• 1975 नंतरचे मराठी नाटक : आशय आणि रचना

    नाटक ही समूहाने आस्वाद घेण्याची कला आहे. त्याच्या पाठ्याच्या आपल्याकडच्या जडणघडणीच्या प्रेरणा मात्र केवळ पाठ्याच्या एकेक एकेकट्याच्या आस्वादनाच्या असल्यामुळे आपल्याकडे सशक्त असे मंचित पाठ्य निर्माण होऊ शकले नाही. अशा प्रकारे नव्वदपूर्वीच्या मराठी नाटकामध्ये शब्द आणि प्रयोगामध्ये त्याचा उच्चार पर्यायाने वाचिक अभिनय महत्त्वाचा ठरला. सत्तरोत्तर रंगभूमीचे अवलोकन केले असता शब्दाचे महत्त्व कमी झालेले दिसून येते. पण त्याचे कारण या काळात सशक्त असे मंचित पाठ्य निर्माण झाले एवढेच फक्त नाही.

    – प्रा. डॉ. प्रवीण भोळे,
    विभाग प्रमुख, ललित कला केंद्र, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे

    1975 Nantarche Marathi Natak : Ashaya Ani Rchana

    450.00
    Add to cart
  • अण्णाभाऊ साठे साहित्य व समीक्षा

    कथा, कादंबरी, लोकनाट्य, प्रवासवर्णन अशा विविध साहित्य प्रकारांची ओळख अण्णाभाऊंच्या लेखनातून प्रकर्षाने होते. समाज प्रबोधन हा प्रधान हेतू असला तरीही त्यांच्या लेखनाचा वास्तव गाभा म्हणजे उपेक्षित, शौषित वर्गाच्या वेदनेला हुंकार देणे हाच आहे.

    मानवी जीवनातील संघर्ष, भूकेची व्याकूळता,ख हीनत्वाची भावना, सन्मान आणि स्वाभिमान इ. चा मिलाफ अण्णाभाऊंच्या साहित्यातून होतांना दिसतो. स्वातंत्र्य, बंधुता, न्याय आणि समताधिष्ठित समाजव्यवस्थेची रचना अण्णाभाऊंना अपेक्षित आहे.

    Annabhau Sathe Sahitya V Samiksha

    120.00
    Add to cart
  • अधांतर एक आकलन

    Adhantar Eka Aakalan

    95.00
    Add to cart
  • अर्वाचीन मराठी वाङ्मयाचा इतिहास (प्रारंभ ते 2000)

    महाराष्ट्रात इ.स. 1818 मध्ये पेशवाईचा अस्त होऊन इंग्रजी सत्तेचा उदय झाला. इंग्रजांनी महाराष्ट्रात सत्ता प्राप्त केल्यानंतर नवे शैक्षणिक धोरण अंमलात आणले. शिक्षण प्रसारासाठी नव्या शिक्षण संस्था निर्माण केल्या. शाळांची निर्मिती केली. एत्द्देशियांना शिक्षण देण्यासाठी, धर्म प्रचारासाठी, विविध विषयांवरची पुस्तके निर्माण केली. विविध स्वरुपात, प्रकारात धार्मिक वाङ्मय मराठी भाषेतून निर्माण केले. अर्वाचीन मराठी वाङ्मयाच्या इतिहासात प्रारंभ काल हा साधारणत: इ.स.1818 मानला जातो. त्याची उत्तर सीमा विष्णुशास्त्री चिपळूणकरांच्या इ.स. 1874 साली सुरु झालेल्या निबंधमाला’पर्यंत संबोधली जाते.

    इ.स. 1818 नंतरच्या अर्वाचीन मराठी वाङ्मयात इंग्रजी शिक्षणाच्या नव्या जाणिवांबरोबर, जुने वाङ्मय प्रकारही नव्या स्वरुपात साकार झाले. शिक्षणाचा प्रसार, मुद्रणाची व्यवस्था, वाचनाची आवड यांचा परिणाम म्हणून वाङ्मयाची सतत वाढ होत गेली. वाङ्मयाच्या क्षेत्रात नवे विचार, नवे सिद्धांत, नवे संप्रदाय, साहित्य विचार निर्माण झाले. बदलणार्‍या गतीमान मानवी जीवनाबरोबर साहित्याचे स्वरुपही पालटले. मराठी वाङ्मयाची कथा, कादंबरी, चरित्र, आत्मचरित्र, नाटक, कविता, साहित्य विचार, समीक्षा विचार इत्यादी प्रकारात विपूल प्रमाणात निर्मिती होत गेली. वाङ्मय प्रवाहात ग्रामीण, दलित, आदिवासी, स्त्रीवादी, मुस्लिम साहित्य, ख्रिश्चन साहित्य, जनवादी साहित्य इत्यादी प्रवाहान्वये निर्मिती झाली.

    मराठी वाङ्मयात विविध प्रकार आणि प्रवाहांमुळे निर्माण झालेल्या साहित्याने विपुलता आलेली आहे. भूतकाळाच्या पार्श्वभूमीवर आजचा वर्तमान आहे. आजचा वर्तमान हा उद्याचा भूतकाळ आहे. काळ हा अखंड आहे. माणूस हाच प्रारंभ असून, विश्वाच्या पाठीवर माणूस असेपर्यंत वाङ्मय निर्मिती आहे. त्यामुळे वाङ्मयाचा शेवट अज्ञात आहे; असे म्हणणे अतिशयोक्त होणार नाही.

    अर्वाचीन कालखंड सुमारे दोनशे वर्षांचा आहे. प्राचीन कालखंडाच्या मानाने तसा लहान आहे. तरीही ह्या कालखंडात विविध प्रवाह, प्रकारांनी विविधापूर्ण वाङ्मय निर्मिती झालेली आहे. महाराष्ट्राच्या वाङ्मयीन समृद्धतेचा, विपुलतेचा विवेचक परामर्श घेण्याच्या हेतु:स्तव म्हणजेच सदरील पुस्तक लेखन होय.

