-
वातावरण
पृथ्वीच्या पृष्ठभागावर, वातावरणात आणि पृथ्वीच्या अंतरंगात जे काही सामावलेले आहे त्या सगळ्यांचा समावेश पर्यावरणात होतो. यामध्ये जमीन, हवा, पाणी निरनिराळ्या वायूराशी, सर्व वनस्पती, सर्व सजीव, खनिजे, नैसर्गिक वायू, खनिजतेल इत्यादींचा समावेश होता. पर्यावरणातील सजीव घटकांपैकी मानव हा एक महत्त्वाचा घटक आहे. पृथ्वीवरील वातावरणामध्ये प्राणवायुशिवाय अन्यही घटक आहेत. हवेमध्ये सुमारे 80 टक्के नत्रवायु असून बाकी उरलेल्या 20 टक्केमध्ये प्राणवायु सुद्धा आहे.परंतु पर्यावरणाच्या केंद्रस्थानी स्वत:ची स्थिती कायम ठेवून मानवाने नैसर्गिक संतुलन बिघडविण्यास सुरूवात केलेली स्पष्ट दिसून येते. पर्यावरणाचे प्रदूषण दिवसेंदिवस वाढत्या स्वरूपाचे आहे.
प्रस्तुत पुस्तकात वातावरण परिचय, हवा-हवामान, वातावरणाचे घटक, संघटन, सूर्यप्रकाश आणि तापमान, सौरऊर्जा, तापमान वितरण, वायुभार आणि वारे, ऋतुमानानुसार परिवर्तन, भारपट्टे, वर्गीकरण, आर्द्रता आणि हवामानशास्त्रांचा उपयोगाचा समावेश झालेला दिसून येतो.Vatavaran
-
-
-
-
शाश्वतता आणि विकास
अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण व आरोग्य या मानवाच्या मूलभूत गरजा असून त्या पूर्ण करणारा विकास म्हणजे शाश्वत विकास होय. शाश्वत विकासात चैनीच्या गरजा अंतर्भूत नसतात. शाश्वत विकासाची संकल्पना व्यापक असून त्यात सर्व व्यक्तींच्या कल्याणाची कल्पना अभिप्रेत आहे. या शाश्वत विकासात केवळ वर्तमान पिढीचे कल्याण नसून भावी पिढ्यांच्या कल्याणाकरिता नियोजन व व्यवस्थापनसुद्धा अंतर्भूत आहे. विकासाची पद्धत अशी असली पाहिजे की, तिच्यामुळे भावी पिढ्यांच्या गरजा भागविणार्या क्षमतेस ठेच पोहचायला नको; तर ती अबाधित राहिली पाहिजे. त्या क्षमतेस धोका निर्माण होता कामा नये. वर्तमान काळातील पिढ्यांच्या गरजा पूर्ण करताना भावी पिढ्यांच्या गरजांकडे लक्ष ठेवून उपयुक्त साधनसंपदा त्यांच्यापर्यंत कशी अबाधित राहिल याकडेही लक्ष दिले गेले पाहिजे. असा विकास म्हणजेच शाश्वत विकास होय.
Shashwatata and Vikas
-
संपूर्ण पर्यावरणशास्त्र
विनाशाच्या पायरीवर उभ्या असलेल्या मानवाने पर्यावरण संदर्भात केलेल्या चुका सुधारण्यासाठी अत्यंत अत्यल्प वेळ बाकी आहे. पृथ्वीवरील तापमान वाढते आहे अन् धृवावरील बर्फ वितळू लागले आहे; समुद्री पाण्यातील तापमान बदलून प्रवाळ नष्ट होवू लागली आहेत, ओझोन छत्रीची घडी विस्कटली आहे, आपल्या सुखोपभोगात पर्यावरण संतुलनाकडे पाठ फिरवणार्या मानवाने पर्यावरण प्रदुषण वाढवून स्वतःच्या आणि अन्य सजीवसृष्टीच्या जीवाला धोका पोहचविलेला आहे. जैव विविधतेतील नष्ट होणार्या जाती-जमाती आणि त्यांचा मानवी जीवनावर होणारा प्रतिकूल परिणाम अभ्यासण्यासाठीच संपूर्ण पर्यावरण! जलसंपत्ती, वनसंपदा, प्राणीजीवन आणि परिसरातील आशावादी जीवनाची सुखद वाट जाणून घेण्यासाठीच संपूर्ण पर्यावरण… पर्यावरणशास्त्रातील परीक्षेत घवघवीत यश संपादनासाठीच संपूर्ण पर्यावरण….
