• विद्याशाखा आणि विषयांचे आकलन

    Vidyashakha Ani Vishyanche Akalan

    160.00
    Add to cart
  • विशेष शिक्षण

    विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधणे हे शिक्षणाचे कार्य आहे. शिक्षणापासून कोणीही वंचित राहू नये हे आजच्या शिक्षणक्षेत्राचे प्रमुख ध्येय मानले जाते. शिक्षण क्षेत्रात समाविष्ट होणार्‍या सामान्य, बुद्धिमान, सर्जनशील, स्त्रीया व अपंग, बालगुन्हेगार या सर्वांसाठी शिक्षण व्यवस्था आपआपल्या पद्धतीने कार्य करीत असते. प्रत्येकांच्या गरजा ओळखून, समस्या समजून शिक्षणाची उद्दिष्टे ठरविली जात असतात. ध्येय, उद्दिष्टे, गरजा व समस्या समजून अभ्यासक्रमाची रचना केली जाते. त्यानुसार शिक्षक आपल्या पद्धतीने अध्यापनाचे कार्य अध्ययनार्थ्यांच्या गतीने करीत असतात.

    प्रस्तुत संदर्भ ग्रंथात प्रतिभावंत, सर्जनशील, मतिमंद, अध्ययन अकार्यक्षम, अस्थिव्यंग, कर्णबधीर, बालगुन्हेगार, दृष्टिदोष असलेल्या बालकांची ओळख कशी करावी? या बालकांच्या या समस्येमागील कारणे, त्यांची वैशिष्टे, त्यांच्या गरजा, त्यांच्या समस्या, त्यांच्यानुसार त्यांची शिक्षणाची उद्दिष्टे कोणती आहेत? तसेच त्यांच्यासाठी शैक्षणिक उपक्रम, शाळा, शिक्षक व पालकांची काय भूमिका असावी याबाबत विविधांगी चर्चा करण्यात आली आहे.

    Vishesh Shikshan

    150.00
    Add to cart
  • व्यक्तिमत्त्व विकास

    व्यक्तीला बाह्यरुपाने आकर्षक बनविणार्‍या गोष्टींनी व्यक्तीचे व्यक्तिमत्त्व ठरत नाही. व्यक्तिमत्त्व हे व्यक्तीच्या कोणत्याही एका शारीरिक, मानसिक गुणधर्मात सामावलेले नसून ते संघात स्वरूपी आहे. या संघात स्वरूपी घटकांमध्ये केवळ सुसंगतपणे व सातत्याने दिसून येणार्‍या शारीरिक-मानसिक-सामाजिक गुणधर्मांचा समावेश होतो. व्यक्तीचे व्यक्तिमत्त्व ज्या गुणधर्मावरून स्पष्ट होते त्या गुणधर्माचा आविष्कार सामाजिक वर्तनामध्ये दिसून येत असल्यामुळे व्यक्तिमत्त्व या कल्पनेस सामाजिक संदर्भ प्राप्त झाला. कोणत्याही व्यक्तीच्या व्यक्तिमत्त्वाचा इतर व्यक्तींवर प्रभाव पडतो. हा प्रभाव वर्तन विशेषातून पडतो. वर्तनाच्या मुळाशी मानसिक कल, अभिरुची, अभिवृत्ती, कृतिक्षमता इ. गोष्टी असतात. म्हणून व्यक्तिमत्त्व हे या सर्वांचा संघात होय. व्यक्तीला व्यक्तित्व असून व्यक्तिमत्त्व देखील असते. व्यक्तित्व आणि व्यक्तिमत्व यात मूलतः फरक आहे. व्यक्तिमत्त्व सतत बदलत असते. कारण जीवनातील अनुभवांची भर त्यात सारखी पडते. व्यक्तिमत्त्व रचना व व्यक्तिमत्त्व विकास यांचा विचार पाश्चात्य आणि पौर्वात्य संशोधकांनी, तत्ववेत्यांनी केला आहे.
    प्रस्तुत पुस्तकात व्यक्तिमत्त्व विकास, नेतृत्व कौशल्य, सादरीकरण कौशल्य, श्रवण कौशल्य, संभाषण कौशल्य, सुदृढ/सक्षम वैशिष्ट्यांसह व्यक्तिमत्त्व, समाज आणि मानवी संबंध, वैयक्तीक व सार्वजनिक क्षेत्रातील संघर्ष व ताणतणावाचे व्यवस्थापन, सामाजिक सलोखा, भावनिक बुद्धीमत्ता, व्यवसाय नियोजन, वेळेचे व्यवस्थापन, मुलाखती, व्यक्तीमत्व आणि अभियोग्यता कसोट्या इ. विविधांगी मुद्द्यांचा सर्वांगीण परामर्श घेतला आहे.

