• Relevance of Mahatma Gandhi’s Ideology in the Present Scenario

    वैष्णव जन तो तेने कहिये, जे पीङ पराई जाणे रे परदुःखे उपकार करे तोये, मन अभिमान ने आणे रे।
    सकल लोकमां सहुने वंदे, निन्दा न करे केनी रे वाचन, काछ, मन निश्छल राखे, धन-धन जननी तेनी रे।
    समद्दष्टि ने तृष्णा त्यागी, पर स्त्री जेने मात रे जिहवा थकी असत्य न बोले, परधन नव झाले हाथ रे
    मोह माया व्यापे नहिं जेनें, दृढ वैराग्य जेना मनमां रे रामनाम शुं ताली लागी, सकल तीरथ तेना तनमां रे,
    वणलोभी ने कपटरहित छे, काम-क्रोध निवार्या रे भणे नस्सैंयों तेनुं दरसन करतां कुल एकोतेर तार्या रे।

    995.00
    Add to cart
  • Relevance of Pandit Nehru’s Ideology in the Present Scenario

    भारतामध्ये आणि जगामध्ये इतरत्र धर्मांच्या नावाखाली चाललेल्या गोष्टी पाहून मला धर्माबद्दल घृणा येते. धर्म नेहमी अंधविश्वास, मतांधता इत्यादी गोष्टींना आश्रय देतो अशाी माझी समजुत आहे. धर्म नेहमी भविष्य, परलोक इत्यादी संबंधी चर्चा करतो. परंतु ज्या जगात मी जगतो त्याविषयी मला प्रेम व आदर असल्यामुळे पार लौकिक जीवनाविषयी मी विचारही करीत नाही व ते मला आवडतही नाही.
    धर्मांमुळे जर राष्ट्रा-राष्ट्रात, व्यक्ती-व्यक्तीत संघर्ष निर्माण होणार असेल तर तो धर्म नसून धर्माचे भ्रष्ट स्वरुप आहे. धर्माचा विचार आणि मूल्यमापन हे नेहमी सामाजिक हिताच्या दृष्टीकोनातूनच व्हावयास पाहिजे.

    795.00
    Add to cart
  • आधुनिक भारतीय राजकीय विचारवंत

    आधुनिक भारताचा प्रारंभच मुळात ब्रिटिशांच्या आगमनानंतरचा आहे. ब्रिटिशांनी सोबत आणलेली नवीन पुष्ये व नवीन विचार भारतीयांसाठी नवीन होते. त्यातून सामाजिक आर्थिक, धार्मिक सुधारणांना प्रारंभ झाला व या नवीन बदलाचे पडसाद एकूण भारतीय जीवनावर पडले व त्यामुळे विचारमंथनालाही चालना मिळाली. राजा राम मोहन रॉय यांनी त्यास वैचारिक आधार देऊन प्रबोधनकालाचा प्रारंभ केला. महात्मा जोतिराव फुले, स्वामी दयानंद सरस्वती, नामदार गोखले, आगरकर, न्यायमूर्ती रानडे, दादाभाई नवरोजी, लोकमान्य टिळक, महात्मा गांधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, पंडित जवाहरलाल नेहरु, अरविंद घोष, स्वातंत्र्यवीर सावरकर, सुभाषचंद्र बोस, एम. एन. रॉय, मौलाना आझाद, राम मनोहर लोहिया इत्यादी विचारवंतांनी भारतातील बदलत्या परिस्थितीला अनुरुप व भविष्यकालीन उपाययोजना म्हणून तत्कालीन आवश्यकतेतून व जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी वेळोवेळी वेगवेगळ्या विषयांवर चिंतन करुन वैचारिक मांडणी केली आहे.

    आधुनिक भारतीय विचारवंतांनी भारताचे स्वातंत्र्य, भारताचा राजवाद, आंतराष्ट्रवाद, धर्मनिरपेक्षता, भारतातील आर्थिक, सामाजिक, धार्मिक, राजकीय प्रश्न त्यासाठी करावयाची उपाययोजना, स्वातंत्र्यप्राप्तीनंतरचा भारत, शासनाचे परराष्ट्र धोरण, अंतर्गत योजना, राज्यघटना शासन पद्धत इत्यादी संदर्भात वेळोवेळी व्यक्त करण्यात आलेले राजकीय विचार हाच भारताचा राजकीय विचाराचा वारसा आहे व त्याचा आधार घेऊन या देशाची राजकीय जडण-घडण संपन्न झाली असून, भारताचा राजकीय विकास होत आहे. म्हणूनच आधुनिक भारतीय राजकीय विचारांचा अभ्यास हा आवश्यक ठरतो.

    Aadhunik Bharatiya Rajkiya Vicharwant

    275.00
    Add to cart
  • आधुनिक भारतीय राजकीय विचारवंत (भाग 2)

    Adhunik Bhartiya Rajkiya Vicharvant (Bhag 2)

