• Covid-19 and The Indian Economy

    250.00
    Add to cart
  • Research Methodology

    395.00
    Add to cart
  • Research Methodology for Business

    The present reference book has been written with the objective to enable researchers in developing the appropriate methodology for their research studies. The book will also make them familiar with the art of using different research methods and techniques.
    Regarding the organization, the book consists of four broad chapters. Chapter one is about Introduction of Business Research, which includes the conceptual background of research, business research and research methodology. Chapter two has been exclusively devoted to concept of Research Problem, Hypothesis, Research Design and its related aspects. Chapter three explains the details of data collection, measurement, scaling and processing of data. It also consists of the detailed aspects of classification, tabulation analysis and interpretation of information. Chapter four dwells on various aspects of research report, mode of citation and bibliography.
    The new concepts in research methodology such as plagiarism, role of computers in research, application of statistical tools etc. are explained in understandable manner. Each chapter cover outline at the beginning which will give the brief idea of the topics covered in the chapter. The topics are arranged in numbered paragraphs. Detailed question bank at the end of each chapter is included. The efforts are made to include the authentic and latest material on this subject.

    295.00
    Add to cart
  • अर्थशास्त्रीय संशोधन पद्धती

    सामाजिक, आर्थिक, राजकीय आणि नैतिक स्वरूपाच्या घटना सातत्याने घडत असतांना त्यामध्ये कार्यकारण संबंध असतोच. पण असा संबंध सहजपणे आपल्या लक्षात येेत नाही. असा संबंध शोधून काढण्याचा प्रयत्न संशोधन कार्यात होत असतो. संशोधन कार्य करीत असताना उपस्थित असलेल्या प्रश्नांचा सातत्याने पाठपुरावा करणे, संकलित केलेल्या माहितीचे शास्त्रशुद्ध विश्लेषण करणे, त्याची पद्धतशीरपणे मांडणी करणे, त्याची अंमलबजावणी करणे, त्याची कारणमिमांसा करणे व त्याची उत्तरे शोधणे या सर्व प्रक्रियांचा समावेश संशोधन कार्यात होतो. संशोधनाद्वारे नवनवीन कल्पनांची मांडणी केली जाते. त्या अनुरोधाने सखोल पहाणी किंवा प्रयोग करून पूर्वी मान्य असणार्‍या अनुमानांना नवीन रूप दिले जाते. संशोधन हे प्रामुख्याने नवीन ज्ञानाची भर वेळोवेळी घालीत असते. अध्ययनाद्वारे निरीक्षणातून तुलना करून आणि प्रयोगातून सत्यता पडताळून पाहिली जाते.
    सदरील पुस्तकात संशोधनाच्या विविध संकल्पना, सिद्धांत व तंत्रे सर्वांना सहजतेने समजावीत यासाठी साध्या-सोप्या भाषेचा वापरासोबतच शास्त्रीय संकल्पनांच्या मूळ अर्थाला बाधा येणार नाही याचीही दक्षता घेतली आहे.
    सदरील पुस्तक हे विविध विद्याशाखांच्या संशोधक विद्यार्थ्यांसाठी, नेट/सेट तसेच विविध स्पर्धात्मक परीक्षांसाठीही उपयुक्त व मार्गदर्शक ठरेल यात शंका नाही.

    Arthashastriya Sanshodhan Paddhati

    275.00
    Add to cart
  • इतिहासातील संशोधन पद्धती

    इतिहासकार कसा असावा याबाबत महान इतिहासकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात,
    इतिहासकार हा काटेकोर, तळमळीचा आणि पंक्तिप्रपंच न करणारा असा असला पाहिजे. भावनाविरहित, आपुलकिची भावना, भीती, तिरस्कार किंवा प्रेमाची ओढ यांच्यापासून मुक्त असा असला पाहिजे. इतिहासाची जननी जी सत्यनिष्ठा ती त्याच्या रोमारोमात भिनलेली असली पाहिजे. महत्कृत्यांना सुरक्षित ठेवणारा, अंधाराचा संहार करणारा, पूर्वकाळाचा साक्षी आणि भावी काळाचा नेता असा असला पाहिजे. थोडक्यात सांगावयाचे म्हणजे अगदी रिकामे नसणारे नव्हे पण उघडे असणारे त्यांचे मन पाहिजे. खोटे-नाटे पुरावे जरी त्याच्या हाती लागले तरी त्या सर्व पुराव्यांची छाननी करण्याची त्याची तयारी पाहिजे म्हणजे सत्यानिष्ठा हा इतिहासाचा आत्मा असतो. डॉ. आंबेडकरांनी भारतीय इतिहासावर जे लिखाण केले ते वस्तुनिष्ठता व सत्यनिष्ठेने केले.