    Vyaktimatav Vikas

    175.00
    Add to cart
  • शांततेसाठी शिक्षण

    Shantatesathi Shikshan

    185.00
    Add to cart
  • शारीरिक शिक्षणात मानसशास्त्राचे मार्गदर्शन व मूल्यमापन

    खगोल, भौतिक, रसायन या शास्त्रांप्रमाणेच मानसशास्त्र हे एक शास्त्र आहे. परंतु ते इतर शास्त्रांपेक्षा निराळे आहे. मानसशास्त्र हे मनुष्याशी निगडित आहे. इतर शास्त्रांच्या मानाने, हे शास्त्र नुकतेच म्हणजे 1000-2000 वर्षांपूर्वी अस्तित्वात आले. पण आज असे कोणतेही शास्त्र नाही की ज्याचा संबंध मानसशास्त्राशी नाही. सर्व क्षेत्रांत या शास्त्राची व्याप्ती झाल्याची आढळते. क्रीडा मानसशास्त्र ही क्रीडा तंत्रज्ञानास उपयुक्त ठरणारी मानसशास्त्राची एक उपयोजित शाखा आहे. क्रीडा मानसशास्त्राच्या दृष्टीने मुक्त खेळ व हालचालींमधून व्यक्ती आपल्या शक्तीबरोबर भावभावनांचा आविष्कार करते. शारीरिक शिक्षण व खेळ हे मानसशास्त्राच्या केवळ मानवी आचरणाशीच संबंधित नाही, तर मानसशास्त्रात बालक, प्रौढ, वृद्ध, स्त्रिया, पुरूष अशा समाजातील सर्व घटकांच्या वागणुकीशी संबंध येतो. शारीरिक शिक्षणाच्या स्थितीत फार मोठे परिवर्तन घडून आलेले आहे. अनेक प्रकारच्या स्पर्धांमुळे त्यांचे महत्त्व वाढतच आहे. महत्त्वाबरोबर त्यांच्या समस्याही वाढत आहेत. खेळाडूंचे प्रशिक्षणानंतर होणार्‍या जय-पराजयांनाही कसे पचवावे व यासाठी मनाची वृत्ती कशी असावी म्हणजेच यश आल्यामुळेच अगदीच हुरळून जाऊ नये व अगदी अपयश आले तरी नाराज होऊन खेळाविषयी नकारात्मक विचार निर्माण होऊ नये असा विश्वास क्रीडामानसशास्त्र देते. आधुनिक क्रीडा तंत्रज्ञानाच्या विकासासाठी क्रीडामानसशास्त्र ही अत्यंत उपयुक्त अशी मानसशास्त्राची शाखा आहे. त्यामुळे क्रीडामानसशास्त्र हे अलीकडे स्वतंत्र असे महत्त्वाचे शास्त्र बनू पहात आहे.