    450.00
    Add to cart
  • आधुनिक युगातील गांधीविचारांची प्रासंगिकता

    महात्मा गांधीचे विचार हे सत्य, अहिंसा, श्रमप्रतिष्ठा, साधे राहणीमान या तत्वावर आधारित आहेत. महात्मा गांधीच्या मते ‘पृथ्वीवरिल साधनसामुग्रीव्दारे सर्व मानवाच्या गरजांचे समाधान होऊ शकते पण कोणत्याही व्यक्तीचा हव्यास पुर्ण होऊ शकत नाही’. त्यांनी सर्व मानवाच्या कल्याणासाठी निगडीत असलेल्या सर्व महत्वपूर्ण बाबींचा विचार करून अनमोल विचार मांडले. महात्मा गांधीचे विचार आजही उपयुक्त आहेत. मुळात गांधीजी आजउद्याच नव्हे, तर चिरंतन आहेत. गांधीविचार आजच्या काळात केवळ उपयुक्त आहेत असे नव्हे, तर त्या विचारांशिवाय जगाला पर्याय नाही. नव्या युगाने निर्माण केलेल्या वेगवेगळ्या समस्यांवर गांधीविचार हेच अंतिम उत्तर आहे. महात्मा गांधीचे विचार हे भविष्याचा वेध घेणारे होते. माझ्या स्वप्नातील भारत, हिंद-स्वराज्य, सत्याचे प्रयोग-आत्मकथा या विविध पुस्तकांत त्यांनी मोलाचे मार्गदर्शन केले आहे.
    आजही महात्मा गांधींचे यंत्रविषयकविचार, स्वदेशीबाबतचे विचार, विश्वस्तवृत्तीबाबतचे विचार, सर्वोदयी विचार, अर्थशास्त्रीय व नितीशास्त्रीय विचार वर्तमान परिस्थितीत अत्यंत उपयुक्त ठरू शकतात. एकंदरीत महात्मा गांधींचा विचार व मार्ग हे नैतीक आणि अहिंसात्मक तत्वावर अवलंबून असल्यामुळे आपल्या कार्यकाळात त्यांनी भारतीय स्वातंत्र्य चळवळीत या मार्गाचा अवलंब केला. ब्रिटीशांसारखा साम्राज्यवादी शत्रु समोर असताना देखील त्यांना नामोहरम केले.
    आज 21 व्या शतकात जागतिकीकरण, खाजगीकरण व उदारीकरणाच्या नावाखाली सर्वसामान्य लोकांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. दारिद्य्र, हिंसाचार, उपासमार, भ्रष्टाचार, स्त्रियांवरील अत्याचार यासारख्या प्रश्नांना सामोरे जावे लागत आहे. अशा परिस्थितीत लोकशाहीवादी देशात गांधीविचारांनी आपले महत्त्व अधोरेखित केले आहे.

    Adhunik Yugatil Gandhivicharanchi Prasangikta

    495.00
    Add to cart
  • गुरु रविदास : जीवन आणि कार्य

    ऐसा चाहूं राज मैं, जहाँ मिलै सबन कौं अन्न |
    छोट-बड़ो सभ सम बसे, ‌‘रविदास’ रहैं प्रसन्न ॥

    गुरु रविदासांनी मानवी मूल्यांची, समानतेची आणि धर्मनिरपेक्ष विचारधारेची जोपासना करणारा वैचारिक लढा दिला. प्रचंड प्रतिभा, प्रभावी वाणी, संघटन कौशल्य, सामान्य जनतेविषयी आस्था, श्रद्धा, प्रेम, करुणा, बंधुत्व असे अष्टपैलू व्यक्तीमत्व गुरु रविदासांचे होते. त्यांच्या तत्त्वज्ञानात आधुनिक काळातील उपयुक्त मुल्ये दिसून येतात. जसे की, कोणताही व्यक्ती त्याच्या जन्मामुळे लहान किंवा मोठा होत नाही तर त्याच्या कर्मामुळे होतो. एखाद्या व्यक्तीची कृती त्याला उच्च किंवा नीच बनवते. जर तुमचे मन आणि अंतःकरण शुद्ध असेल तर ईश्वर तुमच्या हृदयात वास करतो. सर्व मानव हे समान आहेत. मानवसेवा हिच खरी ईश्वरसेवा असून सत्याचा आग्रह धरला पाहिजे. जो माणूस सत्य बोलत नाही आणि जो विश्वासघात करतो त्याच्याबरोबर कोणताही व्यवहार ठेऊ नये. जोपर्यंत ही जात संपणार नाही, तोपर्यंत माणूस माणसाशी जोडला जाऊ शकत नाही. संपूर्ण सजीव सृष्टीसुद्धा एकाच घटकापासून (मातीपासून) बनलेली आहे व त्यांना बनवणाराही एकच असल्याने आपापसातील भेदभाव नष्ट केले पाहिजेत. जगात सर्वत्र अशी समाजव्यवस्था हवी की, सर्वांना पोटभर अन्न खायला मिळेल. जिथे लहान-मोठे, दीन-दलित, गरिब-श्रीमंत असा कुठलाही भेद असणार नाही. गुरु रविदासांनी चौदाव्या शतकात मांडलेले विचार आजही उपयुक्त व विचार करायला लावणारे आहेत. म्हणूनच गुरु रविदासांच्या विचारांचा प्रचार व प्रसार होणे आवश्यक आहे. त्यासाठीच प्रस्तुत ग्रंथलेखनाचा प्रपंच…

