्त करण्याचे औषध आपल्याच देहात किंबहुना प्रत्येक प्राणी मात्राच्या देहात निसर्गातः निर्माण केलेले आहे. पण अज्ञानामुळे आपण त्याच्या लाभापासून वंचित आहोत. ज्याच्या प्राशनाने शरीरात रोग निर्मितीच होणार नाही ते शिवांबु मानवासाठी वरदानच आहे. विशेष महत्वाची गोष्ट म्हणजे शिवांबु उपचारासाठी एक पैसा ही लागत नाही. स्वमुत्र हा रक्ताचाच एक भाग आहे. जे घटक मानवी रक्तात असतात तेच घटक शिवांबुमध्ये असतात कारण मानवी शरीरातुन अतिरिक्त बाहेर टाकलेले रक्त म्हणजेच शिवांबु होय! वैज्ञानिकांच्या मते, शिवांबुमध्ये बायो तत्व आढळतात जे आरोग्यदायक असतात. आणि शरीर निरोगी बनवतात. अनियमित आहार, अपथ्य हेच कुठल्याही रोगाचे मुळ कारण असते. यामुळे पचनशक्ती मंदावते व मलविसर्जन पुर्णपणे न होऊन मलसंचय होतो. स्वमुत्राने यावर परिणाम होऊन पाचनशक्ती वाढते व मलविसर्जन नियमित होते. त्यामुळे रोग निर्मितीला आळा बसतो.
    डायबिटीस, हृदयरोग, संधीवात, अल्सर, अपचन, दमा, फुफ्फुसाचे विकार, त्वचा रोग, दंतरोग, मुखरोग, वातरोग, वातरोग, हाडांचे आजार, जुनाट सर्दी-पडसे, किडनी, यकृताचे आजार, मेंदूरोग, टि.बी., मुळव्याध, मिर्गी, नेत्ररोग घशाचे आजार मलेरीया, टायफाईड, चिकन गुनिया, अस्थिरोग, गुडघेदुखी, डोकेदुखी, अर्धशिशी, रक्तदाब, या व अशा अनेक व्याधींवर शिवांबु उपचाराने मात करता येते.

    Shivambu Pivale Ratka

    110.00
    Add to cart
  • सकारात्मक मानसशास्त्र

    सकारात्मक दृष्टीकोनाचा आपल्या एकंदरीत जीवनावर फार चांगला प्रभाव पडत असतो. त्यामुळे आपले मानसिक व शारीरिक आरोग्य स्वस्थ ठेवले जाते. सकारात्मक भावनांमुळे मनुष्याच्या सुस्थितीत सतत वाढ होत असते. आपल्या आनंदी राहण्यामागे आपला आयुष्याकडे बघण्याच्या वृत्तीचा महत्त्वाचा सहभाग असतो. सकारात्मक मानसशास्त्र मनुष्याच्या चांगल्या व सशक्त बाजूंवर लक्ष केंद्रित करते. सकारात्मक मानसशास्त्रज्ञांनी बर्‍याच व्यक्तिभेदाचा अभ्यास आणि अध्ययन केले आहेत. त्यामुळे व्यक्ती आरोग्यदायी व आनंदी राहते, याबद्दल त्यांनी विश्लेषण केले. आनंदी असण्यामागे सकारात्मक परिणामाचा फार मोठा हातभार असतो. सकारात्मक दृष्टीकोन असेल तर आनंदी राहाल. आनंदी व्यक्तीच्या जीवनामधील कारण हे फक्त सकारात्मक परिणाम होय. आनंदीवृत्ती आणि सकारात्मक परिणाम ह्या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. सकारात्मक परिणामाचा संबंध हा व्यक्तीची आय, शिक्षण वय, लिंग यावर आधारित नाही परंतू सकारात्मक परिणाम हे घनिष्ठ आणि समाधानी नातेसंबंध राखण्यास मदत करतात. सदरील पुस्तकात सकारात्मक मानसशास्त्राचा शास्त्रीय उहापोह करण्यात आलेला आहे.