    Sharirik Shastrat Manasshastrache Margdarshan v Mulymapan

    195.00
    Add to cart
  • शालेय व्यवस्थापन

    Shaley Vyavasthapan

    165.00
    Add to cart
  • शालेय शिक्षणातील मूल्यनिर्धारण आणि मूल्यमापन (बी.एड.द्वितीय वर्ष)

    अनेक संशोधकांच्या मते वारंवार दिल्या जाणाऱ्या चाचण्या ह्या यशस्वी अध्यापनासाठी आणि त्याचबरोबर विद्यार्थी कितपत योग्य कृती करत आहेत यांसाठी उपयोगी पडतात. मानसशास्त्रातील चाचण्या आणि मापन यांच्या चळवळीमुळे ‌‘शैक्षणिक मापन आणि मूल्यमापन’ याला महत्त्व प्राप्त झाले. ‌‘शालेय शिक्षणातील मूल्यनिर्धारण आणि मूल्यमापन’ या विषयाचा बी.एड्. अभ्यासक्रमात समावेश केलेला आहे. या नवीन अभ्यासक्रमावर आधारित प्रस्तुत पुस्तकात मूल्यमापनाची संकल्पना आणि हेतू, मूल्यनिर्धारण आणि मूल्यमापन संबंध दृष्टिकोन, अध्ययनाचे मूल्यनिर्धारण, मूल्यमापनाची तंत्रे आणि साधने, शाळांमधील मूल्यनिर्धारणासाठी चाचण्या, शिक्षक निर्मित संपादन चाचणी, मूल्यनिर्धारणाचे नियोजन, संरचना, अंमलबजावणी आणि अहवाल, मूल्यनिर्धारण आणि मूल्यमापनातील सुधारणा या घटकांची सखोलपणे मांडणी करण्याचा प्रयत्न केलेला आहे. बी.एड्.चे प्रशिक्षणार्थी व प्राध्यापक यांना योग्य दिशा मिळावी या हेतूने सदर पुस्तकाची मांडणी करण्यात आली आहे.

    Shaleya Shikshanatil Mulynirdharan Ani Mulyamapan

    295.00
    Add to cart
  • शालेय स्तरावर जीवन कौशल्यांची रुजवणूक

    जन्म आणि मृत्यू ह्यातील काळात जीवन असे म्हणतात. जीवन कौशल्य शिक्षण म्हणजे सगळेच जीवन जगतात पण प्रत्येकाची जगण्याची तऱ्हा निराळी असते. जीवन कसे जगावे हा प्रत्येकाचा व्यक्तिगत प्रश्न असला तरी माणूस हा समाजशील प्राणी आहे. त्यामुळे त्याने जगतांना व्यक्तीबरोबर संमष्टीचा विचार करावा असे त्याच्याकडून अपेक्षित आहे. जीवनकौशल्ये हे जीवनाच्या सत्याशी परिचित करणारी क्षमता आहे, जी व्यक्तीला सामाजिक प्राणी म्हणून तिचा विकास करू इच्छिते. जीवनकौशल्ये जरी वेगवेगळी दिसत असली तरी त्यांच्यात परस्परसबंध आहे. जीवनात एका कौशल्याचा जरी विकास करायचा ठरविला तरी इतर सर्व जीवनकौशल्ये विकसित होऊ शकतात. व्यक्तीमध्ये असलेल्या आंतरिक शक्ती व गुणवैशिष्ट्‌‍यांची जाणीव होण्यास मदत करणे व त्यानुसार आवश्यक तो बदल घडवून आणण्यास प्रेरित करणे या दृष्टीने शिक्षणात जीवनकौशल्यांचे महत्त्व आहे. सदर पुस्तकाद्वारे दैनंदिन जीवनात येणाऱ्या अडचणी व समस्यांवर विचारपूर्वक निर्णय घेऊन योग्य तो मार्ग आपण समर्थपणे काढू शकतो.

    Shaley Staravar Jivan Kaushalyanchi Rujvanuk

    275.00
    Add to cart
  • शिक्षक आणि शिक्षण

    ‘शिक्षक व शिक्षण’ या पुस्तकामध्ये जवळजवळ सर्वच विषय हा शिक्षकासंबंधित अधोरेखित केलेला आहे. म्हणून आपल्यासारखे बुद्धिजीवी, तळागाळात, ग्रामीण व दुर्गम भागात शैक्षणिक कार्य करणार्‍या शिक्षक वर्गासाठी तसेच नव शिक्षक बांधव यांनादेखील या पुस्तकाचा उपयोग व्हावा, माझे विचार आपल्यापर्यंत पोहोचावेत व आपल्याकडून मला नवीन लेखन करण्यासाठी नवचेतना, प्रेरणा मिळावी हा प्रामाणिक उद्देश अथवा हेतू समोर ठेऊनच सदरील पुस्तकलेखन करण्यात आलेले आहे.
    शाळा आणि शिक्षक, समाज आणि शिक्षक, विद्यार्थी आणि शिक्षक, पालक आणि शिक्षक, लोकसहभाग आणि शिक्षक, या सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक चळवळी उभारून खूप मोठ्या प्रमाणावर या विधायक विचारधारेचा अवलंब करून समाजात परीवर्तन घडविणे सद्य:स्थितीत शिक्षकांकडून समाजाला अपेक्षित आहे. त्याचप्रमाणे शिक्षकाच्याही समाजाकडून काही अपेक्षा आहेत. शिक्षकांनी सामाजिक ऋण म्हणून किंवा आपण समाजाचे काही देणे लागतो म्हणून कोणत्या गोष्टी अभिप्रेत असाव्यात हे प्रामाणिकपणे मांडण्याचा प्रयत्न सदरील पुस्तकात केलेला आहे.