    Guru Ravidas Jeevan ani Karya

    350.00
    Add to cart
  • डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे राष्ट्र उभारणीत योगदान

    प्रज्ञासुर्य भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा प्रचार आणि प्रसार होणे ही मानव कल्याणाच्या दृष्टीने महत्त्वाची बाब आहे. बाबासाहेबांनी मानवी जीवनाच्या विविध अंगांना स्पर्श करणारे लेखन व प्रबोधन केले आहे. त्यांच्या विचारांचा अनुनय हा समाजामध्ये मानवी मुल्य, समता, स्वातंत्र्य, बंधुता आणि सामाजिक न्याय यांची रुजवात करण्यास सदैव मार्गदर्शक राहील. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे केवळ दलितांचे उद्धारकच नव्हेत तर तळागाळातील धार्मिक रूढी-परंपरा यांना छेद देऊन राष्ट्र उभारणीमध्ये संपूर्ण भारतातील दलित आणि दलितेतर, सवर्ण समाजातील कर्मठ विचार व अनिष्ठ रूढींपासून सुटका करून जनजागृती आणि सामाजिक चळवळीच्या माध्यमांतून राष्ट्र उभारणीमध्ये योगदान देण्याबाबत प्रयत्नशील होते. डॉ.बाबासाहेबांनी कठोर परिश्रम, अथक प्रयत्न, असामान्य तडफ आणि जाज्वल्य निष्ठा याद्वारे भारतातील व विदेशातील शक्य ते उच्च शिक्षण घेतले. आणि विद्वान पंडीत, चतुरस्त्र लेखक, स्वतंत्र वृत्तीचे आणि निर्भीड विचारवंत म्हणून नावलौकिक मिळविला. सामाजिक न्याय प्रस्थापित करणारा अलौकिक सेनानी व राष्ट्राला राज्यघटना दिल्यामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे जनमानसात स्थान अढळ राहील.

    अनिती, अन्याय, अत्याचार व शोषणाच्या विरोधातील प्रखर लढ्याच्या उत्तुंग मानदंड असणार्‍या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी तत्कालीन काळात मांडलेले विचार आजही खूप मार्गदर्शक व संयुक्तीक वाटतात. तथागत गौतम बुद्धांची शांती, छत्रपती शिवरायांची क्रांती व संत कबिरांची व महात्मा फुलेंची माणूसकी इ. सुंदर मिश्रण होवून त्यांचे विचार व कृती माणसाला प्रगतीच्या, प्रकाशाच्या दिशेने घेवून जातात. तसेच स्वाभिमानाने जीवन जगायला शिकवतात.

    डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे जीवनकार्य, त्यांचे कृतीशील तत्वज्ञान, त्यांची विचारधारा समस्त भारतीयांसाठी दिपस्तंभ आहेत. त्यातूनच आम्ही उद्याच्या शांतीचा संदेश देणार्‍या व प्रसंगी क्रांतीसाठी तयार असणार्‍या समृद्ध, सशक्त व स्वाभिमानी भारताची निर्मिती करू शकतो.

    Dr. Babasaheb Ambedkar Yanche Rashtra Ubharanit Yogdan

    375.00
    Add to cart
  • डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार : शोध आणि बोध

    क्रांतीसूर्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर एक असामान्य, अलौकीक तेजस्वी आणि वंदनीय महापुरुष होते.
    डॉ. आंबेडकरांच्या शतकोत्तर रौप्यमहोत्सवी वर्षातील ही जयंती आंतरराष्ट्रीय स्तरावर आनंदाचा आणि स्वाभिमानाचा दिवस ठरली. संयुक्त राष्ट्रसंघाने 14 एप्रिल हा दिवस ‘ज्ञानदिवस’ घोषित करुन बाबासाहेबरुपी विचारांना आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यता देऊन सर्व सदस्य राष्ट्रांना हा जयंती उत्सव साजरा करण्याच्या सूचना दिल्या. जपान, भूतान, नायजेरिया, ऑस्ट्रेलिया, रोमानिया, डेन्मार्क, नेपाळ, पाकिस्तान, श्रीलंका, हंगेरी, दुबई, कजाकीस्तान इत्यादी देशांमध्ये विशेष स्वरुपात डॉ. आंबेडकरांची जयंती मोठ्या दिमाखात साजरी करण्यात आल्यामुळे भारताची मान अभिमानाने उंचावली.
    डॉ. आंबेडकरांनी सामाजिक समानतेसाठी आयुष्यभर लढा दिला ती समानता आज तरी प्रस्थापित झाली आहे का? या देशात आंबेडकरांना अपेक्षित समानता आजही दिसून येत नाही. या देशात समानता प्रस्थापित करण्याचे आंबेडकरांचे स्वप्न आपण नक्कीच पूर्ण करु शकतो. परंतु त्यासाठी परिवर्तनवादी आंबेडकरी विचार समजून घेऊन प्रत्यक्षात साकार करण्यासाठी कटिबध्द होणे आवश्यक आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अपेक्षित समानता अद्याप प्रस्थापित झालेली नाही कारण समानता हा फक्त लिहिण्याचा आणि वाचनाचा विषय नसून तो समजून घेऊन कृती करण्याचा विषय आहे.
    चला तर मग आजपासून आपण सर्व डॉ. आंबेडकरांचे विचार प्रत्यक्षात साकार करण्यासाठी कटिबद्ध होऊ या! आणि प्रत्यक्षात कृती करू या!
    जयभीम… जय भारत…

    Dr Babasaheb Ambedkaranche Vichar : Shodha Ani Bodha

    50.00
    Add to cart
  • पंडीत जवाहरलाल नेहरुंचे राजकिय तत्वज्ञान

    भारतामध्ये आणि जगामध्ये इतरत्र धर्माच्या नावाखाली चाललेल्या गोष्टी पाहून मला धर्माबद्दल घृणा येते. धणर्म नेहमी अंधविश्वास, मतांदता इत्यादी गोष्टींना आश्रय देतो अशी माझी समजुत आहे. धर्म नेहमी भविष्य, परलोक इत्यादी संबंधी चर्चा करतो. परंतु ज्या जगात मी जगतो त्याविष्यी मी विचारही करीत नाही व ते मला आवडतही नाही.

