
आदिवासी तडवी भील
Rs.195.00जगातील तसेच भारतातील पहिली सभ्यता म्हणुन आदिवासी भिल्लांचा उल्लेख करावा लागेल. तडवी हे भिल्लांचे वंशज आहेत. आदिवासी तडवींची मातृभाषा ही ‘तडवी’ म्हणुन ओळखली जाते. आदिवासी बोलीभाषा या मुक्त, नैसर्गिक स्वभाव गुणसंपन्न असतात. त्यांच्यात एक प्रकारची सहजता दिसते. आदिवासी तडवी भाषा ही नैसर्गिकपणे ध्वनी, उच्चार, गोडवा, सहजता, ताल, लय, माधुरता या गुणांमुळे हजारो वर्षांपासून फक्त मौखिक परंपरेने एका पिढीपासून दुसऱ्या पिढीपावेतो हस्तांतरीत व सहजच चालत आलेली आहे. काळाच्या ओघात ती लोप पावली नाही. आदिवासी जमातीच्या रूढी, परंपरा, चालीरिती, चालचलन, जीवन व्यवहार, रीतीरिवाज, खानपान, सांस्कृतिक, सामाजिक, जीवन पद्धती, वाङ्मय, लोककथा, साहित्य संपदा या बाबी मौखिक स्वरूपात एका पिढीपासून दुसऱ्या पिढीपावेतो हस्तांतरीत होत आलेल्या आहेत. तडवी लिपीच्या वापराने अख्खी विश्वजात, विश्वसाहित्य, विश्वलोकवाङ्मय व विश्वलोकाभिमुखता सामावून घेण्याची ताकद निश्चितच आहे, असे म्हटल्यास आश्चर्य वाटू नये.
Aadivasi Tadvi Bhil : Tadvi Bhasha Aani Tadvi Lipi

आदिवासी तडवी भील : रुढी, परंपरा, चालिरिती
Rs.225.00आदिवासी तडवी भिल्ल ही एक भिल्ल आदिम जमात आहे. तडवी ही एक शूर, युद्धात भाग घेणारे योद्धे म्हणूनही ही जमात ओळखली जाते. इ.स.पू. 300 ते 4000 पाषण युगापासून आदिवासीचे पुरावे हे संशोधकांना मिळाले आहेत. “भिल्ल” संस्कृती ही जगातील पहिली सभ्यता असावी असे काही जगातील संशोधकांचे मत आहे. आदिवासी तडवी हे हिंदू-मुस्लिम नाहीत. त्याची आपली संस्कृती आहे. स्वतंत्र अशी ‘तडवी’ भाषा आहे तसेच स्वतःची अशी संस्कृतीची गुप्त भाषा आहे. मुस्लिम हिंदू संस्कृती प्रमाणे कोणतेही साम्य आढळून येत नाही. पोशाख, पेहराव, खानपान, सामाजिक रीतिरिवाज, चालीरिती, रूढी परंपरा हे स्वतंत्र व अत्यंत भिन्न आहेत. गेल्या हजारो शतकानुशतके अशी आदिवासी संस्कृती, तडवी संस्कृती आपले आचरण, पालन करतांना दिसतात. आदिवासी हे निसर्ग व पूर्वजांना पूजतात.
आदिवासी संस्कृती व आदिवासी तडवी भील संस्कृतीचा शोध या पुस्तकात घेतला आहे. आजच्या 21 व्या शतकातील पिढीला हे सर्व ज्ञात व्हावे म्हणून हा लेखनप्रपंच!Adiwasi Tadvi Bhill : Rudhi, Parampara, Chaliriti