Sampurna Pryavaranshastra
-
समग्र भूगोल
कोविड-19 च्या वाढत्या प्रसारामुळे भविष्यातील विद्यापीठीय परीक्षा ऑनलाईन होण्याची शक्यता आहे. ऑनलाईन परीक्षेचे स्वरूप वस्तुनिष्ठ वा बहुपर्यायी स्वरूपाचे असेल ही शक्यता गृहित धरून प्रस्तुत पुस्तकाची रचना करण्यात आली. नेट-सेट आणि स्पर्धा परीक्षेच्या परीक्षेतदेखील बहुपर्यायी स्वरूपाचे प्रश्न विचारले जातात म्हणून पुस्तकाची रचना करतांना महाराष्ट्रातील विविध विद्यापीठातील भूगोल विषयाच्या पदवी आणि पदव्युतर वर्गाच्या अभ्यासक्रम, नेट/सेट अभ्यासक्रम, संघ आणि राज्यलोकसेवा आयोग परीक्षा आणि इतर स्पर्धा परीक्षेच्या राज्यशास्त्र विषयाच्या अभ्यासक्रमाचा विचार करण्यात आला. भूगोल विषयावर विविध तज्ञांनी लिहिलेल्या संदर्भ ग्रंथांचा आधार घेऊन तसेच विद्यार्थ्यांच्या अडचणीत लक्षात घेऊन प्रस्तुत पुस्तकांची रचना वैशिष्ट्यपूर्णरित्या करण्यात आली.
प्रस्तुत पुस्तकात भारताचा भूगोल, हवामान, वनस्पती, प्राणी, वन/जंगले, जल, मृदा, खनिजे, वाहतुक व दळणवळण, उद्योगधंदे, जैवविविधता, सामान्य भूगोल, पर्यावरण, आपत्ती व्यवस्थापन, प्रात्यक्षिक भूगोल इ. विविधांगी मुद्द्यांचा घटकनिहाय समावेश केला आहे.Samgra Bhugol
-
साधन व जलसंपदा भूगोल
मानव हा पृथ्वीवरील नैसर्गिक पर्यावरणाचा एक महत्त्वाचा घटक असून त्याचे जीवन व अस्तित्व निसर्गावरच अवलंबून आहे. आपले जीवन अधिक सुखसोयीचे व सुरक्षीत होण्यासाठी मानव सतत प्रयत्नशील असतो. त्यासाठी तो निसर्गातील विविध प्रकारच्या वस्तू वापरतो. मानवाला निसर्गातून उपलब्ध झालेल्या विविध वस्तू किंवा पदार्थ म्हणजेच नैसर्गिक साधने होत. मानवाचे पर्यावरणाविषयी जसजसे ज्ञान वाढत गेले आणि त्याची तांत्रिक प्रगती होत गेली तसतसा पर्यावरणातील विविध घटकांचा वापर वाढला. आधुनिक काळात साधनसंपत्तीची संकल्पना अधिक व्यापक झाली असून त्यात संपूर्ण नैसर्गिक पर्यावरणाचा समावेश होतो.
पृथ्वीचा सुमारे तीन चतुर्थांश भाग म्हणजे सुमारे 71 टक्के भागावर जल तर 29 टक्के क्षेत्रावर भूभाग आहे. भूपृष्ठावरील एकूण जलसंपदेपैकी सुमारे 97 टक्के पाणी समुद्रात सामावले आहे. सागराचे पाणी खारट असल्याने त्याचा फारसा वापर करता येत नाही तर सुमारे 3 टक्के जलसाठा नद्या, तलाव, सरोवर व भूमीगत पाण्याचा म्हणजे गोड पाण्याचा आहे. पृथ्वीच्या निर्मिती/उत्पत्तीसोबत पाणी व पाण्यामुळे सजीव सृष्टीची निर्मिती झाली. जलसंपदेचा योग्य वापर व संवर्धन होण्यासाठी सन 2004 हे वर्ष ‘जल वर्ष’ म्हणून घोषित केले गेले.