    धर्मामुळे जर शब्दा-शब्दात, व्यक्ती-व्यक्तीत संघर्ष निर्माण होणार असेल तर तो धर्म नसून धर्माचे भ्रष्ट स्वरुप आहे. धर्माचा विचार आणि मूल्यमापन हे नेहमी सामाजिक हिताच्या दृष्टीकोनातूनच व्हावयास पाहिजे.

    Pandit Javaharlal Nehrunche Rajkiya Tatvdnyan

    250.00
    Add to cart
  • पाश्चिमात्य राजकीय विचारवंत

    पाश्चिमात्य देशामध्ये प्रामुख्याने युरोपीयन देशातील राजकीय विचारांची प्राचीन परंपरा राहिलेली आहे. पश्चिमी विचार हे सॉक्रेटीस पासून सुरु झाल्याचे मानले जाते. त्यांचा प्रभाव प्लेटो, अ‍ॅरिस्टॉटल या ग्रीक विचारवंतावर दिसून येतो. प्लेटोपासून ही परंपरा सुरु होऊन हॅराल्ड लास्की व त्यानंतरही सुरु आहे. या विचारपंरपरेची फार मोठी शृंखला आहे. त्या सर्व विचारवंताचा परामर्श मार्यादित स्वरुपाच्या ग्रंथात मांडणे अशक्य आहे. म्हणून त्या त्या काळातील प्रतिनिधी म्हणून निवडक विचारवंत घेऊन मांडणी करण्याचा प्रयत्न केला आहे. पाश्चिमात्य विचारवंतांचे सर्वांत महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे हे सर्व विचारवंत समाजाच्या सर्व घटक अंगांना स्पर्श करतात. त्यामुळे त्यांनी मांडलेल्या सर्व स्पर्शी विचारांचा परामर्श घेणे आवश्यक असले तरी ग्रंथाच्या मार्यादेमुळे ते अशक्य आहे. म्हणून प्रतिनिधिक विचारवंत आणि त्यांचे निवडक विचार यात मांडण्याचा प्रयत्न केला आहे. प्राचीन ग्रीक परंपरेतील प्लेटो, अ‍ॅरिस्टॉटल, मध्ययुगाचा प्रतिनिधी म्हणून मॅकियान्हॅली, सामाजिक करार सिद्धांत मांडणार्‍या हॉब्ज, लॉक, रुसो उपयोगितावादी विचारवंत म्हणून जे. एस. मिल, आदर्शवादी विचारवंत टी.एच. ग्रीन, समाजवादी विचारवंत म्हणून कार्ल मार्क्स आणि 20 व्या शतकांचा प्रतिनिधी म्हणजे हॅरॉल्ड लास्की यांचा समावेश या ग्रंथात करुन त्यांचे महत्त्वपूर्ण असणारे विचार यांची ओळख प्रस्तुत ग्रंथात करण्याचा हा प्रयत्न केला आहे.

    Pachimatya Rajkiya Vicharvant

    295.00
    Read more
  • प्राचीन व मध्ययुगीन पाश्चात्त्य तत्त्वज्ञान

    विश्वाचे कोडे उलगडणाच्या तत्त्वचिंतकांच्या अथक प्रयत्नांचे, त्यांच्या न संपणार्‍या शोधयात्रेचे आकलन करणे हा प्रस्तुत पुस्तकाचा प्राथमिक उद्देश आहे. तत्त्वज्ञान या विषयाबद्दल सर्वसामान्यांमध्ये बरेचसे गैरसमज आढळून येतात. प्रस्तुत पुस्तकात तत्त्वज्ञान विषयाचे सामान्य रुप मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे, तो यामुळेच. पाश्चात्त्य तत्त्वज्ञानाच्या प्राचीन (मुख्यत्वे ग्रीक) व मध्ययुगीन स्वरूपाचे विवरण करणारी पुस्तके मराठीत फारशी आढळत नाहीत. इंग्रजी पुस्तके तुलनेने पुष्कळ आहेत, परंतु विद्यार्थ्यांना ती तितकीशी रुचत नाहीत, आपली वाटत नाहीत.
    सदरील विवरण जरी पाश्चात्त्यांच्या प्राचीन व मध्ययुगीन तत्त्वज्ञानाच्या संदर्भात असले तरी तत्त्वज्ञान विषयात अंतर्भूत असलेल्या प्रमुख शाखांचे त्यातील वर्णन सर्वसमावेशक असेच आहे. पाश्चात्त्य जगात प्राचीन तत्त्वविचारांचे नव्याने संशोधन व परिशीलन निरंतर सुरू असते हे लक्षात घेवूनच प्रस्तुत पुस्तकलेखन करण्यात आले आहे.

    Prachin V Madhyayugin Pashchattya Tattvadnyan (Sankshitpa Itihas)

    275.00
    Add to cart
  • भारतीयांच्या हृदयातले सरदार वल्लभभाई पटेल

    वयाच्या तब्बल चाळीस वर्षापर्यंत स्वातंत्र्यलढ्यापासून अलिप्त राहिलेल्या सरदारांनी स्वातंत्र्यलढ्यात प्रवेश केल्यावर त्यास मिळालेली ऊर्जा, गती, दिशा व अनुषंगाने बदललेली लढ्याची सर्वसमावेशक दशा याचे समग्र, सादयंत शब्दचित्रण लेखिकेने प्रभावीपणे, समर्थपणे चित्तारले आहे.