    डॉ. भीमराव रामजी आंबेडकर
    (शुद्र मूळचे कोण होते)

    Itihaas Sanshodhan Paddhati

    150.00
    Add to cart
  • बोलीभाषा संशोधनाच्या नव्या दिशा

    ‘बोली’ जगवण्याचे काम असाक्षर समूहाने कालखंडापासून अव्याहतपणे केले. किंबहूना त्यांच्या जगण्यातील संवेदनांचा आणि भावाभिव्यक्तीचा बोलीभाषा अविभाज्य भाग राहिला.
    बोलीचे सहज सोपे उच्चारण, त्यातील भावार्थांची प्रासादिकता निसर्गतःच समूहाला जोडणारी ठरली. अलीकडे काही अभ्यासक, संशोधक बोलीचे संशोधन करुन भाषाभ्यासाला नव्याने ऊर्जा देऊ पाहतात; ही बाब मानवी जीवनव्यवहार व विकासाच्या अनुषंगाने महत्वाची म्हणता येईल.
    माणसाच्या गतीशील जगण्याबरोबर बोली नष्ट होऊ नयेत; या पार्श्वभूमीवर बोलींच्या अभ्यासाचे प्रयत्न मला प्रकाश किरणांसारखे वाटतात !

    Bolibhasha Sanshodhanachya Navya Disha

    250.00
    Add to cart
  • राज्यशास्त्रातील संशोधन पद्धती

    संशोधन ही सतत चालणारी बौद्धिक प्रक्रिया आहे. या प्रक्रियेत जुन्या त्रुटी दूर करून नवीन वस्तुस्थिती कोणताही पुर्वग्रह मनाशी न बाळगता मांडली जाते. जे साध्य व सिद्ध करायचे असते यासाठी विशिष्ट साधनांचा अथवा रचनांचा भौतिकशास्त्रात ज्या पद्धतीने अवलंब केला जातो तोच फरक हा संशोधनाचे तंत्र व संशोधन पद्धतीमध्ये दिसून येतो. राजकीय अथवा सामाजिक संशोधनात संशोधनाचा अभ्यास, विषयाकडे पाहण्याचा दृष्टिकोन हा सर्वांचा सारखाच असत नाही. संशोधनात आपल्या उद्दिष्टाशी, दृष्टीकोनाशी नेहमीच कटिबद्ध रहावे लागते. हा दृष्टीकोन ऐतिहासिक, तुलनात्मक, विश्लेषणात्मक, रचनात्मक, कार्यात्मक यापैकी कोणताही असू शकतो. संशोधनात बुद्धीनिष्ठता, वस्तुनिष्ठता, तर्कशुद्धतेचा विशेष अवलंब केला जातो.

    सामाजिक शास्त्रातील संशोधनामध्ये संशोधकाचा संबंध हा वास्तविक घटनांशी तसेच सजीव व्यक्तीशी येत असतो. राज्यशास्त्रातील संशोधनामध्ये प्रतीकांची व तथ्यांची हाताळणी व पडताळणी सहेतुक पद्धतीने करावी लागते. विशिष्ट वस्तू किंवा व्यवस्थेविषयी, समस्येविषयी डोक्यात येणारी कल्पना म्हणजे ढोबळ मानाने संकल्पना होय. या संकल्पनेचे अवलोकन करून संशोधक निष्कर्ष काढत असतो. हे निष्कर्ष संशोधनाचे स्वरूप ठरविण्यासाठी महत्वाचे असते. संशोधनात कोणतीही घटना किंवा प्रसंग भावनेच्या चष्म्यातून पाहिला जात नाही. तर वारंवार त्याची पडताळणी केली जाते आणि मगच तथ्यापर्यंत पोहचता येते.

