विनाशकाले विपरीत बुद्धी जोपासणार्या नराधमांनी संपूर्ण जगात दहशतवादी कारवाया सुरु करुन स्थैर्य नष्ट केलेले आहे. दहशतवादींना जोपासणार्या भेकड राष्ट्रांचे भवितव्य अंधारात असून ते इतरांनाही अंधाराच्या गर्तेत ओढत आहेत. दहशतवादी परिस्थितीवर नियंत्रण आणण्यसाठी सर्वांची एकजूट आणि सहकार्य अपेक्षित आहे.
पाकिस्तानने भारतामध्ये दहशतवाद पसरवून अनेक निष्पाप जीवांचे बळी घेतले असून जगभरात थैमान घालणार्या दहशतवादाचे मूळ पाकिस्तानातच आहे. पाकिस्तान हे धर्मांध राष्ट्र असून जागतिक दहशतवादाचा अड्डा बनलेला असून वेळीच आवर घालणे गरजेचे आहे.
सदरील पुस्तकात दहशतवादाचे प्रकार, अणुदहशतवाद, भारत-पाक दहशतवादी संघटना, दहशतवादी हल्ले, 7/9 व 26/11 चे हल्ले, भारत-अफगाण व दहशतवाद, प्रमुख दहशतवादी संघटना, भारतावरील हल्ले, पाकिस्तान दहशतवाद, नक्षलवाद, इतिहास, नक्षलवादी भारतीय समस्या, गंभीर स्वरुप, दहशतवाद-नक्षलवाद आणि सुरक्षा, दहशतवाद प्रतिबंध (नियंत्रण) वगैरे माहितीचा समावेश केला आहे.
राष्ट्राचे भवितव्य घडविणार्या तरुण आधारस्तंभांनी दहशतवादाबद्दल सखोलता, वास्तविकता जाणून घेणे अत्यंत आवश्यक आहे जेणेकरून भारताच्या तसेच जगाच्या विकासासाठी ते साहाय्यभूत ठरेल.
Dahshatwad Ani Nakshalwad