    महात्माजींच्या अहिंसेचा सार्थ अर्थ आणि हेतू सरदारांमुळे सिद्ध होतो. शारीरिक मानसिकदृष्ट्या समर्थ असूनही अहिंसेने ‘लढा देऊन’ संघटनशक्तीने विघटनशक्तीचे उच्चाटन करण्याचा पराक्रम ‘सरदारच’ करू जाणे या सर्वांचा शब्दवेल्हाळ परिचय करण्यात लेखिका यशस्वी झालेली आहे.

    ‘अहिंसेचे जनकत्व’ जसे बापूंकडे जाते तसे भारताच्या अखंडतेचे मातृत्व सरदारांकडे जाते. अखंड, एकसंघ, एकात्म भारतीय संघराज्याच्या निर्माणाचा पुरूषार्थ घडवितांनाच्या घटना, प्रसंग घ्यावे लागलेले कठोर निर्णय याचे समग्र विवेचन परिणामकारकरित्या या पुस्तकात समर्पक व सहज सुलभ शब्दात आपल्यापर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न लेखिकेने केला आहे.

    भारतीयांच्या हृदयातले ‘सरदार’ वल्लभभाई पटेल हे चरित्र्यपुष्प सरदारांच्या अनेकविध लोकदुर्लभ गुणवैशिष्ट्यांचा अजरामर कस्तुरीसुगंध भारतीय वाचकांपर्यंत खचितच पोहचविणार आहे यात शंका नाही.
    या पुस्तकाच्या अनुषंगाने सरदारांवरील मराठी वाङ्मयात नक्कीच भर पडली आहे. सदर पुस्तक हे समस्त भारतीयांना सरदारांच्या विषयी असलेल्या जिज्ञासेला नक्कीच पूर्ण करेल.

    Bharatiyancha Hridyatle Sardar Vallabhabhai Patel

    399.00
    Add to cart
  • महात्मा गांधी व डॉ. बाबासाहेब आंबेडकर : प्रमुख संकल्पना

    महात्मा गांधी हे आदर्शवादी व युगप्रवर्तक नेते होते. त्यांनी राजकारणाला व्यावहारीक अशी नवी अधात्मवादी दृष्टी दिली. अन्यायाचा प्रतिकार सत्य, अहिंसा व सत्याग्रहाच्या मार्गाने करता येतो हे त्यांनी दाखवून दिले. गांधीजींनी ग्रामपातळीपासून ते देशपातळीवर तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवरील राजकारणात, समाजकारणात शुद्धीकरणाला महत्व दिले. त्यांचे सामाजिक कल्याण, अस्पृश्यता व जातीय ऐक्य, महिला सबलीकरण, शिक्षणासंबंधीचे विचार तसेच आर्थिक क्षेत्रात भांडवलवाद व नागरीकरण, आरोग्य आणि स्वच्छता तसेच शेतकरी, कामगार, आदिवासी व अल्पसंख्याकांसंबंधी विचार हे अद्वितीय विचार आहेत.
    डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे सामाजिक क्रांतिप्रवाहाचे कृतिशील विचारवंत व नेते होते. 20व्या शतकातील महान विचारवंत, प्रकांड कायदेपंडित, थोर समाजसेवक, दूरदर्शी राजकारणी म्हणून ते ओळखले जातात. डॉ. आंबेडकरांचे जीवन-कार्य अलौकिक व अनन्यसाधारण असून, आधुनिक भारताच्या जडणघडणीत त्यांचे योगदान खूप मोठे आहे. उत्तम प्रशासक, थोर बुद्धिवादी व सिद्ध हस्तलेखक, ग्रंथकार, कुशल संघटक, दलितांचे महान नेते, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार तसेच सामाजिक विज्ञानाच्या प्रमुख ज्ञानशाखांतील तत्वचिंतक अशा विविध क्षेत्रांतील त्यांचे स्थान वैशिष्ट्यपूर्ण असून त्यांनी केलेले समाजकारण, राजकारण, अर्थकारण, राज्यघटना, शिक्षण या विषयावरील मूलगामी चिंतन, विश्लेषण व कार्य भारतीयांना प्रेरक, पूरक व मार्गदर्शक असे आहे.
    महात्मा गांधी व डॉ. बाबासाहेब आंबेडकर ह्या दोन महापुरुषांनी आपल्या विचार व कृतीने जनमानसात नवजागृती निर्माण करून समताधिष्ठीत मूल्यांची जपवणूक करून आधुनिक भारताची निर्मिती करण्यात सिंहाचा वाटा उचलला.