    Arvachin Marathi Wagmayacha Itihas

    375.00
    Add to cart
  • अशोक पवारांच्या ‘दर कोस दर मुक्काम’, ‘पडझड’ आणि ‘तसव्या’ कादंबरीतील जीवनजाणिवा

    अशोक पवारांनी आपल्या साहित्यातून केवळ बेलदार, पारधी, गावोगावी जाऊन रेडिओ विकणारे, वडार, भविष्य सांगणारे ज्योतिषी, बहुरूपी, भीक मागणारे यांचेच प्रश्न मांडले नाही तर इथले भ्रष्ट राजकारण, सामान्य जनतेला लुटणारे पुढारी, स्त्रियांची अब्रू लुटणारी वासनांध पुरुषप्रवृत्ती, स्त्रीचे अगतिक होऊन जगणे यासारख्या समस्यांनाही वाचा फोडली. त्यामुळे प्रस्थापित साहित्यापेक्षा पवारांचे साहित्य निश्चितच वेगळ्या अंगाचे आणि ढंगाचे ठरले.
    चार-सहा शब्दांची ठसठशीत वाक्यरचना, डोक्याला आणि मनाला सून्न करून सोडणारे अनुभव आणि बाह्य जगातील माणसांची इथल्या संस्कृतीशी बांधलेली परंपरागत वेदना या सार्‍या परिपाकातून पवारांच्या भेदक साहित्याची उभारणी झाली आहे. मानवतावादाची एक सच्ची तळमळ त्यांच्या हृदयात पेटताना दिसते.

    – डॉ. अनंता सूर

    Ashok Pawaranchya ‘Dar Kos Dar Mukkam’, ‘Padjhad’ ani ‘Tasavya’ Kadambaritil Jeevanjaniva

    225.00
    Add to cart
  • अशोक पवारांच्या साहित्यातील लेखनविषयक जाणिवा आणि बोलीभाषा

    साहित्य कृतीतून ज्यावेळी अशोक पवार अभिव्यक्त होतात त्यावेळी मानवाच्या अस्सल जगण्याची प्रतिकृतीच जणू नजरेसमोर ठेवत आहेत असे वाटते. त्यातील एकेक अनुभव वाचकाला देहभान विसरून मेंदूला हादरे देऊ लागतो. इतकी कल्पनाबाह्य आणि मरणालाही न भिता ही माणसं कशी जगत असेल या विचारांनी वाचकाचे मन कासावीस करून सोडते. मनाची ही अस्वस्थताच जिथे वाचकाला विचार करावयास भाग पाडते तेच साहित्य ‘अक्षर साहित्य’ ठरत असते.
    अशोक पवारांचे साहित्य हे याच पठडीतले आहे. त्यामुळे क्षणार्धात ते वाचकांच्या मनाचा ठाव घेते. एकेका माणसाचे अनुभव जाणून घेण्यास ते वाचकाला बाध्य करते.

    – डॉ. अनंता सूर

    Ashok Pawaranchya Sahityatil Lekhanvishyak Janiva Aani Bolibhash

    195.00
    Add to cart
  • आधुनिक मराठी वाङ्मयाचा विश्लेषणात्मक इतिहास (1920 ते 1960)

    आधुनिक मराठी वाङ्मयाचे परिशीलन करण्याचे विविधांगी प्रयत्न आजवरच्या अनेक अभ्यासकांनी केलेले असतांना पुन्हा या वाङ्मयेतिहासाचा धांडोळा घेण्याचे प्रयोजन तसे केवळ नैमित्तिक नाही.
    येथल्या विश्लेषणाचे नमुनेदाखल एकच उदाहरण द्यावेसे वाटते. बहिणाबाईच्या कवितेची बोली अभ्यासकांच्या मते अहिराणी ही आहे. मात्र, वस्तुस्थिती तशी मुळीच नाही. बहिणाबाईची काव्यगत बोली अहिराणी नाहीच हे येथे सप्रमाण मांडले आहे. आजवर मान्यवर समीक्षकांनी जोपासलेला बहिणाबाईंच्या काव्य बोली संदर्भाती भ्रम जर या ग्रंथिकेने दूर केला तर लेखकाचे श्रम सार्थकी लागतील.

    Adhunik Marathi Vangmayacha Visleshanatmak Itihas (1920 to 1960)

    195.00
    Add to cart
  • आधुनिक साहित्य : स्वरूप आणि समीक्षा

    वाचकांमधून चांगल्या समीक्षकांची निर्मिती होत असते. चांगला समीक्षक हा काही वेळेला सहित्यिकही असू शकतो. परंतु तो साहित्यिकच असला पाहिजे असे काही बंधन नाही. परंतु साहित्यिक असणार्‍याच्या संवेदनेच्या पार्श्वभूमीवर आस्वादकता तीव्र असल्यावर तो साहिथतयकांवर अवाजवी टीका करणार नाही, असा एक समज असतो. नाहीतर समीखक साहित्यिकांचा विरोधकच आहे, असे स्वरुप निर्माण करण्याचा प्रयत्न करतांनाही काही मंडळी दिसतात. अलीकडे तर काही साहिथत्यकांचे आणि समीक्षकांचे कंपू तयार होत असून ते एकमेकांची अकारण ‘वाहवाऽऽ’ करीत सुटले आहेत. त्यामुळे अस्सल आणि प्रज्ञावंत साहित्य उपेक्षित राहण्याचा धोका निर्माण झाला आहे.

    Aadhunik Sahitya Swarup Aani Samiksha

    325.00
    Add to cart
  • आंबेडकरी निष्ठेचा विचारवाहक वामनदादा कर्डक

    अनंता सूर या नव्या दमाच्या अभ्यासकाने संपादित केलेले ‌‘आंबेडकरी निष्ठेचा विचारवाहक: वामनदादा कर्डक’ हे पुस्तक प्रकाशित होत आहे ही अत्यंत आनंददायी घटना आहे. वामनदादांच्या जन्मशताब्दी वर्षाचा संदर्भ या संपादनाला आहे. हे मौलिक संपादन करून अनंता सूर यांनी वामनदादांना कृतज्ञतापूर्वक अभिवादनच केलेले आहे. या मौलिक कार्यासाठी मी त्यांना धन्यवादही देतो आणि त्यांचे अभिनंदनही करतो.
    वामनदादा महाप्रतिभावंत होते. बाबासाहेबांचे इहकेंद्री समन्यायी तत्त्वज्ञान त्यांनी लोकांच्या मनांमध्ये प्रस्थापित केले. आंबेडकरी चळवळीतील चढउतारही त्यांनी जिवाच्या आकांताने मांडले. बाबासाहेबांनी उभारलेल्या संग्रामात त्यांनी महायोद्ध्याची भूमिका केली. बाबासाहेबांच्या चळवळीतले ते सौत्रान्तिक महाभिक्खू होते. त्यांच्या हयातीतच वामनदादा एक अनोखी आणि तेजःपुंज महाआख्यायिका झाले होते. या महाआख्यायिकेचा वेध घेणारे अनेक मान्यवरांचे लेख वाचकांना या पुस्तकात वाचायला मिळतील. या लेखांसोबतच वामनदादांचे साहित्य संमेलनाचे अध्यक्षीय भाषण आणि वामनदादांसंबंधीच्या दोन मुलाखतीही या पुस्तकात वाचायला मिळतील.
    या मौलिक पुस्तकाचे संपादक अनंता सूर यांना वामनदादांचे सर्वच चाहते मनापासून धन्यवाद देतील ही खात्री मला आहे.