सदरील पुस्तकात प्रत्येक मुद्यांचे विस्तृत विवेचन करण्याचा प्रयत्न केला आहे. विषयाच्या आकलनासाठी आवश्यक तेथे आकृत्यांचा वापर केला आहे. संज्ञा व संकल्पना सर्वांना समजतील अशा भाषेत मांडल्या आहेत.
Sadhan v Jalsampada Bhugol
-
-
सामान्य नकाशाशास्त्र
नकाशाशास्त्र ही एक कला असून मानवाद्वारे मिळालेल्या ज्ञानाच्या आधारे प्रकट होणारी एक मानवी अभिव्यक्ती आहे. सामान्यत: मानव ज्ञानाचे किंवा सूचनांचे आदान-प्रदान करण्यासाठी रेखाचित्र किंवा नकाशांचा उपयोग करीत असे, मानवाला भाषेचे ज्ञान अगोदर तो चिन्हे, संकेत, रेखाचित्रे व चित्रांचा उपयोग करीत असे. त्यामुळे नकाशाशास्त्र ही कला खूपच प्राचीन आहे हे स्पष्ट आहे.
जगातील वेगवेगळ्या संस्कृतीचा अभ्यास करतांना मानव हा नकाशांचा वापर खूप पूर्वी पासून करीत आला आहे. त्याचे उत्कृष्ट उदाहरण म्हणजे अनेक लेण्या, प्राचीन स्थळे, शहरे, गावे यांचे निरीक्षण केले असता यात चिन्हे व रेखाचित्रांचा वापर खूप मोठ्या प्रमाणावर केलेला दिसतो. यावरून आपल्याला कल्पना येते की, प्राचीन काळातील लोकांनी नकाशाशास्त्रांची रचना केली, त्याचा उपयोग ही मोठ्या प्रमाणावर करून नकाशाशास्त्राचा विकासही केला. आधुनिक काळात मानवाच्या विकासाबरोबरच नकाशाशास्त्राचा विकास होत गेला व तो इतक्या मोठ्या प्रमाणावर झाला की, सामान्य माणूस ही नकाशाशास्त्राचा वापर करू लागला आहे. हवाई छायाचित्र, दूरसंवेदन, उपग्रह प्रतिमा, भौगोलिक माहिती प्रणाली व स्थान निश्चिती प्रणाली, संगणक, मोबाईल, टेलिव्हीजन यावर नकाशाशास्त्राचा वापर मानव केल्याशिवाय रहात नाही.
Samanya Nakashashastra
-
सामान्य नकाशाशास्त्र
भूगोलशास्त्रातील एक महत्त्वाची शाखा म्हणून नकाशाशास्त्र ओळखली जाते. नकाशा हा भूगोलाचा आत्मा असतो. प्राचीन काळापासून नकाशाशास्त्राचा उपयोग व्यवहारात केला जातो. भूगोलशास्त्राप्रमाणेच नकाशाशास्त्र देखील गतिमान स्वरुपाचे आहे. विवि. कालखंडात नकाशाशास्त्राचा विकास होत आलेला असून आजच्या आधुनिक काळात नकाशाशास्त्राचे स्वरूप डीजीटल झालेले आहे.
मानवाच्या उत्क्रांतीच्या काळापासूनच नकाशाशास्त्राचा देखील टप्प्याटप्प्याने क्रमशः होत आलेला आहे. भारतातदेखील नकाशाचा वापर खूप पूर्वीपासून केला जात आहे. परंतु तत्कालीन नकाशाचे स्वरूप हे उद्दिष्टापुरते व अवगत ज्ञानाएवढेच मर्यादित होते. नकाशा तयार करण्याच्या तंत्रात अचूकपणा नव्हता. तरीदेखील भारतीय नकाशाशास्त्राला मोठा इतिहास होता. आधुनिक कालखंडात इ.स. अठराव्या शतकात ब्रिटीशांच्या अखत्यारित भारतीय नकाशाशास्त्राचा विकास झालेला दिसून येतो. भारताचा पहिला अचूक नकाशा इ.स. 1752 मध्ये तयार करण्यात आला. इ.स.1769 मध्ये लॉर्ड क्लाईव्ह यांनी बंगालचे सर्वेअर जनरल म्हणून नियुक्त केलेले जेम्स रेनेल यांनी त्रिकोणीकरण पद्धतीवर आधारित भारताचा अचूक नकाशा तयार केला.
