• 19 व्या शतकातील महाराष्ट्र

    19 व्या शतकातील महाराष्ट्र

    1818 मध्ये बाजीराव पेशवा हा इंग्रजांना शरण गेला व छत्रपती शिवाजी महाराजांनी महत्प्रयासाने उभारलेले स्वराज्य संपुष्टात आले. त्याकाळी सामाजिक जीवनामध्ये जातीव्यवस्थेचे वर्चस्व वाढले होते. जातीव्यवस्था ही दृढ झाली होती. पेशवे काळामध्ये स्त्रीजीवन फारसे चांगले नव्हते. राजा राममोहन रॉय, म. फुले इ. सुधारकांनी केलेल्या प्रयत्नांमुळे समाजात सर्वांगीण सुधारणेस प्रारंभ झाला. समाजातील अनिष्ट प्रथांना मूठमाती दिली गेली. विविध वृत्तपत्रे, नियतकालिकांनी ज्ञान प्रसार आणि समकालीन घटनांना प्रसिद्धी देणे या दोन हेतूंनी समाजसुधारणेस हातभार लावला. ज्ञान आणि विज्ञानाचा परिचय सर्वसामान्यांना झाला. शिक्षणामुळे राजकीय, सामाजिक आणि आर्थिक विकास होतो, याची समाजाला जाणीव झाली. इंग्रजांनी विविध मार्गांनी भारतीयांचे शोषण केले. याबाबत दादाभाई नौरोजी यांनी आर्थिक निःसारणाचा सिद्धांत मांडला. त्यामुळे भारताच्या दारिद्य्राचे खरे कारण कळाले. न्यायमूर्ती रानडे, लोकमान्य टिळक, सुभाषचंद्र बोस, बाबासाहेब आंबेडकर, म. गांधीजींसारख्या नेत्यांनी याविरुद्ध आवाज उठविला व भारतीयांना स्वातंत्र्यप्राप्तीसाठी प्रेरणा दिली.

    19 vya Shatakatil Maharashtracha Itihas

    Rs.225.00
    Add to cart
  • 20 व्या शतकातील महाराष्ट्राचा इतिहास

    20 व्या शतकातील महाराष्ट्राचा इतिहास

    विसावे शतक हे रौद्र शतक मानले जाते. या शतकात दोन महायुद्धे होवून मानव किती क्रूर होवू शकतो हे जगाला दिसले. जगात मोठ्या प्रमाणात मानवी आणि भौतिक संपत्तीची हानी झाली. हिंदुस्थानात गर्व्हनर जनरल लॉर्ड कर्झनने बंगालची फाळणी करून येथे राष्ट्रवाद निर्माण केला. लाल, बाल आणि पाल यांची त्यांतून निर्मिती होवून स्वराज्याची मागणी होवू लागली. त्यानंतर गांधीयुग उदयाला आले. स्वातंत्र्याची पहाट घेवून आले. पण त्यावर फाळणीचे धुके पसरले. भाषावार प्रांताची भारतात मागणी झाली. त्यातून नवीन प्रांतांची निर्मिती झाली. महाराष्ट्राचा दुर्दैवाने द्वैभाषिक राज्य गुजरातच्या जोडीने निर्माण झाले. गुजरात आणि महाराष्ट्र या दोन्ही राज्यांना हे द्वैभाषिक मान्य नव्हते. त्यातून मुंबई कोणाची ही समस्या निर्माण झाली आणि संयुक्त महाराष्ट्राची चळवळ सुरु झाली. 1960 मध्ये स्वतंत्र महाराष्ट्र राज्याची निर्मिती होवून या राज्याने मोठ्या प्रमाणात औद्योगिकरण साधले. त्यातून नागरीकरणाचा प्रश्न निर्माण झाला. सहकाराच्या मार्गाने या राज्याची प्रगति झाली. साखर, कापूस या उत्पादनांनी यश गाठले. याचा प्रारंभीचा पाया महाराष्ट्रातील अनेक विचारवंतांनी घातला. औद्योगिक प्रगतीमुळे कामगारांचे प्रश्न निर्माण झाले. ब्राह्मणेत्तर चळवळीबरोबर शेतकऱ्यांची चळवळ आणि दलित चळवळ ह्या चळवळी महाराष्ट्रात झाल्या. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर हैद्राबादचा निजाम संघराज्यात सामील होत नव्हता. रझाकार चळवळीने त्याच्या राज्यात धुमाकूळ घातला. त्याला जमिनीवर आणण्याचे कार्य पोलिस कारवाईने केले. अशा अनेक घटनांचा आढावा या ग्रंथात घेण्याचा प्रयत्न केला आहे.

    20 vya Shatakatil Maharashtracha Itihas

    Rs.200.00
    Add to cart