    250.00
    Add to cart
  • महात्मा गांधींच्या विचारांचा समाजावरील प्रभाव

    विश्वात ‌‘शांती’ नावाची क्रांती घडावी यासाठी रक्ताचा थेंब न सांडता ‌‘अहिंसा’ नावाच ब्रम्हास्त्र गांधीजींनी साऱ्या जगाला दिले. म्हणूनच गांधीजींना विश्वशांतीचे दूत म्हणून ओळखले जाते. दया, प्रेम आणि सत्याच्या मूलमंत्राने गांधीजींनी साऱ्या जगाला अनुग्रहीत केले.
    गांधीजींनी आपल्या तत्वज्ञानाच्या आधारावर भारतीय स्वातंत्र्य इतिहासात आपली वज्रछाप सोडली. एखाद्या देशाला खऱ्या अर्थाने स्वउद्धार करुन घ्यावयाचा असल्यास त्याने गांधी विचारांचे पाईक व्हाव कारण गांधी विचार नुसते राजकीय परीघापुरते मर्यादीत नूसन समाजवाद, स्त्रीवाद, रामराज्यातून ग्रामराज्य संकल्पना तसेच अंत्योदय तत्व डोळ्यासमोर ठेवून समाजाच्या अंतिम रांगेतील अंतिम घटकाचा विचार करुन मांडलेले अर्थकारण, पर्यावरण, जात, धर्म आणि संस्कृती या साऱ्या विचारमंथनातून उदयास आलेली सर्वोदय संकल्पना एखाद्या राष्ट्रास स्वबळावर समृद्ध होण्यास पुरेशी आहे. म्हणून गांधी विचारांची आवश्यकता होती, आहे आणि यापुढेही राहील यात शंका नाही.

     

    Mahatma Gandhinchya Vicharancha Samajavaril Prabhav

    295.00
    Add to cart
  • महात्मा गांधीजींचे तत्वज्ञान

    वैष्णव जन तो तेने कहिये, जे पीड़ पराई जाणे रे
    परदुःखे उपकार करे तोये, मन अभिमान ने आणे रे ।
    सकल लोकमां सहुने वंदे, निन्दा न करे केनी रे
    वाच, काछ, मन निश्छल राखे, धन-धन जननी तेनी रे।
    समदृष्टि ने तृष्णा त्यागी, पर स्त्री जेने मात रे
    जिह्वा थकी असत्य न बोले, परधन नव झाले हाथ रे
    मोह माया व्यापे नहिं जेनें, दृढ वैराग्य जेना मनमां रे
    रामनाम शुं ताली लागी, सकल तीरथ तेना तनमां रे,
    वणलोभी ने कपटरहित छे, काम-क्रोध निवार्या रे
    भणे नरसैंयों तेनुं दरसन करतां कुल एकोतेर तार्या रे ।

    Mahatma Gandhijinche Tatvdnyan

    125.00
    Add to cart
  • राजर्षी शाहू महाराज : व्यक्तित्व, कर्तृत्व आणि विचार

    छत्रपती शाहू महाराज हे बहुजन समाजाचे महानायक, शेतकर्‍यांचा उद्धारकर्ता, दूरदृष्टीचा, विशाल मनाचा राजा व लोकनेते होते. त्यांनी समाजातील बहुजन, मागासलेल्या, तळागाळातील वर्गाला समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याकरिता जे अनेक कार्य केले; त्यात गुन्हेगारी जमातीवरील गुन्हेगारीचा शिक्काबंद, मुलांच्या सक्तीच्या शिक्षणासाठी पालकांना दंड, सहकारीत्वाची भावना वाढविणे, जनहितार्थ कायद्याची मांडणी करणे, आंतरजातीय विवाहाला प्रोत्साहन देणे, विधवा पुनर्विवाह कायदा आणणे, मूलगामी सुधारणा करणे, शेतीसाठीची पाणीव्यवस्था-पाटबंधारे, कोल्हापुरी बंधारे आणि मालासाठी बाजारपेठा व कारखाने यांची उभारणी हे उद्दिष्ट्ये घेवून शाहू महाराजांनी ‘नव्या सामाजिक क्रांती’चा पुरस्कार केला. शिक्षणाची संकल्पना, जातवार नेतृत्व, स्वावलंबन, शिस्त, सहकार्य, नियमितता, सहिष्णूता, देशप्रेम इत्यादी गुणवाढीसाठी प्रयत्न केले. लोकशाही, नवनिर्मितीक्षम आणि सामाजिक सुधारणेचा पाया रचणारे राजर्षी शाहू महाराजांचे शिक्षणविषयक धोरण आजही देशाला प्रेरणादायी ठरत आहे. वसतीगृहे, शिष्यवृत्ती, शाळा व नोकरीत राखीव जागांची तरतूद, जातीप्रथेला विरोध, वेठबिगारीला विरोध, स्त्रीशोषणाला विरोध करून वेगवेगळे कायदे अस्तित्वात आणून सामाजिक सुधारणा, बंधुभाव, शिक्षण, कृषी, उद्योग व कला या क्षेत्रात केलेले लोककल्याणकारी कार्य बहुजन समाजाला न्याय हक्क देण्यास उपयुक्त आहे. त्यामुळे अशा राष्ट्रपुरूषाच्या कार्याची दखल घेतल्याशिवाय इतिहास पूर्ण होवू शकत नाही. म्हणून या थोर माणसाच्या विचार व कार्याला समाजापर्यंत पोहचविणे आवश्यक आहे. याकरिताच हा लेखनप्रपंच!