इ.स.1905 मध्ये भारत सरकारच्या सर्वेक्षण विभागाने भारताचे 1 इंचास 1 मैल या प्रमाणावरील 3000 नकाशे तयार केले. हे नकाशे भारतीय स्थलनिर्देशक नकाशे म्हणून ओळखले जातात. असे नकाशे तयार करतांना त्यामध्ये अनेक सांकेतिक खुणा व चिन्हांचा वापर करण्यात आलेल आहे. पुढे जाऊन ब्रिटीश तसेच मेट्रीक मापन पद्धतीत या नकाशांची अधिकाधिक उत्तम निर्मिती होऊ लागली. भारतीय अवकाश संशोधन संस्थाच्या माध्यमातून अनेक उपग्रह अवकाशात सोडून त्यांच्या माध्यमातून नवीन तंत्रज्ञानाच्या सहाय्याने (दूर संवेदन) उपग्रह प्रतिमांद्वारे आधुनिक व वैशिष्ट्यपूर्ण नकाशांची निर्मिती केली जात आहे.
Samanya Nakashashastra
-
सेट/नेट भूगोल (पेपर 2 व 3)
भूगोल विषयाच्या सर्वच उपशाखांची दर्जेदार व अचूक माहिती असलेले ग्रंथ प्रत्येक विद्यार्थ्याला विकत घेवून अभ्यासणे तसेच एकाच ग्रंथालयात ही सर्व ग्रंथसंपदा उपलब्ध असणे दुरापास्त आहे. तसेच भूगोलशास्त्रातील बहुसंख्य ग्रंथ इंग्रजी भाषेत उपलब्ध आहेत. त्यामुळे नेट/सेट/जे.आर.एफ. भूगोल विषयाची तयारी करणार्या मराठी भाषिक विद्यार्थ्यांंना अनेक अडचणींंना तोंंड द्यावे लागते. या सर्व अडचणींंचा सखोल विचार करुन एकाच ग्रंथात नेट/सेट परीक्षेच्या अभ्यासक्रमात समाविष्ट असलेल्या भूगोल विषयाच्या सर्वच उपशाखांची माहिती प्रासादात्मक भाषेत अचूकपणे उपलब्ध करुन देणे हा या पुस्तक निर्मितीचा प्रमुख उद्देश आहे. सदर पुस्तकात भूगोलशास्त्राच्या विविध शाखांतील संकल्पना व पाठयांश मांडणी अभ्यासकाला सहज अवगत होईल अशी करण्याचा परिश्रमपूर्वक प्रयत्न करण्यात आला आहे. तसेच आवश्यक त्या संकल्पना आकृतींंच्या साहाय्याने स्पष्ट केलेल्या असून त्या स्वत:लेखकांनी संगणकावर तयार केलेल्या आहेत. त्यामुळे त्या अधिक अचूकपणे तयार केलेल्या आहेत. सर्वांंना ज्ञात असलेल्या भूमीच्या भूगोलाची व्याप्ती अतिशय व्यापक असून त्यातील पाठयाशाची मांडणी मर्यादित पृष्ठांत करणे ही अशक्यप्राय बाब आहे. त्यामुळे सदर पुस्तकात नेट/सेट परीक्षेच्या अभ्यासक्रमातील सर्वच घटक विस्ताराने स्पष्ट करण्याऐवजी स्वयंअध्यापनानुभव व नेट/सेट परीक्षेतील प्रश्नांचे स्वयंअध्ययन व अवलोकन करुन अचूक पध्दतीने संक्षेपाने स्पष्ट करण्यावर भर देण्यात आलेला आहे. प्रत्येक घटका नंतर नेट/सेट प्रश्नसंचातील काठीण्य पातळीचा विचार करुन वस्तुनिष्ठ प्रश्न दिलेले असल्यामुळे विद्यार्थ्यांंना स्वअध्ययन करण्यास मदत होईल. त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांंचा प्रश्नसंच सोडविण्याचा सराव व्हावा म्हणून 900 प्रश्नांचा समावेश असलेले चार सराव प्रश्नसंचासह नेट व सेट परीक्षांचे दुसर्या व तिसर्या पेपरचे प्रश्नसंच उत्तरांसह समाविष्ट केले आहेत.