    Shikshak Ani Shikshan

    110.00
    Add to cart
  • शिक्षक कसा असावा?

    या पुस्तिकेद्वारे शिक्षक बंधू-भगिनींना काही चांगले मिळत असेल तर मी त्याबाबत धन्यता मानतो. माझ्या शिक्षक बंधू-भगिनींना अक्कल शिकविणे हा या पुस्तकाचा उद्देश अजिबात नाही. शिक्षक म्हणून जीवन जगत असताना जे शिकायला मिळाले ते आपल्या इतर शिक्षक बंधू-भगिनी समोर ठेवणे, एवढाच एकमेव उद्देश या पुस्तकाचा आहे. माझ्या बावीस वर्षाच्या सेवेत मी एक परिपूर्ण शिक्षक बनलो, असा मी दावा करीत नाही. किंबहुना मला अजून बरेच काही शिकायचे आहे आणि स्वतःमध्ये असलेल्या उणीवा दूर करायच्या आहेत. मी एक शिक्षकाचा मुलगा आहे आणि स्वतःही शिक्षक असल्याने मला शिक्षक व्यवसायाबद्दल नितांत आदर आहे.
    या पुस्तकात जसे मी शिक्षकांच्या काही दोषांवर भाष्य केले आहे तसे चांगल्या शिक्षकांच्या उदात्त कार्याला नमन देखील केले आहे. शिक्षकांच्या उणीवांवर केलेली चर्चा केवळ शिक्षकी व्यवसाय समृद्ध व्हावा व त्यातून समाज व राष्ट्र बळकट व्हावे याच हेतूने केली आहे. माझ्या शिक्षक बंधू-भगिनींना हीन लेखणे, हा त्या मागचा हेतू अजिबात नाही. तरीही माझ्या शिक्षक बंधू भगिनींचे मन जर या पुस्तकातील काही मजकुराने दुखावले गेले तर मी आधीच त्याची माफी मागतो व आपला शिक्षक व्यवसाय अजून समृद्ध व्हावा यासाठी मोठ्या मनाने ते या पुस्तकाचा स्वीकार करतील, अशी अपेक्षा व्यक्त करतो.

    Shikshak Kasa Asava

    85.00
    Add to cart
  • शिक्षण आणि विकास

    Shikshan Ani Vikas

    195.00
    Add to cart
  • शिक्षण व्यवस्थेची सद्यःस्थिती दशा आणि दिशा

    वाढते औद्योगिकरण, बदलते तंत्रज्ञान सामाजिक आणि आर्थिक बदल याचा विचार करता रोजगार व स्वयंरोजगार यांना चालना मिळण्याच्या दृष्टीने कुशल व अर्धकुशल स्वरुपातील व्यवसाय शिक्षणाची आज गरज निर्माण झाली आहे. चीन देशाने माणसाची गरज लक्षात घेऊन त्या गरजोपयोगी वस्तूंची निर्मिती केली. त्यामुळे जगातील सर्वच बाजारपेठांत त्यांच्या वस्तूंना मोठ्या प्रमाणात मागणी आहे. चीनचा हाच दृष्टिकोन नजरेसमोर ठेवून तसेच तंत्र व व्यवसाय शिक्षणाचे महत्व लक्षात घेऊन महाराष्ट्र राज्य व्यवसाय शिक्षण परीक्षा मंडळातर्फे अल्प मुदतीचे दैनंदिन जीवनावश्यक अशा विषयांचे प्रशिक्षण घेऊन स्वबळावर रोजगार निर्माण करण्याचे उद्दिष्ट विद्यार्थ्यांसमोर यानिमित्ताने शासनाने ठेवले आहेत. आज केवळ पारंपरिक पुस्तकी शिक्षणच न घेता व्यावसायिक शिक्षण घेऊन स्वावलंबी बनण्याचा तरुणांनी विचार करणे आवश्यक आहे.