    सामाजिक परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घटनांची वास्तवता कशी शोधावी, राजकीय घटना अथवा घडामोडींचा अन्वयार्थ कसा लावावा, राजकीय सिद्धांताची मांडणी कशी करावी, राजकीय तसेच त्या अनुषंगाने सामाजिक स्वरूपाची गृहीतके कशी मांडावीत तसेच त्यांची पडताळणी करून निष्कर्षाची मांडणी कशा पद्धतीने करावी यासाठी प्रस्तुत ग्रंथ उपयोगी आहेच त्याचबरोबर संशोधनाची ओळख, त्यांचे स्वरूप, संशोधनाची वैशिष्ट्ये, आव्हाने, समस्या व संशोधनाच्या पद्धती, त्याची गृहीतके तसेच ध्येय आणि उद्दिष्टांच्या माहितीचे स्पष्टीकरण यांचेही मुद्देसूद विवेचन शास्त्रीय पद्धतीने केले आहे.

    Rajyashastratil Sanshodhan Paddhati

    110.00
    Add to cart
  • शास्त्रीय संशोधन पद्धती

    नवीन आणि अनपेक्षित परिस्थिती संशोधकास संशोधन कार्य करण्यास प्रोत्साहित करते. जीवनातील कोणतेही कार्य असो ते पार पाडण्यासाठी प्रथम कार्याचे नियोजन तयार करावे लागते. आपल्या या नियोजनामुळे त्या कार्याला सुसूत्रता येते. त्या कार्याचे पद्धतशीर रचना, मांडणी ठरवावी लागते. वैज्ञानिक पद्धतीनुसार संशोधनाची सुरूवात समस्या सूत्रण किंवा विषय निवड करण्यापासून केली जाते. आणि शेवटी त्या संशोधनातून निष्कर्ष काढून त्याचा अहवाल तयार केला जातो. समग्रातील निवडलेल्या एककाच्या पाहणीवरून समष्टीबाबत सामान्य स्वरूपाचे निष्कर्ष काढता येतात. संशोधनाची उद्दिष्टे पूर्ण करण्यासाठी योजना आखणे, गृहीतकृत्य असेल तर त्याची चाचणी घेणे किंवा संशोधन प्रश्नाची उत्तरे मिळविणे या वेगवेगळ्या बाबींचा समावेश होतो. संशोधनात विविध नमुना निवड पद्धतींचा उपयोग नेहमीच केला जातो. सदरील पुस्तक हे विद्यार्थी, संशोधक तसेच अध्यापकांकरिता उपयुक्त ठरणार आहे.

    Shastriya Sanshodhan Paddhati

    150.00
    Add to cart
  • शैक्षणिक संशोधन शोध सारांश

    Shaikshanik Sanshodhan Shodh Saransh

    425.00
    Add to cart
  • संशोधन पद्धती

    संशोधनाचा एकंदरीत विचार करता, संशोधन म्हणजे काय ते प्रथम पाहायला हवे. माणसामध्ये एक उपजत कुतूहल प्रवृत्ती असते. आपल्या भोवतालच्या जगातील माणसे, वस्तू आणि घटना यांचे अस्तित्व माणसाला जेव्हापासून जाणवायला लागते, तेव्हापासून हे काय आहे, कसे आहे हे आपल्या ज्ञानेंद्रियांचा उपयोग करुन जाणून घेण्याची त्याची खटपट सुरु होते आणि हे जाणून घेणे म्हणजे संशोधन होय. संशोधनाला इंग्रजीत ’ठशीशरीलह’ म्हटले जाते. हा इंग्रजी प्रतिशब्द योग्यच आहे. ’ठशीशरीलह’ म्हणजे ‘पुन्हा शोध घेणे.’ थोडक्यात कोणत्याही ज्ञानशाखेत नवीन तत्त्वे अथवा तथ्ये शोधण्यासाठी आणि जुनी तथ्ये व तत्त्वे परीक्षणासाठी केलेला चिकित्सक व पध्दतशीर अभ्यास म्हणजे संशोधन होय. माणूस गोष्टींच्या संपर्कात यायला लागतो, नवीन माहिती मिळवायला लागतो, तसतसा तो नवीन माहितीची आधीच्या माहितीशी सांगड घालायला लागतो. मग त्याला त्याच्यात काही संबंध दिसायला लागतात. तो तुलना करु लागतो. नव्या व जुन्या गोष्टींत त्याला काही समान गुणधर्म आढळतात. तेव्हा तो त्यांना एका वर्गात घालतो. म्हणजे त्यांचे वर्गीकरण करतो. आणखी पुढे जाऊन त्याला असे आढळते की, भोवताली घडणार्‍या घटना काही क्रमाने घडतात. तसेच एखादी घटना घडली तरच पुढची घटना घडते. म्हणजे आधी घडलेली घटना कारण आहे तर नंतर घडलेली घटना तिचा परिणाम आहे हे कळते. कार्यकारण संबंध निश्चित करण्यासाठी तो अनेक वेळा तशीच निरीक्षणे वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या वेळी करतो, मगच त्याच्या मनात कारण-परिणाम संबंध प्रस्थापित होतो. म्हणजेच नव्याने उजेडात आलेल्या तथ्यांच्या आधारे प्रस्थापित, स्वीकृत निष्कर्ष व सिध्दांतांचे पुनर्परीक्षण करण्याच्या हेतूने चिकित्सक व सखोल चौकशी वा प्रयोगास संशोधन म्हणता येईल. सदरील ग्रंथात संशोधनाची सर्वांगाने चर्चा करण्यात आली आहे.
    सदरील ग्रंथ हा पदवी, पदव्युत्तर, एम.फील., पीएच.डी., एमपीएससी, यूपीएससी व सेट इत्यादी परीक्षांचे अध्ययन करणार्‍या विद्यार्थ्यांना व प्राध्यापकांना उपयुक्त ठरेल.