Set-Net Bhugol (Pepar 2 V 3)
-
हवामानशास्त्र
पृथ्वीवरील सजीवसृष्टी, पर्यावरण आणि मानवी जीवनाची सुरक्षितता या दृष्टीकोनातून हवामानशास्त्र अधिक महत्त्वाचे शास्त्र आहे. पर्यावरणातील संपूर्ण हालचाली, भुपृष्ठावरील घडामोडी, अवकाशातील अस्थिरता, जलभागातील प्रदुष्ण, वादळ-वारे, पाऊस आणि जागतिक तापमानातील वाढ इत्यादी सर्व घटकांचा आणि संकल्पनांचा समावेश ‘हवामानशास्त्रात’ केलेला आहे. फक्त सजीवांचे संरक्षण म्हणून नव्हे तर त्यांची उत्पादनशीलता, राहणीमान, उद्योगधंदे, व्यवसाय यातील सुखकारकता यासाठी सुद्धा हवामानशास्त्र उपयोगी ठरले आहे.
मराठी भाषीय विद्यार्थ्यांच्या निरनिराळ्या अभ्यासक्रमासाठी, स्पर्धापरीक्षा, नेट सेट आणि विद्यापीठीय स्तरावरील संशोधन व मार्गदर्शनासाठी हे पुस्तक निश्चितपणे उपयुक्त ठरेल. ओझोनचा होणारा र्हास, ग्लोबलवार्मिग यासारख्या सतत भेडसावणार्या समस्यांच्या निराकरणासाठी मार्गदर्शक म्हणून हवामानशास्त्रातील संकल्पना उपयुक्त आहेत. सर्व विद्यापीठातील अभ्यासक व शिक्षक यांना मार्गदर्शनासाठी ‘हवामानशास्त्र’ निश्चितपणे बहुगुणी ठरेल.Hawamanshastra
-
हवामानशास्त्र आणि सागरविज्ञान
पृथ्वीवरील सजीवसृष्टी, पर्यावरण आणि मानवीजीवनाची सुरक्षितता या दृष्टीकोनातून हवामानशास्त्र, अत्यधिक महत्त्वाचे शास्त्र आहे. पर्यावरणातील संपूर्ण हालचाली, भुपृष्ठावरील घडामोडी, अवकाशातील अस्थिरता, जलभागातील प्रदुषण, वादळ-वारे, पाऊस आणि जागतिक तापमानातील वाढ इत्यादी सर्व घटकांचा, संकल्पनांचा समावेश ‘हवामानशास्त्रात’ केलेला आहे. तसेच सागरीय भूस्वरूपे, सागरीजल गुणधर्म, सागरी जलाच्या हालचाली, सागरी किनारा महत्त्व इत्यादींचा समावेश सागरी विज्ञानात केलेला आहे. फक्त सजीवांचे संरक्षण म्हणून नव्हे तर त्यांची उत्पादनशीलता, राहणीमान, उद्योगधंदे, व्यवसाय यातील सुखकारकता यासाठी सुध्दा हवामानशास्त्र उपयोगी ठरले आहे.
मराठी भाषीय विद्यार्थ्यांच्या निरनिराळ्या अभ्यासक्रमासाठी, स्पर्धापरीक्षेसाठी, नेट सेटसाठी आणि विद्यापीठीय स्तरावरील संशोधनासाठी व मार्गदर्शनासाठी हे ‘हवामानशास्त्र’ व ‘सागरविज्ञान’ निश्चितपणे उपयुक्त आहे. ओझोनचा होणारा र्हास, ग्लोबलवार्मिग यासारख्या सतत भेडसावणार्या समस्यांच्या निराकरणासाठी मार्गदर्शक म्हणून हवामानशास्त्रातील संकल्पना उपयुक्त आहेत. सर्व विद्यापीठातील युवक युवतीसाठी अभ्यासक व शिक्षक मार्गदर्शनासाठी हे ‘हवामानशास्त्र’ व ‘सागरविज्ञान’ निश्चितपणे बहुगुणी आहे.Havamanshastra Ani Sagarvidnyan