    – यशवंत मनोहर

    350.00
    Add to cart
  • इच्यार करीसन रे भो!

    विविध प्रदेश बोलींनी मराठी भाषेला समृद्धी प्राप्त करुन दिली आहे.उत्तर महाराष्ट्रातील अहिराणी ही महाराष्ट्राची एक महत्त्वाची बोली आहे. अहिराणीचीच सहोदर असणारी लेवा गणबोली हीसुद्धा या प्रदेशातील एक प्रमुख बोली आहे. समूहबोली म्हणून तिचे वेगळे असे स्थान आहे. व.पु.होले यांचे या लेखसंग्रहातील लेखन लेवा गणबोलीतच सिद्ध झालेले आहे प्रदेश लोकरीति, जीवनव्यवहार, परंपरा, संस्कृतिविषयीचे हे कथन आहे. वर्तमान समाजमनाचा कानोसा लेवाबोलीतून घेतला आहे. त्यासाठी त्यांनी त्यांच्या लेखनरूपात मानसपात्रांच्या ‌‘बोलण्या’तूून सद्यःकालीन समाजाची विविध चित्रे रेखाटली आहेत. विविध जोडगोळ्यांच्या बोलण्यातून वर्तमान समाजमन आणि त्यावरचे समाजभाष्य प्रकटलेले आहे. लेवा बोलीतील ही संवादचित्रे आहेत. ग्रामीण समाज, शेती, लोकव्यवहाराच्या गोष्टी यात सांगितल्या आहेत. या जशा समाजाच्या भद्र-अभद्रपणाच्या गोष्टी आहेत तशाच त्या शहाणपणाच्या बोधकथाही आहेत. स्त्रीकष्टाच्या व त्यांच्या गुणांच्या कथा आहेत. एका प्रदेशातील समकालीन समाजावकाशाचे दर्शन त्यातून होते.
    हा जीवनानुभव त्यांनी लेवाबोलीत संवादित केला आहे. जळगाव-बुलढाणा जिल्ह्यातील जिव्हाळकथनाने त्यास वैशिष्ट्यपूर्णता प्राप्त झाली आहे. ‌‘रे-भो’, ‌‘काभ्र’ अशा संबोधनरूपांनी हा भाषावकाश रचला आहे. ‌‘सन’,‌‘त’ व ‌‘ये’ कारान्त रूपांनी सजलेले हे कथन आहे.
    समाज, संस्कृती, प्रदेशविशिष्ट शब्दकळा, समूहनिर्मित सुलभ उच्चाररूपे व प्रादेशिक वाहती गद्यलय या बोलीत आहे. बोलीरूपे ही जशी त्या त्या प्रदेशाची संवादकथने असतात, तशीच ती मुख्य भाषेलादेखील संपन्न करत असतात. सांस्कृतिक संचित आणि लोकव्यवहार साठवून ठेवणारे हे प्रादेशिक बोलीकथन निश्चितच महत्त्वाचे आहे.

    – डॉ. रणधीर शिंदे

    Ichyar Karisan Re Bho

    295.00
    Add to cart
  • काटेरी पायवाट आकलन आणि आस्वाद

    अनंता सूर यांचे ‌‘काटेरी पायवाट’ हे एक महत्त्वाचे संघर्षशील आत्मकथन विदर्भातील शेतकऱ्यांच्या समस्या आणि बेरोजगारीची समस्या याविषयी धीटपणे आणि दाहक विचार मांडणारे जळजळीत लेखन आहे. शिक्षण व्यवस्थेतील भ्रष्ट्राचार, बाजारू वृत्ती, आणि मस्तवालपणा यांसारख्या कुप्रवृत्तीवर अनंतानी आपल्या अनुभवांच्या आधारे नेमकेपणाने बोट ठेवले आहे. सामान्य माणसांचा संघर्ष आणि चिवटपणे जगण्याची जिद्द याचे वर्णन या आत्मकथेत परखड आणि प्रांजळपणे व्यक्त झाले आहे.
    बेकारी आणि गरिबीशी झुंज देत लेखकाने जगण्याचा संघर्ष केलेला आहे. दहावीत गणितात दोनदा नापास होऊनही प्राध्यापक होण्यापर्यंतच्या पात्रतेचे उच्च शिक्षण तो घेतो. नौकरीअभावी नागपुरात सायकलने पाच नामांकित महाविद्यालयात तासिका तत्त्वावर काम करतो. प्रचंड उमेद आणि ऊर्जा घेऊन तो बेरोजगारीशी झगडत राहतो. म्हणूनच अनंताचे या आत्मकथनातील दुःख आणि दैन्य वाचतांना वाचक अंतर्मुख आणि आशावादी होतो हे या आत्मकथेचं यश आहे.

    – शरणकुमार लिंबाळे

    Kateri Paywat Akalan ani Aswad

    395.00
    Add to cart
  • काव्यगंध

    जीवनवास्तवातून वाट्यास येणाऱ्या अनुभवविश्वाच्या अंतरंगाचे अल्पाक्षरी पण भेदक काव्यात्म दर्शन घडविण्यासाठी कविता आकाराला येत असते. व्यक्तीच्या वैयक्तिक भावविश्वाच्या पडझडीपासून भोवतालच्या जगण्यातील अस्वस्थताजनक घटना-प्रसंगांपर्यंत अभिव्यक्तीचा पैस असलेली कविता विशिष्ट रचनाबंधातून प्रत्ययास येत असते. आत्मनिष्ठ भावकविता ते समाजनिष्ठ जीवनवादी कविता अशा भिन्न भिन्न जाणीवांच्या संपुटातून आकारास येणारी काव्यरचना त्या त्या कविव्यक्तिमत्त्वाच्या जीवनविषयक आकलनाचे, जीवनदृष्टीचे प्रत्यंतर देत असते. अशा अंगाने कविता समजून घेण्याची उत्सुकता विद्यार्थ्यांमध्ये निर्माण व्हावी या भूमिकेतून सदर पुस्तक सिद्ध झालेले आहे. बहिणाबाई चौधरी ते सुदाम राठोड असा आधुनिक मराठी कवितेचा सुमारे शतकभराचा प्रवास लक्षात आणून देणाऱ्या एकूण सोळा कवितांचे हे संपादन आहे. जीवनविषयक आणि काव्यविषयक विविधांगी जाणिवांची दृष्टी विद्यार्थ्यांच्या मनात पेरणाऱ्या या कविता प्रामुख्याने दीर्घरचनेच्या रूपबंधातून प्रत्ययास येतात. अभ्यासक्रमाच्या उद्देशाने सिद्ध झालेल्या पुस्तकाचा एक चांगला नमुना सदर पुस्तक प्रस्तुत करते.