    Sanshodhan Paddhati

    675.00
    Add to cart
  • संशोधन पद्धती (प्री पीएच.डी. कोर्स वर्क व संशोधकांना उपयुक्त)

    संशोधन पद्धती हे संशोधन करण्याच्या तंत्राविषयी माहिती देणारे शास्त्र आहे. सामाजिक शास्त्रातील संशोधन हे विज्ञान शाखेतील संशोधनाइतकेच शास्त्रशुद्ध व अर्थपूर्ण व्हावे यासाठी संशोधनाच्या तंज्ञाची माहिती असणे आवश्यक आहे. मानसशास्त्र, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, इतिहास, राज्यशास्त्र इ. विषयांमध्ये अलिकडे संशोधनाचे महत्त्व वाढतच आहे. आधुनिक युगात आणि जगात संशोधनाला अनन्य साधारण महत्त्व प्राप्त झालेले आहे. तेव्हा संशोधन करतांना संशोधकाला संशोधन कार्याबद्दल माहिती व्हावी. संशोधन करताना संशोधकाला विषयाची पद्धतशीर माहिती असणे आवश्यक असल्यामुळे प्री पीएच.डी. अभ्यासक्रमाला भारतातील सर्व विद्यापीठामध्ये प्री. पीएच.डी. कोर्ससाठी सामाजिक संशोधन पद्धतीचा पेपर अनिवार्य केला आहे. तेव्हा मराठी माध्यमाच्या संशोधकांसाठी वस्तुनिष्ठ प्रश्नांसाठीच्या पुस्तकाची होणारी परवड लक्षात घेऊन हे पुस्तक निर्माण करण्याचा लेखकांचा प्रयत्न आहे.
    सामाजिक संशोधनात वस्तुनिष्ठता व तटस्थता राखणे तसे कठीण आहे, परंतु वैज्ञानिक पद्धतीचा अवलंब करून सामाजिक घटनांचे शासत्रीय पद्धतीने अध्ययन करून नवीन ज्ञान प्राप्त करणे शक्य होते. प्री पीएच.डी. च्या संशोधकांना संशोधनाचा मार्ग सुकर व्हावा यासाठी सामाजिक संशोधनासंबंधीचे ज्ञान सरळ व सोप्या पद्धतीने उपलब्ध व्हावे हाच उद्देश यामागे आहे. त्याचबरोबर संशोधन विषयक दृष्टीकोन या घटकांतर्गत येणार्‍या नेट सेट परीक्षेतील मागील प्रश्नपत्रिकेंमध्ये प्रश्नांचाही यात समावेश करण्यात आला आहे.