    Shikshan Vyavasthechi Sadya:Sthiti Dasha Aani Disha

    95.00
    Add to cart
  • शिक्षणशास्त्र दर्शन

    Shikshanshasra Darshan

    350.00
    Add to cart
  • शिक्षणातील नाट्य आणि कला

    Shikshanatil Natya Aani Kala

    180.00
    Add to cart
  • शिक्षणातील नाट्य आणि कला

    मानवी मनातील विविध भावनांचे प्रकटीकरण, त्याला जाणवणाऱ्या सौंदर्यानुभूतिचे माध्यम म्हणजे कला. या विविध प्रकारच्या आहेत. नाटक ही देखील एक कला आहे प्राचीन काळापासून मानवाच्या विविध कलांशी संबंध आहे. या विविध कलांचा विकास मानवाच्या कर्तृत्वाची साक्ष देणारा आहे. प्राचीन काळापासून चौसष्ट कलांचा उल्लेख केलेला दिसतो. आज आधुनिक काळात या कलांमध्ये वाढच झालेली दिसते. विविध कलाप्रकार जगाच्या पाठीवर अस्तित्वात आहेत त्यातच सरमिसळ करून त्यांच्यावर प्रयोग करून कलाकारांनी त्यात नवनिर्मिती केलेली आहे. सर्व कलांच्या परिचय प्रस्तुत पुस्तकात देणे शक्य नाही तरी प्रमुख कलांचा थोडक्यात परिचय दिलेला आहे.
    शिक्षकाला आपल्या प्राचीन संस्कृतीचा वारसा समजून घेणे आवश्यक आहे. आपल्या अभ्यासक्रमाच्या गाभा घटकांपैकी एक प्रमुख घटक म्हणून त्याचा समावेश आहे. आज विज्ञानयुगात आपण राहत असलो तरी कलेपासून मानव दूर गेलेला नाही. उलट कलांना उजाळा देण्याचे नवनवीन रूप देण्याचे कार्य सुरू आहे. अभ्यासक्रमाच्या माध्यमातून विविध कला-नाट्य याद्वारे विविध विषयांचे प्रभावी अध्यापन शिक्षक करू शकतो. तसेच प्रत्येक विषयाच्या अध्यापनात नाट्याचा समावेश करून विद्यार्थ्यांच्या क्रियाशीलतेला चालना देऊ शकतो.

    Shikshanatil Natya Aani Kala

    155.00
    Add to cart
  • शैक्षणिक तंत्रविज्ञान

    विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधणे हे शिक्षणाचे कार्य आहे. या विकास कार्याला जोड मिळालेली आहे ती म्हणजे शैक्षणिक तंत्रविज्ञानाची. आज माहिती तंत्रज्ञानाच्या युगामध्ये सर्वच क्षेत्रांमध्ये अमुलाग्र बदल झालेला दिसून येतो. या बदलातूनच शैक्षणिक तंत्रविज्ञानातून शिक्षणक्षेत्र सर्व दृष्टिकोनातून गतिमान झालेले आहे. आजच्या 21 व्या शतकातील प्राथमिक ते महाविद्यालयीन शिक्षणक्रमामध्ये तंत्रविज्ञानाचा शिरकाव झालेला आपणास दिसून येत आहे. शिक्षक वर्गाला प्रभावी अध्यापनासाठी आंतरक्रियात्मक फलक, एलसीडी या माध्यमाची मदत घ्यावी लागत आहे. सहज व सुलभ अध्ययन अध्यापन क्रिया घडावी यासाठी तंत्रविज्ञानाची जोड घेणे महत्त्वाचे आहे. अध्ययनासाठी विद्यार्थी आता पुस्तकांच्या बाहेर जावून विकीपीडीया, युट्युब, ऑनलाईन डिक्शनरी, विविध शैक्षणिक वेबसाईटस्, विविध शैक्षणिक अ‍ॅप्स तसे हातातील स्मार्ट फोनचा उपयोग करु लागले आहेत. संंबंधित सर्व विषयांची सखोल चर्चा प्रस्तुत ग्रंथातून करण्यात आली आहे.