    – आशुतोष पाटील

    195.00
    Add to cart
  • काव्यतरंग एक आस्वाद

    खानदेशला साहित्याचा वारसा प्राचीन काळापासून लाभलेला आहे. काळाच्या प्रत्येक टप्प्यावर यामध्ये निश्चितपणे चांगली भर पडलेली आहे. हा वारसा समृद्धपणे जतन करण्याचे काम आजची नवकवींची पिढी तितक्याच ताकदीने करत आहे. या नवकवींमध्ये अशोक सोनवणे, पांडुरंग सुतार, संजीवकुमार सोनवणे, चामुलाल राठवा व रावसाहेब कुवर हे अग्रणी आहेत. नव्या-जुन्यांचा चांगला मेळ घालून संवेदनशील, विचारप्रवर्तक, सामाजिक जाणीवांनी भरलेल्या, दुर्दैम्य आशावादाने प्रेरित असलेल्या या नवकवींच्या कविता निश्चितच आपल्याशा वाटतात. समकालीन जाणिवांचा अचूक वेध घेण्याचे, कवितेच्या कलात्मकतेची बाजू सक्षम असण्याचे, वाचकरसिकांना अस्वस्थ करण्याचे सामर्थ्य या खानदेशकवींच्या कवितेत निश्चितपणे आहे. खानदेशच्या या ‘काव्यतरंग : एक आस्वाद’ या पुस्तकात जुन्या-नव्या कवींचा समन्वय साधण्याचा निश्चितपणे प्रयत्न केला आहे. विद्यार्थ्यांच्या भावविश्वाला हे कवी निश्चितच ढवळून काढतील व ज्ञानाचा, संवेदनशीलतेचा नव्याने परिचय करुन देतील एवढी ताकद त्यांच्या कवितांमध्ये आहे. विद्यार्थी व शिक्षकांसाठी ही चर्चा नक्कीच उपयुक्त ठरेल. मराठी कवितेच्या प्रांगणातील खानदेशी कवींचे स्थान, एकूणच काव्य वाङ्मयातील स्थान याबद्दल काही एक निर्णय घेण्यास ही समीक्षा उपयुक्त ठरावी. याखेरीज काव्य: संकल्पना, स्वरूप, वैशिष्ट्ये, कवितेचे घटक, कवितेेचे प्रकार, मराठी कवितेची वाटचाल, खानदेशची काव्य परंपरा हा भाग उपयुक्त ठरावा, यासंबंधीची सखोल चर्चा सदरील पुस्तकात केली आहे.

    Kavyatarang Eka Aswad

    95.00
    Add to cart
  • काव्यांकुर आस्वाद आणि चिकित्सा

    मराठी कवितेला समृद्ध परंपरा आहे. कवितेच्या विविध प्रकारांनी मराठी कविता विकसित झालेली आहे. या प्रकारांमधून वैविध्यपूर्ण आशयसूत्रे आढळतात. प्रीतिभावना, निसर्ग जाणीव, सामाजिक जाणीव, राष्ट्रभावना ही काही महत्त्वाची आशयसूत्रे. या आशयसुत्रांनी प्रेरीत झालेल्या कवितांचे रसग्रहण ‘काव्यांकुर : आस्वाद आणि चिकित्सा’ या ग्रंथातून आलेले आहे. कविता हा मानवी चित्तवृत्ती चेतवणारा वाङ्मय प्रकार. अर्थाची विविध वलये तो निर्माण करतो. सदर समीक्षाग्रंथात ह्या अर्थवलयांना अक्षररूप देण्यात आलेले आहे.

    Kavyankur Aaswad Aani Chikitsa

    95.00
    Add to cart
  • खानदेश : साहित्य आणि संस्कृती

    प्रत्येक भौगोलिक प्रदेशाची एक संस्कृती विशिष्टता असते. त्या प्रदेशातील लोकपरंपरा, बोली, आध्यात्मिक आणि वैचारिक प्रभाव यांमधून ती आकाराला येत असते. त्या प्रदेशातील साहित्यनिर्मिती हा देखील त्याचाच एक भाग असतो. या भूमिकेतून ‘खानदेश’ या प्रदेशाचे पृथगात्म संस्कृतीविशेष संशोधन-अभ्यासाच्या प्रक्रियेतून उलगडून दाखविण्यासाठी पावले उचलणे आवश्यक आहे. प्रदेशविशिष्ट अस्मितांचा जागर करणे, एवढ्या संकुचित अर्थाने याकडे पाहणे उचित नाही. स्वसमाज-संस्कृतीचे निरीक्षण, परीक्षण करून पुनर्मूल्यांकन करण्याची दृष्टी त्यात अभिप्रेत आहे. या दिशेने व्यापक स्तरावरून आणि विविधांगांनी कार्यरत राहणे गरजेचे आहे. त्याचाच एक भाग म्हणून सदर पुस्तकाचा विचार करावा लागतो. खानदेशातील साहित्याच्या अभ्यासावर प्रकाश टाकणार्‍या या पुस्तकाच्या माध्यमातून ह्या प्रदेशाच्या सांस्कृतिक अभ्यासाला चालना मिळेल अशी अपेक्षा करायला हरकत नाही.