    Sakaratmak Manasshastra

    125.00
    Add to cart
  • सौंदर्योपचार

    ‘सुंदरता’ ही मानवी मनाची, भावनेची आणि त्याच्या संवेदनशीलतेची प्रतिक्रिया असते. शरीराच्या निरोगी अवस्थेत मनाची आनंददायीवृत्ती दडलेली असते. मन चांगलं तर शरीरही चांगलं असं मानले जाते. इंद्रियांच्या संवेदनशीलतेतून सत्य-शिव आणि सुंदराची अनुभूती ही मानवी भावनेची अनुभूतीनिष्ठता असते. म्हणून सुंदरतेची व्याख्या ही मानसिक, भावनिक आणि त्यानंतरच्या सर्जनशीलवृत्तीच्या स्थितीवर अवलंबून असते. रंग, रूप, गंध, नाद-स्पर्शात्मक भावनांच्या आनंदनिधान वृत्तीचा प्रभाव हा सुंदरतेच्या आकलनाचा एक अविभाज्य भाग असतो. त्यातूनच आरोग्यशास्त्र, सौंदर्यशास्त्र, रसशास्त्र आणि आयुर्वेदादि पॅथींचा संदर्भ निर्माण होतो. “शरीरं आद्यं खलु धर्म साधनम्” असं म्हटलं जाते.

    सौंदर्य आणि प्रसाधने, सौंदर्य आणि उपचार, सौंदर्य आणि व्यक्तिमत्व, सौंदर्य आणि जीवनानंद इत्यादी बाबतचे हे संग्रहित-एकत्रित विचारांचे मार्गदर्शन लेखक मोठ्या कौशल्याने प्रस्तुत ग्रंथात करतात. ‘एकनूर आदमी तो दसनूर कपडा’ अशी एक म्हण आहे. तसेच माणसाचा ‘नूर’ बदलवून टाकणारे सौंदर्य-प्रसाधन व उपचार पद्धतीचे हे प्रशिक्षण व प्रबोधन करणारे पुस्तक वाचकांना निश्चितच आवडेल असे झाले आहे. आज ‘ब्युटीपार्लर’ आणि ‘ब्युटीशिअन’ हा मानवी जीवनाच्या सुंदरतेच्या प्रवासातला अविभाज्य भाग झाला आहे. ती भावनिक, मानसिक भूक आहे. म्हणून जाणीव जागृती करणारे ‘सौंदर्यापचार’ हे पुस्तक नव्या पिढीस वरदान ठरेल अशी आशा वाटते. बालकवींनी आपल्या एका निसर्ग कवितेत म्हटले आहे “सुंदरतेच्या सुमनावरचे दंव चुंबुनी घ्यावे.” या ओळीचा ऐहिक, लौकिक, आध्यात्मिक तसेच सौंदर्यशास्त्रीय विचार ‘सौंदर्योपचार’ ग्रंथातून वेगळ्या अर्थाने प्रतीत होतो.