    Shaikshanik Tantravidnyan

    195.00
    Add to cart
  • शैक्षणिक माहिती तंत्रविज्ञान

    विज्ञानात होत चाललेली प्रगती, ज्ञान क्षेत्रात होत असलेली वाढ, शिक्षण क्षेत्रात नवनव्याने प्रवेश करणारे मानवसमूह, लोकसंख्येत होत असलेली प्रचंड वाढ यांचा परिणाम शिक्षणावर फार मोठ्या प्रमाणावर होऊ लागलेला आहे. शिक्षण हे सर्वांसाठी आहे. शिक्षणक्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींची जबाबदारीही खूपच वाढली आहे. मर्यादित मानवसमूहाला शिक्षण देण्यासाठी निर्माण झालेली शिक्षण पद्धती, विविध तंत्रे, साधने आता निष्प्रभ ठरू लागली आहेत. परंतु ही साधने, तंत्रे किंवा पद्धतींचे उच्चाटन करावयाचे तर नवीन पद्धती, साधने, तंत्रे विकसित व्हायला हवीत. शिक्षणक्षेत्रात निर्माण झालेल्या व होत असलेल्या विविध समस्यांचे निराकरण करण्यासाठी विचारवंत प्रयत्नशील आहेत. शिक्षणाच्या हेतूपासून ते थेट वर्गाध्यापनापर्यंत नव्याने मांडणी करण्याचा प्रयत्न होत आहे. केवळ ज्ञानासाठी ज्ञान ही संकल्पना थोडीशी बाजूला पडून मानवसमूहाच्या विकासासाठी शिक्षण्ा ही संकल्पना दृढ होऊ पाहते आहे. शैक्षणिक तंत्रविज्ञानाची व्याप्ती दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे शिक्षण क्षेत्रातील प्रत्येक गोष्ट कोणत्या ना कोणत्या तऱ्हेने शैक्षणिक तंत्रविज्ञानाशी निगडित होऊ पाहाते आहे.

    495.00
    Add to cart
  • शैक्षणिक संख्याशास्त्र

    Shaikshanik Sankhyashasra

    295.00
    Add to cart
  • शैक्षणिक संशोधन शोध सारांश

    Shaikshanik Sanshodhan Shodh Saransh

    425.00
    Add to cart
  • सकारात्मक मानसशास्त्र

    सकारात्मक दृष्टीकोनाचा आपल्या एकंदरीत जीवनावर फार चांगला प्रभाव पडत असतो. त्यामुळे आपले मानसिक व शारीरिक आरोग्य स्वस्थ ठेवले जाते. सकारात्मक भावनांमुळे मनुष्याच्या सुस्थितीत सतत वाढ होत असते. आपल्या आनंदी राहण्यामागे आपला आयुष्याकडे बघण्याच्या वृत्तीचा महत्त्वाचा सहभाग असतो. सकारात्मक मानसशास्त्र मनुष्याच्या चांगल्या व सशक्त बाजूंवर लक्ष केंद्रित करते. सकारात्मक मानसशास्त्रज्ञांनी बर्‍याच व्यक्तिभेदाचा अभ्यास आणि अध्ययन केले आहेत. त्यामुळे व्यक्ती आरोग्यदायी व आनंदी राहते, याबद्दल त्यांनी विश्लेषण केले. आनंदी असण्यामागे सकारात्मक परिणामाचा फार मोठा हातभार असतो. सकारात्मक दृष्टीकोन असेल तर आनंदी राहाल. आनंदी व्यक्तीच्या जीवनामधील कारण हे फक्त सकारात्मक परिणाम होय. आनंदीवृत्ती आणि सकारात्मक परिणाम ह्या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. सकारात्मक परिणामाचा संबंध हा व्यक्तीची आय, शिक्षण वय, लिंग यावर आधारित नाही परंतू सकारात्मक परिणाम हे घनिष्ठ आणि समाधानी नातेसंबंध राखण्यास मदत करतात. सदरील पुस्तकात सकारात्मक मानसशास्त्राचा शास्त्रीय उहापोह करण्यात आलेला आहे.