    – डॉ. आशुतोष पाटील

    Khandesh : Sahitya Aani Sanskruti

    325.00
    Add to cart
  • खानदेशचे मराठी साहित्य कथा आणि कथाकार

    ‘कथा’ हा आदिम साहित्यप्रकार आहे. शेकडो वर्षे मौखिक वाङ्मयात कथा जीवंत होती. भारतीय साहित्यात कवितेनंतर कथा हा वाङ्मयप्रकार मोठ्या प्रमाणात लिहिला गेला. मराठी साहित्यातही कथेला विशेष स्थान आहे. इंग्रजी वाङ्मयाच्या अनुकरणातून आलेल्या लिखित मराठी कथेला स्वतःचा चेहरा प्राप्त व्हायला बराच काळ जावा लागला.
    स्वातंत्र्यपूर्व कालखंडात वि.स. खांडेकर, ना.सी. फडके यांसारख्या कथाकारांनी मराठी कथेला लोकप्रियता मिळवून दिली. पुढे स्वातंत्र्योत्तर कालखंडात नवकथाकार गंगाधर गाडगीळ, जी.ए. कुलकर्णी यांनी कथेचा चेहरा-मोहराच बदलवून टाकला. ग्रामीण, दलित, आदिवासी, स्त्रीवादी अशा साठोत्तरी कालखंडातल्या विविध प्रवाहातील तसेच नव्वदोत्तर कालखंडातील कितीतरी कथाकारांनी मराठी कथेला नवा आशय-विषय देत एक नवा आयाम प्राप्त करून दिला.
    खानदेशातील कथाकारांचाही मराठी कथेला समृद्ध करण्यात खारीचा वाटा आहे. स्वातंत्र्योत्तर कालखंडापासून आजतागायत मराठी कथा वाङ्मयात महत्त्वपूर्ण योगदान असलेल्या बारा कथाकारांच्या कथांचा हा ऐवज म्हणजे खानदेशी मराठी कथा वाङ्मयाचा आरसा आहे.

    Khandeshche Marathi Sahitya : Katha & Kathakar

    150.00
    Add to cart
  • खानदेशचे मराठी साहित्य कवी आणि कविता

    या पुस्तकात खानदेशातील निवडक कवींच्या कविता आहे. हे सारे कवी स्वातंत्र्योत्तर कालखंडातील आहेत आणि साधारणपणे विसाव्या शतकाच्या अखेरीस आलेल्या जागतिकीकरणाच्या काळात लिहिणार्‍या कवींच्या पिढीपर्यंतचा विचार सदर संपादनात केलेला आहे. स्वातंत्र्योत्तर मराठी कवितेचा विचार केल्यास नवकवितेपासून ते नव्वदनंतरच्या कवितेपर्यंतच्या प्रवासात आकाराला आलेल्या कवींच्या कविता ह्यात आहेत. गणेश कुडे ते रावसाहेब कुवर या कविपरंपरेकडे या दृष्टीने बघता येते. पण हे बारा कवी व त्यांची कविता म्हणजे गेल्या सहा दशकांत खानदेशातून लिहिणार्‍या कवितेचे एक निवडक व प्रातिनिधिक दर्शन आहे. खानदेशातून लिहिल्या गेलेल्या आणि आजही लिहिल्या जाणार्‍या कवितेचा तो एक लहानसा भाग आहे. या अंगाने विचार करताना सदर संपादनातील निवडक कवींच्या कवितांकडे वळण्याआधी खादेशातील आधुनिक कवितेच्या परंपरेचे अवलोकन करणे अपरिहार्य ठरते.

    Khandeshche Marathi Sahitya Kavi ani Kavita 

    125.00
    Add to cart
  • खानदेशातील दलित साहित्य

    दलित साहित्यामध्ये कविता, कादंबरी, नाटक, जलसे या प्रकाराव्यतिरिक्त खानदेशी दलित साहित्यामध्ये वैचारिक लिखाणही झालेले दिसते. दलित साहित्याची थोरवी व दलित साहित्याची अटळ निर्मिती संदर्भात प्रा. सुषमा तायडे (अहिरे) आपल्या संशोधनांनी निष्कर्ष नोंदवतात, ‘दलित साहित्यातील अनुभवाची जी भूमी आहे. तिच्यावर अजून कोणी पाय ठेवला नव्हता तो प्रथम दलित साहित्यिकांनी ठेवला आहे. ह्या दाहक सामाजिक वास्तवाच्या रुपात काही बदल होत नाही. तोपर्यंत दलित साहित्याची निर्मिती अटळ व अपरिहार्य आहे. दलित साहित्य म्हणून जे लिहिले जाईल ते सर्व श्रेष्ठ साहित्य असे मी मानत नाही आणि कुणी तसे मानूही नाही पण एक मात्र निश्चित की मराठीला आंतरराष्ट्रीय दर्जा, मान्यता मिळवून देण्याची जबाबदारी ही निखालसपणे दलित साहित्यिकांवर येऊन पडलेली आहे.’ संशोधनांती हा काढलेला निष्कर्ष तंतोतत तर्कसुसंगत, यथोचित असून दलित साहित्यिकांना ही मोठी जबाबदारी आता पेलायची आहे. हे मात्र निश्चित!

    Khandeshatil Dalit Sahitya

    425.00
    Add to cart
  • खानदेशातील साहित्य

    खानदेशाला साहित्याची समृद्ध परंपरा लाभलेली आहे. विविध वाङ्मयप्रकार व प्रवाहात खानदेशी साहित्यिकांनी आपला ठसा उमटविलेला आहे. मराठीतील चौथा ज्ञानपीठ पुरस्कार डॉ. भालचंद्र नेमाडेंच्या रुपाने खानदेशाला मिळाला व कधीकाळी मराठी साहित्याच्या केंद्रस्थानी असलेला ‘खानदेश’ पुन्हा मराठी साहित्याच्या मुख्य प्रवाहात आलेला आहे. प्रारंभापासून आजतागायत या समृद्ध साहित्याची समीक्षा मात्र अभावानेच झालेली दिसून येते. त्यामुळे खानदेशी साहित्याच्या अभ्यासकांना अडचणी निर्माण होत आलेल्या आहेत. ‘खानदेशातील साहित्य’ हा ग्रंथ मात्र खानदेशी साहित्याच्या अभ्यासकांसाठी महत्वाचा ठरणार आहे.

    सदर संपादित ग्रंथात विषयाचे सर्वस्पर्शित्व विशेषत्वाने दिसून येते. उपेक्षित राहिलेल्या कवी, लेखक, वाङ्मयप्रकार, नियतकालिके, लोकवाङ्मय यांवर नव्या दमाच्या अभ्यासकांनी नव्याने टाकलेला प्रकाश निश्चितच कौतुकास्पद आहे.