    Sanshodhan Padhati

    150.00
    Add to cart
  • संशोधन पद्धती आणि बौद्धिक संपदा

    नवीन अभ्यासक्रमावर आधारित संशोधन पद्धती व बौद्धिक संपदा हे पुस्तक विद्यार्थ्यांना संशोधन म्हणजे काय? संशोधन कसे व का करावे? संशोधनाच्या पद्धती कोणत्या? याचे सविस्तर ज्ञान देण्यास उपयुक्त असून संशोधन करताना संशोधकाने कोणत्या नियमाचे पालन करावे? कोणत्या बाबी लक्षपूर्वक हाताळाव्या याचे सविस्तर ज्ञान बौद्धिक संपदा या प्रकरणाद्वारे करून देण्यास पूरक आहे. तसेच पदवी व पदव्युत्तर शिक्षणाबरोबरच पीएच.डी. करताना संशोधनाबद्दल जे ज्ञान संशोधकांना आवश्यक असते. शोध प्रबंध तयार करताना कशाप्रकारे तयार करावा. प्रबंध तयार करताना आवश्यक घटक याची पूर्तता कशी करावी याविषयीचे ज्ञान, या सर्वांच्या पायऱ्या, याचे पूर्वज्ञान व पूर्वतयारी या पुस्तकातील प्रत्येक प्रकरणातून होणार असून सदर पुस्तिका विद्यार्थ्यांना, संशोधकांना तसेच प्राध्यापकांकरिता उपयुक्त ठरणार आहे.

    395.00
    Add to cart
  • संशोधन पद्धती संख्यात्मक आणि गुणात्मक

    एखादी समस्या वैज्ञानिक किंवा शास्त्रीय पद्धतीने व सुव्यवस्थितपणे सोडवणे म्हणजे संशोधन होय. संशोधन ही एक प्रक्रिया आहे. ही प्रक्रिया वस्तुनिष्ठ असते. या प्रक्रियेद्वारे प्रश्नांची उत्तरे शोधली जातात. समस्येची उकल केली जाते. प्रश्नांची उत्तरे शोधतांना किंवा समस्येची उकल शोधतांना वैज्ञानिक पद्धतीचा अवलंब केला जातो. प्रत्येक संशोधकाचा आपल्या संशोधनातून सत्य जगापुढे आणण्याचा प्रयत्न असतो. म्हणूनच योग्य, प्रमाणित मापन साधनाद्वारे माहिती संकलित केली जाते. माहिती संकलित करतानाही ती योग्य न्यादर्शाकडूनच व्हावी याची दक्षता ठेवली जाते. त्या माहितीच्या स्वरुपावरुन योग्य संख्याशास्त्रीय परिमाणांचा उपयोग केला जातो व त्यावरुन अचूक निष्कर्ष मांडण्याचा प्रयत्न असतो. यावरुन संशोधक सत्य शोधण्याचाच प्रयत्न करीत असतो. दैनंदिन जीवनातही आपण वैज्ञानिक पद्धतीच्या पायऱ्यांचा उपयोग करुन समस्या सोडवत असतो व त्या अनुषंगाने ज्ञान मिळवत असतो.
    प्रस्तुत पुस्तकात संशोधनाची संकल्पना स्पष्ट करून संख्यात्मक आणि गुणात्मक संशोधन पद्धतींचा उहापोह करण्यात आलेला आहे. संशोधन करण्यासाठी, संशोधन हा विषय शिकवण्यासाठी, संशोधनातील विविध संकल्पना समजवून घेण्यासाठी या पुस्तकाचा निश्चितच उपयोग होईल.

    Sanshodhan Paddhati Sankhyatmak Aani Gunatmak

    275.00
    Add to cart
  • संशोधन प्रकल्पाची लेखनपद्धती

    दैनंदिन जीवनात अनेक प्रश्न निर्माण होतात. त्यांच्याकडे दुर्लक्ष करुन चालत नाही. उलट ते प्रश्न सोडविण्यासाठी सदोदीत प्रयत्न करावे लागतात. प्रश्न जसे व्यक्तिसमोर निर्माण होतात. तसे सार्वजनिक संस्थापुढे, निरनिराळ्या संघटनापुढे, देशाच्या व राज्याच्या अथवा जिल्ह्याच्या अनेक विभागापुढे निर्माण होतात. तसेच ते विचारवंतापुढे, अभ्यासकांपुढे व विद्यार्थ्यांपुढे उभे राहतात.
    एखाद्या देशासमोर विषाणूजन्य व जीवाणूजन्य आजारांचे प्रश्न पुढे उभे राहतात, ते आजार बरे होण्यासाठी तो देश सतत प्रयत्न करीत असतो इ. प्रकारचे प्रश्न असतात. सरकारपुढे बेरोजगारी, शासकीय यंत्रणा कशी सुधारावी? धान्य उत्पादन कसे वाढवावे? कौशल्यपूर्ण शिक्षण कसे द्यावे? देशाला संरक्षणक्षम कसे ठेवावे? इत्यादी सारखे प्रश्न असतात. याउलट विचारवंतापुढे व विद्यार्थ्यांसमोर व्यक्तिव्यक्तित अपप्रवृत्ती का उफाळून येतात? असा प्रश्न उभा राहतो. या सर्व प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी पुष्कळ प्रकारे माहिती जमवून तिचे सूक्ष्म अवलोकन करुन एकंदर परिस्थितीचा साधक-बाधक विचार करून कारणे शोधावी लागतात व उपाययोजना करावी लागते, हे सारे ‌‘संशोधन’ असते.