    Sakaratmak Manasshastra

    125.00
    Add to cart
  • समकालीन भारत आणि शिक्षण

    Samkalin Bharat Ani Shikshan

    160.00
    Add to cart
  • समावेशक शिक्षण

    Samaveshak Shikshan

    160.00
    Add to cart
  • समावेशक शिक्षण : शाळा व शिक्षक भूमिका

    ‌‘समावेशक शिक्षण-शाळा व शिक्षक भूमिका’ या पुस्तकात विविध घटकांच्या माध्यमातून अनेक पैलू उलगडून अतिशय सोप्या व समर्पक भाषेची रचना करत या पुस्तकाची निर्मिती केली आहे. यातील प्रत्येक घटकामधील सर्वच मुद्द्यांची मांडणी अतिशय अभ्यासपूर्ण असुन शिक्षणाची व्याख्या, शिक्षणाची गरज, शिक्षणाचे प्रकार याच्यावर प्रकाशझोतच टाकला नाही तर शिक्षणक्षेत्रामधील वेळोवेळी झालेले कायदे याची सुद्धा अतिशय सुक्ष्म माहिती या पुस्तकात दिलेली आहे. यातील समावेशक शिक्षणाची उद्दिष्टे या घटकामध्ये सुद्धा अतिशय विचारपूर्व लेखन केलेले दिसते. त्यामध्ये मांडलेली शिक्षणाची उद्दिष्टे, शिक्षणाची वैशिष्ट्ये, शिक्षणाची गरज, फायदे, तत्वे व दृष्टिकोन, याचे अतिशय सुंदर विवेचन केलेले आहे. तसेच सर्व समावेशक शिक्षण आणि क्षमता या घटकांमध्ये सुद्धा विद्यार्थी, शिक्षक, पालक, समाज या प्रत्येक घटकाचे कार्य व जबाबदारी यांची चांगली गुंफण केलेली दिसते.
    प्रामुख्याने अक्षमता असणाऱ्या व्यक्तिसाठींचा 1995 चा कायदा, 1948 मानवी हक्क जाहिरनामा मधील कलमांचे विश्लेषण, बालकांसाठी शिक्षण हा मोफत व सक्तीचा शिक्षणाचा मूलभूत हक्क असल्याने मान्य केलेला शिक्षण हक्क कायदा 2009. बालहक्क संबंधी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय कायदे तसेच 1989, यासह अनेक शासकीय योजनांचे लेखांकन केले गेले आहे. सर्व शिक्षा अभियान, राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा या विषयाची मांडणी सुद्धा अतिशय सुबक केलेली दिसते.

    Samaveshak Shikshan : Shala V Shikshak Bhumika

    225.00
    Add to cart
  • समावेशित शाळा व शिक्षक

    आधुनिक काळात शिक्षण व्यवस्थेमध्ये अमुलाग्र बदल होत आहेत. प्राथमिक शिक्षणामध्ये नवनवीन विचारप्रवाह येत आहेत. भारत सरकारने बालकांच्या शिक्षणासाठी शिक्षण हक्क कायदा केला. प्राथमिक शिक्षणाचे कलम भारतीय राज्यघटनेमध्ये मार्गदर्शक तत्त्वामध्ये समाविष्ट होते. प्रत्येक बालकाला प्राथमिक शिक्षण उपलब्ध करून देण्याची राज्याची जबाबदारी आहे. सर्वसामान्य बालकांबरोबर विशेष गरजा असणार्‍या बालकांनाही हा शिक्षणाचा अधिकार प्राप्त झाला आहे.

    सर्वसामान्य शाळेमध्ये सर्वसामान्य मुलांसोबत विशेष गरजा असणार्‍या बालकांना अध्ययनाची संधी उपलब्ध करून दिली पाहिजे. सौम्य व मध्यम अपंगत्व असणारी बालके सामान्य बालकांबरोबर शिक्षण घेऊ शकतात. यामुळे त्यांच्यामधील न्यूनगंडाची भावना दूर होते, तसेच त्यांचे सामाजीकीकरण होण्यास मदत होते. देशातील प्रत्येक बालकाला मुलभूत प्राथमिक शिक्षण मिळावे, यासाठी भारत सरकारने शिक्षणाच्या सार्वत्रिकीकरणाची मोहिम सुरु केली. या मोहिमेला सर्व शिक्षा अभियानामुळे व्यापक स्वरूप प्राप्त झाले. या अभियानामध्ये अपंग समावेशित शिक्षण ही योजना राबविण्यात आली. यातूनच समावेशित शिक्षण ही संकल्पना विकसित झाली.