    Rajrshi Shahu Maharaj : Vyaktitva, Kartutva Ani Vichar

    225.00
    Add to cart
  • लष्करी विचारवंत

    प्राकृतिक घटकांच्या अनुषंगाने ठरविलेले संरक्षणविषयक धोरणक्षेत्र विचार म्हणजेच सैनिकी विचार होत. सैनिकी शक्ती, सुरक्षेच्या हमी किंवा संरक्षणाच्या योग्य व्यवस्थेशिवाय राष्ट्रीय अस्तित्व टिकू शकत नाही. त्याचा मूलभूत स्त्रोत म्हणजे आपले विचारवंत होत. विचारवंत हे अर्थशास्त्रज्ञ, राजनीतीज्ञ, समाजसेवक, भूगोलतज्ञ, उद्योगपती किंवा लढवैय्ये योद्धा असतील, त्या सर्वांच्या सारासार विचारसरणीतून देशाचे भवितव्य साकारते. देशाची प्रगती, स्थैर्य, शांतता व स्वातंत्र्य अबाधित राहते. प्रस्तुत लिखाणात पाश्चात्य विचारवंताबरोबर पौर्वात्य विचारवंतही विचारात घेतले आहेत. शिवाय सर्व प्रमुख महान भारतीयांची भूमिका स्पष्ट करण्याचा प्रयत्न केलेला आहे. प्रामुख्याने कौटिल्य, श्री छत्रपती शिवाजी महाराज, लोकमान्य टिळक, मोहनदास गांधी, सरदार वल्लभभाई पटेल, वि.दा. सावरकर, पं. नेहरु, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, नेताजी सुभाषचंद्र बोस, लालबहादूर शास्त्री, शहीद भगतसिंग, इंदिरा गांधी, श्री अटलबिहारी वाजपेयी, फील्ड मार्शल सॅम, माणेकशा, डॉ. एपीजे अब्दुल कलाम यासारख्या देशहितवादी विचारवंतांच्या विचाराचा समावेश असून जनरल सन्त्जू, मॅकियाव्हेली निक्कोलो, गुस्तावस एडाल्फ पासून तर कॅप्टन सादत आणि इसाकू साटो पर्यंतच्या पाश्चात्य विचारवंतांचाही समावेश केला आहे.

    Lashkari Vicharwant

    395.00
    Add to cart
  • लोकसेवक – महात्मा गांधी आणि पंडित नेहरु यांचे समग्र तत्त्वज्ञान

    सत्याग्रह, सविनय कायदेभंग, सत्य, अहिंसा अशा विवेचक स्वरुपाचा ‘विधायक कार्यक्रम’ महात्मा गांधी यांनी जगाला दिला. जगभर ‘राडा आंदोलने’ करणार्‍या सर्वांसाठी महात्मा गांधी यांनी उभी केलेली जन आंदोलने प्रेरक ठरावीत. व्यक्तीदोष दाखविण्यापेक्षा अथवा व्यवस्था परिवर्तनापेक्षा त्यांनी जीवनमूल्ये सजविणारी आंदोलने केलीत.
    पं. नेहरू हे महात्मा गांधी यांचे अनुयायी होते स्वतंत्र भारताची लोकशाही राष्ट्र म्हणून नेहरुंनी जगात ओळख निर्माण करून दिली. त्यांचे हे कार्य अतुलनीय स्वरुपाचे असे आहे. उपरोक्त दोघेही महापुरूष हे खरेखूरे लोकसेवक होते. प्रा. भुषण काटे-पाटील व प्रा. अमर जावळे यांनी संपादित केलेल्या ‘लोकसेवक’ या ग्रंथास हार्दिक शुभेच्छा!

    – प्रा. शिवाजीराव अ. पाटील, अध्यक्ष, प्राध्यापक महासंघ, महाराष्ट्र राज्य

    Loksevak – Mahatma Gandhi Ani Pandit Nehru Yanche Samagra Tattvadnyan

    275.00
    Add to cart
  • वर्तमान परिस्थितीत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांची आवश्यकता

    ‘जनतेचे सरकार, जनतेसाठी सरकार व सरकार जनतेचे’ हा सिद्धांत आपण टिकविण्यासाठी निर्धार केला पाहिजे. त्यासाठी आपल्या मार्गात येणार्‍या वाईट गोष्टी, अडथळे ओळखण्यात वेळ दवडता कामा नये. जेणेकरुन आपण आपल्या लोकांना जनतेसाठी सरकार ऐवजी जनतेचे सरकार ही भूमिका स्वीकारायला भाग पाडू. अयोग्य सरकारे हलविण्यात आपण दुबळे राहणार नाही. हाच एक देशसेवा करण्याचा मार्ग आहे. यापेक्षा चांगला मार्ग मला माहीत नाही.

    26 जानेवारी 1950 रोजी भारत एक लोकशाहीवादी देश होईल. याचा अर्थ, या दिवसापासून भारतात लेकांचे सरकार असेल, लोकांनी चालविलेले सरकार असेल, व लोकांसाठी सरकार असेल. पुन्हा तोच विचार माझ्या मनात घोळत राहतो, भारताच्या लोकशाहीवादी घटनेचे काय होईल…? भारतीय लोक ही घटना अबाधित ठेवतील काधधध? का ही घटना नष्ट होईल…? हा विचार माझ्या मनात येतो तेव्हा मी खूप चिंताग्रस्त होतो.

    – डॉ. बी. आर. आंबेडकर

    Vartaman Paristhitit Dr. Babasaheb Ambedkaranchya Vicharanchi Avashyakta

    650.00
    Add to cart
  • वर्तमान परिस्थितीत पंडित नेहरुंच्या विचारांची आवश्यकता

    भारतामध्ये आणि जगामध्ये इतरत्र धर्मांच्या नावाखाली चाललेल्या गोष्टी पाहून मला धर्माबद्दल घृणा येते. धर्म नेहमी अंधविश्वास, मतांधता इत्यादी गोष्टींना आश्रय देतो अशी माझी समजुत आहे. धर्म नेहमी भविष्य, परलोक इत्यादी संबंधी चर्चा करतो. परंतु ज्या जगात मी जगतो त्याविषयी मला प्रेम व आदर असल्यामुळे पार लौकिक जीवनाविषयी मी विचारही करीत नाही व ते मला आवडतही नाही.