    Sanshodhan Prakalpachi Lekhanpaddhati

    125.00
    Add to cart
  • संशोधन प्रक्रिया

    Sanshodhan Prakriya

    95.00
    Add to cart
  • -11%

    संशोधन मार्गदर्शिका

    संशोधन मार्गदर्शिका (पीएच.डी. कोर्सवर्क) यात मॅडरेट 1 संशोधन पद्धतीचे 10 मार्कचा सेमिनार तर 10 मार्कची असाइन्मेंट, मॅडरेट 2 मध्ये ओळख माहिती तंत्रज्ञानाची (ICT) याचे पाचही युनिटवर सेमिनार, असाईन्मेंट असून यातील एकच सेमिनार 50 मार्कांकरिता आहे. मॅडरेट 3 रिसेन्ट ट्रेड इन सब्जेक्ट यात सेमिनार, असाइन्मेंट असून यातील एक सेमिनार 50 मार्काकरिता आहे. मॅडरेट 4 रिव्हीव्ह ऑफ लिटरेचर यात सुद्धा सेमिनार व असाईन्मेंट आहे. मॅडरेट 5 यावर आपल्या अध्ययन विषयावर एक सेमिनार 50 मार्कांकरिता आहे व यावरच RRC करिता सिनोप्सीस आवश्यक आहे. प्रत्येक संशोधकासाठी पीएच.डी. मार्गदर्शिका हे एक उत्कृष्ट पुस्तक ठरणार आहे.

    Original price was: ₹225.00.Current price is: ₹200.00.
    Add to cart
  • साहित्य आणि समाजशास्त्रीय संशोधन

    शास्त्र (विज्ञान), समाजशास्त्र व साहित्यादी कला, अशा विविध मानवीजीवनाशी निगडित विद्याशाखा अस्तित्वात असून त्या एकमेकांत मिसळलेल्या दिसतात. कुठल्याही शाखेसाठी अमुक एक सर्वगामी व मूलगामी अशी संशोधन पद्धत निश्चित केलेली आढळून येत नाही, म्हणून काही विषयात झालेले संशोधनपर लेखन पाहिले, तर संशोधन हे एक शास्त्र असूनही अभ्यासकांमध्ये विरोधाभास आढळतो. तेव्हा काही संशोधनपर ग्रंथांचा समग्रतेने विचार करून संशोधक विद्यार्थ्यांसाठी व अभ्यासकांसाठी एक सुलभ सुटसुटीत असे ‌‘साहित्य व समाजशास्त्रीय संशोधन पद्धती’चे पुस्तक उपलब्ध होणे गरजेचे आहे. कारण संशोधन पद्धतीचा अभ्यास करताना एकाच पुस्तकात क्रमबद्ध, सूत्रबद्ध व परिपूर्ण अशी माहिती आढळून आलेली नाही. जसे- संशोधन पद्धती किती व कोणत्या? संशोधनाची संकल्पना व स्वरूप कसे? संशोधनाचे प्रकार नेमके किती व कोणते? व त्याचा क्रम कसा असावा?, या प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठीच उपलब्ध असलेल्या साधनसामग्रीचा अभ्यास करून हा ग्रंथ लिहिला आहे. साहित्य आणि समाजशास्त्रातील वेगवेगळ्या शाखांचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना उपयुक्त ठरेल, अशी मांडणी या ग्रंथात केलेली आहे.

    – प्रा. उन्नती संजय चौधरी

    150.00
    Add to cart