    या पुस्तकात समावेशित शिक्षणाची संकल्पना, विशेष गरजा असणारी बालके, समावेशित शाळा व समावेशित शाळेतील शिक्षक या मुद्यांचा विचार केला आहे. सद्याच्या युगात प्रत्येक बालकाच्या कौशल्य विकसनावर भर देण्याची आवश्यकता आहे. विशेष गरजा असणारी बालके राष्ट्र विकासात भरीव योगदान देऊ शकतात. या बालकांच्या शिक्षणाकडे शिक्षकांनी विशेष लक्ष देणे गरजेचे आहे. यासाठी हा संदर्भ ग्रंथ विद्यार्थी, शिक्षक, शिक्षक-प्रशिक्षक यांना मार्गदर्शक ठरेल असा विश्वास वाटतो.

    Samaveshit Shala V Shikshak

    160.00
    Add to cart
  • संशोधन पद्धती

    संशोधनाचा एकंदरीत विचार करता, संशोधन म्हणजे काय ते प्रथम पाहायला हवे. माणसामध्ये एक उपजत कुतूहल प्रवृत्ती असते. आपल्या भोवतालच्या जगातील माणसे, वस्तू आणि घटना यांचे अस्तित्व माणसाला जेव्हापासून जाणवायला लागते, तेव्हापासून हे काय आहे, कसे आहे हे आपल्या ज्ञानेंद्रियांचा उपयोग करुन जाणून घेण्याची त्याची खटपट सुरु होते आणि हे जाणून घेणे म्हणजे संशोधन होय. संशोधनाला इंग्रजीत ’ठशीशरीलह’ म्हटले जाते. हा इंग्रजी प्रतिशब्द योग्यच आहे. ’ठशीशरीलह’ म्हणजे ‘पुन्हा शोध घेणे.’ थोडक्यात कोणत्याही ज्ञानशाखेत नवीन तत्त्वे अथवा तथ्ये शोधण्यासाठी आणि जुनी तथ्ये व तत्त्वे परीक्षणासाठी केलेला चिकित्सक व पध्दतशीर अभ्यास म्हणजे संशोधन होय. माणूस गोष्टींच्या संपर्कात यायला लागतो, नवीन माहिती मिळवायला लागतो, तसतसा तो नवीन माहितीची आधीच्या माहितीशी सांगड घालायला लागतो. मग त्याला त्याच्यात काही संबंध दिसायला लागतात. तो तुलना करु लागतो. नव्या व जुन्या गोष्टींत त्याला काही समान गुणधर्म आढळतात. तेव्हा तो त्यांना एका वर्गात घालतो. म्हणजे त्यांचे वर्गीकरण करतो. आणखी पुढे जाऊन त्याला असे आढळते की, भोवताली घडणार्‍या घटना काही क्रमाने घडतात. तसेच एखादी घटना घडली तरच पुढची घटना घडते. म्हणजे आधी घडलेली घटना कारण आहे तर नंतर घडलेली घटना तिचा परिणाम आहे हे कळते. कार्यकारण संबंध निश्चित करण्यासाठी तो अनेक वेळा तशीच निरीक्षणे वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या वेळी करतो, मगच त्याच्या मनात कारण-परिणाम संबंध प्रस्थापित होतो. म्हणजेच नव्याने उजेडात आलेल्या तथ्यांच्या आधारे प्रस्थापित, स्वीकृत निष्कर्ष व सिध्दांतांचे पुनर्परीक्षण करण्याच्या हेतूने चिकित्सक व सखोल चौकशी वा प्रयोगास संशोधन म्हणता येईल. सदरील ग्रंथात संशोधनाची सर्वांगाने चर्चा करण्यात आली आहे.
    सदरील ग्रंथ हा पदवी, पदव्युत्तर, एम.फील., पीएच.डी., एमपीएससी, यूपीएससी व सेट इत्यादी परीक्षांचे अध्ययन करणार्‍या विद्यार्थ्यांना व प्राध्यापकांना उपयुक्त ठरेल.

    Sanshodhan Paddhati

    675.00
    Add to cart
  • संशोधन प्रक्रिया

    Sanshodhan Prakriya

    95.00
    Add to cart
  • सूक्ष्म अध्यापन

    Sukshm Adhyapan

    275.00
    Add to cart
  • स्व-आकलन

    Swa-Akalan

    150.00
    Add to cart