-
संशोधन पद्धती
Rs.675.00संशोधनाचा एकंदरीत विचार करता, संशोधन म्हणजे काय ते प्रथम पाहायला हवे. माणसामध्ये एक उपजत कुतूहल प्रवृत्ती असते. आपल्या भोवतालच्या जगातील माणसे, वस्तू आणि घटना यांचे अस्तित्व माणसाला जेव्हापासून जाणवायला लागते, तेव्हापासून हे काय आहे, कसे आहे हे आपल्या ज्ञानेंद्रियांचा उपयोग करुन जाणून घेण्याची त्याची खटपट सुरु होते आणि हे जाणून घेणे म्हणजे संशोधन होय. संशोधनाला इंग्रजीत ’ठशीशरीलह’ म्हटले जाते. हा इंग्रजी प्रतिशब्द योग्यच आहे. ’ठशीशरीलह’ म्हणजे ‘पुन्हा शोध घेणे.’ थोडक्यात कोणत्याही ज्ञानशाखेत नवीन तत्त्वे अथवा तथ्ये शोधण्यासाठी आणि जुनी तथ्ये व तत्त्वे परीक्षणासाठी केलेला चिकित्सक व पध्दतशीर अभ्यास म्हणजे संशोधन होय. माणूस गोष्टींच्या संपर्कात यायला लागतो, नवीन माहिती मिळवायला लागतो, तसतसा तो नवीन माहितीची आधीच्या माहितीशी सांगड घालायला लागतो. मग त्याला त्याच्यात काही संबंध दिसायला लागतात. तो तुलना करु लागतो. नव्या व जुन्या गोष्टींत त्याला काही समान गुणधर्म आढळतात. तेव्हा तो त्यांना एका वर्गात घालतो. म्हणजे त्यांचे वर्गीकरण करतो. आणखी पुढे जाऊन त्याला असे आढळते की, भोवताली घडणार्या घटना काही क्रमाने घडतात. तसेच एखादी घटना घडली तरच पुढची घटना घडते. म्हणजे आधी घडलेली घटना कारण आहे तर नंतर घडलेली घटना तिचा परिणाम आहे हे कळते. कार्यकारण संबंध निश्चित करण्यासाठी तो अनेक वेळा तशीच निरीक्षणे वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या वेळी करतो, मगच त्याच्या मनात कारण-परिणाम संबंध प्रस्थापित होतो. म्हणजेच नव्याने उजेडात आलेल्या तथ्यांच्या आधारे प्रस्थापित, स्वीकृत निष्कर्ष व सिध्दांतांचे पुनर्परीक्षण करण्याच्या हेतूने चिकित्सक व सखोल चौकशी वा प्रयोगास संशोधन म्हणता येईल. सदरील ग्रंथात संशोधनाची सर्वांगाने चर्चा करण्यात आली आहे.
सदरील ग्रंथ हा पदवी, पदव्युत्तर, एम.फील., पीएच.डी., एमपीएससी, यूपीएससी व सेट इत्यादी परीक्षांचे अध्ययन करणार्या विद्यार्थ्यांना व प्राध्यापकांना उपयुक्त ठरेल.Sanshodhan Paddhati
-
संशोधन पद्धती (प्री पीएच.डी. कोर्स वर्क व संशोधकांना उपयुक्त)
Rs.150.00संशोधन पद्धती हे संशोधन करण्याच्या तंत्राविषयी माहिती देणारे शास्त्र आहे. सामाजिक शास्त्रातील संशोधन हे विज्ञान शाखेतील संशोधनाइतकेच शास्त्रशुद्ध व अर्थपूर्ण व्हावे यासाठी संशोधनाच्या तंज्ञाची माहिती असणे आवश्यक आहे. मानसशास्त्र, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, इतिहास, राज्यशास्त्र इ. विषयांमध्ये अलिकडे संशोधनाचे महत्त्व वाढतच आहे. आधुनिक युगात आणि जगात संशोधनाला अनन्य साधारण महत्त्व प्राप्त झालेले आहे. तेव्हा संशोधन करतांना संशोधकाला संशोधन कार्याबद्दल माहिती व्हावी. संशोधन करताना संशोधकाला विषयाची पद्धतशीर माहिती असणे आवश्यक असल्यामुळे प्री पीएच.डी. अभ्यासक्रमाला भारतातील सर्व विद्यापीठामध्ये प्री. पीएच.डी. कोर्ससाठी सामाजिक संशोधन पद्धतीचा पेपर अनिवार्य केला आहे. तेव्हा मराठी माध्यमाच्या संशोधकांसाठी वस्तुनिष्ठ प्रश्नांसाठीच्या पुस्तकाची होणारी परवड लक्षात घेऊन हे पुस्तक निर्माण करण्याचा लेखकांचा प्रयत्न आहे.
सामाजिक संशोधनात वस्तुनिष्ठता व तटस्थता राखणे तसे कठीण आहे, परंतु वैज्ञानिक पद्धतीचा अवलंब करून सामाजिक घटनांचे शासत्रीय पद्धतीने अध्ययन करून नवीन ज्ञान प्राप्त करणे शक्य होते. प्री पीएच.डी. च्या संशोधकांना संशोधनाचा मार्ग सुकर व्हावा यासाठी सामाजिक संशोधनासंबंधीचे ज्ञान सरळ व सोप्या पद्धतीने उपलब्ध व्हावे हाच उद्देश यामागे आहे. त्याचबरोबर संशोधन विषयक दृष्टीकोन या घटकांतर्गत येणार्या नेट सेट परीक्षेतील मागील प्रश्नपत्रिकेंमध्ये प्रश्नांचाही यात समावेश करण्यात आला आहे.Sanshodhan Padhati