    – डॉ. शिरीष पाटील

    Khandeshatil Sahitya

    350.00
    Add to cart
  • खानदेशातील साहित्य व समाजदर्शन

    खानदेशची भूमी ही साहितयक्षेत्रात संपन्न अशी भूमी आहे. यात बालकवींपासून तर आजच्या साहित्यिकांपर्यंत अनेक दिग्गज असे साहित्यिक निर्माण झालेत. या सर्व साहित्यिकांनी आपल्या लेखनाने खानदेशचे नाव अवघ्या देशात वाढवले आहे. या खानदेशातील साहित्यिकांचा अभ्यास हा संपूर्ण भारतात होत आहे हे विशेष. खानदेशचे सुपूत्र व नुकताच ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त साहित्यिक मा. भालचंद्रजी नेमाडे यांना साहित्यक्षेत्रातला प्रतिष्ठीत असा बहुमान प्राप्त झाला. अशा अनेकांनी आपल्या लेखणीने लेखन करुन खानदशाचे वास्तव व जिवंत असे वर्णन केले, त्यातून त्यांनी आपल्या जन्मभूमीचे ऋण फेडले आहे.

    या साहित्यिकांनी आपल्या लेखनातून या भागाच खरेखुरे असे चित्रण केलेले दिसून येते. यातूनच या भागातील शेतीची समस्या, बेरोजगारीची समस्या, येथील समाजजीवन यांचे सक्षम असे लेखन झाले आहे.

    Khandeshatil Sahitya v Samazdarshan

    195.00
    Add to cart
  • खारं आलनं

    Khara Aalan

    195.00
    Add to cart
  • गुलामगिरी मूल्य आणि अन्वयार्थ

    डॉ. कैलास वानखडे यांनी ‌‘गुलामगिरी : मूल्य आणि अन्वयार्थ’ हा ग्रंथ लिहितांना या ग्रंथातील मूल्यात्मकता आणि सामाजिकता यांची आस्वादक मीमांसा करण्याची जी वैचारिक भूमिका घेतली आहे, ती स्तुत्य असून; त्यामुळे ‌‘गुलामगिरी’ या ग्रंथांचे क्रांतिकारकत्व नव्या पिढीला पुन्हा ज्ञात होईल. प्रस्तुत ग्रंथाच्या माध्यमातून त्यांनी गुलामगिरी ग्रंथातील मूल्यदर्शनाचा प्रामुख्याने वेध घेतला आहे. कारण, हा ग्रंथ जोतीरावांच्या प्रगल्भ सामाजिक चिंतनातून साकार झालेला असून; तो केवळ हिंदू धर्मशास्त्राची चिकित्सा करत नाही तर तथागत बुद्धांनी दिलेल्या मूळ भारतीय संस्कृतीची मूल्ये रूजवितो. त्यामुळे सदर ग्रंथाला वैचारिक व वाङ्मयीन मूल्ये प्राप्त झाले. ही मूल्य केवळ मूल्य नाहीत तर ती जीवन सुखी करण्यासाठी उपकारक ठरलेली ‌‘मानवी जीवनमूल्ये’ आहेत, असे ठाम प्रतिपादन त्यांनी केले ते फार महत्त्वाचे ठरते. त्यामुळे ‌‘गुलामगिरी’ हा मूळ ग्रंथ समजून घेण्यासाठी ‌‘गुलामगिरी : मूल्य आणि अन्वयार्थ’ हा ग्रंथ वाचकांसाठी मार्गदर्शक वाटाड्या ठरणार आहे.
    डॉ. कैलास वानखडेंची तर्कशुद्ध मांडणी, समीक्षेची आस्वादकदृष्टी उत्तम आहे. यामुळे जिज्ञासू व चोखंदळ अभ्यासकांनी सदर ग्रंथ आवर्जून संग्रही ठेवावा, इतका संदर्भयुक्त आहे.

    – डॉ. अशोक रा. इंगळे
    सदस्य, मराठी अभ्यास मंडळ,
    संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ, अमरावती

    150.00
    Add to cart
  • चकवा एक आकलन

    ‘चकवा’ केवळ प्रांतविशिष्ट अनिष्ट रूढींबद्दल बोलणारी कादंबरी नाही.

    केवळ प्रांतीय आदिमजीवनाचे दर्शन घडविणारी कादंबरी नाही.

    आदिवासी साहित्य प्रवाहातील अवशिष्ट कादंबरी म्हणजे चकवा.

    स्त्रीवादाच्या प्रांगणात पहिल्यांदाच दाखल होणार्‍या सेवलीची करूणगंभीर कहाणी म्हणजे चकवा.

    विज्ञानयुगाकडे झेपावणार्‍या समाजाला अजून खूप काही करायचे राहिले आहे हे आवर्जून सांगणारी, वैज्ञानिक जाणिवा पेरणारी, प्रबोधनाचा पिंड जोपासणारी, खानदेशातील सकस प्रतिभेची चुणूक दाखविणारी, अपूर्व भाषिक प्रयोग राबविणारी, सोकॉल्ड समाजसेवकांचा बुरखा फाडणारी, व्यवस्थेला नागडं करणारी, कार्यकर्तीचा जिवंत अनुभव चितारणारी आणखी बरेच काही करणारी…

    Chakva Eka Akalan

    125.00
    Add to cart
  • जागतिकीकरणाचा प्रभाव

    जागतिकीकरणाचा प्रभाव तपासतांना भाषा, साहित्य, समाज, अर्थ, क्रीडा, पर्यावरण, राजकारण आणि प्रशासन या घटकांचा विचार करणे क्रमप्राप्त ठरते. या विविध आयामांतून समाजरचना गतिमान व्हावी; तसेच प्रगतीचे आलेख रेखाटता यावेत अन्यथा निरर्थक धावण्याची स्पर्धा मूल्यहीनता निर्माण होण्यास कारणीभूत ठरु शकते. मूल्यसंवर्धनासाठी गतिमान विवेकी विज्ञानवादाची आवश्यकता आहे. जागतिकीकरण तेव्हाच प्रभावशाली बनू शकेल.