    धर्मांमुळे जर राष्ट्रा-राष्ट्रात, व्यक्ती-व्यक्तीत संघर्ष निर्माण होणार असेल तर तो धर्म नसून धर्माचे भ्रष्ट स्वरुप आहे. धर्माचा विचार आणि मूल्यमापन हे नेहमी सामाजिक हिताच्या दृष्टीकोनातूनच व्हावयास पाहिजे.

    Vartman Paristhitit Pandit Nehrunchya Vicharanchi Avashykta

    495.00
    Add to cart
  • -10%

    वर्तमान परिस्थितीत महात्मा गांधीजींच्या विचारांची आवश्यकता

    Vartaman Paristhitit Mahatma Gandhijinchya Vicharanchi Avashyakta

    Original price was: ₹595.00.Current price is: ₹535.00.
    Add to cart
  • सद्यस्थितीत महात्मा गांधी, पंडीत नेहरु आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांची गरज

    भारतावर ब्रिटीशांचे सुमारे दिडशे वर्ष राज्य होते, भारत पारतंत्र्यात होता. या पारतंत्र्याच्या जोखडातून मुक्त करुन सामाजिक स्वातंत्र्य, मानवी स्वातंत्र्य मिळण्यासाठी राष्ट्राच्या स्वातंत्र्यासाठी महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरु, लोकमान्य टिळक, सरदार वल्लभभाई पटेल, लाला लजपतराय, बिपीन चंद्रपाल, उमेशचंद्र बॅनर्जी, दादाभाई नौरोजी, नामदार गोखले, फिरोज शहा मेहता आदिंनी मोठे योगदान दिले. 1920 नतरंच्या काळात भारतीय स्वातंत्र्यासाठी महात्मा गांधींकडे नेतृत्व आले. त्यांनी सत्य, अहिंसा, प्रेम, असहकार, हरताळ, उपोषण, स्वदेशी, परदेशी मालावर बहिष्कार, मिठाचा सत्याग्रह अशा विविध अंगांनी महात्मा गांधींनी जनतेचं वैचारिक प्रबोधनाबरोबर कृतीयुक्त सहभाग करुन घेतला त्यामुळे राजकीय चळवळीत अधिकाधिक जनता सामिल होऊन आंदोलने तीव्र झालीत व ब्रिटीश राजवटीच्या चळवळीला शह दिला. पुढे अनेकांच्या प्रयत्नातून देशास 1947 मध्ये स्वातंत्र्य मिळाले. महात्मा गांधींवर ‘रस्कीन’च्या ‘Un to the Last’ या पुस्तकातील विचारांचा प्रभाव होता. तसेच टॉलस्टायच्या “तुमच्या हृदयात परमेश्वराचा निवास आहे” या विचारांचा प्रभाव होता. या तत्वज्ञानातच मानवतावाद आपणांस दिसतो. महात्मा गांधींनाही मानवतेचे पुजारी संबेधले जाते.

    सर्वच जगाने दुसज्या महायुध्दाचे भिषण परिणाम अनुभवलेले आहेत. विज्ञान व तंत्रज्ञानाने केलेल्या प्रगतीचा उपयोग केवळ मानवी कल्याणासाठीच व्हावा, विनाशासाठी नाही असे पंडित जवाहरलाल नेहरुंचे धोरण होते. म्हणून त्यांनी जागतिक शांततावाद, अलिप्ततावाद स्विकारुन पंचशिल तत्व जगासमोर ठेवलीत व साम्राज्यवादाला विरोध केला. यातून पंडित नेहरुंचे वैश्विक शांततेचं धोरण समाजाला त्यांच्यातील मानवतावाद लक्षात येतो. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी राज्य घटनेत स्वातंत्र्य, समता, बंधुता, प्रेम, न्याय व हक्क ही तत्वे सर्वांना दिलीत. त्यांनी सर्व धर्म, पंथं व जात यासाठी न्याय राज्यघटना बहाल केली. यातून त्यांची मानवतावादी दृष्टी लक्षात येते.
    महात्मा गांधी, पंडित नेहरु, डॉ. बाबासाहेब आंबेडकर या तिनही व्यक्ती मानवतावादी होत्या. मानवहित हेच त्यांचे जीवन होते. आज सर्व जगाला दहशतवादाने जेरीस आणले आहे. भारतात दहशतवादा बरोबरच नक्षलवादानेही तोंड वरती काढले आहे. तेव्हा सर्वच राष्ट्रांनी अशा विघातक शक्ती घालविण्यासाठी प्रयत्नशील राहून शांततामय जीवन जगणे आवश्यक आहे. म्हणून संयुक्त राष्ट्र संघाच्या (णछज) जबाबदारी बरोबर प्रत्येक राष्ट्राचीही मोठी जबाबदारी आहे. सर्वच राष्ट्रांनी सत्य, अहिंसा, प्रेम व मानवतावाद याचा अवलंब केला तरच जागतिक शांतता स्थापित होईल, अन्यथा अखिल मानवजात विज्ञान व तंत्रज्ञानाच्या अयोग्य, अविचारी वापराने धोक्यात येईल. म्हणून महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरु व डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे जीवन चरित्र व कार्य जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी, विद्यार्थी व सुजाण नागरिक घडविण्यासाठी ते अभ्यासून अधिकाधिक कृतीत येणे गरजेचे वाटते.

    Sadyasthitita Mahatma Gandhi, Pandit Nehru Aani Dr. Babasaheb Ambedkar

    475.00
    Add to cart