    Soundaryshastra

    250.00
    Add to cart
  • स्त्री मानसशास्त्र

    वैदिक काळात स्त्रीला कुटुंबात व समाजात उच्च स्थान होते. नंतरच्या काळात मात्र स्त्रीला दुय्यम स्थान प्राप्त झाले. विविध समाजसुधारकांनी प्रयत्नांची पराकाष्ठा केल्याने स्त्री शिक्षणाचे महत्त्व समाजाला पटले. आज स्त्रिया शिक्षण घेऊन विविध क्षेत्रात झेप घेत आहेत. हे जरी सत्य असले तरी आजही लाखो स्त्रिया शिक्षणापासून वंचित आहेत. बलात्कार, कुमारीमाता, स्त्रीभृणहत्या, हुंउाबळी, घटस्फोट, मारझोड अशा अनंत संकटांशी स्त्री लढा देत आहे. याचा कारणे समाज व संस्कृतीच्या मूळाशी आहेत. स्त्रीला मासिक पाळी, गर्भधारणा, प्रसुती, रजोनिवृत्ती या स्थित्यंतरांमधून जावे लागते. प्रत्येक अवस्थेत स्त्रवणार्‍या संप्रेरकांमुळे तिला पुरुषांपेक्षा कितीतरी पटीने अधिक शारीरिक, मानसिक व भावनिक ताण-संघर्षांचा सामना करावा लागतो. त्यादृष्टीने स्त्री-पुरुषांची शरीर रचना, तिचे शारीरिक व मानसिक आरोग्य, आरोग्यावर परिणाम करणारे घटक, स्त्री आणि पुरुष दोघांनीही समजून घेऊन स्त्रीला प्रत्येक टप्प्यावर समजून घेतले, तिला आधार दिला तर तिचा त्रास, येणारा ताण ती सहजपणे यांचा सामना करु शकेल हा विचार या पुस्तक लेखनामध्ये केलेला आहे. स्त्रियांची मनोसामाजिक भूमिका, स्त्री-स्वभावाची वैशिष्ट्ये आणि वर्तन, स्त्रियांची विविध क्षेत्रातील संपादणूक, आधुनिक स्त्री व नैतिकता-बदलते संदर्भ इत्यादी मुद्यांवर येथे विवेचन केले आहे.

    Stri Manasshastra

    350.00
    Add to cart
  • स्मार्ट सखी

    सौंदर्यसाधनाही सखीच्या जीवनाच सत्य आहे तसेच अंतरात्म्याचं संगीत आहे; जीवनाची जगण्याची कला-साधना आहे. सखीमध्ये जोपर्यंत सुंदर दिसण्याची प्रबळ इच्छा होत नाही, तोपर्यंत तिचे सौंदर्य निव्वळ प्रसाधनांनीसुद्धा खुलत नाही. प्रसन्नता, आनंद, समाधान असलेले सौंदर्य शक्तीवर्धक संजीवनी देणारे असल्यानेच सखीने स्मार्ट होणे गरजेचे आहे. सौंदर्याची सत्यता आणि संवेदनशीलता ही त्यासंबंधितावर अवलंबून असते. सखीच्या दीर्घायुष्यासाठी काही टीप्स या स्मार्ट सखीत…

    Smart Sakhi

    145.00
    Add to cart
  • स्वास्थ्यकारक मसाज

    वैश्विक शक्तीने संपन्न आणि निसर्गोपचाराच्या अधिपत्याखालील स्वास्थकारक मसाजने शारीरिक, मानसिक आणि बौद्धिक विकासाला सहाय्य होते. अतिशय सहज, सुलभ अणि खर्चिक नसलेल्या मसाज तंत्राचा अवलंब सर्वांनी करणे काळाची गरज आहे. स्वास्थकारक मसाजने शरिराचा योग्य पद्धतीने विकास होतो आणि कोणतेही दुष्परिणाम अनुभवास येत नाहीत.
    समाजजीवनातील स्वास्थ्यासाठी, आरोग्यासाठी सहजपणे उपलब्ध असलेल्या दवाखान्यात प्रवेश करण्याची सहजासहजी इच्छा होत नाही. मसाजतंत्र स्वतःच अवगत केले आणि त्याचा योग्य तो उपयोग केला तर अनेक व्याधीपासून सुटका होते. त्यामुळेच आपल्या जवळच्या व्यक्तीच्या मदतीने ‘मसाज’कसा करता येईल? याचाही विचार होणे गरजेचे आहे.
    नैसर्गिक चिकित्साशास्त्र म्हणूनच आयुर्वेदाचा अभ्यास केला जातो. प्राचीन भारतामध्ये याचा मोठ्या प्रमाणात विकास झालेला होता. आयुर्वेदामध्ये ज्या अनेक चिकित्सापद्धती आहेत त्यातीलच एक पद्धती म्हणजे मालिश होय.

    Swasthyakarak Masaj

    125.00
    Add to cart