    – प्रा. डॉ. म. सु. पगारे

    Jagtikikaranacha Prabhav

    250.00
    Add to cart
  • डॉ. आनंद यादवांच्या आत्मचरित्रात्मक कादंबरीतील जीवनसंघर्ष

    साठोत्तरी मराठी साहित्यातील एक स्वतंत्र प्रवाह म्हणजे ‘ग्रामीण साहित्य’ होय. शहरी संस्कृतीच्या सान्निध्यात विकसित होणार्‍या ’मध्यमवर्गीय माणसांच्या जीवनदर्शनातील सुखदु:खाचे वर्णन करणार्‍या साहित्यापेक्षा निसर्गाच्या सान्निध्यात ग्रामीण संस्कृतीच्या आधारे जीवनाची वाटचाल करणार्‍या सामान्य माणसाच्या जीवनातील सुखदु:खासमवेत संघर्षाचे वास्तववादी वर्णन करणारे ‘ग्रामीण साहित्य’ जाणीवपूर्वक विकसित झाले. या परंपरेत काव्य, कथा, कादंबरी, समीक्षात्मक लेखन, वाङ्मयीन संपादने इ. साहित्य रचनेतून आपले स्वतंत्र अस्तित्व निर्माण करणारे लेखक म्हणजे डॉ. आनंद यादव होय. अनुभवलेल्या जीवनाच्या आधारावर ग्रामीण जीवन संघर्षाचे यथार्थ दर्शन घडविणारे त्यांचे साहित्य मराठीत मानदंड ठरले आहे. डॉ. यादवांनी प्रतिकूल परिस्थितीतून मार्ग काढत आपले जीवन किती सर्वांगसुंदर बनविले व त्यांचा कौटुंबिक संघर्ष किती जीवघेणा होता. त्याही परिस्थितीतून त्यांनी कसा मार्ग काढला, याचे वर्णन त्यांनी आपल्या चारही ‘झोंबी’, ‘नांगरणी’, ‘घरभिंती’ व ‘काचवेल’ या आत्मचरित्रात्मक कादंबर्‍यातून केले आहे. त्यांनी ग्रामीण जीवनातील संघर्ष अचूकपणे टिपले.
    डॉ. दिलीप पाटील यांनी सदरील पुस्तकात डॉ. यादवांच्या कादंबर्‍यातील संघर्ष व स्थित्यंतरांचा अचूकपणे वेध घेतल्याने जिज्ञासूंना ते निश्चितच मार्गदर्शक ठरेल. शिवाय या चारही आत्मचरित्रात्मक कादंबरीतील आशय एकत्रितपणे अभ्यासता येईल. ‘कोणत्याही साहित्यकृतीतील आशयद्रव्याला लेखकाच्या जीवनानुभवाचा स्पर्श असतो’ ही जाणीव विकसित होईल. रसिक वाचक या प्रयत्नांचे स्वागत करतीलच!

    Dr Anand Yadav Yanchya Kadambaritil Jeevansangharsh

    195.00
    Add to cart
  • तहान स्वरुप आणि समीक्षा

    नव्या सहस्रकाच्या उंबरठ्यावर ग्रामीण जनजीवनाची वाताहत ज्या भयानक रूपात होत आहे, त्याला गेल्या शतकात तरी तोड नाही. अनेक समस्यांनी घायाळ झालेला हा समाज हळूहळू का होईना जागा होत आहे; याच समाजातून आलेले सर्जनशील लेखक नव्या पिढीचे साहित्यिक म्हणून प्रा. सदानंद देशमुख आता सर्वपरिचित झाले आहेत. त्यांनी आपल्या कादंबरीतून ग्रामजीवनाच्या व्यथा-वेदना आणि समस्यांना सशक्तपणे शब्दरूपाने अविष्कृत केले आहे. त्यातलीच ‘तहान’ ही कादंबरी.

    ‘तहान’ ही कादंबरी अनेक दृष्टींनी महत्वाची साहित्यकृती मानली जाते. ग्रामीण जीवनातील पाण्याच्या महत्वाच्या प्रश्नाला तर ती जिवंतपणे साकार करतेच, पण ही ‘तहान’ केवळ पाण्यापुरती न राहता ती पैसा, भोगलालसा, दोन पिढ्यांतील व दोन संस्कृतीतील मूल्यसंघर्ष अशा अनेक गोष्टींना व्यापून राहते. त्यामुळे या कादंबरीला अनेक प्ररिमाणे प्राप्त होतात. या कादंबरीतील वैशिष्ट्यपूर्ण पात्रे प्रसंग, जिवंत भाषाशैली-अशा अनेक घटकांमुळे ही कादंबरी वाचकाच्या मनाची पकड तर घेते, शिवाय मूलभूत मानवी प्रश्नांच्या बाबत त्याला विचारप्रवृत्तही करते.

    Tahan_Swarup Aani Samiksha

    250.00
    Add to cart
  • नव्या गद्यशैलीची नोंद

    प्रामुख्याने ‘ग्रंथ परिचय ः सिद्धांत आणि समीक्षा’ हे निमित्त घेऊन या नव्या प्रवाहांच्या लेखनासाठी प्राथमिक किंवा मूलभूत अशी चर्चा व्हावी ही अपेक्षा आहे. या नव्या गद्य शैलीचा शोध आणि बोध घेऊन या नव्या उमेदीच्या लेखकांच्या कथा, कादंबरी, ललितगद्य कृतींचा परिचय झाला. तो कधी सखोल, कधी धावता तर कधी त्या कृतिंची प्रस्तायना लिहिण्याच्या दृष्टीने आणि नियतकालिकात परिचयात्मक समीक्षा लिहिण्याच्या हेतूने झाला आहे. हेच या लेखनाचे स्वरुप असले तरी त्यातून या नव्या वाङ्मयीन चळवळी-प्रवाहांतील नव्या गद्यशैलीच उगम झाल्याच्या खुणा जाणवतात. विशेषतः या लेखनातील कथा – कादंबरी – ललित गद्यात चाकोरी बाहेरची आणि व्यवस्थाबाह्य राहिलेल्या लेखकांची नोंद घेता आली

    ग्रामीणता, दलित अस्मिता, आर्थिक विषमता, व्यवस्थेतून बाहेर पडलेली मानवता, शोषणाची नवी रुपे, भ्रष्टाचार आणि विषमता, चळवळी आणि त्यातून असलेली नवी मूल्ये, भावनिक विस्फोट आणि सामाजिकता, बाजारपेठ आणि शेतकर्‍याची लूट, विज्ञानतंत्र-ज्ञानाचा विकास आणि मागासलेपणाचा न्यूनगंड अशा सर्वावरच प्रकाश टाकणारे गद्यशैलीतील हे लेखन वर्तुळाबाहेरच्या एका ‘नव्यागद्यशैलीचे स्वरुप’ प्रकट करणारे ठरते. म्हणून या सर्वांची काळाच्या ओघात वाङ्मयीन प्रवाहात नोंद व्हावी. यासाठी त्याचे चिकित्सक, टीकात्मक मूल्यमापन महत्त्वाचे ठरते.

    Navya Gadyashailichi Nond

    195.00
    Add to cart
  • नव्वदोत्तर आदिवासी कविता

    नव्वद नंतरचे साहित्य हा एकूणच जगभरातील साहित्याच्या बदलाचा एक महत्त्वाचा टप्पा मानला जातो. जागतिकीकरणाने मानवी जगण्यात, त्यातून निर्माण झालेल्या वर्तनात, मानव-पशु, मानव-पक्षी, मानव-निसर्ग, मानव-पर्यावरण आणि माणूस-माणूस यांच्या नात्यातील वीण उखडलेली जाणवू लागली. हिंदीतील सुप्रसिद्ध कवी लीलाधर मंडलोई म्हणतात, ‌‘जागतिकीकरण यह ऐसा बाजार है जो हमारे सामान की नही रिश्तों की भी नीलामी करवाता है|’ तसेच मानवी जगण्यातील माणुसकी ह्या चिवट मूल्याला उद्ध्वस्त करून पैसा हेच मानवाचे प्रभावी मूल्य ठरू लागले. एकूणच मानवाच्या आतापर्यंतच्या जीवनमूल्यांना उद्ध्वस्त करून त्याच्या जगण्याला मिळालेली कलाटणी, या सगळ्यांचा परिणाम नव्वदोत्तरच्या जागतिकीकरणातून जाणवतो. त्याचा आदिवासींच्या जगण्यावर परिणाम झाला का? की आणखी कुठल्या घटकाने आदिवासींचे जगणे आपल्या मुळांपासून उखडून टाकले, वर्तुळापासून परिघावर गेले? या सर्वांचा शोध नव्वदोत्तर आदिवासी कवितेतून घेण्याचा प्रयत्न येथे केला आहे.

    Navadottar Adivasi Kavita

    275.00
    Add to cart
  • नव्वदोत्तरी मराठी ग्रामीण साहित्य

    प्रा. कैलास सार्वेकर हे माझे गेल्या पस्तीस वर्षापासूनचे मित्र होते. ते ग्रामीण साहित्य चळवळीतील एक निष्ठावान कार्यकर्ते होते. महाराष्ट्रातील ग्रामजीवनाशी, आदिवासी जीवनाशी समरस होऊन ते ग्रामीण साहित्य चळवळीचे काम करीत होते. ग्रामीण साहित्याचे संशोधनही करीत होते. त्यांनी केलेले संशोधन मराठी साहित्य संशोधनात मोलाची भर टाकणारे आहे. विशेष म्हणजे ते स्थानिक बोलीच्या अभ्यासातही रमून गेले. कदाचित त्यांनी केलेला हा बोलींचा अभ्यास मराठीतील पहिलावहिला अभ्यास असेल. नवापूरसारख्या गुजरातच्या सीमारेषेवरील गावात राहून संशोधन करणे, चळवळ करणे ही अधिक अवघड गोष्ट असते. परंतु कैलास सार्वेकर हे सारे निष्ठेने करीत होते. ग्रामजीवनासंबंधीच्या आंतरिक प्रेमाने करीत होते. सार्वेकरांनी ग्रामीण जीवनातील दु:ख, दारिद्य्र, श्रद्धा व अंधश्रद्धाही पाहिलेल्या-साहिलेल्या होत्या. मराठी साहित्यविश्वातील सार्‍याच वाङ्मयीन चळवळी जागतिकीकरणाच्या प्रक्रियेने निष्प्रभ करून टाकल्या. तरीही ग्रामीण साहित्य, ग्रामीण जीवन, ग्रामीण साहित्य चळवळ यांच्याशी शेवटपर्यंत ज्यांनी स्वत:ची बांधिलकी सांगितली, त्यात कैलास सार्वेकर आहेत; यात शंकाच नाही.

    – नागनाथ कोत्तापल्ले

    Navvadottari Marathi Gramin Sahitya

    325.00
    Add to cart
  • नामदेव ढसाळांची कविता : स्वरूप आणि आकलन

    Namdev Dhasalanchi Kavita : Swarup Ani Aakalan

    260.00
    Add to cart
  • निर्झरास… निवडक बालकवी

    केवळ अठ्ठावीस वर्षांचं अल्पायुष्य लाभलेले बालकवी अर्वाचीन मराठी काव्यपरंपरेत अनन्यसाधारण कवी ठरलेत. वयाच्या तेराव्या वर्षी त्यांनी पहिली कविता लिहिली. केवळ दहा-अकरा वर्षे कविता लेखन करणार्‍या या प्रतिभासंपन्न कवीने आयुष्यात केवळ एकशे त्रेसष्ठ कविता लिहिल्या. त्यात पस्तीस ते चाळीस निसर्गकविता व उर्वरित कविता (पूर्ण-अपूर्ण अवस्थेतल्या) काव्यविषयक, प्रेमविषयक, गुढगुंजनात्मक, सामाजिक तथा राष्ट्रभक्तीपर स्वरूपाच्या आहेत.

    बालकवी हे बालपणापासून निसर्गातच रमले. शिवाय जीवनातल्या एकटेपणाला कटांळून निसर्गाकडे त्यांचे पलायन झाल्यामुळे त्यांची काव्यवैशिष्ट्ये ही निसर्ग कवितेत अधिक खुलुन दिसली. खानदेशातल्या मातीत रुजलेल्या या औदुंरबरावर अल्पवयातच काळाचा घाला आला. परंतु या औदुंबराच्या मूळा आजही कुठल्यातरी अनामिक ओलाव्यानं तगून आहेत. आज जवळपास एक शतक उलटलं तरीही मराठीतल्या साहित्यिक, रसिक, समीक्षकांना बालकवीची कविता नवनव्या अर्थगर्भ छटांनी, नवनव्या रूपात सापडत आहे. ‘बालकवी’ हे मराठी कवितेला पडलेलं एक मधुर स्वप्न आहे, अशा शब्दात समीक्षकांकडून त्यांचा गौरव झाला आहे. बालकवींची कविता अभिजात कविता ठरते. त्यांचा संप्रदाय निर्माण झाला नाही. परंतु एकूणच अर्वाचीन मराठी कवितेपासून ते आजतागायत लिहिणार्‍या सार्‍याच पिढीला बालकवींच्या कवितेने वेड लावले आहे.

    निर्झरास.. हे बालकवींच्या निवडक कवितांचे संकलन अभ्यासकांच्या दृष्टीने उपयुक्त ठरेल.

    Nirzaras Nivdak Balkavi

    50.00
    Add to cart
  • निवड कथा स्वरुप व समीक्षा

    Nivardak Katha Swarup V Samiksha

    120.00
    Add to cart